Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर

Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details
Highlights

  • Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 दोन्ही फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी.
  • फ्लिपकार्टवर गुगलच्या दोन्ही फोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
  • Flipkart वर 4 मे पासून सुरु होणार आहे बिग सेव्हिंग डे सेल

Flipkart वर 4 मे से बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर मिळत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अपकमिंग सेलमध्ये मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्स टीज करत आहे. फ्लिपकार्टनं आता Pixel 7 आणि Pixel 7 Pro वरील ऑफर समोर ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डीलची माहिती देत आहोत.

गुगल पिक्सल 7 प्रो आणि पिक्सल 7 फ्लिपकार्ट ऑफर

Google Pixel 7 Pro स्मार्टफोन भारतात 84,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच काही निवडक बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. तर जुना फोन एक्सचेंज केल्यावर फ्लिपकार्ट 28,250 रुपयांचा अतिरिक डिस्काउंट ऑफर करत आहे. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच

फ्लिपकार्टवर 4 मे पासून सुरु होणाऱ्या सेल दरम्यान Pixel 7 Pro स्मार्टफोन 65,999 रुपयांमध्ये विकला जाईल. यात एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटचा समावेश आहे. Pixel 7 Pro स्मार्टफोन 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तीन कलर ऑप्शन – ब्लॅक, व्हाइट आणि ग्रे मध्ये विकला जातो.

Pixel 7 स्मार्टफोन पाहता Flipkart Big Saving Days सेल दरम्यान हा फोन 15000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. गुगलच्या फोनची किंमत 69,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा 44,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिस्काउंटेड किंमतीत प्राइस कट, बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. Pixel 7 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तीन कलर – लाइम, व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

गुगल पिक्सल 7 आणि पिक्सल 7 प्रो स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : Google Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर Pixel 7 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.1-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

प्रोसेसर : गुगलच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गुगलनं स्वतः डेव्हलप केला आहे.

कॅमेरा : Pixel 7 Pro मध्ये 50MP वाइड अँगल कॅमेरा, 48MP टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर Pixel 7 मध्ये 50MP वाइड कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 10.8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

बॅटरी : Pixel 7 Pro स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि Pixel 7 स्मार्टफोनमध्ये 4,355mAh ची बॅटरी मिळते. गुगलचे हे दोन्ही फोन 30W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. तसेच पिक्सल स्मार्टफोन Qi-सर्टिफाय वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

रॅम आणि स्टोरेज : Goole Pixel 7 Pro स्मार्टफोन पाहता हा 12GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. तर Google Pixel 7 फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळतो. हे देखील वाचा: Nothing घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, ऑफिशियल रेंडर आले समोर

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल

Flipkart वर बिग सेव्हिंग डे सेल 4 मेला लाइव्ह होईल. या सेल दरम्यान फ्लिपकार्टवरील 80 टक्के प्रोडक्टवर डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्टनं आगामी सेल टीज करत सांगितलं आहे की इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, टीव्ही आणि अ‍ॅप्लायंसेजवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here