JioBook - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jul 2023 05:27:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/new-jiobook-laptop-launching-in-india-on-july-31st-expected-price-specs-features/ https://www.91mobiles.com/marathi/new-jiobook-laptop-launching-in-india-on-july-31st-expected-price-specs-features/#respond Mon, 24 Jul 2023 05:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22529 Jio आपला सेकंड-जनरेशन JioBook भारतीय बाजारात आणण्यासाठी तयार आहे. कंपनी ह्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जुलैला आपला नवीन जियोबुक लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. आता तर अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून New JioBook Laptop चा टीजर देखील जारी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया आगामी जियोबुक बाबत सर्वकाही. New JioBook Laptop स्पेसिफिकेशन्स अ‍ॅमेझॉननं लॅपटॉपसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. […]

The post 31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आगामी जियोबुक अ‍ॅमेझॉन इंडियावर विकला जाईल.
  • ह्याची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
  • हा जुन्या लॅपटॉपपेक्षा हलक्या स्पेसिफिकेशन्ससह येऊ शकतो.

Jio आपला सेकंड-जनरेशन JioBook भारतीय बाजारात आणण्यासाठी तयार आहे. कंपनी ह्या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जुलैला आपला नवीन जियोबुक लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे. आता तर अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून New JioBook Laptop चा टीजर देखील जारी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया आगामी जियोबुक बाबत सर्वकाही.

New JioBook Laptop स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉननं लॅपटॉपसाठी एक मायक्रोसाइट बनवली आहे. ह्या साइटवर टीजर इमेज आणि लॅपटॉपचे काही खास फीचर्स समोर आले आहेत. लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की ह्याची बॉडी हलकी असेल. कारण गेल्यावर्षीचा मॉडेल 1.2 किलोग्रामचा होता तर नवीन अपग्रेडेड व्हर्जनचं वजन 990 ग्राम असेल.

तसेच कन्फर्म माहिती देण्यात आली आहे की लॅपटॉप 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. नवीन जियोबुकमध्ये JioOS (अँड्रॉइड बेस्ड) आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. त्याचबरोबर कंपनी ह्यात संपूर्ण दिवस चालणारी बॅटरी देऊ शकते.

JioBook price (संभाव्य)

कंपनीनं आपला पहिल्या-जनरेशनचा जियोबुक 15,799 रुपयांमध्ये सादर केला होता. जो Reliance Digital stores वरून विकत घेता येईल. तर, नवीन जनरेशनच्या लॅपटॉपची किंमत देखील 20,000 पेक्षा कमी असू शकते. हा लॅपटॉप फक्त अ‍ॅमेझॉनवर विकला जाणार नाही तर रिटेल स्टोर्सवरून देखील ह्याची खरेदी करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीनं आपला हा बजेट फ्रेंडली लॅपटॉप सर्वप्रथम IMC 2022 मध्ये सादर केला होता. जुलैमध्ये Jio चा दुसरा लॅपटॉप भारतात लाँच होईल. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपला जिओ भारत 4जी फीचर फोन सादर केला आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे. कारण JioBook वर देखील 4G सिमची आवश्यकता होती आहे, त्यामुळे ह्या लॅपटॉप सह कंपनी किफायती डेटा प्लॅन देखील सादर करू शकते.

The post 31 जुलैला लाँच होईल New JioBook laptop; जाणून घ्या संभाव्य किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-jiobook-laptop-launching-in-india-on-july-31st-expected-price-specs-features/feed/ 0
टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु https://www.91mobiles.com/marathi/jiobook-sale-on-reliance-digital-price-specification-video-photos/ https://www.91mobiles.com/marathi/jiobook-sale-on-reliance-digital-price-specification-video-photos/#respond Fri, 21 Oct 2022 10:29:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14229 JioBook Laptop Sale: टेलीकॉम विश्वात नवी क्रांती घडवणारी कंपनी Reliance Jio आता Laptop मार्केटवर राज्य करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी मध्ये IMC 2022 (इंडियन मोबाइल कांग्रेस 2022) दरम्यान JioBook सादर केल्यानंतर कंपनीनं गुपचुप हा लॅपटॉप सेलसाठी उपलब्ध केला आहे. जर तुम्ही देखील हा स्वस्त लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा Reliance Digital […]

The post टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
JioBook Laptop Sale: टेलीकॉम विश्वात नवी क्रांती घडवणारी कंपनी Reliance Jio आता Laptop मार्केटवर राज्य करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी मध्ये IMC 2022 (इंडियन मोबाइल कांग्रेस 2022) दरम्यान JioBook सादर केल्यानंतर कंपनीनं गुपचुप हा लॅपटॉप सेलसाठी उपलब्ध केला आहे. जर तुम्ही देखील हा स्वस्त लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा Reliance Digital च्या साइटवर सेलसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा लॅपटॉप सरकारी ई-कॉमर्स पोर्टलवर देखील उपलब्ध झाला होता. चला जाणून घेऊया या लॅपटॉपच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

JioBook Laptop Price

JioBook Price ची किंमत पाहता या लॅपटॉपची MRP 35,605 रुपये आहे. परंतु Reliance Digital वर बेस्ट डील दरम्यान हा लॅपटॉप 15,799 वर विकला जात आहे. तसेच, क्रेडिट कार्ड (Yes Bank, Kotak Mahindra Bank, Axis Bank इत्यादी बँक) द्वारे खरेदी केल्यास डिस्काउंटही मिळेल. इतकेच नव्हे तर 758.56 रुपयांच्या EMI ऑप्शन वर देखील हा लॅपटॉप विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त सीरिजमध्ये नव्या Samsung स्मार्टफोनची एंट्री; 4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह Galaxy A04e लाँच

JioBook सध्या Reliance Digital वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा लॅपटॉप सिंगल कलर ऑप्शन-Jio Blue मध्ये विकत घेता येईल. कंपनीकडून JioBook वर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा लॅपटॉप https://gem.gov.in/ वेबसाइटवर 19,500 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला होता, जिथून फक्त सरकारी डिपार्टमेंट्सना खरेदी करता येते

JioBook specifications आणि features

JioBook ची बॉडी प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि यात 4जी सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book च्या कीबोर्डमध्ये विंडोज बटनच्या जागी Jio लिहिण्यात आलं आहे. तसेच, Jio Book च्या बॅक पॅनलवर जियोची ब्रँडिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. तसेच यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर याआधी अनेक Smartphone मध्ये देखील दिसला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो आणि याचा कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.

Jiobook sale on reliance digital price specification video photos

1.2 किलोग्राम वजन असलेल्या जियो लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे, जी 128GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. प्रथमदर्शनी Jio Book क्रोमबुक सारखा वाटतो. तसेच यात विंडोज असलेला कीबोर्ड देखील आहे. Jio Book मध्ये विंडोजचे काही आवश्यक अ‍ॅप्स आहेत, परंतु ऑपरेटिंग सिस्टम जियो (JioOS) ची आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एचडी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Airtel Sim हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित करा ब्लॉक; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Jio Book सह जियोचे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. यात जियो क्लाउड पीसीचा देखील सपोर्ट आहे. Jio Book मध्ये मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर प्री-इंस्टॉल मिळतो. तसेच कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बार देखील आहे. ड्युअल स्पिकर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता JioBook वाय-फाय (802.11ac), LTE (B3, B5, B40), ब्लूटूथ v5, एचडीएमआय मिनी पोर्ट, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि मायक्रोयूएसडी कार्ड रीडर आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiobook-sale-on-reliance-digital-price-specification-video-photos/feed/ 0
स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/jio-laptop-available-for-sale-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/jio-laptop-available-for-sale-price-specifications-and-features/#respond Mon, 03 Oct 2022 12:26:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13663 गेले कित्येक दिवस जियोच्या किफायशीर लॅपटॉपच्या बातम्या येत आहेत. अखेरीस आज हा JioBook विक्रीसाठी उपलब्ध झाला झाला आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरु असलेल्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) मध्ये रिलायन्स जियो (Reliance Jio) नं आपल्या पहिल्या लॅपटॉप JioBook ची पहिली झलक दाखवली. आता सेलसाठी लिस्ट झालेला हा लॅपटॉप सर्वप्रथम 91मोबाइल्सच्या टीमनं स्पॉट केला आहे. स्वस्त […]

The post स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस जियोच्या किफायशीर लॅपटॉपच्या बातम्या येत आहेत. अखेरीस आज हा JioBook विक्रीसाठी उपलब्ध झाला झाला आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरु असलेल्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) मध्ये रिलायन्स जियो (Reliance Jio) नं आपल्या पहिल्या लॅपटॉप JioBook ची पहिली झलक दाखवली. आता सेलसाठी लिस्ट झालेला हा लॅपटॉप सर्वप्रथम 91मोबाइल्सच्या टीमनं स्पॉट केला आहे. स्वस्त जियो लॅपटॉप ई-कॉमर्स साइटवर सेलसाठी लिस्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही देखील हा विकत घेण्याची योजना बनवत असाल तर खरेदी करण्यापूर्वी प्राइस आणि फीचर्स जाणून घ्या.

Jio Laptop ची विक्री

Jio Laptop सरकारी वेबसाइटवर विकला जात आहे, ज्याचा अ‍ॅड्रेस – gem.gov.in. आहे. कंपनीनं गुपचूप या साइटवर आपल्या लॅपटॉपची विक्री सुरु केली आहे. या सरकारी साइटवर Resellers च्या माध्यमातून हा लॅपटॉप विकला जात आहे जो सामान्य लोकांसाठी नाही. ही सरकारी मार्केट प्लेस आहे आणि इथे सरकारी डिपार्टमेंट्सच खरेदी करू शकतात. तसेच कंपनी हा लॅपटॉप सामान्य ग्राहकांसाठी सादर करणार आहे की फक्त बिजनेसेससाठी याचा वापर केला जाईल, हे देखील अजून स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: दोन दिवस टिकेल या Samsung फोनची बॅटरी; अत्यंत कमी किंमतीत 50MP कॅमेरा असलेला फाडू फोन

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

JioBook लॅपटॉपची किंमत

https://gem.gov.in/ वर विकला जाणारा JioBook लॅपटॉप 19,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. बातमी लिहताना सरकारी साइटवर दिलेल्या माहितीनुसार या प्रोडक्टचे फक्त 10 युनिट्सच स्टॉकमध्ये आहेत. रिलायन्स जियोच्या अधिकृत साइटवर मात्र हा लॅपटॉप अजूनतरी विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला नाही.

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

नोट: रिलायन्स जियोनं या लॅपटॉपच्या उपलब्धतेची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु दिवाळीच्या निमिताने Jio Book ग्राहकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे.

JioBook चे स्पेसिफिकेशन्स

JioBook ची बॉडी प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि यात 4जी सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book च्या कीबोर्डमध्ये विंडोज बटनच्या जागी Jio लिहिण्यात आलं आहे. तसेच, Jio Book च्या बॅक पॅनलवर जियोची ब्रँडिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. तसेच यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर याआधी अनेक Smartphone मध्ये देखील दिसला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो आणि याचा कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

1.2 किलोग्राम वजन असलेल्या जियो लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. प्रथमदर्शनी Jio Book क्रोमबुक सारखा वाटतो. तसेच यात विंडोज असलेला कीबोर्ड देखील आहे. Jio Book मध्ये विंडोजचे काही आवश्यक अ‍ॅप्स आहेत, परंतु ऑपरेटिंग सिस्टम जियो (JioOS) ची आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एचडी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone लाँच! चायनीज कंपनीच्या नाकावर टिच्चून स्वदेशी कंपनीची कामगिरी

Jio Book सह जियोचे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. यात जियो क्लाउड पीसीचा देखील सपोर्ट आहे. Jio Book मध्ये मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर प्री-इंस्टॉल मिळतो. तसेच कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बार देखील आहे. ड्युअल स्पिकर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय आणि ब्लूटूथचा ऑप्शन मिळतो.

The post स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-laptop-available-for-sale-price-specifications-and-features/feed/ 0