Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज काही दिवसांपूर्वीच सॅमसंग इंडिया वेबसाइटवर दिसलं आहे. कंपनीनं अद्याप या गॅलेक्सी मोबाइलच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु आता बाजारात येण्याआधी हा सॅमसंग स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर देखील लिस्ट झाला आहे. Google Play Console listing मध्ये Samsung Galaxy M04 च्या रॅम आणि प्रोसेसरची माहिती देखील समोर आली आहे आणि त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एम04 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो, ही चर्चा जोर धरू लागली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम04 गुगल प्ले कंसोलवर 3जीबी रॅमसह लिस्ट करण्यात आला आहे. इथे फोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट असल्याचं समजलं आहे त्याचबरोबर 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच होईल तसेच ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची स्क्रीन 720 × 1600 पिक्सल रिजोल्यूशनवर काम करू शकते. हे देखील वाचा: 325 रुपयांमध्ये घरी आणा रेडमीचा ए वन फोन! स्वस्तात मिळतेय दिवसभर टिकणारी 5000mAh ची बॅटरी

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलक्सी एम04 बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन जागतिक बाजारातील गॅलेक्सी ए04ई चा इंडियन व्हर्जन असू शकतो. Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले इनफिनिटी ‘व्ही’ ला सपोर्ट करतो. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई मध्ये तोच प्रोसेसर देण्यात आला आहे जो गुगल प्ले कंसोलवरील Samsung Galaxy M04 मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोनचे चिपसेट आणि ग्राफिक्स जीपीयू दोन्ही एकसारखे आहेत. टेक मार्केटमध्ये गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच झाला आहे जो 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Corona नंतर समोर आला Zombie Virus! 48000 वर्षांपासून होता बर्फाखाली, नवीन संकटाची चाहूल?

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04e मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्ससह या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here