Airtel Sim हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित करा ब्लॉक; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

स्मार्टफोन सध्या प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे ऑनलाइन डेटा चोरी आणि ऑनलाइन फ्रॉडच्या अनेक घटना समोर येत असतात. तसेच अनेकदा स्मार्टफोन चोरी होणे आणि हरवणे या घटना देखील वारंवार घडत असतात. अशावेळी युजरचं सिम कार्ड देखील त्या स्मार्टफोन सोबत जातं. सध्या Sim Card च्या माध्यमातून ऑनलाइन फ्रॉड आणि डेटा चोरीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे आम्ही आम्ही तुम्हाला Airtel SIM card चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर Sim Block करण्याची पद्धत सांगणार आहोत.

Airtel सिम ब्लॉक करण्याची सोपी पद्धत:

कस्टमर केयरला कॉल करून करा सिम ब्लॉक

block-airtel-sim-if-it-is-lost-or-stolen-know-these-easy-steps

जर तुम्ही एयरटेल कस्टमर असाल आणि तुमचं सिम ब्लॉक करायचं असेल तर (How to block Airtel Sim) यासाठी तुम्हाला एयरटेलच्या 198 आणि 121 नंबरवर कॉल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कस्टमर केयर एग्जीक्यूटिवशी बोलण्याचा पर्याय निवडावा लागेल. तुमची परिस्थती समजून कस्टमर केयर एग्जीक्यूटिव्ह तुम्हाला माहिती विचारतील. त्यानंतर तुमची माहिती व्हेरिफाय केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट पुढे पाठवली जाईल आणि तुमचं सिम कार्ड ब्लॉक केला जाईल. जर तुम्ही एयरटेल कस्टमर नसाल तर तुम्ही 9849098490 किंवा 1800 103 4444 वर देखील कॉल करू शकता. इथे तुम्ही इतर कंपन्यांच्या नंबरवरून कॉल करू शकता. हे देखील वाचा: Okaya नं लाँच केल्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, इंजिनसह रेंज देखील फाडू

एयरटेल स्टोरवर जाऊन करा सिम ब्लॉक

block-airtel-sim-if-it-is-lost-or-stolen-know-these-easy-steps

एयरटेल सिम ब्लॉक करण्यासाठी तुम्ही जवळच्या Airtel Store वर देखील जाऊ शकता. स्टोरमधील एजंट तुमची मदत करेल. तुम्हाला तुमच्या सोबत ओरिजनल आयडी प्रूफ घेऊन जावा लागेल, जसे की आधार कार्ड किंवा विज बिल. तुमची समस्या ऐकल्यानंतर आणि समजल्यानंतर एजंट तुम्ही दिलेली माहिती व्हेरिफाय करेल आणि रिक्वेस्ट प्रोसेस केल्यानंतर तुमचं सिम ब्लॉक होईल.

ऑनलाइन प्रक्रियाच्या माध्यमातून असं करा सिम ब्लॉक

block-airtel-sim-if-it-is-lost-or-stolen-know-these-easy-steps

एयरटेल कंपनीच्या Airtel Thanks App च्या माध्यमातून देखील तुम्ही सिम ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला अ‍ॅपवर हेल्प सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर लाइव्ह चॅट सपोर्ट ऑप्शनवर जाऊन तुम्हाला स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. लाइव्ह चॅट सपोर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही कशाप्रकारे स्टेप्स फॉलो करून तुमचं एयरटेल सिम ब्लॉक करू शकता. तसेच ई-मेलच्या माध्यमातून देखील एयरटेल सिम ब्लॉक करता येतं, यासाठी तुम्हाला 121@in.airtel.com वर मेल पाठवावा लागेल. या ई-मेल मध्ये तुम्हाला तुमची समस्या व्यवस्थित लिहावी लागेल आणि तुम्हाला तुमचं सिम त्वरित ब्लॉक करायचं आहे, हे सांगावं लागेल. त्यानंतर एयरटेल तुमच्यासाठी संपर्क करेल. हे देखील वाचा: 14,999 रुपयांमध्ये मिळवा 42 इंचाचा शानदार Smart TV; एक्सचेंज आणि बँक ऑफरमुळे एक्स्ट्रा डिस्काउंट

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here