फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा भारतातील सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जवर 160KM ची रेंज

तुम्ही देखील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे एक नवीन इलेक्ट्रिक कार विकत घेण्याची योजना बनवत आहात का? परंतु, किंमत जास्त असल्यामुळे माघार घेत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच होण्यासाठी तयार आहे. फक्त 7 दिवसांनी म्हणजे 16 नोव्हेंबरला मुंबई मधील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप PMV इलेक्ट्रिक देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ही कार EaS-E नावानं ऑटो मार्केटमध्ये सादर केली जाईल आणि यात सिंगल चार्जवर 160km ची रेंज मिळू शकते. कंपनीनं आपल्या साइटवर ही ई-कार लिस्ट देखील केली आहे. चला जाणून घेऊया या कार बाबत आतापर्यंत समोर आलेली संपूर्ण माहिती.

2,000 रुपयांमध्ये करे प्री-बुक

कंपनीच्या साइटवर 11 कलर ऑप्शनमध्ये 2,000 रुपये देऊन कारची प्री-बुकिंग केली जाऊ शकते. कंपनीनं खुलासा केला आहे की यात फक्त 2 पॅसेंजर बसू शकतात. कारमध्ये पुढे एक सीट असेल आणि मागे एक सीट असेल. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! सेमी-फायनल बघण्यासाठी Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

4 लाख रुपये असू शकते किंमत

कंपनीनं माहिती दिली आहे की या इलेक्ट्रिक कारची किंमत 4-5 लाख रुपये (एक्स शोरूम) असू शकते. तसेच, कंपनीनं स्पष्ट केलं आहे की ही प्राइस 160km ची रेंज देणाऱ्या व्हेरिएंटची असू शकते. त्यामुळे यापेक्षा जास्त रेंज देणारा व्हेरिएंट देखील बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. याआधी TATA Tiago EV देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून लाँच झाली होती. परंतु असं वाटतंय की ही कार आल्यानंतर टाटा टियागो ईव्हीच्या विक्रीला झटका बसू शकतो. चला जाणून घेऊया की या कारचे फीचर्स कसे असतील.

कारचे फीचर्स

पीएमवी ईएएस-ई बाबत चर्चा आहे की हिच्या दुसऱ्या मॉडेलची डिलिव्हरी रेंज 200 किमी पर्यंत असू शकते. यात 10 किलोवॉटची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी असण्याची शक्यता आहे जी 20hp ची पावर देईल. तसेच या EV मध्ये एक कॉम्पॅक्ट “स्मार्ट कार” ची डिजाइन मिळेल. यात एक क्लॅमशेल बोनट, एलईडी डीआरएलसह स्क्वायर-आउट ग्रिल, सर्कुलर एलईडी हेडलॅम्प यूनिट आणि रेक्ड विंडस्क्रीन मिळेल. हे देखील वाचा: Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत

या आगामी ईव्हीमध्ये मोठ्या खिडक्या, फ्लेयर्ड व्हील आर्च असलेले टायर्स असू शकतात. यात मागील बाजूस एक फुल-विड्थ टेललाइट असेल, अशी चर्चा आहे. इंटीरियर पाहता PMV EaS-E मध्ये मिनिमलिस्ट डॅशबोर्ड आणि फॅब्रिक अपहोल्स्ट्रीसह टू-सीटर मायक्रो EV असण्याची शक्यता आहे. तसेच यात क्रूज कंट्रोल, पावर विंडो आणि मॅन्युअल एसीसह रिमोट कीलेस एंट्री मिळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here