टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु

Jiobook sale on reliance digital price specification video photos

JioBook Laptop Sale: टेलीकॉम विश्वात नवी क्रांती घडवणारी कंपनी Reliance Jio आता Laptop मार्केटवर राज्य करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी मध्ये IMC 2022 (इंडियन मोबाइल कांग्रेस 2022) दरम्यान JioBook सादर केल्यानंतर कंपनीनं गुपचुप हा लॅपटॉप सेलसाठी उपलब्ध केला आहे. जर तुम्ही देखील हा स्वस्त लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा Reliance Digital च्या साइटवर सेलसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा लॅपटॉप सरकारी ई-कॉमर्स पोर्टलवर देखील उपलब्ध झाला होता. चला जाणून घेऊया या लॅपटॉपच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

JioBook Laptop Price

JioBook Price ची किंमत पाहता या लॅपटॉपची MRP 35,605 रुपये आहे. परंतु Reliance Digital वर बेस्ट डील दरम्यान हा लॅपटॉप 15,799 वर विकला जात आहे. तसेच, क्रेडिट कार्ड (Yes Bank, Kotak Mahindra Bank, Axis Bank इत्यादी बँक) द्वारे खरेदी केल्यास डिस्काउंटही मिळेल. इतकेच नव्हे तर 758.56 रुपयांच्या EMI ऑप्शन वर देखील हा लॅपटॉप विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त सीरिजमध्ये नव्या Samsung स्मार्टफोनची एंट्री; 4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह Galaxy A04e लाँच

JioBook सध्या Reliance Digital वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा लॅपटॉप सिंगल कलर ऑप्शन-Jio Blue मध्ये विकत घेता येईल. कंपनीकडून JioBook वर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा लॅपटॉप https://gem.gov.in/ वेबसाइटवर 19,500 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला होता, जिथून फक्त सरकारी डिपार्टमेंट्सना खरेदी करता येते

JioBook specifications आणि features

JioBook ची बॉडी प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि यात 4जी सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book च्या कीबोर्डमध्ये विंडोज बटनच्या जागी Jio लिहिण्यात आलं आहे. तसेच, Jio Book च्या बॅक पॅनलवर जियोची ब्रँडिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. तसेच यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर याआधी अनेक Smartphone मध्ये देखील दिसला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो आणि याचा कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.

Jiobook sale on reliance digital price specification video photos

1.2 किलोग्राम वजन असलेल्या जियो लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे, जी 128GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. प्रथमदर्शनी Jio Book क्रोमबुक सारखा वाटतो. तसेच यात विंडोज असलेला कीबोर्ड देखील आहे. Jio Book मध्ये विंडोजचे काही आवश्यक अ‍ॅप्स आहेत, परंतु ऑपरेटिंग सिस्टम जियो (JioOS) ची आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एचडी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Airtel Sim हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित करा ब्लॉक; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Jio Book सह जियोचे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. यात जियो क्लाउड पीसीचा देखील सपोर्ट आहे. Jio Book मध्ये मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर प्री-इंस्टॉल मिळतो. तसेच कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बार देखील आहे. ड्युअल स्पिकर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता JioBook वाय-फाय (802.11ac), LTE (B3, B5, B40), ब्लूटूथ v5, एचडीएमआय मिनी पोर्ट, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि मायक्रोयूएसडी कार्ड रीडर आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here