Gadget - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 02 May 2023 09:34:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20632 देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल. Jio Dive ची किंमत जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं […]

The post जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • JioDive VR headset लाँच झाला आहे.
  • यावर 100 इंच वचुर्अल स्क्रीनचा एक्सपीरियंस मिळतो.
  • हे JioMart वरून विकत घेता येईल.

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल.

Jio Dive ची किंमत

जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं 1,299 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा हेडसेट रिलायन्स जियोच्या ऑफिशियल वेबसाइट सोबतच JioMart वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे, जिथे हा ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. हा विकत घेताना Paytm वॉलेटनं पेमेंट केल्यास कंपनीकडून 100 रुपयांचा डिस्काउंट आणि 500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हे देखील वाचा: Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर

Jio Dive चे फीचर्स

  • 360-degree View
  • 100″ virtual screen
  • Switch camera angles

जियो डाइव व्हीआर हेडसेट आयपीएलच्या टी-20 क्रिकेट मॅचसाठी सादर करण्यात आला आहे. हा डिवायस डोळ्यांना लावल्यानंतर युजर्सना 100 इंचाची वचुर्अल स्क्रीन अनुभवता येते. तसेच 360 डिग्री व्यूइंग एक्सपीरियंस मिळतो ज्यामुळे तुम्ही स्टेडियममध्ये असल्यासारखं वाटतं. तसेच सर्व खेळाडूंची हालचाल बघण्यासाठी अनेक कॅमेरा अँगल देखील यात आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता.

Jio Dive चे स्पेसिफिकेशन्स

  • Android 9/iOS 15
  • Adjustable lenses
  • 3-way adjustable strap

रिलायन्स जियोचं हे नवीन गॅजेट अँड्रॉइड स्मार्टफोन तसेच अ‍ॅप्पल आयफोनसह देखील वापरता येईल. यासाठी अँड्रॉइड 9 आणि आयओएस 15 वरील व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाइल फोनवरून कनेक्ट करण्यासाठी लक्षात असू द्या की त्या फोनची स्क्रीन 4.7 इंच ते 6.7 इंच दरम्यान असावी. हे देखील वाचा: Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

Jio Dive VR Headset फोनमध्ये jioImmerse अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येईल. या हेडसेट गॅजेसचे डायमेंशन 195 x130 x90एमएम आणि वजन 325 ग्राम आहे. परफेक्ट फिटसाठी यात 3-वे अडजस्टेबल स्ट्रॅप मिळतो, तसेच तुमच्या सोयीनुसार लेन्स देखील साइड व्हीलच्या माध्यमातून सेट करता येईल.

The post जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/#respond Thu, 08 Aug 2019 14:41:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5006 Nubia Z20 ची मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेला डुअल डिस्प्ले आहे.

The post डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ZTE चा सब-ब्रँड Nubia ने गेल्याच आठवड्यात अधिकृत माहिती दिली होती कि कंपनी येत्या 8 ऑगस्टला आपल्या झेड सीरीजचा विस्तार करत Nubia Z20 सादर करणार आहे. आज कंपनीने फ्लॅगशिप डिवाईस सादर केला आहे. खूप पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात आला आहे. Nubia Z20 ची मोठी खासियत फोन मध्ये देण्यात आलेला डुअल डिस्प्ले आहे. चला जाणून घेऊया Nubia Z20 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

डुअल डिस्प्ले

Nubia Z20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.42-इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 5.1-इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. Nubia Z20 ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.0 टेक्नॉलॉजी सह येतो. या डिस्प्ले वर फोन अनलॉक न करता टेक्स्ट, ग्राफिक्स व वीडियो इत्यादी बघता येतात.

स्पेसिफिकेशन्स

Nubia Z20 चा हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित नुबिया यूआई 7.0 वर सादर केला गेला आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या सर्वात नवीन व पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालतो. कंपनीने हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्यात 6जीबी रॅम व 8जीबी रॅम देण्यात आला आहे. हे वेरिएंट 64जीबी मेमरी, 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी च्या इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Z20 ट्रिपल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप रियर व फ्रंट दोन्हींचे काम करतो. कंपनीने फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे जो 30एक्स डिजीटल झूमला सपोर्ट करतो.

Nubia Z20 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स व फिंगरप्रिंट सेंसर सोबत पावर बॅकअप साठी 27वॉट फास्ट चार्जिंग व क्विक चार्ज 4.0 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Nubia Z20 रेड, ब्लू आणि ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. किंमत पाहता फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 3499 युआन (जवळपास 35,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. त्याचप्रमाणे फोनचा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 3699 युआन (जवळपास 37,000 रुपये) आणि 8जीबी रॅम + 512जीबी मेमरी वेरिएंट 4199 युआन (जवळपास 42,000 रुपये) मध्ये आला आहे. चीन मध्ये हा फोन 16 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post डुअल डिस्प्ले असलेला Nubia Z20 लॉन्च, याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेल्फी आणि रियर दोन्हींचे करतो काम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zte-nubia-z20-launch-with-dual-display-triple-camera-8gb-ram-specs-price/feed/ 0
आला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन, आता बदलतील स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-under-screen-camera-usc-technology-unveiled-mec-shanghai-with-meshtalk/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-under-screen-camera-usc-technology-unveiled-mec-shanghai-with-meshtalk/#respond Thu, 27 Jun 2019 14:52:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4678 सेल्फी घेण्यासोबतच फेस अनलॉक आणि वीडियो कॉलिंग सह इमर्सिव स्क्रीन व्यूइंगचा पण शानदार अनुभव मिळेल.

The post आला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन, आता बदलतील स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी Under-Screen Camera असलेल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच हि टेक्नॉलॉजी जगासमोर येईल. तसेच काल शांघाई मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉग्रेसच्या मंचावरून जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन सादर केला आहे. आता पर्यंत वॉटरड्रॉप नॉच, पॉप-अप आणि पंच-होल डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जात होता पण ओपोच्या या फोन मध्ये स्क्रीनच्या खाली कॅमेरा देण्यात आला आहे जो बाहेरून इनविजिबल म्हणजे अदृश्य असतो. Oppo ने हि अनोखी टेक्नॉलॉजी समोर आणून स्मार्टफोनच्या दुनियेत एक नवीन सुरवात केली आहे.

Oppo ने आपल्या या अनोख्या टेक्नॉलॉजीला Under-Screen Camera (USC) चे नाव दिले आहे. MWC Shanghai 2019 च्या मंचावरून कंपनीने आपला प्रोटोटाइप मॉडेल सादर केला आहे. हि टेक्नोलॉजी प्रदर्शित करत Oppo ने सांगितले आहे कि हि टेक्नॉलॉजी कस्टमाइज कॅमेरा मॉड्यूल सह काम करते जो एन्हांस्ड ट्रांसपॅरेंट पॅनल मटेरियलच्या खाली फिट केला गेला आहे. अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी सह Oppo फोन ट्रूली फुल-स्क्रीन सह लॉन्च होतील.

असे करेल काम

हि टेक्नॉलॉजी असलेल्या Oppo स्मार्टफोन्स मध्ये सेल्फी कॅमेरा इनविजिबल असेल. हा फोन एक नव्हे तर दोन डिस्प्ले सह येईल. फोन डिस्प्ले खाली अजून एक डिस्प्ले असेल. खालच्या डिस्प्ले वरच सेल्फी कॅमेरा सेंसर असेल. कॅमेरा सोबतच या डिस्प्ले वर लाईट सेंसर पण दिला जाईल. हा लाईट सेंसर दोन्ही डिस्प्ले सह काम करेल. हि टेक्नॉलॉजी बऱ्याच अंशी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखी असेल.

Oppo Under-Screen Camera डिस्प्लेच्या खालून काम करेल आणि डिस्प्लेच्या बाहेरून यूजरला हा दिसणार नाही. टेक्नॉलॉजी अशी असेल कि सेल्फीची कमांड देताच खालच्या डिस्प्ले वरील कॅमेरा सेंसर चालू होईल आणि फोटो कॅप्चर करेल. कंपनीचा दावा आहे कि यूजरला सेल्फी घेण्यासोबतच फेस अनलॉक आणि वीडियो कॉलिंग सह इमर्सिव स्क्रीन व्यूइंगचा पण शानदार अनुभव मिळेल.

Oppo नुसार हि टेक्नॉलॉजी ‘कंप्लीट फोटोग्राफी एक्सपीरियंस’ देईल जी आगामी काळात अजून एडवांस केली जाईल. कंपनी USC टेक्नॉलॉजीचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे आणि हा कॅमेरा स्मार्ट ब्यूटी मोड आणि फोटो फिल्टर सारख्या फीचर्सला पण सपोर्ट करेल. कंपनीने कस्टमाइज कॅमेरा मॉड्यूल तयार केला आहे जो जोनिंग कंट्रोल फीचरच्या मदतीने जास्त प्रकाश कॅप्चर करतो. विशेष म्हणजे Oppo ने बेजल्स हटवण्यासोबत एचडीआर आणि चांगल्या फोटो क्वॉलिटी साठी व्हाइट बॅलेन्सचा वापर केला आहे.

Oppo MeshTalk

एमडब्ल्यूसी शांघाईच्या मंचावरून कंपनीने अजून एक नवीन टेक्नॉलजी ‘MeshTalk’ पण सादर केली आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने Oppo फोन यूजर कोणत्याही सेल्युलर नेटवर्क, ब्लूटूथ आणि वाई-फाई कनेक्शनविना पण वॉयस कॉल करू शकतील. तसेच टेक्स्ट मेसेज पण पाठवता येतील. पण यासाठी तुम्ही ज्याला कॉल किंवा मेसेज करत आहेत तो फोन तुमच्या पासून 3 किलोमीटरच्या रेंज मध्ये असावा.

The post आला जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन, आता बदलतील स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-under-screen-camera-usc-technology-unveiled-mec-shanghai-with-meshtalk/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-rollable-display-device-patent-uspto/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-rollable-display-device-patent-uspto/#respond Thu, 02 May 2019 11:06:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4214 पेटेंट मध्ये समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सॅमसंगच्या या डिवाईसचा डिस्प्ले मोठा असेल, जो सामान्य घड्याळापेक्षा खूप रुंद

The post सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने फेब्रुवारीत आपला बहुप्रतीक्षित फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold सादर केला होता. सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन एखाद्या डायरी प्रमाणे बंद होतो. या फोनने टेक मंचावर येताच सर्वांचे लक्ष वेधले. Galaxy Fold बद्दल टेक एक्सपर्ट्स कडून संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हा शानदार डिवाईस सादर केल्यानंतर सॅमसंग थांबणार नाही. आता बातमी समोर येत आहे कि सॅमसंग अजून एक अशाच अनोख्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो एखाद्या डायरी नव्हे तर मनगटावरील घड्याळाप्रमाणे वाकेल.

91मोबाईल्स ने सॅमसंगच्या या अनोख्या डिवाईसची माहिती दिली आहे. 91मोबाईल्सला सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनची पेटेंट फाईल मिळाली आहे ज्यात फोनच्या डिजाईनच्या सूचना लपलेल्या आहेत. हि पेटेंट फाईल यूनाईटेड स्टेट पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिस म्हणजे USPTO च्या डाटाबेस मध्ये मिळाली आहे. या पेटेंट मध्ये सॅमसंग ने अनेक डिजाईन फाईल्सचा समावेश केला आहे. पेटेंट सोबत सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोनच्या डिजाईनचा फोटो पण समोर आला आहे.

पेटेंट वरून झाला खुलासा
प्राप्त पेटेंट मध्ये सॅमसंगचा रोलेबल डिवाईस दाखवण्यात आला आहे. हा डिवाईस अशा डिजाईन वर बनवला जात आहे जी एखाद्या बँड किंवा घड्याळाप्रमाणे गोलाकार असेल. पेटेंटे फाईल मध्ये या डिवाईसचे अनेक फोटोज आहेत. फोटो वरून समजले आहे कि सॅमसंगच्या या डिवाईस मध्ये 20 पेक्षा जास्त हींज दिले जातील जे एकमेकांच्या जवळ असतील. विशेष म्हणजे एखादा स्मार्टफोन याच हींजच्या सपोर्टने बंद होतो किंवा घडी होतो.

सॅमसंगचा हा आगामी डिवाईस पण याच ​हींजेसच्या सपोर्टने रोल होईल. ज्याप्रमाणे एखादा कागद गोल आकारात रोल केला जाऊ शकतो त्याप्रमाणे हा सॅमसंग डिवाईस पण रोल होईल. हा डिवाईस खूप जास्त फ्लेक्सीबल असेल आणि याच खास टेक्नॉलॉजीमुळे सॅमसंग फोन हातावर एखाद्या घड्याळाप्रमाणे किंवा बँड प्रमाणे बांधता येईल. पण पेटेंट मध्ये समोर आलेल्या फोटो वरून समजते कि सॅमसंगच्या या डिवाईसचा डिस्प्ले मोठा असेल, जो सामान्य घड्याळापेक्षा खूप रुंद असेल.

फोटोवरून समजले आहे कि हा डिवाईस फोल्ड केल्यानंतर डिस्प्लेचा भाग त्याच्या इतर भागांना कवर करेल, तसेच फोन उघडल्यावर हा पुन्हा एका सिंगल मोठ्या स्क्रीन मध्ये रूपांतरित होई. सॅमसंगच्या फोल्डेबल फोन मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत तर या रोलेबल फोन मध्ये एकच डिस्प्ले दिसत आहे. विशेष म्हणजे USPTO वरील हे पेटेंट ऑगस्ट 2017 मधील आहेत जे वेळोवेळी अपडेट केले जात आहेत. नवीन अपडेट मध्ये या डिवाईसचे स्केच फोटोज मिळाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर यात 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोल्ड करून एका छोट्या टॅबलट मध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होईल. गॅलेक्सी फोल्ड एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नव्या वनयूआई इंटरफेस वर सादर केला गेला आहे जो 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.

या फोन मध्ये 6 कॅमेरा आहेत. फोनच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्स वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. रियर कॅमेरा सेटअप मध्ये मेन सेंसर 16एमपी चा आहे तो अल्ट्रा वाइडला सपोर्ट करतो आणि हा एफ/2.2 अपच्रर सह येतो. तसेच दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनी ने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 पासून एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तर तिसरा सेंसर टेलीफोटो आहे. यात 2एक्स ऑटिकल जूम सपोर्ट आहे.

तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. सोबत तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तसेच आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि हा एफ/1.9 अपर्चर वाला आहे. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज आहेत. या दोन्ही बॅटरीज फोनच्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतात. या दोन्ही बॅटरिजची कॅपेसिटी मिळून 4,380एमएएच होते. Galaxy Fold ची किंमत 1,980 डॉलर (जवळपास 1,40,639 रुपये) ठेवण्यात आली आहे.

The post सॅमसंग घेऊन येत आहे कागदाप्रमाणे घडी होणार फोन, बांधता येईल मनगटावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-foldable-rollable-display-device-patent-uspto/feed/ 0
ट्रेन मध्ये हरवला ऑनरचा फोन, शोधून देणाऱ्याला मिळेल 3,90,000 रुपयांचे बक्षीस https://www.91mobiles.com/marathi/honor-lost-prototype-phone-in-train-offering-5000-euro-reward/ https://www.91mobiles.com/marathi/honor-lost-prototype-phone-in-train-offering-5000-euro-reward/#respond Thu, 25 Apr 2019 10:55:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4157 ऑनरच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीचा प्रोटोटाइप फोन हरवला आहे आणि त्यामुळे संपूर्ण कंपनी हादरली आहे.

The post ट्रेन मध्ये हरवला ऑनरचा फोन, शोधून देणाऱ्याला मिळेल 3,90,000 रुपयांचे बक्षीस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल फोन सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. मोबाईल फोन आता फक्त कॉलिंग किंवा ​मनोरंजन नव्हे तर रोजच्या आयुष्यातील कामांमध्ये पण वापरला जातो. जेव्हा हा फोन हरवतो तेव्हा मोठी अडचण होते. फोन हरवल्याने पैशांच्या नुकसानीपेक्षा जास्त निराशा त्यातील मीडिया फाइल्स, कॉन्टॅक्ट लिस्ट तसेच इतर डाक्यूमेंट्स व मेसेज पण आपल्याकडे नसतात यामुळे होते. पण जरा विचार करा जर एखाद्या स्मार्टफोन कंपनीनेच आपला प्रोटोटाइप फोन हरवला तर काय होईल. अशाच दुःखद घटनेची शिकार झाली आहे टेक कंपनी ऑनर. ऑनरच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीचा प्रोटोटाइप फोन हरवला आहे आणि त्यामुळे संपूर्ण कंपनी हादरली आहे.

प्रोटोटाइप फोन म्हणजे काय
प्रोटोटाइप फोन म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. दुकानात येण्याआधी स्मार्टफोन अनेकप्रकारच्या स्टेप्स मधून जातो. आणि जेव्हा फोन निर्मितीच्या सुरवातीच्या स्टेज वर असतो तेव्हा याची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. या स्टेज मध्ये फोनची सर्वप्रकारची टेस्टिंग केली जाते ज्यात हार्डवेयर व सॉफ्टवेयर सोबत याची डिजाईन पण तपासली जाते. या स्टेज मध्ये असलेल्या फोनला प्रोटोटाइप फोन म्हटले जाते. हा फोन पूर्णपणे डेवेलप नसतो, फक्त त्याच्या फीचर्सची टेस्टिंग केली जाते आणि गरजेनुसार यात बदल केले जातात.

आता तुम्ही समजू शकता कि कोणत्याही स्मार्टफोन कंपनी साठी प्रोटोटाइप फोन किती जास्त महत्वाचे असतात. अशाच एका प्रोटोटाइप फोन वर ऑनर कंपनी काम करत होती. या फोन मध्ये ऑनरच्या काही अशा आइडिया होत्या ज्या गुप्त होत्या. हा प्रोटोटाइप फोन घेऊन कंपनीचा एक कर्मचारी ट्रेन मध्ये प्रवास करत होता. पण प्रवासात काही कारणास्तव ऑनरचा प्रोटोटाइप फोन ट्रेन मध्ये हरवला.

हे देखील वाचा: BSNL ने या तीन प्लान मध्ये केले बदल, मिळेल 25 पट जास्त डेटा

असा हरवला
हि घटना जर्मनीची आहे. ऑनर ने आपल्या आफिशियल ट्वीटर हँडेल वर याची माहिती देत सांगितले कि गेल्या सोमवारी एक ऑनर कर्मचारी डुसॅलड्रॉर्फ वरून म्यूनिकच्या ट्रेन मध्ये बसला होता. चुकून ऑनरचा प्रोटोटाइप या ट्रेन मध्ये राहिला. ऑनर कर्मचारी म्यूनिकला उतरल्यावर त्याला फोन मिळाला नाही. हा फोन हरवल्यानंतर ऑनर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून हि माहिती सार्वजनिक केली आहे.

शोधून देणाऱ्यास मोठा ईनाम
हि घटना झाल्यानंतर ऑनर ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर प्रोटोटाइप फोन साठी बक्षिसाची घोषणा केली आहे. ऑनर ने म्हटले आहे कि कंपनीचा हरवलेला प्रोटोटाइप फोन शोधून आणणाऱ्यास 5000 यूरो बक्षीस म्हणून दिले जातील. हैराणीची बाब म्हणजे हि रक्कम इंडियन करंसीनुसार जवळपास 3,90,418 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे ऑनरचा हरवलेला फोन शोधणाऱ्याला कंपनी कडून जवळपास 4 लाख रुपयांची बक्षीस दिली जाईल.

हे देखील वाचा: TikTok वरचा बॅन हटला ! पुन्हा करता येईल फोन मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध

ऑनर ने सांगितले आहे कि हा प्रोटोटाइप फोन ग्रे रंगाच्या प्रोटेक्टिव केस मध्ये होता आणि फोनचा कॅमेरा पण केस ने शटर पासून ढाकलेला होता. पण हा प्रोटोटाइप ऑनरच्या कोणत्या फोनचा होता हे अजून समजले नाही, तसेच का कंपनी हा शोधून देणाऱ्यास मोठी बक्षीस देत नाही. बातमी देत असे पर्यंत हा फोन मिळालेला नाही.

The post ट्रेन मध्ये हरवला ऑनरचा फोन, शोधून देणाऱ्याला मिळेल 3,90,000 रुपयांचे बक्षीस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-lost-prototype-phone-in-train-offering-5000-euro-reward/feed/ 0
चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी https://www.91mobiles.com/marathi/smartphone-will-charge-by-walk-kinetic-energy-delhi-student-develop-new-techno-gadget-make-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-will-charge-by-walk-kinetic-energy-delhi-student-develop-new-techno-gadget-make-in-india/#respond Fri, 29 Mar 2019 15:23:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3971 दोन प्रोटोटाईप प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले होते.

The post चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन्सची टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. फोनचा लुक आणि डिजाईन सोबतच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण एडवांस झाले आहेत. लो बजेट फोन असो वा ​हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस सर्वांमध्ये जीव ओतण्याचे काम करते फोनची बॅटरी. जास्तीत जास्त बॅकअप देण्यासाठी स्मार्टफोन ब्रँड फोन मध्ये मोठी बॅटरी देतात जे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह पण येतात. पण हे चार्ज करण्यासाठी तुम्हाला प्लग इन करावेच लागते. पण जरा विचार करा तुमच्या चालण्यामुळे तुमचा मोबाईल चार्ज होऊ लागला तर कसे वाटेल. वाचताना निश्चितच वेगळे किंवा अशक्य वाटत असेल पण हि टेक्नॉलॉजी निर्माण झाली आहे. आणि तुम्हाला ऐकून आनंद होईल कि हि अनोखी टेक्नॉलॉजी शोधणारे अमेरिका किंवा चीन मधले नसून भारताची राजधानी दिल्ली मध्ये राहणारी 2 मुलं आहेत.

हे तर सर्वांनाच माहित आहे कि मोबाईलमुळे जीवनशैली एडवांस तर झाली आहे पण फोनच्या वापराने लोकांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम पण झाला आहे. मोबाईल मध्ये गेम आणि इंटरनेटमुळे लोकांची मेहनत कमी झाली आहे. फोन बारीक होत आहेत आणि वापरकर्ते जाड. याच विचाराने दिल्लीच्या दोन किशोरवयीन मुलांना नवीन टेक्नॉलॉजी निर्माण करण्यास प्रेरणा दिली आहे. या मुलांची नावे आहेत मोहक भल्ला आणि आनंद गंगाधरन.

चालण्यामुळे होईल फोन चार्ज
मोहक आणि आनंद यांनी एका अश्या गॅजेटची निर्मिती केली आहे जो तुमच्या चालण्यामुळे निर्माण होणाऱ्या उर्जेला विद्युत ऊर्जेत रूपांतरित करून फोनची बॅटरी चार्ज करेल. दोन्ही युवकांनी बनवलेला हा गॅजेट सध्या प्रोटेटाईप स्टेज वर आहे. हा डिवाईस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या सिद्धांतावर चालतो. हा डिवाईस बुटांमध्ये टाचेखाली असेल, ज्यात एक डायनामो आहे जो बफर मॅक्नेजिम वर चालतो. जेव्हा व्यक्ति चालतो तेव्हा हा फिरतो. चालताना हा फिरून कायनेटिक एनर्जी निर्माण करतो. हि पावर केबल द्वारे मोबाईल पर्यंत पोहचवली जाते जी विजेट रूपांतरित होऊन फोनची बॅटरी चार्ज होते.

10वीच्या मुलांचा कारनामा
आनंद आणि मोहक यांना हि कल्पना 4 वर्षांपूर्वी सुचली होती जेव्हा ते 10वीत होते. फिजिक्सच्या एका प्रोजेक्ट साठी त्यांनी या गॅजेट वर काम करायला सुरवात केली होती. शाळा शिक्षक आणि कुटुंबाच्या मदतीने त्यांनी अश्या डिवाईसची निर्मिती केली जो चालल्यावर निर्माण झालेल्या एनर्जीने फोन चार्ज करू शकतो. विशेष म्हणजे या गॅजेटची निर्मिती पहिल्या दुसऱ्या नव्हे तर तिसऱ्या प्रयत्नात झाली होती. दोन प्रोटोटाईप प्रोजेक्ट फेल झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले होते.

फक्त 500 रुपये असेल कॉस्ट
मोहक आणि आनंद आज कॉलेज मध्ये शिकत आहेत. ते म्हणतात कि येत्या काही दिवसांत हा प्रोटोटाईप पूर्णपणे डेवेलप होऊन बाजारात येईल. या एडवांस टेक्नॉलॉजी वाल्या गॅजेटची किंमत पण जास्त नसेल. 500 रुपयांच्या किंमतीत हा डिवाईस सहज विकत घेता येईल.

सोर्स

The post चालता चालता चार्ज होईल तुमचा फोन, दिल्लीच्या दोन मुलांनी शोधली अनोखी टेक्नॉलॉजी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-will-charge-by-walk-kinetic-energy-delhi-student-develop-new-techno-gadget-make-in-india/feed/ 0