Matter Energy ने सादर केली गियर बॉक्स असलेली पहिली इलेक्ट्रिक बाइक; जोडीला वॉटरप्रूफ बॅटरी

Matter Energy नं भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. ही पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यात गियरबॉक्स देण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीनं 4 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. तसेच यात ABS सिस्टम देखील देण्यात आली आहे. तसेच लिक्विड कूलिंग सिस्टम, 5.0 kWh ची बॅटरी देखील आहे. Matter Energy चा दावा आहे की ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जमध्ये 125 किमी ते 150 किमीची रेंज ऑफर करते.

Matter Energy electric bike: बॅटरी, मोटर आणि पावरट्रेन डिटेल्स

Matter Energy इलेक्ट्रिक बाइकमध्ये IP67-रेटेड लिक्विड कूल, 5.0 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे जी घरातली रेग्युलर 5A हाउसहोल्ड सॉकेटद्वारे चार्ज करता येते. ही बाइक फक्त 5 तासांमध्ये फुल चार्ज होते. या बाइकमध्ये 10.5kW ची मोटर देण्यात आली आहे जी रियर व्हील मध्ये 520Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये तीन मोड मिळतील. ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे ज्यात पारंपरिक गियरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यात 4 स्पीड यूनिट मिळतात. तसेच यात ड्युअल चॅनेल ABS सिस्टम आहे. हे देखील वाचा: दगडासारखा मजबूत मोबाइल फोन! झेलू शकतो आग आणि पाण्याचा मारा, बॅटरी टिकेल 1150 तास!

Matter Energy electric bike: फीचर्स

Matter ची इलेक्ट्रिक बाइक फीचर पॅक टू व्हीलर व्हेईकल आहे, ज्यात 7 इंचाचा टच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो निवेगेशन, नोटिफिकेशन अलर्ट आणि म्यूजिक प्लेबॅक डिस्प्ले करतो. तसेच ऑल कंट्रोल बटन आणि हँडलबार माउंटेड स्विचगेयर देखील मिळतात. या इलेक्ट्रिक बाइकला वेळोवेळी सॉप्टवेयर अपडेट देण्याचा शब्द देखील कंपनीनं दिला आहे.

Matter e-bike मध्ये की-लेस ऑपरेशन फीचर देण्यात आलं आहे. तसे ऑनबोर्ड चार्जर आणि 5 लीटरचा ग्लव्हबॉक्स टँक देण्यात आला आहे. ही बाइक अ‍ॅपच्या माध्यमातून पण कनेक्ट करता येते, ज्यात युजर्स थेफ्ट डिटेक्शन, चार्जिंग प्रसेंटेज, राइड स्टेट्स अशी माहिती मिळवूं शकतात. या बाइकमध्ये पार्किंग असिस्ट देखील देण्यात आला आहे.

Matter Energy electric bike: डिजाइन आणि व्हेरिएंट

Matter Energy इलेक्ट्रिक बाइकची डिजाइन पाहता ही नेकेड स्ट्रीटफाइटर लुकसह येते. या बाइकमध्ये LED लाइट आणि ऑटो कॅन्सलिंग इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. तसेच स्प्लिट सीट देखील आहेत. ही बाइक ग्रे, नियॉन, ब्लू आणि गोल्ड, ब्लॅक आणि गोल्ड आणि रेड, व्हाइट, ब्लॅक अशा चार कलर ऑप्शनमध्ये येते. हे देखील वाचा: Airtel ने लाँच केला 155 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅन! स्वस्तात मिळणार डेटा, कॉलिंग आणि एसएमएसही

Matter Energy electric bike: इंडिया लाँच आणि प्राइस

Matter Energy च्या या इलेक्ट्रिक बाइकची बुकिंग 2023 च्या पहिला तिमाहीत सुरु होईल. कंपनीनं अजूनतरी किंमतीची घोषणा केली नाही. मॅटर एनर्जी इलेक्ट्रिक बाइकची विक्री एप्रिल 2023 मध्ये सुरु होईल. ही बाइक तीन व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here