Samsung च्या आधी या कंपनीने लॉन्च केला M12 स्मार्टफोन, 6GB RAM सह आहे 5,100mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा

Samsung कंपनी Galaxy M12 स्मार्टफोन वर काम करत आहे ज्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. लीक्स मध्ये या फोनच्या डिजाईन सोबतच अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण शेयर केली गेली आहे. सॅमसंग कधी गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन बाजारात घेऊन येईल, हि बातमी अजूनतरी स्पष्ट झाली नाही पण Samsung च्या आधी चीनी कंपनी Gionee ने M12 नावाचा एक नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे. हा फोन सध्या नाइजीरिया मध्ये लॉन्च केला गेला आहे जो शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतो.

Gionee M12

जियोनी एम12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यह फोन पंच-होल डिस्प्ले वर सादर केला गेला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेेशियो 91 टक्के आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.55 इंचाच्या आयपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्ले तीन बाजूंनी बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

Gionee M12 अँड्रॉइड आधारित फोन आहे जो दोन चिपसेट मॉडेल सह मॉर्केट मध्ये आला आहे. फोनचा एक मॉडेल मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेटला सपोर्ट करतो तर दुसऱ्या मॉडेल मध्ये मीडियाटेकचा हीलियो ए25 चिपसेट देण्यात आला आहे. हे मॉडेल्स दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. फोनच्या बेस मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठ्या वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि 4000mAh बॅटरी सह येत आहे लो बजेट असलेला हा शानदार फोन, Realme-Xiaomi देईल आव्हान

जियोनीचा हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि दोन 2 मेगापिक्सलचे इतर सेंसर देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी जियोनी एम12 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Gionee M12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,100एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here