Jio Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या रिचार्ज प्लॅनला तोड नाही! Jio चा 31 दिवसांचा Calendar Month Plan; फ्री कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे https://www.91mobiles.com/marathi/259-rupee-reliance-jio-calendar-month-plan-with-30-31-days-validity/ https://www.91mobiles.com/marathi/259-rupee-reliance-jio-calendar-month-plan-with-30-31-days-validity/#respond Mon, 05 Sep 2022 07:29:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12793 Jio Calendar Month Plan: देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी जियो (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी प्रत्येकवेळी काही तरी नवीन घेऊन येत असते. कंपनीनं काही दिवसांपूर्वी 28 दिवसांच्या वैधतेचं झंझट संपवलं हॉट आणि एक खास प्लॅन (Recharge Plan) सादर केला होता. या प्लॅनमध्ये 28 नव्हे तर पूर्ण 30 आणि 31 दिवस म्हणजे एका महिन्याची वॅलिडिटी […]

The post या रिचार्ज प्लॅनला तोड नाही! Jio चा 31 दिवसांचा Calendar Month Plan; फ्री कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio Calendar Month Plan: देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी जियो (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी प्रत्येकवेळी काही तरी नवीन घेऊन येत असते. कंपनीनं काही दिवसांपूर्वी 28 दिवसांच्या वैधतेचं झंझट संपवलं हॉट आणि एक खास प्लॅन (Recharge Plan) सादर केला होता. या प्लॅनमध्ये 28 नव्हे तर पूर्ण 30 आणि 31 दिवस म्हणजे एका महिन्याची वॅलिडिटी ऑफर देण्यात आली. भारतीय युजर्स अशा प्लॅन्सची मागणी गेले कित्येक दिवस करत होते. त्यानुसार रिलायन्स जियोनं आपला हा Calender Month Plan (Monthly Recharge Plan) बाजारात आणला आहे. या प्लॅनची किंमत 259 रुपये आहे जो संपूर्ण महिनाभर म्हणजे 31 दिवसांपर्यंत सक्रिय राहतो.

Jio Calender Month Plan

रिलायन्स जियोनं आपल्या या प्लॅनला ‘कॅलेंडर मंथ प्लॅन’ असं नावं दिलं आहे आणि नावातूनच सर्व माहिती मिळते. या प्लॅनची वैधता ठरलेली नाही, म्हणजे जेवढ्या दिवसांचा महिना असेल तेवढे दिवस हा प्लॅन वापरता येईल. जर एखाद्या महिन्यात 30 दिवस असतील तर हा Jio plan 30 दिवसांची वॅलिडिटी देईल आणि जर 31 दिवसांचा महिना असेल तर रिलायन्स जियोच्या या प्लॅन प्लॅनमध्ये 31 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. त्यामुळे ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात नवीन रिचार्ज करावा लागेल. हे देखील वाचा: स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक

Jio Rs 259 Plan

Jio Calender Month Plan ची किंमत 259 रुपये ठेवण्यात आली आहे. हा प्लॅन रिलायन्स जियोच्या सर्वात किफायतशीर मोबाइल प्लॅन्स पैकी एक आहे. 259 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 30 दिवस किंवा 31 दिवसांच्या वॅलिडिटीनुसार जियो प्रीपेड युजर्सना लाभ मिळतील. या प्लॅनमध्ये रोज 1.5GB 4G इंटरनेट डेटा मिळेल.

30 दिवसांच्या महिन्यात युजर्सना एकूण 45 जीबी इंटरनेट डेटा मिळेल तसेच 31 दिवसांच्या महिन्यात जियो मोबाइल युजर 46.5 जीबी 4जी इंटरनेट डेटा वापरू शकतील. दिवसाचा दीड जीबी डेटा संपल्यावर देखील मोबाइल नंबरवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी अ‍ॅक्टिव्ह असेल आणि जियो ग्राहक 64केबीपीएसीच्या स्पीडनं इंटरनेट वापरू शकतील. इथे वर्षभराचा हिशोब केल्यास जियो युजर्स (259 x 12) = 3108 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी मिळवू शकतात ज्यात एकूण 547.5 जीबी डेटा मिळेल. हे देखील वाचा: वायरविना मिळणार 2 जीबीपीएसचा भन्नाट स्पीड; अशाप्रकारे Jio AirFiber देईल वेगवान 5G इंटरनेट

259 रुपयांच्या या जियो कॅलेंडर मंथ प्लॅनमध्ये कंपनीकडून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग दिली जात आहे. हे कॉल लोकल व एसटीडी नंबरवर पूर्णपणे फ्री असतील तसेच रोमिंग दरम्यान मोफत कॉलिंग करता येईल. तसेच ग्राहकांना रोज 100 एसएमएस देखील मिळतील. या 259 रुपयांचा प्लॅनचा रिचार्ज करणाऱ्या युजर्सना Jio TV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या सर्व Jio Apps चा मोफत वापर करता येईल.

The post या रिचार्ज प्लॅनला तोड नाही! Jio चा 31 दिवसांचा Calendar Month Plan; फ्री कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/259-rupee-reliance-jio-calendar-month-plan-with-30-31-days-validity/feed/ 0
Jio ने पुन्हा केली अनलिमिटेड काॅलिंग फ्री, सर्व नेटवर्क वर करता यईल मोफत कॉलिंग https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-remove-iuc-regime-from-1st-jan-2021-voice-calls-unlimited-free/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-remove-iuc-regime-from-1st-jan-2021-voice-calls-unlimited-free/#respond Thu, 31 Dec 2020 10:15:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9507 Jio Phone बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवायस पण 4G VoLTE कनेक्टिविटी सर्विस सह लाॅन्च केला जाईल.

The post Jio ने पुन्हा केली अनलिमिटेड काॅलिंग फ्री, सर्व नेटवर्क वर करता यईल मोफत कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ला चांगलेच माहित आहे कि भारतीय ग्राहकांना काय हवे आहे आणि कंपनी आपल्या ग्राहकांना दतेच देत आहे. कंपनीची सुरवातच मोफत सर्विसने झाली होती आणि काही दिवसांतच जियो युजर्सची संख्या कोटींमध्ये पोहोचली होती. Jio आता पुन्हा आपल्या युजर्ससाठी शानदार भेट घेऊन आली आहे. जियो नेटवर्क वर वाॅयस काॅलिंग पुन्हा अनलिमिटेड फ्री होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि 1 जानेवारी पासून IUC चार्ज हटवले जातील.

Jio ने अधिकृतपणे घोषणा करून सांगितले आहे कि कंपनी नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून आपले IUC म्हणजे इंटरकनेक्ट यूजेज चार्ज काढून टाकणार आहे. त्यानंतर रिलायंस जियो युजर देशात कोणत्याही नेटवर्क वर कितीपण वेळ बोलू शकतील. विशेष म्हणजे आतापर्यंत जियो टू जियो नेटवर्क वर वाॅयस काॅलिंग तो पूर्णपणे फ्री होती पण जियो वरून दुसऱ्या नेटवर्क वर काॅल करण्यासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागत होती.

पण आता IUC काढून टाकल्यावर ऑफ-नेटवर्क काॅलिंग वरची मर्यादा पण रद्द झाली आहे. जियो युजर्सना कोणत्याही कंपनीच्या नंबर वर काॅल करण्यासाठी वेगळे चार्ज द्यावे लागणार नाहीत किंवा इतर नेटवर्क वर वाॅयस काॅलिंगसाठी कोणतीही मर्यादा नसेल. या बदलानंतर जियो ग्राहक देशात कोणत्याही नंबर वर अनलिमिटेड फ्री काॅलिंग करू शकतील.

हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह OPPO Reno 5 लाॅन्च, यात आहे 50W SuperVOOC टेक्नोलाॅजी

Jio Phone 2.0

रिलायंस जियो बद्दल अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि हि कंपनी भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे. हा मोबाईल फोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्च पासून मार्केट मध्ये एंट्री घेईल. या नवीन Jio Phone फोन बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि याची किंमत आधीच्या जियोफोन पेक्षा थोडी जास्त असेल पण किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Jio Phone बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवायस पण 4G VoLTE कनेक्टिविटी सर्विस सह लाॅन्च केला जाईल. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन नसून कंपनी जुना Jio Phone रिलाॅन्च केला जाईल. फोन रिलाॅन्च करण्यामागे कंपनीचा उद्देश नवीन ग्राहक जोडण्याचा आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि जियो फोन पुन्हा लाॅन्च करून कंपनी देशात ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.

The post Jio ने पुन्हा केली अनलिमिटेड काॅलिंग फ्री, सर्व नेटवर्क वर करता यईल मोफत कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-remove-iuc-regime-from-1st-jan-2021-voice-calls-unlimited-free/feed/ 0
पुन्हा आली जियो ऑफर, 399 रुपयांच्या रिचार्ज वर मिळेल 400 चा कॅशबॅक, वाचा सविस्तर https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-happy-new-year-offer-get-100-percent-cashback-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-happy-new-year-offer-get-100-percent-cashback-in-marathi/#respond Mon, 31 Dec 2018 09:18:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3242 या कॅशबॅक ऑफरचा लाभ जुन्या आणि नवीन रिलायंस जियो यूजर्सना मिळेल.

The post पुन्हा आली जियो ऑफर, 399 रुपयांच्या रिचार्ज वर मिळेल 400 चा कॅशबॅक, वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम सेक्टर मध्ये प्राइस वॉर सुरु करणारी रिलायंस जियो आपल्या शानदार ऑफर्स मधून यूजर्सना सरप्राइज देत असते. कंपनीने सुरवातीला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापर्यंत फ्री कॉलिंग आणि डेटाचा लाभ आपल्या यूजर्सना दिला होता. आता कंपनीने वर्ष संपताना जियो हॅपी न्यू ईयर नावाने ऑफर सादर केली आहे, ज्यात यूजर्सना 399 रुपयांचा रिचार्ज केल्यास 100 टक्के कॅशबॅक मिळेल.

हा कॅशबॅक कंपनी अजियो कूपन च्या माध्यमातून देणार आहे. ग्राहक या कूपनचा वापर अजियो ऑफर्स मध्ये करू शकतील. या कॅशबॅक ऑफरचा लाभ जुन्या आणि नवीन रिलायंस जियो यूजर्सना मिळेल. चला तर जाणून घेऊया कि कशाप्रकारे हि ऑफर तुम्ही घेऊ शकता.

अशाप्रकारे मिळवा रिलायंस जियो हॅपी न्यू ईयर ऑफर

–या ऑफरचा लाभ घेण्यासाठी जियो यूजर्सना सर्वात आधी आपल्या नंबर वर 399 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या ऑफरचा लाभ 28 डिसेंबर 2018 पासून 31 जानेवारी 2019 पर्यंतच मिळेल.

–रिचार्ज केल्यावर रिलायंस अजियो चा 399 रुपयांचे कूपन माएजियो ऍप्लिकेशन मध्ये मायकूपन सेक्शन मध्ये ऍड केला जाईल.

–या कूपनचा वापर यूजर्स अजियोच्या ऍप आणि वेबसाइट वर कमीत कमी 1,000 रुपयांच्या खरेदीवर करू शकतील. याचा अर्थ असा कि जर तुम्ही 1,000 ची शॉपिंग केलीत आणि या 399 रुपयांच्या कूपनचा वापर केला तर तुम्हाला 601 रुपये दयावे लागतील.

-अजियो ऍप आणि वेबसाइट वर या कूपनचा वापर 15 मार्च 2019 पर्यंत केला जाऊ शकतो.

जियोची ऑफर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

अजियो वरून शॉपिंग करून 399 रुपयांचे कूपन वापरण्यासाठी इथे क्लिक करा

The post पुन्हा आली जियो ऑफर, 399 रुपयांच्या रिचार्ज वर मिळेल 400 चा कॅशबॅक, वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-happy-new-year-offer-get-100-percent-cashback-in-marathi/feed/ 0
जियो देत आहे 8जीबी फ्री 4जी डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे आपल्या नंबर मिळवावा हा मोफत फायदा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-celebration-pack-8gb-4g-data-free-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-celebration-pack-8gb-4g-data-free-offer-in-marathi/#respond Tue, 27 Nov 2018 13:40:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2996 एक यूजर्स फक्त एकदाच जियो सेलिब्रेशन पॅकचा लाभ घेऊ शकतो.

The post जियो देत आहे 8जीबी फ्री 4जी डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे आपल्या नंबर मिळवावा हा मोफत फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ची फॅन फॉलोइंग वाढतच आहे. देशात फक्त 4जी सर्विस देणारी एकुलती एक कपंनी जियो आपल्या यूजर्सची पण खास काळजी घेते. जियो ने दोन महिन्यांपूर्वी अचानक आपल्या यूजर्सच्या नंबर वर 8जीबी डेटा एक्स्ट्रा द्यायला सुरवात केली होती ज्याला कंपनी ने ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ चे नाव दिले होते. जियो ने हा पॅक कंपनीला दोन वर्ष पूर्ण झाले म्हणून सादर केला होता. तर हातात पुन्हा एकदा रिलायंस जियो हा पॅक घेऊन आली आहे ज्यात जियो ग्राहकांना 8जीबी फ्री 4जी डेटा मिळत आहे.

रिलायंस जियो ने ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ सुरु केला आहे. हा पॅक यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळत आहे. या पॅक अंतर्गत ग्राहकांना एका दिवसात 2जीबी 4जी डेटा मिळेल. हा पॅक 4 दिवसांच्या वैधते सह मिळत आहे. म्हणजे 4 दिवसांसाठी एकूण 8जीबी 4जी डेटा. जियो हा 8जीबी डेटा अगदी मोफत देत आहे ज्याचा वापर वीडियो बघण्यासाठी व मीडिया कंटेट डाउनलोड कारण्यासोबत तुम्ही तुमच्या मर्जीनुसार वापरू शकता.

तुम्हाला मोफत 8जीबी डेटा मिळाला आहे कि हे जाणून घेण्यासाठी..

1. सर्वात आधी आपल्या फोन मधील माय जियो ऍप ओपन करा

2. माय जियो ऍप मध्ये ‘माय प्लान्स’ ओपन करा

3. माय प्लान्स मध्ये सर्वात वर तुमचा करंट प्लान दिसेल आणि त्याच्या खाली तुम्हाला इतर आॅफर्स सोबत ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ मिळेल.

4. जियो सेलिब्रेशन पॅक सोबत तुम्हाला या पॅकची एक्सपायर डेट पण सांगितली जाईल, म्हणजे हा मोफत इंटरनेट डेटा कधी पर्यंत मिळेल याची सूचना असेल.

Jio offer

विशेष म्हणजे जियो हा पॅक सर्व यूजर्सना एक साथ देत नाही. वेगवेगळ्या सर्कलच्या यूजर्सना 8जीबी डेटा वाली आॅफर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मिळेल. एक यूजर्स फक्त एकदाच जियो सेलिब्रेशन पॅकचा लाभ घेऊ शकतो.

जियो आॅफरच्या सविस्तर माहितीसाठी (इथे क्लिक करा)

The post जियो देत आहे 8जीबी फ्री 4जी डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे आपल्या नंबर मिळवावा हा मोफत फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-celebration-pack-8gb-4g-data-free-offer-in-marathi/feed/ 0
जियो ओपो मॉनसून आॅफर, 198 रुपयांच्या रिचार्जवर 4,900 रुपयांचे बेनिफिट आणि 3.2टीबी डाटा पण https://www.91mobiles.com/marathi/jio-oppo-monsoon-offer-with-up-to-3-2tb-data-rs-4900-benefits-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-oppo-monsoon-offer-with-up-to-3-2tb-data-rs-4900-benefits-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 11:41:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1109 जियो च्या या दोन्ही प्लॅन्स पैकी एक प्लान सलग 36 महीने वापरल्यास 36 महीने प्रति माह 50 रुपयांचा कॅशबॅक असे एकूण 1,800 रुपये परत मिळतील.

The post जियो ओपो मॉनसून आॅफर, 198 रुपयांच्या रिचार्जवर 4,900 रुपयांचे बेनिफिट आणि 3.2टीबी डाटा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम विश्वातील दिग्गज कंपनी जियो ने आपल्या यूजर्स साठी नवीन आॅफर ची सुरवात केली आहे. रिलांयस जियो ने ही नवीन आॅफर ‘जियो ओपो मॉनसून आॅफर’ नावाने बाजारत आणली आहे. नावावरून समजले असेलच की ही आॅफर स्मार्टफोन ब्रांड ओपो सोबत सादर करण्यात आली आहे जी यूजर्सना 3.2टीबी 4जी इंटरनेट डाटा सह 4,900 रुपयांचे बेनिफिट देते.

जियो ओपो मॉनसून आॅफर नवीन ओपो स्मार्टफोन विकत घेतल्यास रिलांयस जियो ग्राहकांना मिळेल. नवीन तसेच जुन्या जियो यूजर्स या आॅफर मधील फायदे घेऊ शकतात. सर्वात आधी कॅशबॅक बद्दल बोलू, या आॅफर मध्ये एकूण 1,800 रुपयांच्या कॅशबॅक जियो यूजर्सना दिला जात आहे. हा कॅशबॅक जियो ग्राहकांना कॅशबॅक वाउचर च्या स्वरूपात मिळेल. 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लान ने रिचार्ज केल्यास प्रत्येक रिचार्ज वर 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

जियो च्या या दोन्ही प्लॅन्स पैकी एक प्लान सलग 36 महीने वापरल्यास 36 महीने प्रति माह 50 रुपयांचा कॅशबॅक असे एकूण 1,800 रुपये परत मिळतील. या कॅशबॅक सोबतच सुरवातीचे 13 महीने रिचार्ज केल्यावर कंपनी आपल्या यूजर्सना 600 रुपये जियो मनी क्रेडिट स्वरूपात देईल. हे 600 रुपयांचे जियो मनी क्रेडिट तीन वेळा यूजर्सना मिळेल जो 13व्या, 26व्या, आणि 39व्या महिन्यात मिळेल. अशा प्रकारे एकूण 1,800 रुपयांचे जियो मनी क्रेडिट कंपनी कडून दिला जाईल.

ओपो स्मार्टफोंस वर दिल्या जाणार्‍या या आॅफर मध्ये 1,800 रुपयांचा कॅशबॅक आणि 1,800 रुपयांच्या जियो मनी क्रेडिट सोबत यूजर्सना 1,300 रुपयांचे मेक माय ट्रिप डिस्काउंट वाउचर मिळतील. जियो ओपो मॉनसून आॅफर मिळवणार्‍या यूजर्सना हे सर्व मिळून 4,900 रुपयांचे फायदे मिळतील. त्याचबरोबर जियो यूजर्स ओपो फोन मध्ये 39 महीने 198 रुपयांचा रिचार्ज करतील त्यामुळे त्यांना रोज 1.5 जीबी डाटा मिळेल आणि 299 रुपयांचा प्लान घेतल्यास रोज 3जीबी डाटा मिळेल. 39 महीने रोज 3जीबी डाटा या हिशोबाने जियो ग्राहक 3.2टीबी डाटा चा लाभ घेऊ शकतील.

The post जियो ओपो मॉनसून आॅफर, 198 रुपयांच्या रिचार्जवर 4,900 रुपयांचे बेनिफिट आणि 3.2टीबी डाटा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-oppo-monsoon-offer-with-up-to-3-2tb-data-rs-4900-benefits-in-marathi/feed/ 0
​जियो ने एयरटेल ला दिले धमाकेदार उत्तर, 120 रुपयांमध्ये 84जीबी 4जी डाटा, आता येईल मजा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-everyday-more-value-promise-extra-1-5gb-additional-4g-data-on-prepaid-plans-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-everyday-more-value-promise-extra-1-5gb-additional-4g-data-on-prepaid-plans-in-marathi/#respond Tue, 12 Jun 2018 12:00:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=876 12 जून पासून 30 जून दरम्यान जे जियो ​यूजर्स या प्लान्स चा रिचार्ज करतील त्यांना हा अतिरिक्त डाटा चा फायदा मिळेल.

The post ​जियो ने एयरटेल ला दिले धमाकेदार उत्तर, 120 रुपयांमध्ये 84जीबी 4जी डाटा, आता येईल मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी एयरटेल ने 399 रुपयांमध्ये डेली तिन जीबी डाटा वाला प्लान सादर केला होता. त्यानंतर चर्चा सुरू झाली की कंपनी चा हा प्लान जियो पेक्षा पण स्वस्त आहे. पण याला लॉन्च होऊन दोनच दिवस झाले होते की जियो ने डबल धमाका आॅफर आणून एयरटेल सडेतोड उत्तर दिले आहे. याचबरोबर कंपनी आपल्या ते वक्तव्य पण कायम ठेवले आहे ज्यात कंपनी ने भारतात सर्वात कमी किंमतीत 4जी डाटा देण्याचा विश्वास दिला होता. मुकेश अंबानी की कंपनी रिलायंस जियो ने आज आपल्या टॅरीफ प्लान मध्ये बदल केला आहे आणि कंपनी ने डबल धमाका नावाने आॅफर सादर केली आहे. या आॅफर बद्दल माहिती घेतल्या नंतर तुम्ही पण म्हणाल ही खरच हा रिलायंस चा हा धमाका आहे.

पुन्हा एकदा असाच डाव खेळत जियो ने आपल्या टॅरिफ प्लान्स मध्ये बदल केले आहेत. जियो ने आपले प्लान्स अपडेट केले आहेत. या अपडेट मध्ये फक्त एक-दोन जीबी डाटा चा फायदा होत नाही तर प्रत्येक पॅक मध्ये प्रतिदिन मिळणार्‍या डाटा मध्ये 1.5जीबी डाटा अतिरिक्त दिला जाईल. म्हणजे रोज एक्स्ट्रा 1.5 जीबी डाटा, तो पण अगदी मोफत.

​रिलायंस जियो ने आपले ते सर्व प्रीपेड प्लान्स अपडेट केले आहेत जे 28 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वॅलिडिटी सह येतात. उदाहरणार्थ 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येणार्‍या 149 रुपयांच्या प्लान मध्ये आधी रोज 1.5जीबी 4जीबी डाटा मिळत होता, त्याच प्लान मध्ये आता रोज 3जीबी डाटा मिळेल. त्याचप्रमाणे 198 रुपये वाल्या प्लान मध्ये आधी रोज 2जीबी डाटा मिळत होता तर आता या प्लान मध्ये रोज 3.5जीबी डाटा मिळेल.

​जियो च्या 149 रुपये, 349 रुपये, 399 रुपये आणि 449 रुपयांच्या प्लान मध्ये आधी 1.5जीबी डाटा प्रतिदिन मिळत होता त्याऐवजी यात रोज 3जीबी 4जी डाटा मिळेल.

​जियो च्या ​198 रुपये, 398 रुपये, 448 रुपये आणि 498 रुपये वाल्या प्लान मध्ये आधी 2जीबी डाटा प्रतिदिन मिळत होता तर आता या प्लान्स मध्ये 3.5जीबी 4जी डाटा प्रतिदिन मिळेल.

​​रोज 3जीबी डाटा देणार्‍या जियो च्या 299 रुपयांच्या प्लान मध्ये आता ग्राहकांन 4.5जीबी डाटा प्रतिदिन मिळेल.

त्याचप्रमाणे जियो चा 509 रुपयांचा प्लान आधी 4जीबी डाटा प्रतिदिन देत होता त्याजागी यात रोज 5.5जीबी डाटा मिळेल.

रिलायंस जियो 799 रुपयांच्या प्लान मध्ये सर्वात जास्त 5जीबी डाटा प्रतिदिन देत होती, परंतु अपडेट नंतर याच किंमतीत आता रोज 6.5जीबी डाटा मिळेल.

लक्षात असू दे जियो ने हा अपडेट काही दिवसांसाठी उपलब्ध केला आहे. 12 जून पासून 30 जून दरम्यान जे जियो ​यूजर्स या प्लान्स चा रिचार्ज करतील त्यांना हा अतिरिक्त डाटा चा फायदा मिळेल. जियो कस्टमर्स माय जियो अॅप मधून पण आपला जियो नंबर रिचार्ज करू शकतात.

The post ​जियो ने एयरटेल ला दिले धमाकेदार उत्तर, 120 रुपयांमध्ये 84जीबी 4जी डाटा, आता येईल मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-everyday-more-value-promise-extra-1-5gb-additional-4g-data-on-prepaid-plans-in-marathi/feed/ 0