नंबर तोच ठेवून मोफत मिळवा 5G सिम, जाणून घ्या सिम पोर्ट करण्याची सोपी पद्धत

इंडियन टेलीकॉम मार्केटमधील स्पर्धा सर्वश्रुत आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (VI) सह देशातील सरकारी दूरसंचार कंपनी BSNL देखील ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत असते, त्यात आता भर पडली आहे 5G ची! एयरटेल आणि जियोनं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क लाइव्ह केलं आहे परंतु वोडाफोन आयडिया आणि बीएसएनल अजून शर्यतीत उतरले नाहीत. त्यामुळे या वी आणि बीएसएनएलच्या ग्राहकांना कंपनी बदलण्याची इच्छा होऊ शकते. एक सामान्य ग्राहक फक्त 5G नव्हे तर आपल्या टेलीकॉम कंपनीच्या नेटवर्क, इंटरनेट व अन्य सर्व्हिस व्यवस्थित नसल्यामुळे त्रासून कंपनी सोडण्याचा विचार करू शकतो. आपल्या मोबाइल कंपनी आणि नेटवर्कमुळे त्रासलेल्या ग्राहकांसाठी आज आम्ही अशी सोपी पद्धत घेऊन आलो आहोत, जिच्यामुळे ते घर बसल्या मोबाइल नंबर दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करू शकतात. याला Mobile Number Portability म्हणजे MNP असं म्हटलं जातं.

या स्टेप्सद्वारे घर बसल्या करा नंबर पोर्ट

– तुमच्या फोनच्या SMS बॉक्समध्ये जाऊन नवीन मेसेज लिहिण्याचा ऑप्शन निवडा.

– इथे PORT आणि एक स्पेस देऊन तुमचा मोबाइल नंबर टाइप करा. उदाहरण : PORT 901#####88

– मेसेज टाइप झाल्यावर तो 1900 नंबर वर पाठवा.

– मेसेज सेंड होताच तुम्हाला एक नवीन मेसेज मिळेल जो 1901 नंबरवरून येईल.

– तुम्हाला एक पोर्टिंग कोड तेव्हा मिळेल जेव्हा फोन बिल पूर्णपणे पेड असेल.

– 1901 नंबरवरून मिळालेल्या मेसेजमध्ये 8 अंकी यूनिक कोड असेल. याला पोर्टिंग कोड किंवा UPC देखील म्हणतात.

– या 8 अंकी कोडच्या सुरुवातीला दोन इंग्रजी अलफाबेट असतील आणि बाकी 6 डिजिट असतील.

– हा पोर्टिंग कोड काही दिवसांसाठी वैध असेल आणि या कालावधीतच हा कोड वापरता येतो.

– हा यूनिक पोर्टिंग कोड त्या कंपनीच्या आउटलेट किंवा स्टोरवर घेऊन जावा लागेल, ज्या कंपनीच्या नेटवर्कवर तुम्हाला तुमचा नंबर ट्रान्सफर करायचा आहे.

– आउटलेटवर अ‍ॅप्लीकेशन फॉर्म दिल्यानंतर एक नवीन सिम देण्यात येईल. सध्या दूरसंचार कंपन्या होम डिलिव्हरी देखील आणि ही सर्व प्रोसेस डोर स्टेपवर देखील होऊ लागली आहे.

नंबर तोच पण कंपनी नवी

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात युजरला त्याचा मोबाइल नंबर बदलावा लागत नाही. म्हणजे ग्राहकाचा फोन नंबर तोच राहतो परंतु त्याचा ऑपरेटर म्हणजे मोबाइल कंपनी बदलते. MNP सर्व्हिस मोबाइल युजरला आपल्या मर्जीनुसार आपली मोबाइल कंपनी निवडण्याची संधी देते. ग्राहकांना जी कंपनी आवडते ती मोबाइल कंपनी त्यांचं सिम देते ज्यात मोबाइल नंबर जुनाच असतो.

PostPaid नंबर देखील करता येतो पोर्ट

PrePaid व्यतिरिक्त PostPaid दोन्ही प्रकारचे युजर्स एमएनपी सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे जे ग्राहक आपलं जुनं टेलीकॉम नेटवर्क सोडून दुसरी कंपनी निवडायची आहे त्यांच्यासाठी आम्ही एक सोपी पद्धत सांगितली आहे. जिच्या मदतीनं एका कंपनीचा नंबर दुसऱ्या कंपनीच्या नंबरमध्ये ट्रान्सफर करता येतो. हे देखील वाचा: टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here