9,800mAh च्या मोठ्या बॅटरीसह Oukitel WP21 लाँच

Oukitel ब्रँड आपल्या मजबूत आणि हटके स्मार्टफोन बनवण्यासाठी ओळखला जातो. या कंपनीचे मोबाइल फोन जास्त मजबूत बॉडी आणि अनेक दिवस बॅकअप देणाऱ्या बॅटरीसह येतात. याचा वैशिष्ट्यांसह आता अजून एक नवीन स्मार्टफोन Oukitel WP21 लाँच झाला आहे. हा मजबूत बिल्ड क्वॉलिटी असलेला एक रगेड मोबाइल फोन (Rugged Mobile Phone) आहे जो 9,800mAh Battery सह येतो. सिंगल चार्जमध्ये हा स्मार्टफोन 1150 तास म्हणजे जवळपास 48 दिवस चालू शकतो. पुढे Oukitel WP21 Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहेत.

रगेड स्मार्टफोन

Oukitel WP21 मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत परंतु याची प्रमुख यूएसपी म्हणजे रगेड बॉडी. हा मोबाइल फोन IP68 आणि IP69K रेटिंगसह येतो त्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो तसेच याला सॉलिड मजबूती मिळते. हा स्मार्टफोन जमिनीवर पडला, भिंतीवर आपटला तरी सुरक्षित राहू शकतो. MIL-STD-810H certification च्या माध्यमातून या फोनला military-grade protection मिळालं आहे त्यामुळे खराब हवामानात देखील फोन डॅमेज होत नाही. हे देखील वाचा: Airtel ने लाँच केला 155 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅन! स्वस्तात मिळणार डेटा, कॉलिंग आणि एसएमएसही

rugged smartphone Oukitel WP21 launched with 9800mAh Battery and 12gb ram

Oukitel WP21 चे स्पेसिफिकेशन्स

Oukitel WP21 के अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनच्या बॅक पॅनलवर देखील एक छोटी ऑलवेज-ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात नोटिफिकेशन, म्यूजिक कंट्रोल आणि कॅमेरा व्यू फाइंडर सारखे ऑप्शन अ‍ॅक्सेस करता येतात.

rugged smartphone Oukitel WP21 launched with 9800mAh Battery and 12gb ram

हा मोबाइल फोन अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन 12 जीबी रॅमसह लाँच झाला आहे, जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

पावर बॅकअपसाठी Oukitel WP21 मध्ये 9,800एमएएचची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 12 तास कंटिन्यू व्हिडीओ प्लेबॅक आणि 1150 तास म्हणजे जवळपास 48 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. हा फोन 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: तयार व्हा! येतोय नवा फ्लॅगशिप कीलर OnePlus Ace 2; 16GB RAM आणि 100W चार्जिंगसह सर्वात पावरफुल प्रोसेसर

फोटोग्राफीसाठी Oukitel WP21 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स 686 सेन्सर देण्यात आला आहे सोबत 20 मेगापिक्सलची नाइट व्हिजन लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एनएफसी, जीएनएसएस आणि अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येतो.

rugged smartphone Oukitel WP21 launched with 9800mAh Battery and 12gb ram

Oukitel WP21 ची किंमत

Oukitel WP21 स्मार्टफोन सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोट करतो. या फोनची किंमत 280 डॉलर्स आहे जी भारतीय करंसीनुसार 22,800 रुपयांच्या आसपास आहे. हा मोबाइल फोन चीनमध्ये या आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होईल. भारतात मात्र हा फोन आयत करूनच खरेदी करता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here