iQOO Neo 7 SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:41:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंगसह iQOO Neo 7 SE लाँच https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-se-phone-launched-with-16gb-ram-64mp-camera-and-120w-fast-charging/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-se-phone-launched-with-16gb-ram-64mp-camera-and-120w-fast-charging/#respond Fri, 09 Dec 2022 03:28:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15821 iQOO नं आपल्या होम मार्केट चीनमध्ये आपल्या फ्लॅगशिप iQOO 11 सीरीजमध्ये iQOO 11 5G आणि 11 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्याचबरोबर आपल्या मिड रेंज ग्राहकांसाठी iQOO Neo 7 SE देखील सादर केला आहे. हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येणार जगातील पहिला डिवाइस आहे. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 16GB […]

The post 16GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंगसह iQOO Neo 7 SE लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO नं आपल्या होम मार्केट चीनमध्ये आपल्या फ्लॅगशिप iQOO 11 सीरीजमध्ये iQOO 11 5G आणि 11 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्याचबरोबर आपल्या मिड रेंज ग्राहकांसाठी iQOO Neo 7 SE देखील सादर केला आहे. हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येणार जगातील पहिला डिवाइस आहे. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 16GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 64MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. आता चीनमध्ये Neo 7 SE नावाने लाँच झालेला हा फोन भारतात Neo 7 5G नावाने लवकरच एंट्री घेऊ शकतो. पुढे तुम्हाला iQOO Neo 7 SE स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि अन्य माहिती मिळेल.

iQOO Neo 7 SE ची किंमत

iQOO Neo 7 SE स्मार्टफोन चीनमध्ये 5 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत CNY 2099 (सुमारे 24,800 रुपये) आहे. या फोनचे तीन अन्य व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह 8GB, 12GB आणि 16GB रॅम ऑप्शनसह येतात, ज्यांची किंमत अनुक्रमे CNY 2299 (सुमारे 27,100 रुपये), CNY 2499 (सुमारे 29,500 रुपये) आणि CNY 2799 (सुमारे 33,000 रुपये) आहे. या फोनचा पाचवा व्हेरिएंट 12GB + 512GB स्टोरेजसह CNY 2899 (सुमारे 34,200 रुपये) मध्ये विकत घेता येईल. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनचे इलेक्ट्रॉनिक ब्लू, स्टार ब्लॅक आणि गॅलेक्सी असे तीन कलर ऑप्शन चीनमध्ये आले आहेत. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro लाँच; वनप्लसला मिळणार खरी टक्कर

iQOO Neo 7 SE चे स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080-पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि पंच होल कटआउट थिन बेजल्ससह देण्यात आला आहे. आयकूचा हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येतो, ज्याच्या जोडीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, जो चौकोनी आकाराच्या कॅमेरा मोड्युलमध्ये आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. आयकूच्या Neo 7 SE 5G स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.3, ड्युअल-बँड Wi-Fi, NFC आणि GPS चा पर्याय मिळतो. तसेच हा फोन Android 13 आधारित Origin OS 3 वर चालतो. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

The post 16GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंगसह iQOO Neo 7 SE लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-se-phone-launched-with-16gb-ram-64mp-camera-and-120w-fast-charging/feed/ 0
मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-and-512gb-storage-phone-iqoo-7-se-specification-leak/ https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-and-512gb-storage-phone-iqoo-7-se-specification-leak/#respond Wed, 23 Nov 2022 03:33:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15246 गेल्याच महिन्यात iQOO Neo 7 चीनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि हा फोन त्या बजेटमध्ये एक शानदार डिवाइस असल्याचं म्हटलं जातं. आता कंपनी याचा स्वस्त व्हेरिएंट सादर करणार आहे. लवकरच कंपनी iQOO Neo 7 SE सादर करू शकते, अशी बातमी आली आहे. या फोनबद्दल एक पोस्टर लीक झाला आहे त्यानुसार फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह […]

The post मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्याच महिन्यात iQOO Neo 7 चीनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि हा फोन त्या बजेटमध्ये एक शानदार डिवाइस असल्याचं म्हटलं जातं. आता कंपनी याचा स्वस्त व्हेरिएंट सादर करणार आहे. लवकरच कंपनी iQOO Neo 7 SE सादर करू शकते, अशी बातमी आली आहे. या फोनबद्दल एक पोस्टर लीक झाला आहे त्यानुसार फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. अलीकडेच या फोनची काही माहिती लीक झाली होती. आज पोस्टर समोर आल्यामुळे स्पष्ट झाला आहे की कंपनी या फोनची योजना बनवत आहे.

iQOO Neo 7 SE चे लीक स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे एसई मॉडेल थोडा स्वस्त असेल. त्यामुळे अलीकडेच आलेल्या आयकू नियो 7 प्रमाणे मीडियाटेक डिमेन्सिटी 900 प्रोसेसर ऐवजी iQOO Neo 7 SE मध्ये कंपनी मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह सादर करणार आहे. मीडियाटेक डिमेन्सिटी सीरीजचे प्रोसेसर 5G सह येतात त्यामुळे या फोनमध्ये तुम्हाला 5जी सपोर्ट नक्कीच मिळेल. तसेच हा फोन चार मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. फोन 8GB RAM सह 256GB स्टोरेज, 12GB RAM सह 256GB स्टोरेज आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

फोनची डिजाइन पाहता हा फोन नियो 7 सारखाच दिसेल. फोनच्या मागे चौकोनी शेपमध्ये कॅमेरा ब्रॅकेट असेल, ज्यात दोन कॅमेरा एकीकडे आणि एक कॅमेरा वेगळा मिळेल. तसेच फोनची बॉडी ग्लासमध्ये आहे आणि फ्रंटला पंच होल स्क्रीन बघायला मिळेल. महत्वाची बाब म्हणजे कंपनी स्वस्त मॉडेलमध्ये देखली AMOLED E5 डिस्प्ले पॅनलचा वापर करत आहे. या फोनची स्क्रीन साइज 6.78 इंच असू शकते.

आयकू नियो 7 एसई चा पावर बॅकअप पाहता हा फोन 5,000mAh ची बॅटरीसह 120W चार्जिंग स्पीडसह उपलब्ध होईल. कॅमेरा बाबत कोणतीही खास माहिती आली नाही परंतु रुमरनुसार हा फोन 50 एमपीच्या ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह उपलब्ध होऊ शकतो. यात तुम्हाला कॅमेऱ्यासह ओआयएस सपोर्ट मिळेल, हे विशेष. हे देखील वाचा: Chup OTT Release: ‘सीता रामम’ नंतर Dulquer Salmaan चा नवा चित्रपट OTT वर; ‘चुप’ मूव्ही येतोय ऑनलाइन

iQOO Neo 7 सीरीज

iQOO Neo 7 सीरीजचा पहिला फोन चीनमध्ये लाँच हो चुका आहे आणि आशा आहे की पुढील महिन्याच्या सुरुवातीला हा भारतात देखील लाँच होईल. तसेच iQOO Neo 7 SE आणि Neo 7S बद्दल काही लीक आले आहेत. कंपनी या सीरीजमध्ये 3 मॉडेल सादर करणार आहे, अशी चर्चा आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-and-512gb-storage-phone-iqoo-7-se-specification-leak/feed/ 0