टेलीकॉम क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) नं काही दिवसांपूर्वी आयोजित 45th Annual General Meeting (AGM) दरम्यान आपल्या Jio 5G लाँच बाबत माहिती दिली आहे. कंपनीनं 5G Service च्या घोषणेसोबतच गुपचूप JioBook laptop देखील टीज केला, जो आता लॅपटॉप मार्केटमध्ये ‘जियोबुक’ नावानं येण्याची शक्यता वाढली आहे. या लॅपटॉप (Reliance Jio Laptop) ची सर्वात खास बाब म्हणजे याची किंमत खूप किफायशीर ठेवण्यात येईल, अशी चर्चा आहे. पुढे आम्ही या स्वस्त लॅपटॉपबाबत आतापर्यंत समोर आलेली माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.
परवडणाऱ्या किंमतीत येईल JioBook Laptop
JioBook लॅपटॉपमध्ये क्वॉलकॉमच्या एआरएम चिपसेटचा वापर केला जाण्याची शक्यता आहे आणि आशा आहे की हा Android ओएसच्या नवीन व्हर्जनसह बाजारात येईल. तसेच हा डिवाइस कंपनी आपल्या Mobile Phone प्रमाणेच कमी किंमतीत सादर करू शकते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा भारतीय स्टँडर्ड ब्यूरोच्या सर्टिफिकेशन वेबसाइट आणि गीकबेंचवर दिसला होता. हे देखील वाचा: वायरविना मिळणार 2 जीबीपीएसचा भन्नाट स्पीड; अशाप्रकारे Jio AirFiber देईल वेगवान 5G इंटरनेट
रिलायन्सनं आपल्या 45व्या एजीएममध्ये आगामी 5जी सेवेची माहिती देताना एका व्हिडीओच्या माध्यमातून JioBook देखील टीज केला, ज्याची माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. व्हिडीओमध्ये Reliance JioBook लॅपटॉप एका टेबलवर दिसला आहे.
JioBook चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Reliance JioBook बजेट फ्रेंडली कंप्यूटिंग सेगमेंटला लक्ष्य करेल आणि त्यामुळे त्या दर्जाचे हार्डवेयर वापरण्यात येईल. JioBook मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 (SM6125) चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा डिवाइस Android ऑपरेटिंग सिस्टमच्या एका नवीन मॉडिफाइड व्हर्जनवर काम करू शकतो. ज्याला JioOS असं नाव दिलं जाऊ शकतं.
लीक रिपोर्ट्सनुसार लॅपटॉपच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 1366×768 असू शकतं. आणि डिवाइसमध्ये 2GB LPDDR4X रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज मिळू शकते. 4GB रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेज असलेला एक हाय व्हेरिएंट देखील येऊ शकतो. तसेच JioBook मध्ये व्हिडीओ आउटपुटसाठी एक मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, एक थ्री-अॅक्सिस अॅक्सेलेरोमीटर आणि एक क्वॉलकॉम ऑडियो चिप देण्यात येईल. हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल, 1 जीबी स्पीड असलेलं इंटरनेट; Jio सादर करणार ‘हे’ शानदार प्रॉडक्टस
Jio Cloud PC ची घोषणा
Cloud PC कोणत्याही मोठ्या हार्डवेयरविना हा पीसी वापरता येईल. हा एक वर्चुअल पीसी आहे. ही सेवा वेगवान 5G नेटवर्क स्पीडमुळे यूजर्सना रिमोट सर्वर लोकेशनवरून देखील सर्व कंप्यूटेशंस स्ट्रीम करण्यास मदत करेल. यात वारंवार पीसी अपग्रेड करण्याचं झंझट राहणार नाही. तसेच यामुळे एक नव्हे एकाच वेळी अनेक पीसीची ताकद वापरू शकता.

















