Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जाणून घ्या माहिती

2022 EICMA दरम्यान अनेक ऑटो कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. या मेगा-शो मध्ये Kawasaki नं देखील आपली बहुप्रक्षित इलेक्ट्रिक बाइक सादर केली आहे. कंपनीनं अनेक बाइक सोबतच दोन इलेक्ट्रिक बाइक सादर केल्या आहेत, ज्यांची नावे Ninja electric bike आणि Z electric अशी ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही ई-बाइक 2023 मध्ये बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं आहे. परंतु भारतीय बाजारात यांच्या लाँच बाबत अजूनतरी कोणतीही बातमी आली नाही. या electric bikes अधिकृतपणे Z BEV आणि Ninja BEV नावाने विकल्या जातील. पुढे आम्ही तुम्हाला या दोन्ही बाइकची संपूर्ण माहिती दिली आहे.

Electric Kawasaki Ninja सादर

इलेक्ट्रिक निंजा आणि झेड मॉडेल दोन्ही अजूनही प्रोटोटाइपच्या टप्प्यात आहेत. परंतु कावासाकी मोटर्सचे अध्यक्ष हिरोशी इतो यांनी चाहत्यांसाठी घोषणा केली दोन्ही मॉडेल पुढील वर्षी खरेदीसाठी उपलब्ध होतील. Z BEV आणि निंजा BEV मोठ्या प्रमाणावर अनुक्रमे Z400 आणि Ninja 400 सारख्या दिसतात. दोन्ही को एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक परफॉर्मन्स बाइक के म्हणून सादर केल्या जातील आणि या A1 नियमांचे पालन करतील. हे देखील वाचा: फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा भारतातील सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जवर 160KM ची रेंज

kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023

इलेक्ट्रिक Kawasakis 11kW मोटरसह बाजारात येईल आणि यात 3.0 kWh चा बॅटरी पॅक असेल. पंरतु कंपनीनं एकूण राइडिंग रेंज किंवा चार्जिंग टाइमची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता या बाइक्सची परफॉर्मन्स खूप शानदार असेल, अशी आशा आहे. कावासाकी पुढील वर्षी युरोपमध्ये झेड बीईवीची विक्री सुरु करण्याची योजना बनवत आहे. वर सांगितल्याप्रमाणे निंजा बीईवी सध्या एक प्रोटोटाइप आहे, परंतु ही बाइक देखील झेड बीईवीसह विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु या बाइक्ससाठी भारतीयांना मात्र अजून काही काळ वाट बघावी लागू शकते.

kawasaki-z-ninja-electric-bikes-unveiled-go-on-sale-2023

तीन वर्षांपूर्वी याच शोमध्ये कावासाकीनं एक प्रोटोटाइप इलेक्ट्रिक निंजा सादर केली होती जिने 10 kW मोटर (20 kW पीक रेटिंग) सह लोकांचं लक्ष वेधलं होतं आणि 100 किमी (62 माइल्स) च्या रेंजचा दावा तेव्हा करण्यात आला होता. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! सेमी-फायनल बघण्यासाठी Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here