Gionee - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Apr 2021 09:50:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/gionee-p15-pro-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-p15-pro-launched-check-price-and-specifications/#respond Wed, 07 Apr 2021 09:50:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10539 Gionee P15 Pro स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 84.6% आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Gionee ने बजेट स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये अजून एक नवीन Gionee P15 Pro लॉन्च केला आहे. लेटेस्ट Gionee P15 Pro स्मार्टफोन दमदार 6000mAh बॅटरी आणि एंट्री लेवल मीडियाटेकचा चिपसेट Helio G35 SoC सह सादर केला गेला आहे. चायनीज स्मार्टफोन कंपनी Gionee ने हा स्मार्टफोन सध्या नायजेरियामध्ये लॉन्च केला आहे. Gionee चा हा बजेट स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात पण कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो. Gionee च्या या स्मार्टफोनची थेट टक्कर Xiaomi, Realme, Samsung आणि Motorola च्या एंट्री लेवल स्मार्टफोनपासून होणार आहे. इथे आम्ही तुम्हाला Gionee P15 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर आणि किंमतीची माहिती देत आहोत. (gionee p15 pro launched check price and specifications)

Gionee P15 Pro : स्पेसिफिकेशन

Gionee P15 Pro स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 84.6% आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटचा बनला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Gionee P15 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G35 SoC सह 3GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनची स्टोरेज MicroSD कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये हेडफोन जॅक, डुअल 4G सिम स्लॉट, WiFi, ब्लूटूथ आणि GPS सारखे फीचर देण्यात आले आहेत. जियोनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन Android 11 वर चालतो.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Z ने केली धमाकेदार एंट्री, यात आहे 48MP कॅमेरा, 8GB रॅम आणि खूप काही

Gionee P15 Pro : कॅमेरा

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Gionee P15 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. या कॅमेरा सेंसरसह 2 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आणि AI लेंस देण्यात आली आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅश पण देण्यात आला आहे. रियर पॅनलमध्ये या फोनचा फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस

Gionee P15 Pro : किंमत

Gionee P15 Pro स्मार्टफोन सध्या नायजेरियामध्ये सादर केला गेला आहे. हा फोन सिंगल वेरिएंट 3GB RAM + 64GB स्टोरेजसह नाइजिरिया मध्ये ₦61,500 (जवळपास 11,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. जियोनीचा हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

The post 6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-p15-pro-launched-check-price-and-specifications/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 6,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/gionee-max-pro-price-at-rs-6999-launch-in-india-with-6000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-max-pro-price-at-rs-6999-launch-in-india-with-6000mah-battery/#respond Tue, 02 Mar 2021 11:10:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10224 फोटोग्राफीसाठी Gionee Max Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्यासोबत 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 6,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये स्पेसिफिकेशन्स कितीही दमदार असले तरी जोपर्यंत फोनची बॅटरी चार्ज होत नाही तोपर्यंत तो काही उपयोगाचा नसतो. अनेक मोबाईल युजर्स असे आहेत जे मोठी बॅटरी असलेला डिवायस शोधात असतात. अश्याच लोकांचा विचार करून काल टेक ब्रँड जियोनीने भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन Gionee Max Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि याची किंमत आहे फक्त 6,999 रुपये. (Gionee Max Pro price at rs 6999 launch in india with 6000mah battery)

Gionee Max Pro

जियोनीच्या या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, जियोनी मॅक्स प्रो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ फुलव्यू डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च झाला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर स्प्रेडट्रम 9863ए चिपसेटवर चालतो.

हे देखील वाचा : Jio ने आणला बंपर इंटरनेट प्लान, 140 दिवसांत मिळेल 106GB डेटा, सुरुवाती किंमत 22 रुपये

फोटोग्राफीसाठी Gionee Max Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्यासोबत 2 मेगापिक्सलची बोका लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी जियोनी मॅक्स प्रो मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन नाईट मोड, एचडीआर मोड सारख्या फीचर्ससह येतो.

जियोनी मॅक्स प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच हा फोन गुगल असिस्टंट बटनला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. म्हणजे Gionee Max Pro ने दुसरे स्मार्टफोन पण चार्ज केले जाऊ शकतात.

हि आहे किंमत

Gionee Max Pro भारतात 3 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. जियोनीने आपला नवीन फोन 6,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो Red, Royal Blue आणि Black कलरमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर 8 मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 6,000एमएएच बॅटरी असलेला हा फोन फक्त 6,999 रुपयांमध्ये झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-max-pro-price-at-rs-6999-launch-in-india-with-6000mah-battery/feed/ 0
Samsung च्या आधी या कंपनीने लॉन्च केला M12 स्मार्टफोन, 6GB RAM सह आहे 5,100mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/gionee-m12-launch-with-5100-mah-battery-48mp-quad-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-m12-launch-with-5100-mah-battery-48mp-quad-camera-specs-price-sale/#respond Thu, 19 Nov 2020 12:26:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8996 Samsung च्या आधी चीनी कंपनी Gionee ने M12 नावाचा एक नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे.

The post Samsung च्या आधी या कंपनीने लॉन्च केला M12 स्मार्टफोन, 6GB RAM सह आहे 5,100mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनी Galaxy M12 स्मार्टफोन वर काम करत आहे ज्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. लीक्स मध्ये या फोनच्या डिजाईन सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण शेयर केली गेली आहे. सॅमसंग कधी गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन बाजारात घेऊन येईल, हि बातमी अजूनतरी स्पष्ट झाली नाही पण Samsung च्या आधी चीनी कंपनी Gionee ने M12 नावाचा एक नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे. हा फोन सध्या नाइजीरिया मध्ये लॉन्च केला गेला आहे जो शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतो.

Gionee M12

जियोनी एम12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यह फोन पंच-होल डिस्प्ले वर सादर केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेेशियो 91 टक्के आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.55 इंचाच्या आयपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्ले तीन बाजूंनी बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

Gionee M12 अँड्रॉइड आधारित फोन आहे जो दोन चिपसेट मॉडेल सह मॉर्केट मध्ये आला आहे. फोनचा एक मॉडेल मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेटला सपोर्ट करतो तर दुसऱ्या मॉडेल मध्ये मीडियाटेकचा हीलियो ए25 चिपसेट देण्यात आला आहे. हे मॉडेल्स दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. फोनच्या बेस मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठ्या वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह येत आहे लो बजेट असलेला हा शानदार फोन, Realme-Xiaomi देईल आव्हान

जियोनीचा हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि दोन 2 मेगापिक्सलचे इतर सेंसर देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी जियोनी एम12 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Gionee M12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,100एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung च्या आधी या कंपनीने लॉन्च केला M12 स्मार्टफोन, 6GB RAM सह आहे 5,100mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-m12-launch-with-5100-mah-battery-48mp-quad-camera-specs-price-sale/feed/ 0
6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह येत आहे लो बजेट असलेला हा शानदार फोन, Realme-Xiaomi देईल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/gionee-m12-specifications-on-google-play-console-launch-soon-with-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-m12-specifications-on-google-play-console-launch-soon-with-6gb-ram/#respond Wed, 04 Nov 2020 13:23:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8809 Gionee M12 Pro मध्ये MediaTek Helio P60 चिपसेट, 128GB इंटरनल स्टोरेज, एक HD + वॉटरड्रॉप डिस्प्ले, 16MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली होती.

The post 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह येत आहे लो बजेट असलेला हा शानदार फोन, Realme-Xiaomi देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Gionee पुन्हा एकदा आपले नवनवीन स्मार्टफोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने लो बजेट वाले Gionee Max भारतात लॉन्च केला होता. तर आता 91मोबाईल्सला गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये नवीन फोन Ginoee M12 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. लिस्टिंग मध्ये Gionee फोनचा मॉडेल नंबर H603B सह लिस्ट केला गेला आहे. गुगल प्ले वर समोर आले आहे कि फोनचे नाव Gionee M12 असेल. हा अपकमिंग स्मार्टफोन M12 Pro चा छोटा वर्जन माना असल्याचे बोलले जात आहे, व चीन मध्ये सप्टेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता. Gionee M12 ची किंमत आणि लॉन्च डेट बद्दल सध्यातरी कोणतीही माहिती समोर आली नाही. पण असे म्हणता येईल कि हा एंट्री-लेवल स्मार्टफोन असेल.

लिस्टिंग नुसार Gionee M12 मध्ये MediaTek Helio P22 चिपसेट आणि 4GB रॅम व 6GB रॅम असेल. स्मार्टफोन मध्ये 720p डिस्प्ले आणि फ्रंटला पंच-होल कोपऱ्यात असेल. तसेच Gionee M12 अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह येईल.

सध्या जियोनी एम 12 स्पेक्सचे समोर आले नाहीत. फोनच्या लॉन्च डेटची आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही, पण आम्ही यावर्षीच्या शेवटपर्यंत हा फोन येण्याची आशा करू शकतो.

लक्षात असू द्या कि Gionee M12 Pro मध्ये MediaTek Helio P60 चिपसेट, 128GB इंटरनल स्टोरेज, एक HD + वॉटरड्रॉप डिस्प्ले, 16MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली होती. आपण आगामी आठवड्यांमध्ये फोनच्या लॉन्च डेट, किंमत आणि उपलब्धते सहित अजून पण माहिती लीक होण्याची आशा करू शकतो.

The post 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह येत आहे लो बजेट असलेला हा शानदार फोन, Realme-Xiaomi देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-m12-specifications-on-google-play-console-launch-soon-with-6gb-ram/feed/ 0
फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 2 जीबी रॅम असलेला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-gionee-f8-neo-launched-in-india-at-rs-5499/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-gionee-f8-neo-launched-in-india-at-rs-5499/#respond Thu, 22 Oct 2020 12:21:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8620 Gionee F8 Neo अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह UNISOC SC9863A चिपसेट वर चालतो.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 2 जीबी रॅम असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Gionee ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Gionee Max लॉन्च केला होता. हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि फक्त 5,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. जियोनी मॅक्सच्या माध्यमातून कंपनीने अनेक दिवसानंतर भारतीय बाजारात पुनर्प्रवेश केला होता. पण आता वाटते आहे कि जियोनीने मोठी खेळी खेळण्यासाठी भारतात परतली आहे. देशात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत जियोनीने आज पुन्हा आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन Gionee F8 Neo नावाने भारतात लॉन्च केला आहे.

Gionee F8 Neo ने भारतीय बाजारात सध्या एकाच वेरिएंट मध्ये एंट्री घेतली आहे. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबतच 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने या फोनची किंमत 5,499 रुपये ठेवली आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. जियोनी एफ8 नियो Black, Blue आणि Red कलर मध्ये विकत घेता येईल.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

जियोनी एफ8 नियो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने नॉचलेस डिस्प्ले वर सादर केला आहे. एंट्री लेवल स्मार्टफोन असल्यामुळे फ्रंट पॅनल वर बेजल्स असलेला डिस्प्ले देण्यात आली आहे. स्क्रीनच्या वर आणि खाली रुंद पार्ट आहे तसेच साईडला नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.4 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Gionee F8 Neo अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह UNISOC SC9863A चिपसेट वर चालतो. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करणाऱ्या या फोन मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत एक्सपांड केली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : फक्त 5999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी असलेला हा नवीन फोन, रिवर्स चार्जिंगला पण करतो सपोर्ट

जियोनी एफ8 नियो एलईडी फ्लॅश सह 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Gionee F8 Neo बेसिक कनेक्टिविटी सह येतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Gionee Max

Gionee Max कंपनीने 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह Spreadtrum 9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी जियोनी मॅक्स मध्ये आईएमजी8322 जीपीयू देण्यात आला आहे.

जियोनी मॅक्स एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Gionee Max डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि सेकेंडरी डिजीटल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी, 48MP क्वॉड कॅमेरा आणि 4GB रॅम सह Huawei Y7a लॉन्च, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Gionee Max एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी जियोनी मॅक्स मध्ये रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, रेड आणि रॉयल ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला 2 जीबी रॅम असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-phone-gionee-f8-neo-launched-in-india-at-rs-5499/feed/ 0
फक्त 5999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी असलेला हा नवीन फोन, रिवर्स चार्जिंगला पण करतो सपोर्ट https://www.91mobiles.com/marathi/gionee-max-launched-in-india-with-5000mah-battery-price-at-rs-5999/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-max-launched-in-india-with-5000mah-battery-price-at-rs-5999/#respond Wed, 26 Aug 2020 10:16:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7860 Gionee Max कंपनीने 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे

The post फक्त 5999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी असलेला हा नवीन फोन, रिवर्स चार्जिंगला पण करतो सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक ब्रांड Gionee ने आज बऱ्याच दिवसांनंतर भारतीय बाजारात वापसी केली आहे. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये आर्थिक अडचणीमुळे जियोनीला आपले प्रोडक्शन बंद करावे लागेल होते. पण पुन्हा एकदा मोबाईल बाजारात चांगल्या भविष्याच्या अपेक्षांसह हि कंपनी परत आली आहे. यावेळी जियोनीने आपली सुरवात लो बजेट स्मार्टफोन Gionee Max पासून केली आहे जो इंडियन मार्केट मध्ये फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

लुक व डिजाईन

Gionee Max कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर लॉन्च केला आहे. फोन स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्स असलेल्या आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. सेटअपच्या खाली नीचे फ्लॅश आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर नाही . पावर बटन व वाल्यूम रॉकर जियोनी मॅक्सच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत तर वरच्या बाजूच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Gionee Max कंपनीने 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह Spreadtrum 9863A चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी जियोनी मॅक्स मध्ये आईएमजी8322 जीपीयू देण्यात आला आहे.

जियोनी मॅक्स एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Gionee Max डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि सेकेंडरी डिजीटल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Gionee Max एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी जियोनी मॅक्स मध्ये रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, रेड आणि रॉयल ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे जो फक्त 5,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post फक्त 5999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5000एमएएच बॅटरी असलेला हा नवीन फोन, रिवर्स चार्जिंगला पण करतो सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-max-launched-in-india-with-5000mah-battery-price-at-rs-5999/feed/ 0
6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/gionee-m11-and-m11s-smartphones-reportedly-announced/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-m11-and-m11s-smartphones-reportedly-announced/#respond Wed, 04 Sep 2019 13:58:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5223 दोन्ही फोन मध्ये खूप सारखेपणा आहे, फक्त प्रोसेसरच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत.

The post 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारात आपल्या डिवाइसने ग्राहकांना आकर्षित करणारी कंपनी Gionee गेल्या वर्षी आर्थिक कारणांमुळे डबघाईला आली होती. त्यानंतर कंपनीने आपली अधिकृत वेबसाइट पण बंद केली होती. काही दिवसांपूर्वी कंपनीचे दोन फोन Gionee M11 आणि Gionee M11s सर्टिफिकेशनस साइट वर दिसले होते. त्यामुळे बोलले जात होते कि कंपनी पुन्हा एकदा मार्केट मध्ये येईल. आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीने M11 आणि M11s सादर केले आहेत.

Gionee ने अधिकृतपणे फोन लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही. पण WeChat चॅनल वर M11 आणि M11s ची प्रोमो इमेज पोस्ट करण्यात आली आहे. दोन्ही फोन मध्ये खूप सारखेपणा आहे, फक्त प्रोसेसरच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत. फोनचे सर्व डिटेल्स समोर आले नाहीत.

Gionee M11 आणि M11s मध्ये एक सारखा ग्लास बॅक पॅनल देण्यात आला आहे. तसेच यात डुअल कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Gionee M11 थोडा कमी पावरफुल वेरिएंट वाटत आहे. प्रोमो इमेज मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असेल. तसेच फोन काही दिवसांपूर्वी सर्टिफिकेशनस साइट टेना वर दिसला होता. M11 मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 6.217-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. M11s मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले आणि 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

कंपनीच्या अधिकृत प्रोमो मध्ये Gionee M11/M11s मध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा असेल आणि कॅमेरा सेटअप पाहता यात 16MP चा प्राइमेरी कॅमेरा सेंसर आणि सेकेंडरी कॅमेरा सेंसर 5MP चा असेल. रिपोर्ट नुसार कंपनीने आपल्या अधिकृत WeChat अकाउंटवरून याची माहिती शेयर केली आहे. कंपनीने सध्या आपल्या Weibo अकाउंट आणि ऑफिशियल वेबसाइट वर नवीन स्मार्टफोन्स बद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

The post 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह या कंपनीने लॉन्च केले आपले स्मार्टफोन्स, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-m11-and-m11s-smartphones-reportedly-announced/feed/ 0
जियोनी ने कमी किंमतीत शानदार फीचर्स सह लॉन्च केला एफ205 प्रो स्मार्टफोन, बघा याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/gionee-f205-pro-launched-in-india-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/gionee-f205-pro-launched-in-india-price-specifications-in-marathi/#respond Wed, 20 Feb 2019 10:12:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3666 कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक असल्याची माहिती दिली आहे.

The post जियोनी ने कमी किंमतीत शानदार फीचर्स सह लॉन्च केला एफ205 प्रो स्मार्टफोन, बघा याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी जियोनी ने भारतीय मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन एफ205 प्रो नावाने लॉन्च केला आहे. कंपनी बऱ्याच दिवसांनी भारतीय मार्केट मध्ये परत आली आहे. कंपनीचा हा एंट्री लेवल स्मार्टफोन ग्राहकांना किती आवडतो ते बघावे लागेल. जियोनी एफ205 प्रो कंपनी द्वारा आधी लॉन्च केलेल्या एफ205 चा अपग्रेडेड वर्जन आहे.

जियोनी एफ205 प्रो ची किंमत आणि उपलब्धता
कंपनी ने डिवाइस 6,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. पण फ्लिपकार्ट वर हा डिवाइस 1,100 रुपयांच्या डिस्काउंट सह 5,890 रुपयांमध्ये जात आहे. याव्यतिरिक्त एक्सिस बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून ग्राहक 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट घेऊ शकतात. एफ205 प्रो ब्लॅक, ब्लू आणि शॅम्पेन गोल्ड रंगांत उपलब्ध आहे.

12जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला शाओमीचा दमदार मी 9 स्मार्टफोन

जियोनी एफ205 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
यात 5.45-इंचाचा एचडी+ (720×1440 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 18:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2.5डी कर्व्ड ग्लास ने सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये 1.5 गीगाहर्ट्ज क्वाड-कोर मीडियाटेक एमटी6739डब्ल्यूडब्ल्यू चिपसेट आहे. तसेच फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गरज पडल्यास 256 जीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्डचा वापर करून स्टोरेज वाढवता येईल.

जियोनी एफ205 प्रो मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 13- मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा अपर्चर एफ/2.2 आहे.

एयरटेलच्या दुप्पट 4जी स्पीड देत आहे जियो, जाणून घ्या इतर कंपन्यांची स्थिती

कनेक्टिविटी फीचर म्हणून फोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.1, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि माइक्रो-यूएसबी पोर्ट आहे. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक असल्याची माहिती दिली आहे. याची बॅटरी 3,000 एमएएच ची आहे. जियोनी एफ205 प्रो एंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालतो.

The post जियोनी ने कमी किंमतीत शानदार फीचर्स सह लॉन्च केला एफ205 प्रो स्मार्टफोन, बघा याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gionee-f205-pro-launched-in-india-price-specifications-in-marathi/feed/ 0