मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती

गेल्याच महिन्यात iQOO Neo 7 चीनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि हा फोन त्या बजेटमध्ये एक शानदार डिवाइस असल्याचं म्हटलं जातं. आता कंपनी याचा स्वस्त व्हेरिएंट सादर करणार आहे. लवकरच कंपनी iQOO Neo 7 SE सादर करू शकते, अशी बातमी आली आहे. या फोनबद्दल एक पोस्टर लीक झाला आहे त्यानुसार फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. अलीकडेच या फोनची काही माहिती लीक झाली होती. आज पोस्टर समोर आल्यामुळे स्पष्ट झाला आहे की कंपनी या फोनची योजना बनवत आहे.

iQOO Neo 7 SE चे लीक स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे एसई मॉडेल थोडा स्वस्त असेल. त्यामुळे अलीकडेच आलेल्या आयकू नियो 7 प्रमाणे मीडियाटेक डिमेन्सिटी 900 प्रोसेसर ऐवजी iQOO Neo 7 SE मध्ये कंपनी मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह सादर करणार आहे. मीडियाटेक डिमेन्सिटी सीरीजचे प्रोसेसर 5G सह येतात त्यामुळे या फोनमध्ये तुम्हाला 5जी सपोर्ट नक्कीच मिळेल. तसेच हा फोन चार मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. फोन 8GB RAM सह 256GB स्टोरेज, 12GB RAM सह 256GB स्टोरेज आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

फोनची डिजाइन पाहता हा फोन नियो 7 सारखाच दिसेल. फोनच्या मागे चौकोनी शेपमध्ये कॅमेरा ब्रॅकेट असेल, ज्यात दोन कॅमेरा एकीकडे आणि एक कॅमेरा वेगळा मिळेल. तसेच फोनची बॉडी ग्लासमध्ये आहे आणि फ्रंटला पंच होल स्क्रीन बघायला मिळेल. महत्वाची बाब म्हणजे कंपनी स्वस्त मॉडेलमध्ये देखली AMOLED E5 डिस्प्ले पॅनलचा वापर करत आहे. या फोनची स्क्रीन साइज 6.78 इंच असू शकते.

आयकू नियो 7 एसई चा पावर बॅकअप पाहता हा फोन 5,000mAh ची बॅटरीसह 120W चार्जिंग स्पीडसह उपलब्ध होईल. कॅमेरा बाबत कोणतीही खास माहिती आली नाही परंतु रुमरनुसार हा फोन 50 एमपीच्या ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह उपलब्ध होऊ शकतो. यात तुम्हाला कॅमेऱ्यासह ओआयएस सपोर्ट मिळेल, हे विशेष. हे देखील वाचा: Chup OTT Release: ‘सीता रामम’ नंतर Dulquer Salmaan चा नवा चित्रपट OTT वर; ‘चुप’ मूव्ही येतोय ऑनलाइन

iQOO Neo 7 सीरीज

iQOO Neo 7 सीरीजचा पहिला फोन चीनमध्ये लाँच हो चुका आहे आणि आशा आहे की पुढील महिन्याच्या सुरुवातीला हा भारतात देखील लाँच होईल. तसेच iQOO Neo 7 SE आणि Neo 7S बद्दल काही लीक आले आहेत. कंपनी या सीरीजमध्ये 3 मॉडेल सादर करणार आहे, अशी चर्चा आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here