स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट

गेले कित्येक दिवस जियोच्या किफायशीर लॅपटॉपच्या बातम्या येत आहेत. अखेरीस आज हा JioBook विक्रीसाठी उपलब्ध झाला झाला आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरु असलेल्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) मध्ये रिलायन्स जियो (Reliance Jio) नं आपल्या पहिल्या लॅपटॉप JioBook ची पहिली झलक दाखवली. आता सेलसाठी लिस्ट झालेला हा लॅपटॉप सर्वप्रथम 91मोबाइल्सच्या टीमनं स्पॉट केला आहे. स्वस्त जियो लॅपटॉप ई-कॉमर्स साइटवर सेलसाठी लिस्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही देखील हा विकत घेण्याची योजना बनवत असाल तर खरेदी करण्यापूर्वी प्राइस आणि फीचर्स जाणून घ्या.

Jio Laptop ची विक्री

Jio Laptop सरकारी वेबसाइटवर विकला जात आहे, ज्याचा अ‍ॅड्रेस – gem.gov.in. आहे. कंपनीनं गुपचूप या साइटवर आपल्या लॅपटॉपची विक्री सुरु केली आहे. या सरकारी साइटवर Resellers च्या माध्यमातून हा लॅपटॉप विकला जात आहे जो सामान्य लोकांसाठी नाही. ही सरकारी मार्केट प्लेस आहे आणि इथे सरकारी डिपार्टमेंट्सच खरेदी करू शकतात. तसेच कंपनी हा लॅपटॉप सामान्य ग्राहकांसाठी सादर करणार आहे की फक्त बिजनेसेससाठी याचा वापर केला जाईल, हे देखील अजून स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: दोन दिवस टिकेल या Samsung फोनची बॅटरी; अत्यंत कमी किंमतीत 50MP कॅमेरा असलेला फाडू फोन

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

JioBook लॅपटॉपची किंमत

https://gem.gov.in/ वर विकला जाणारा JioBook लॅपटॉप 19,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. बातमी लिहताना सरकारी साइटवर दिलेल्या माहितीनुसार या प्रोडक्टचे फक्त 10 युनिट्सच स्टॉकमध्ये आहेत. रिलायन्स जियोच्या अधिकृत साइटवर मात्र हा लॅपटॉप अजूनतरी विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला नाही.

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

नोट: रिलायन्स जियोनं या लॅपटॉपच्या उपलब्धतेची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु दिवाळीच्या निमिताने Jio Book ग्राहकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे.

JioBook चे स्पेसिफिकेशन्स

JioBook ची बॉडी प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि यात 4जी सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book च्या कीबोर्डमध्ये विंडोज बटनच्या जागी Jio लिहिण्यात आलं आहे. तसेच, Jio Book च्या बॅक पॅनलवर जियोची ब्रँडिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. तसेच यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर याआधी अनेक Smartphone मध्ये देखील दिसला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो आणि याचा कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

1.2 किलोग्राम वजन असलेल्या जियो लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. प्रथमदर्शनी Jio Book क्रोमबुक सारखा वाटतो. तसेच यात विंडोज असलेला कीबोर्ड देखील आहे. Jio Book मध्ये विंडोजचे काही आवश्यक अ‍ॅप्स आहेत, परंतु ऑपरेटिंग सिस्टम जियो (JioOS) ची आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एचडी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone लाँच! चायनीज कंपनीच्या नाकावर टिच्चून स्वदेशी कंपनीची कामगिरी

Jio Book सह जियोचे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. यात जियो क्लाउड पीसीचा देखील सपोर्ट आहे. Jio Book मध्ये मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर प्री-इंस्टॉल मिळतो. तसेच कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बार देखील आहे. ड्युअल स्पिकर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय आणि ब्लूटूथचा ऑप्शन मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here