इनफिनिक्स भारतात आणू शकते 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेटची केली घोषणा

200MP Camera 180W Fast Charging Smartphone Infinix Zero Ultra 5G Launched Price Specifications

इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन करत 200MP Camera असलेला स्मार्टफोन Infinix Zero Ultra सादर केला होता जो 180W Fast Charging टेक्नॉलॉजीसह येतो तसेच फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होतो. हा पावरफुल मोबाइल फोन आता भारतीय बाजारात एंट्री घेण्यासाठी तयार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की इनफिनिक्स झिरो अल्ट्रा 20 डिसेंबरला भारतात लाँच होईल तसेच 60MP Selfie Camera असलेला Infinix Zero 20 देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.

Infinix ZERO ULTRA च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन

जागतिक बाजारात Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FHD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो. हे देखील वाचा: शाओमीनंतर आता Samsung ची बारी! आयफोनला लाजवणाऱ्या कॅमेऱ्यासह येऊ शकतो Galaxy S23 Ultra

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, तर ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू आहे. जोडीला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. पावर बॅकअपसाठी यात 180W थंडर चार्जसह 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस, ब्लूटूथ, 3.5mm ऑडिओ जॅक यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 6 आणि 5जी असे ऑप्शन मिळतात.

इनफिनिक्सच्या लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे जो OIS सपोर्ट असलेला एक 1/1.22 इंच सेन्सर आहे. जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. यातील 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील ड्युअल एलईडी फ्लॅशसह येतो.

Infinix Zero 20 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स झिरो 20 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी प्लस नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स झिरो 20 108MP+13MP+2MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन Infinix Zero 20 मध्ये 60 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: Chienese Smartphones नको? मग हे आहेत बेस्ट नॉन चिनी मोबाइल; शक्तिशाली प्रोसेसरसह शानदार कॅमेरा

Infinix Zero 20 अँड्रॉइड आधारित एक्सओएस 12 वर चालतो. ऑक्टाकोर प्रोसेसरसह या स्मार्टफोनमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. बाजारात हा इनफिनिक्स मोबाइल 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्टफोन 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here