Infinix Hot 20 Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:24:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-play-phone-launched-with-6000mah-battery-in-india-under-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-play-phone-launched-with-6000mah-battery-in-india-under-price-specifications/#respond Thu, 01 Dec 2022 07:29:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15564 Infinix ब्रँडनं भारतात आपली बहुप्रतीक्षित Hot 20 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं Infinix Hot 20 5G आणि Infinix Hot 20 Play असे दोन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत 12 5G बँड्सना सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. तर Infinix Hot 20 […]

The post 6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ब्रँडनं भारतात आपली बहुप्रतीक्षित Hot 20 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं Infinix Hot 20 5G आणि Infinix Hot 20 Play असे दोन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. Infinix Hot 20 5G स्मार्टफोन 12 हजारांच्या आत 12 5G बँड्सना सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. तर Infinix Hot 20 Play सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 6,000mAh Battery, MediaTek Helio G37, 7GB RAM आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Infinix Hot 20 Play Price

Infinix Hot 20 Play स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे, जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली असून, याची विक्री शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. हा हँडसेट चाट कलर व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यात Luna Blue, Fantasy Purple, Aurora Green आणि Racing Black चा समावेश आहे. हे देखील वाचा: 12 हजारांच्या आत आला दणकट 5G Phone; 7GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 5G लाँच

Infinix Hot 20 Play Specifications

इनफिनिक्स हॉट 20 प्ले स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, 720 X 1640 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा एक पंच होल डिस्प्ले आहे, ज्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल मिळतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सॅम्पलिंग रेट, 450 नीट्स ब्राईटनेस, 1500:1 कलर कॉन्ट्रास्ट, 21:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि आय केयर मोडला सपोर्ट करतो.

Infinix Hot 20 Play अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR4X 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 7GB रॅमची पावर मिळवता येईल. तसेच फोनची स्टोरेज देखील मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 प्ले मध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ 1.8 अपर्चर असलेला 13MP चा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला एक एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ 2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी येतोय Samsung चा लो बजेट स्मार्टफोन; MediaTek चिपसेटसह होणार लाँच

सिक्योरिटीसाठी या हँडसेटमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएस असे फिचर मिळतात. भारतात Infinix Hot 20 Play स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह लाँच झाला जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

The post 6000mAh च्या राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-20-play-phone-launched-with-6000mah-battery-in-india-under-price-specifications/feed/ 0
15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात https://www.91mobiles.com/marathi/30-november-india-launch-date-of-infinix-hot-20-5g-phone-and-infinix-hot-20-play/ https://www.91mobiles.com/marathi/30-november-india-launch-date-of-infinix-hot-20-5g-phone-and-infinix-hot-20-play/#respond Thu, 10 Nov 2022 07:15:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14807 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या इनफिनिक्स कंपनीच्या भारतीय चाहत्यांसाठी खुखबर आली आहे. इनफिनिक्स कंपनी भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची तयारी करत आहे आणि लवकरच Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G फोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. Infinix Hot 20 series अंतगर्त Infinix Hot 20 5G आणि Hot 20 Play सह […]

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या इनफिनिक्स कंपनीच्या भारतीय चाहत्यांसाठी खुखबर आली आहे. इनफिनिक्स कंपनी भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची तयारी करत आहे आणि लवकरच Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G फोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. Infinix Hot 20 series अंतगर्त Infinix Hot 20 5G आणि Hot 20 Play सह Hot 20 4G, Hot 20s तसेच Hot 20i याआधी आंतरराष्ट्रीय बाजारात आले आहेत आणि आता यातील इनफिनिक्स हॉट 20 5जी आणि हॉट 20 प्ले भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.

Infinix Hot 20 5G भारतीय लाँच

इनफिनिक्स हॉट 20 5जी आणि इनफिनिक्स हॉट 20 प्ले इंडिया लाँचचा दावा फोनएरिना वेबसाइटनं केला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की इनफिनिक्स कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करणार आहे जे 30 नोव्हेंबरला लाँच होतील. रिपोर्टनुसार Infinix Hot 20 5G मध्ये 12 5G bands चा सपोर्ट मिळेल. आम्हाला आशा आहे की Infinix Hot 20 5G Price 15 हजारांच्या बजेटमध्ये भारतीयांच्या भेटीला येईल. हे देखील वाचा: Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जबरदस्त लूकवर तुम्हीही व्हाल फिदा

Infinix Hot 20 5G चे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा वापर करून बनवण्यात आला आहे ज्यात तीन बेजल लेस कडा आणि चिन पार्ट आहे.

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर चालतो, ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा भारतातील सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जवर 160KM ची रेंज

50MP camera Infinix Hot 20 5G launched under 15000 price check specifications

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Infinix Hot 20 5G मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/30-november-india-launch-date-of-infinix-hot-20-5g-phone-and-infinix-hot-20-play/feed/ 0