iQOO 11 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:59:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Snapdragon 8 Gen 2 चिपसेट असलेला iQOO 11 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/indias-first-qualcomm-snapdragon-8-gen-2-smartphon-iqoo-11-5g-launched-know-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/indias-first-qualcomm-snapdragon-8-gen-2-smartphon-iqoo-11-5g-launched-know-price-specs/#respond Tue, 10 Jan 2023 06:57:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16716 Vivo च्या सब-ब्रँड iQOO नं आपला नवीन iQOO 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. याआधी चीनमध्ये आलेला हा स्मार्टफोन आता भारतीयांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Qualcomm चा लेटेस्ट फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे. त्यामुळे हा हँडसेट वनप्लससाठी दमदार पर्याय ठरू शकतो. तसेच या फोनमध्ये 120W फास्ट […]

The post Snapdragon 8 Gen 2 चिपसेट असलेला iQOO 11 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo च्या सब-ब्रँड iQOO नं आपला नवीन iQOO 11 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. याआधी चीनमध्ये आलेला हा स्मार्टफोन आता भारतीयांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Qualcomm चा लेटेस्ट फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे. त्यामुळे हा हँडसेट वनप्लससाठी दमदार पर्याय ठरू शकतो. तसेच या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा मिळतो.

iQOO 11 5G ची भारतीय किंमत

iQOO 11 स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 59,999 रुपयांपासून सुरु होते, ही 8GB रॅम व 256GB मॉडेलची किंमत आहे. तर फोनचा 16GB रॅम व 256GB मॉडेल 64,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही HDFC आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला 5,000 रुपयांची थेट सूट मिळेल. iQOO 11 ची विक्री 13 जानेवारीपासून अ‍ॅमेझॉन आणि iQOO.com वर सुरु होईल.

iQOO 11 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 144Hz रिफ्रेश रेट
  • 16GB RAM + 256GB storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen 2
  • 120W fast charging

iQOO 11 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 2K अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो LTPO 4.0 टेक्नॉलॉजी, 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 आस्पेक्ट रेशियो, HDR10+ आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच यात 1.07 बिलियन कलर्स, DCI-P3 कलर गामुट, 1800 नीट्स पीक ब्राईटनेस आणि 1440Hz PWM डीमींग सपोर्ट मिळतो.

iQOO 11 भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Qualcomm चा लेटेस्ट्स आणि शक्तिशाली Snapdragon 8 Gen2 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी कंपनीनं Adreno GPU चा वापर केला आहे. जोडीला कंपनीची कस्टम V2 चिप देखील देण्यात आली आहे. हा फोन Android 13 आधारित Funtouch OS वर चालतो. फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज मिळते.

iQOO 11 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फोनमध्ये 50MP ISOCELL GN5 कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो गिंबल टेक्नॉलॉजीसह येतो. त्याचबरोबर बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो व पोर्टरेट लेन्स तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा आयकू फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

पावर बॅकअपसाठी iQOO 11 मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, त्यामुळे हा फोन 0 ते 50 टक्के फक्त आठ मिनिटांत चार्ज होतो. सिक्योरिटीसाठी यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच या फोनमध्ये इन्फ्रारेड सेन्सर, हायफाय ऑडिओ, स्टिरियो स्पीकर आणि यूएसबी टाइप सी ऑडिओ मिळतो. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, यूएसबी टाइप सी आणि एनएफसी असे पर्याय मिळतात.

The post Snapdragon 8 Gen 2 चिपसेट असलेला iQOO 11 भारतात लाँच; अ‍ॅमेझॉनवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indias-first-qualcomm-snapdragon-8-gen-2-smartphon-iqoo-11-5g-launched-know-price-specs/feed/ 0
कथित iQOO Neo 7 5G फोन झाला भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-india-launch-soon-phone-listed-on-bis-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-india-launch-soon-phone-listed-on-bis-check-specifications/#respond Wed, 14 Dec 2022 06:46:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15975 iQOO नं अलीकडेच चीनमध्ये तीन नवीन स्मार्टफोन iQOO 11 5G, iQOO 11 Pro 5G आणि iQOO Neo 7 SE लाँच केले आहेत. कंपनीची नंबर सीरीज फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आली आहे तर नियो 7एसई मिडबजेट फोन आहे. हे तिन्ही मोबाइल फोन भारतीय बाजारात देखील लवकरच लाँच केले जाऊ शकतात. परंतु आज कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट […]

The post कथित iQOO Neo 7 5G फोन झाला भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO नं अलीकडेच चीनमध्ये तीन नवीन स्मार्टफोन iQOO 11 5G, iQOO 11 Pro 5G आणि iQOO Neo 7 SE लाँच केले आहेत. कंपनीची नंबर सीरीज फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आली आहे तर नियो 7एसई मिडबजेट फोन आहे. हे तिन्ही मोबाइल फोन भारतीय बाजारात देखील लवकरच लाँच केले जाऊ शकतात. परंतु आज कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर एक नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 5G दिसला आहे. त्यामुळे अंदाज लावला जात हा फोन लवकरच आता भारतात लाँच केला जाऊ शकतो.

कथित iQOO Neo 7 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएसवर लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 7 SE चा ही रिब्रँडेड व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे जो भारतीय बाजारात नियो 7 5जी नावानं सादर केला जाऊ शकतो. गिजमोचायनाच्या रिपोर्टनुसार ही लिस्टिंग 12 डिसेंबरची आहे तसेच यात सर्टिफाइड स्मार्टफोन आयकू नियो 7एसईच आहे जो लवकरच भारतात आयकू नियो 7 5जी नावानं लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: 17,500 रुपयांमध्ये वनप्लसचा दणकट फोन; OnePlus Nord CE 2 Lite वर असा मिळवा अतिरिक्त डिस्काउंट

iQOO Neo 7 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू नियो 7 5जी फोन चीनमध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसई स्मार्टफोनचा इंडियन व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स सारखेच असू शकतात. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080-पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि पंच होल कटआउट थिन बेजल्ससह देण्यात आला आहे.

आयकूचा हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येतो, ज्याच्या जोडीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, जो चौकोनी आकाराच्या कॅमेरा मोड्युलमध्ये आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. आयकूच्या Neo 7 SE 5G स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.3, ड्युअल-बँड Wi-Fi, NFC आणि GPS चा पर्याय मिळतो. तसेच हा फोन Android 13 आधारित Origin OS 3 वर चालतो. हे देखील वाचा: रेडमीच्या आधीच ‘ही’ कंपनी भारतात आणतेय 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेट घोषित

The post कथित iQOO Neo 7 5G फोन झाला भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-india-launch-soon-phone-listed-on-bis-check-specifications/feed/ 0
16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-5g-phone-launch-date-8-december-know-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-5g-phone-launch-date-8-december-know-features-and-specifications/#respond Mon, 05 Dec 2022 05:26:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15653 iQOO 11 series 2 डिसेंबरला टेक मार्केटमध्ये लाँच होणार होती, परंतु former Chinese President Jiang Zemin यांच्या निधनानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपले लाँच पुढे ढकलले, त्यात आयकू 11 सीरीजचा देखील समावेश होता. चायना लाँच टळल्यानंतर आता ही स्मार्टफोन सीरीज इंडोनेशियाच्या माध्यमातून टेक मंचावर येईल. कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू 11 सीरीज 8 डिसेंबरला इंडोनेशियामध्ये […]

The post 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO 11 series 2 डिसेंबरला टेक मार्केटमध्ये लाँच होणार होती, परंतु former Chinese President Jiang Zemin यांच्या निधनानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपले लाँच पुढे ढकलले, त्यात आयकू 11 सीरीजचा देखील समावेश होता. चायना लाँच टळल्यानंतर आता ही स्मार्टफोन सीरीज इंडोनेशियाच्या माध्यमातून टेक मंचावर येईल. कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू 11 सीरीज 8 डिसेंबरला इंडोनेशियामध्ये लाँच होईल आणि या दिवशी iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात येतील.

iQOO 11 5G कधी होणार लाँच

iQOO 11 5G 8 डिसेंबरला इंडोनेशिया मध्ये लाँच होईल. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयकू 11 सीरीज लाँच टीज केला आहे. ही स्मार्टफोन सीरीज 8 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता टेक मंचावर एंट्री घेईल म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी. विशेष म्हणजे कंपनीनं आपल्या टीजरमध्ये फक्त आयकू 11 5जी फोनचा उल्लेख केला आहे, त्यामुळे कदाचित 8 डिसेंबरला फक्त iQOO 11 5G फोन लाँच होईल आणि iQOO 11 Pro 5G फोन येणार नाही. हे देखील वाचा: 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यावर घरी आणा 64MP कॅमेरा असलेला Oppo स्मार्टफोन; अशी आहे ऑफर

iQOO 11 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू 11 पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी iQOO 11 5G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असेल जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

iQOO 10

iQOO 11 5G Phone मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Samsung GN5 प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स मिळू शकते. लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 16 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो, जोडीला 512 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

iQOO 11 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू 11 प्रो मध्ये पण आयकू 11 5जी फोनमध्ये असलेला चिपसेट म्हणजे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळेल तसेच हा मोबाइल फोन पण 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार या आयकू मोबाइलमध्ये 6.78 इंच ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो पंच होल स्टाईलसह येईल तसेच क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी आयकू 11 प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सल टेलीफोटो सेन्सर असल्याच लीकमध्ये समोर आलं आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO 11 Pro मध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.

The post 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-5g-phone-launch-date-8-december-know-features-and-specifications/feed/ 0