जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL

Highlights

  • JioDive VR headset लाँच झाला आहे.
  • यावर 100 इंच वचुर्अल स्क्रीनचा एक्सपीरियंस मिळतो.
  • हे JioMart वरून विकत घेता येईल.

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल.

Jio Dive ची किंमत

जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं 1,299 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा हेडसेट रिलायन्स जियोच्या ऑफिशियल वेबसाइट सोबतच JioMart वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे, जिथे हा ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. हा विकत घेताना Paytm वॉलेटनं पेमेंट केल्यास कंपनीकडून 100 रुपयांचा डिस्काउंट आणि 500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हे देखील वाचा: Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर

Jio Dive चे फीचर्स

  • 360-degree View
  • 100″ virtual screen
  • Switch camera angles

जियो डाइव व्हीआर हेडसेट आयपीएलच्या टी-20 क्रिकेट मॅचसाठी सादर करण्यात आला आहे. हा डिवायस डोळ्यांना लावल्यानंतर युजर्सना 100 इंचाची वचुर्अल स्क्रीन अनुभवता येते. तसेच 360 डिग्री व्यूइंग एक्सपीरियंस मिळतो ज्यामुळे तुम्ही स्टेडियममध्ये असल्यासारखं वाटतं. तसेच सर्व खेळाडूंची हालचाल बघण्यासाठी अनेक कॅमेरा अँगल देखील यात आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता.

Jio Dive चे स्पेसिफिकेशन्स

  • Android 9/iOS 15
  • Adjustable lenses
  • 3-way adjustable strap

रिलायन्स जियोचं हे नवीन गॅजेट अँड्रॉइड स्मार्टफोन तसेच अ‍ॅप्पल आयफोनसह देखील वापरता येईल. यासाठी अँड्रॉइड 9 आणि आयओएस 15 वरील व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाइल फोनवरून कनेक्ट करण्यासाठी लक्षात असू द्या की त्या फोनची स्क्रीन 4.7 इंच ते 6.7 इंच दरम्यान असावी. हे देखील वाचा: Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

Jio Dive VR Headset फोनमध्ये jioImmerse अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येईल. या हेडसेट गॅजेसचे डायमेंशन 195 x130 x90एमएम आणि वजन 325 ग्राम आहे. परफेक्ट फिटसाठी यात 3-वे अडजस्टेबल स्ट्रॅप मिळतो, तसेच तुमच्या सोयीनुसार लेन्स देखील साइड व्हीलच्या माध्यमातून सेट करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here