JioPhone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Jul 2023 16:19:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 खुशखबर: 999 रुपयांमध्ये लाँच झाला स्वस्त जियो भारत V2 4जी फोन, असे आहेत फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/jio-cheapest-4g-feature-phone-bharat-v2-launched-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/jio-cheapest-4g-feature-phone-bharat-v2-launched-price-specification/#respond Mon, 03 Jul 2023 16:19:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21870 रिलायन्स जियोनं 4जी फोन ‘जियो भारत V2’ लाँच केला आहे. जियो भारत V2 कंपनीनं 999 रुपयांमध्ये सादर केला आहे. ह्या फोनच्या माध्यमातून कंपनी भारतातील 25 कोटी 2जी ग्राहकांना लक्ष्य करत आहे. हे ग्राहक आता एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया सारख्या कंपन्यांकडे आहेत. तसेच रिलायन्स जियोचा दावा आहे की ‘जियो भारत V2’ च्या जीवावर कंपनी 10 कोटींपेक्षा जास्त […]

The post खुशखबर: 999 रुपयांमध्ये लाँच झाला स्वस्त जियो भारत V2 4जी फोन, असे आहेत फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मार्केटमध्ये ‘जियो भारत V2’ ची किंमत सर्वात कमी आहे.
  • कंपनीनं 123 रुपयांचा प्लॅन पण सादर केला आहे.
  • कंपनीनं ‘जियो भारत’ प्लॅटफॉर्म देखील लाँच केला आहे.

रिलायन्स जियोनं 4जी फोन ‘जियो भारत V2’ लाँच केला आहे. जियो भारत V2 कंपनीनं 999 रुपयांमध्ये सादर केला आहे. ह्या फोनच्या माध्यमातून कंपनी भारतातील 25 कोटी 2जी ग्राहकांना लक्ष्य करत आहे. हे ग्राहक आता एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया सारख्या कंपन्यांकडे आहेत. तसेच रिलायन्स जियोचा दावा आहे की ‘जियो भारत V2’ च्या जीवावर कंपनी 10 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जोडेल.

Jio Bharat V2 सह लाँच झाला रिचार्ज प्लॅन

999 रुपयांमध्ये आलेल्या ‘जियो भारत V2’ सह एक मंथली रिचार्ज देखील सादर करण्यात आला आहे. हा प्लॅन कंपनीनं 123 रुपयांमध्ये आणला आहे. प्लॅनमध्ये ‘जियो भारत V2’ च्या ग्राहकांना कंपनी 14 जीबी 4जी डेटा मिळेल. तसेच ‘जियो भारत V2’ वर वार्षिक प्लॅन देखील आहे ज्यासाठी ग्राहकांना 1234 रुपये द्यावे लागतील.

Jio Bharat V2 ची खासियत

  • ‘जियो भारत V2’ 4G वर चालतो, यात एचडी व्हॉइस कॉलिंग आणि एफएम रेडियो आहे.
  • तसेच फोनमध्ये 128 जीबी एसडी मेमरी कार्ड सपोर्ट सारखे फीचर्स आहेत.
  • मोबाइलमध्ये 1.77 इंचाची टीएफटी स्क्रीन आणि 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • तसेच फोनमध्ये 1000 mAh ची बॅटरी, 3.5 mm चा हेडफोन जॅक, पावरफुल लाउडस्पिकर आणि टार्च देण्यात आली आहे.

Jio Bharat V2 मोबाइल ग्राहकांना जियो सिनेमा सब्सक्रिप्शनसह जियो-सावनच्या 8 कोटी गाण्यांचा अ‍ॅक्सेस मिळेल. ग्राहक जियो-पेच्या माध्यमातून यूपीआयवर देवाण घेवाण करू शकतात. भारतातील प्रमुख भाषा ‘जियो भारत V2’ मध्ये आहेत. हा मोबाइल 22 भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.

Jio Bharat V2 ची उपलब्धता

कंपनीनं 7 जुलैपासून ‘जियो भारत V2’ च्या बीटा ट्रायलची घोषणा केली आहे. कंपनीचा प्लॅन ‘जियो भारत V2’ 6,500 तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचा आहे. जियोफोन प्रमाणेच ‘जियो भारत V2’ कडून कंपनीला खूप अपेक्षा आहेत.

The post खुशखबर: 999 रुपयांमध्ये लाँच झाला स्वस्त जियो भारत V2 4जी फोन, असे आहेत फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-cheapest-4g-feature-phone-bharat-v2-launched-price-specification/feed/ 0
न्यू Jio Phone ऑफर: कंपनी देत आहे 2 वर्षे सर्वकाही फ्री पण द्यावे लागतील इतके पैसे https://www.91mobiles.com/marathi/jio-offer-free-unlimited-calling-data-jio-phone-24-months-rs-1999/ https://www.91mobiles.com/marathi/jio-offer-free-unlimited-calling-data-jio-phone-24-months-rs-1999/#respond Sat, 27 Feb 2021 09:39:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10204 रिलायंस जियोने दोन ऑफर सादर केल्या आहेत. या दोन प्लानची किंमत क्रमश: 1,999 रुपये व 1,499 रुपये आहे.

The post न्यू Jio Phone ऑफर: कंपनी देत आहे 2 वर्षे सर्वकाही फ्री पण द्यावे लागतील इतके पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारताच्या टेलिकॉम इंडस्ट्रीवर राज्य करत असलेल्या Reliance Jio ने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. कंपनीने हि शानदार ऑफर 2जी मुक्त भारत ‘2G-MUKT BHARAT’ अभियांतर्गत लॉन्च केली आहे. सध्या देशात करीब 30 कोटी 2जी युजर्स आहेत ज्यांच्यासाठी जियोने आपली नवीन ऑफर सादर केली आहे. कंपनी अधून मधून अश्या प्रकारच्या ऑफरची सादर करत असते. या ऑफरची खासियत अशी आहे कि यात कंपनी फक्त, डेटा, कॉलिंग आणि एसएमएस नव्हे तर फोन पण फ्री देत आहे. (jio offer free unlimited calling data jio phone 24 months rs 1999)

ऑफरची किंमत

रिलायंस जियोने दोन ऑफर सादर केल्या आहेत. या दोन प्लानची किंमत क्रमश: 1,999 रुपये व 1,499 रुपये आहे. या ऑफरची खासियत अशी कि हि नवीन ऑफर जियो फोनसह मिळत आहे. जियोची हि नवीन ऑफर 1 मार्च 2021 पासून सुरु होत आहे आणि हिचा लाभ देशातील सर्व रिलायंस रिटेल आणि जियो रिटेलर्सवर मिळेल.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy A32 4G, भारतात पण लवकरच करेल एंट्री

प्लान मध्ये मिळतील हे लाभ

सर्वप्रथम 1,999 रुपयांची ऑफर पाहता यात युजर्सना एक Jio Phone दिला जाईल. या फोन सोबत 24 महीने (दोन वर्ष) अनलिमिटेड कॉलिंगसह दरमहिन्याला 2जीबी हाईस्पीड 4जी डेटा मिळेल. याचा अर्थ असा आहे कि एकदा 2,000 रुपये दिल्यानंतर दोन वर्ष युजर्सना एक पण रुपयांचा रिचार्ज करावा लागला नाही.

दुसऱ्या प्लानची किंमत 1499 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जियो फोनसह 1 वर्ष पर्यंतची अनलिमिटेड कॉलिंगसह 2 जीबी प्रतिमाह डेटा दिला जाईल. इतकेच नव्हे तर ऑफरमध्ये जियो फोन ग्राहकांचा विचार पण करत कंपनीने सांगितले आहे कि जुने युजर्स 750 रुपये देऊन एक वर्ष रिचार्ज ना करता राहू शकतात. या प्लान मध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 2जीबी प्रतिमाह डेटा दिला जाईल.

हे देखील वाचा : Exclusive: बघा Realme 8 Pro ची पहिली झलक, Salman Khan च्या हातात दिसला हा फोन

रिलायंस जियोने निर्देशक आकाश अंबानी म्हणाले कि, “जेव्हा जग 5G क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे तेव्हा भारतात 30 कोटी लोक 2 जी मध्ये अडकले आहेत. ते इंटरनेटच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गेल्या वर्षांपासून जियोने इंटरनेट सर्वांपर्यंत पोहोचवली आहे आणि प्रत्येक भारतीयांना टेक्नोलॉजीचा लाभ मिळाला आहे. टेक्नोलॉजी आता काही निवडक लोकांचा विशेषाधिकार राहिला नाही. न्यू जियो फोन 2021 ऑफर त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. जियोमध्ये आम्ही हा डिजिटल डिवाइड मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत”

The post न्यू Jio Phone ऑफर: कंपनी देत आहे 2 वर्षे सर्वकाही फ्री पण द्यावे लागतील इतके पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-offer-free-unlimited-calling-data-jio-phone-24-months-rs-1999/feed/ 0
Reliance Jio लवकरच लॉन्च करेल आपला दमदार स्मार्टफोन, किंमत असेल 8000 रुपयांपेक्षा पण कमी! https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-to-soon-launch-4g-smartphones-price-around-rs-8000/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-to-soon-launch-4g-smartphones-price-around-rs-8000/#respond Mon, 30 Nov 2020 10:26:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9111 रिलायंस जियो अश्याप्रकारे वोडाफोन आयडिया आणि भारती एयरटेल सारख्या कंपन्यांकडून जास्तीत जास्त युजर्सना पण आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

The post Reliance Jio लवकरच लॉन्च करेल आपला दमदार स्मार्टफोन, किंमत असेल 8000 रुपयांपेक्षा पण कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची बातमी अनेक दिवसांपासून इंटरनेट वर येत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार कंपनी 4G फीचर फोन युजर्सना स्मार्टफोन्स वर नेण्याची तयारी करत आहे. तसेच आता एक रिपोर्ट समोर आली आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि टेलीकॉम कंपनी रिलांयस जियो लवकरच देशात स्मार्टफोन निर्माता वीवोच्या पार्टनरशिप मध्ये एक एक्सक्लूसिव स्मार्टफोन्स लॉन्च करेल. कंपनी आपल्या स्मार्टफोन्स सह OTT प्लॅटफॉर्मचा फ्री अ‍ॅक्सिस आणि वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या अनेक ऑफर्स पण देऊ शकते.

रिलायंस जियो अश्याप्रकारे वोडाफोन आयडिया आणि भारती एयरटेल सारख्या कंपन्यांकडून जास्तीत जास्त युजर्सना पण आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. इकनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार रिलायंस जियो लोकल मैन्युफैक्चरर जसे कार्बन, लावा व्यतिरिक्त काही चीनी ब्रँडस सोबत बोलणी करत आहे.

रिपोर्ट मध्ये या संबंधित लोकांचा हवाला देत ET ने सांगितले आहे कि कंपनी हा स्मार्टफोन 8 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनतरी कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही.

5G स्मार्टफोन

Reliance Jio ने अधिकृतपणे घोषणा केली आहे की कंपनीने 5G नेटवर्कची तयारी केली आहे आणि भारतात 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच सेवा सुरू देखील होईल. आशा आहे कि 2021 पर्यंत भारतात 5जी स्पेक्ट्रम लिलावसाठी उपलब्ध होईल आणि त्यानंतर सर्विस पण सुरु होईल. 5जी ची घोषणा करत अंबानीने स्पष्ट केले कि जियो 5जी नेटवर्क पूर्णपणे पूरी ‘मेड इन इंडिया’ असेल. त्याचबरोबर त्यांनी Google सह मिळून आपला स्वतःचा 5G Smartphone बनवेल. कंपनीने फोनचे नाव सांगितले नाही पण एवढे मात्र सांगितले की हा फोन Made In India असेल.

सोर्स

The post Reliance Jio लवकरच लॉन्च करेल आपला दमदार स्मार्टफोन, किंमत असेल 8000 रुपयांपेक्षा पण कमी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-to-soon-launch-4g-smartphones-price-around-rs-8000/feed/ 0
JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/#respond Wed, 18 Nov 2020 13:55:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8988 हैराणीची बाब म्हणजे आता विकला जाणारा JioPhone चा रिटेल बॉक्स पण आधी विकल्या जाणाऱ्या जियोफोनच्या बॉक्स पेक्षा वेगळा असेल.

The post JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तीन वर्षांपूर्वी 2017 मध्ये Reliance Jio ने देशातील मोबाईल बाजारात क्रांती करत आपला 4G फीचर फोन JioPhone लॉन्च केला होता. हा फोन युजर्सना बंडल ऑफर सह उपलब्ध केला होता जो आतापर्यंत ग्राहकांना फक्त 699 रुपयांमध्ये मिळत होता. जियोफोन भारतीय युजर्सना इतका आवडला कि फीचर फोन्सच्या विक्रीत Jio Phone भारतच नव्हे तर जगातील टॉप सोल्ड फोन मध्ये समाविष्ट झाला होता. फोनची मागणी देशात अजूनही मोठ्याप्रमाणावर आहे, पण जियोफोन मिळवणे आता लोकांसाठी महाग होणार आहे.

91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे कि JioPhone कंपनी स्टॉक मध्ये घेऊन येत आहे पण यावेळी हा फोन ग्राहकांना महागात विकला जाईल. प्राप्त माहितीनुसार Reliance Jio जियोफोनची किंमत 300 रुपयांनी वाढवण्याची योजना बनवत आहे. म्हणजे आतापर्यंत 699 रुपयांमध्ये मिळणारा हा 4जी फीचर फोन आता 999 रुपयांमध्ये विकला जाईल. कंपनीने पुन्हा दुकानांवर जियोफोनचा स्टॉक देण्यास सुरवात केली आहे आणि लवकरच नवीन किंमतीसह फोनच्या विक्रीची अधिकृत घोषणा होणार आहे.

हैराणीची बाब म्हणजे आता विकला जाणारा JioPhone चा रिटेल बॉक्स पण आधी विकल्या जाणाऱ्या जियोफोनच्या बॉक्स पेक्षा वेगळा असेल. वरील फोटो मध्ये नवीन जियोफोनचा बॉक्स दिसत आहे ज्यावर फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सुरवातीला जियोफोन स्प्रेडट्रम प्रोसेसर वर लॉन्च केला गेला होता तर नवीन JioPhone क्वॉलकॉमच्या चिपसेट वर काम करेल. जियो यावेळी नवीन जियोफोन प्लान पण अनाउंस करणार आहे ज्यात 125 रुपयांचा रिचार्ज पॅक पण असेल. या पॅक सह JioPhone ची किंमत युजर्सना 1,124 रुपये पडेल.

JioPhone

जियोफोनचे फीचर्स पाहता रिलायंस जियोच्या या फर्स्ट जेनरेशन 4G फीचर फोन मध्ये 240×320 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आली आहे. आतापर्यंत फोन मध्ये 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर देण्यात आला होता तर आता जियोफोन मध्ये क्वॉलकॉम प्रोसेसर मिळेल. या डिवाइस मध्ये 512 एमबी रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे. फोटोग्राफीसाठी मागे 2-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आणि फ्रंट पॅनल वर वीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी 2000 एमएएचची आहे. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ वी4.1, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 चा सपोर्ट आहे.

रिलायंस जियोफोन व्हिडीओ

The post JioPhone आता होईल अजून महाग, रिलायंस जियो वाढवणार आहे फोनची किंमत, एवढी असेल नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-4g-feature-phone-jio-phone-price-to-be-increased-by-rs-300-in-india/feed/ 0
जियोने केले शक्तिप्रदर्शन, 5जी टेक्नॉलॉजीची केली यशस्वी चाचणी, लवकरच येईल Jio 5G https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-qualcomm-tested-5g-technology-achieve-over-1gbps-speed/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-qualcomm-tested-5g-technology-achieve-over-1gbps-speed/#respond Wed, 21 Oct 2020 12:35:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8601 या टेस्टिंग नंतर भारत त्या एलिट देशांच्या लिस्ट मध्ये समाविष्ट झाला आहे जे आपल्या युजर्सना 1 Gbps स्पीड देतात. सध्या अमेरिका, साउथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी असे देश आहेत जे आपल्या 5जी कस्टमर्सना 1 Gbps स्पीड देत आहेत.

The post जियोने केले शक्तिप्रदर्शन, 5जी टेक्नॉलॉजीची केली यशस्वी चाचणी, लवकरच येईल Jio 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेलीकॉम सेक्टर मध्ये मोठा धमाका केल्यानंतर रिलायंस जियो आता भारतीयांसाठी सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन बनवण्याचे काम करत आहे, ज्याची किंमत 2,500 रुपयांपेक्षा पण कमी असू शकते. कंपनीने स्वस्त जियो 5G फोनची घोषणा आधीच केली आहे. आता क्वालकॉमच्या 5G इवेंट मध्ये रिलायंस जियोने एक मोठा कारनामा केला आहे, ज्यामुळे भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये हलचल निर्माण होणे निश्चित आहे. अमेरिकन टेक्नोलॉजी फर्म क्वालकॉम सह मिळून रिलायंस जियोने अमेरिकेत आपल्या 5जी टेक्नोलॉजीचे यशस्वी चाचणी केली आहे.

अमेरिकेतील सॅन डियागो मध्ये झालेल्या एका वर्चुअल इवेंट मध्ये हि घोषणा करण्यात आली. रिलायंस जियोचे प्रेसिडेंट मॅथ्यु ओमान यांनी क्वालकॉम इवेंट मध्ये सांगितले कि क्वालकॉम आणि रिलायंसची सब्सिडरी रेडिसिस सह आम्ही 5जी टेक्नॉलॉजी वर काम करत आहोत आहेत जेणेकरून भारतात हि टेक्नॉलॉजी लवकर लॉन्च करता येईल.

मेड इन इंडिया असेल 5G

जवळपास तीन महिन्यांपूर्वी 15 जुलैला रिलायंसच्या इंडस्ट्रीच्या बैठकीत रिलायंस जियोचे मलिक मुकेश अंबानींनी 5जी टेक्नोलॉजीच्या सुरवातीची घोषणा केली होती. देशातील साधनांचा वापर करून विकसित करण्यात आलेली हि टेक्नॉलॉजी देश देत मुकेश अंबानींनी म्हटले होते कि 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच रिलायंस जियो 5जी टेक्नॉलॉजीच्या टेस्टिंगसाठी तयार आहे.

मिळाला 1 Gbps की स्पीड

या टेस्टिंग नंतर भारत त्या एलिट देशांच्या लिस्ट मध्ये समाविष्ट झाला आहे जे आपल्या युजर्सना 1 Gbps स्पीड देतात. सध्या अमेरिका, साउथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी असे देश आहेत जे आपल्या 5जी कस्टमर्सना 1 Gbps स्पीड देत आहेत.

रिलायंस जियोफोन 2 व्हिडीओ

The post जियोने केले शक्तिप्रदर्शन, 5जी टेक्नॉलॉजीची केली यशस्वी चाचणी, लवकरच येईल Jio 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-qualcomm-tested-5g-technology-achieve-over-1gbps-speed/feed/ 0
Jio 5G फोन झाला लिस्ट, यात आहे 1GB रॅम, ‘Made in india’ 5जी फोन करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-smartphone-spotted-on-google-play-know-specifications-orbic/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-smartphone-spotted-on-google-play-know-specifications-orbic/#respond Wed, 30 Sep 2020 13:57:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8367 रिलायंसचा मॉडेल नंबर RC545L असलेला फोन गूगल प्ले कंसोल वर स्पॉट केला गेला आहे.

The post Jio 5G फोन झाला लिस्ट, यात आहे 1GB रॅम, ‘Made in india’ 5जी फोन करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio द्वारे अँड्रॉइड 5G फोन सादर केला जाणार असल्याची घोषणा केल्यापासून यूजर्स याची वाट बघत आहेत. यूजर्सच नाहीत तर इतर मोबाईल ब्रँड्स पण जियोच्या प्लानिंग वर नजर ठेऊन आहेत. Google सोबत मिळून 5जी फोन घेऊन येणाऱ्या रिलायंस जियोने अधिकृतपणे हँडसेटबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. पण काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, त्यात सांगण्यात आले होते कि रिलांयस यावर्षी डिसेंबर मध्ये नवीन जियो स्मार्टफोन लॉन्च करू शकते. तसेच रिलायंसचा मॉडेल नंबर RC545L असलेला फोन गूगल प्ले कंसोल वर स्पॉट केला गेला आहे.

लिस्टिंग मध्ये समोर आलेला फोन रिलायंस ऑर्बिक स्मार्टफोन सीरीज अंतर्गत सादर केला जाऊ शकतो, त्यामुळे आशा आहे कि कंपनी पुन्हा एकदा Orbic स्मार्टफोन सीरीज परत आणण्याची तयारी करत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ऑर्बिक स्मार्टफोन्सना सर्टिफिकेशन्स पण मिळाले आहे. हि लिस्टिंग टिप्स्टर मुकुल शर्माने स्पॉट केली आहे.

गूगल प्ले कंसोल वर फोनचा फ्रंट लुक पण दाखवण्यात आला आहे. या फोटोनुसार फोन मध्ये टॉप आणि बॉटमला जाड बेजल्स असतील. फोनचा मागील लुक अजूनतरी समोर आला नाही. तसेच लिस्टिंगनुसार डिवाइस 18:9 आस्पेक्ट रेशियो सह एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल.

लिस्टिंगनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन QM215 मोबाईल प्लॅटफॉर्म सह येईल तसेच डिवाइस आउट-ऑफ-द बॉक्स अँड्रॉइड 10 (गो एडिशन) सह येऊ शकतो. हा फोन एड्रीनो 306 जीपीयू सह येईल. गूगल प्ले कंसोलच्या लिस्टिंग मध्ये या फोनच्या रॅम बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण बोलले जात आहे कि हा एंट्री लेवलचा स्वस्त स्मार्टफोन असेल त्यामुळे यात 1जीबी रॅम असेल.

किंमत

किंमत पाहता, अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता, त्यात सांगण्यात आले होते कि हा फोन एक एंट्री लेवल हँडसेट असेल. या फोनची किंमत 54 डॉलर म्हणजे 4000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Jio 5G फोन झाला लिस्ट, यात आहे 1GB रॅम, ‘Made in india’ 5जी फोन करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-smartphone-spotted-on-google-play-know-specifications-orbic/feed/ 0
Jio चा स्वस्त 5G फोन डिसेंबर मध्ये होईल लॉन्च, मुकेश अंबानींनी केली तयारी https://www.91mobiles.com/marathi/jios-affordable-5g-phone-will-be-launched-in-december-mukesh-ambani-prepares/ https://www.91mobiles.com/marathi/jios-affordable-5g-phone-will-be-launched-in-december-mukesh-ambani-prepares/#respond Wed, 09 Sep 2020 08:54:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8049 91मोबाईल्सला अलीकडेच एक्सक्लूसिव माहिती मिळाली होती कि कंपनी आपल्या स्वस्त फीचर फोन वर काम करत आहे आणि या प्रोजेक्टचे नाव JioPhone 5 आहे.

The post Jio चा स्वस्त 5G फोन डिसेंबर मध्ये होईल लॉन्च, मुकेश अंबानींनी केली तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मुकेश अंबानींनी रिलायंस इंडस्ट्रीजच्या 43व्या ऍन्युअल मीटिंग मध्ये आपल्या 5G सर्विस सोबतच स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा केली होती, तेव्हापासून भारतात स्वस्त जियो 5G स्मार्टफोनची वाट बघितली जात आहे. Google सोबत मिळून 5जी फोन घेऊन येत असलेल्या रिलायंस जियोने अधिकृतपणे हँडसेट बाबत आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. पण आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार बोलले जात आहे कि रिलांयस यावर्षी डिसेंबर मध्ये नवीन जियो स्मार्टफोन लॉन्च करू शकते. बिजनेस स्टॅंडर्डच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या ‘2G’ मुक्त भारत अभियानचा भाग असेल.

डेटा पॅक सह येऊ शकतो जियो 5G स्मार्टफोन

बिजनेस स्टॅंडर्डने सूत्रांच्या आधारे सांगितले आहे कि Jio कमी किंमत असलेल्या 10 कोटी स्मार्टफोन्सची निर्मिती करणार आहे जे गूगलच्या एंडरॉयड प्लॅटफॉर्म वर आधारित असतील. बुधवारी वर्तमानपत्राने सांगितले कि फोन डेटा पॅक सह यावर्षी डिसेंबर किंवा पुढल्या वर्षीच्या सुरवातीला लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: Jio मुळे नाखुश होऊ लागलेत ग्राहक जाणून घ्या कारणे, तुम्ही पण आहात का यातील एक?

गूगल सोबत केली पार्टनरशिप

Google सह आपल्या पार्टनरशिपची घोषणा करत Mukesh Ambani बोलले होते कि गूगलने रिलायंस जियो मध्ये 7.7 टक्के गुंतवणूक केली आहे. Jio मध्ये गुंतवणूक केल्या गेलेल्या या शेयरची रक्कम 33,737 कोटी रुपये आहे. तसेच त्यांनी सांगितले होते गूगल आणि जियो मिळून देशात ‘डिजीटल इंडिया’ च्या दिशेने काम करतील आणि भारतातील 4जी व 5जी फोन्सची निर्मिती करतील.

किती असेल किंमत

आतापर्यंत JioPhone 5G च्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही पण आशा आहे कि हा फोन भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन असेल. तुम्हाला माहित असेल कि पहिला Jiophone 1,500 रुपयांच्या बजेट मध्ये आला होता आणि Jiophone 2 3,000 रुपयांच्या बजेट मध्ये आला होता. तसेच नवीन स्मार्ट Jio 5G Phone 5,000 रुपयांच्या बजेट मध्ये सादर केला जाऊ शकतो. पण हि किंमती फक्त आमचा अंदाज आहे.

हे देखील वाचा: Jio च्या नावाने होत आहे फसवणूक, Reliance ने दिला सावधानतेचा इशारा

JioPhone 5 ची पण तयारी

91मोबाईल्सला अलीकडेच एक्सक्लूसिव माहिती मिळाली होती कि कंपनी आपल्या स्वस्त फीचर फोन वर काम करत आहे आणि या प्रोजेक्टचे नाव JioPhone 5 आहे. JioPhone 5 ची माहिती आम्हाला इंडस्ट्रीच्या अश्या सोर्स कडून मिळाली होती जो या प्रोजेक्ट मध्ये आहे. नाव न छापणाच्या अटीवर सूत्रांनी आम्हाला सांगितले आहे कि रिलायंस जियो एक स्वस्त मोबाईल फोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे आणि या स्वस्त फीचर फोनच्या प्रोजेक्टचे नाव Jio Phone 5 आहे. हा प्रोजेक्ट सध्या डेवलेमेंट स्टेज वर आहे आणि हा लॉन्च होण्यास तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्यास अजून थोडा वेळ लागेल.

The post Jio चा स्वस्त 5G फोन डिसेंबर मध्ये होईल लॉन्च, मुकेश अंबानींनी केली तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jios-affordable-5g-phone-will-be-launched-in-december-mukesh-ambani-prepares/feed/ 0
स्वस्त JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 4G फीचर फोन, असतील हे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/new-nokia-4g-feature-phone-design-specifications-revealed-in-tenaa/ https://www.91mobiles.com/marathi/new-nokia-4g-feature-phone-design-specifications-revealed-in-tenaa/#respond Mon, 07 Sep 2020 12:51:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8022 टेना वर नोकियाचा फीचर फोन मॉडेल नंबर TA-1278 सह दिसला आहे.

The post स्वस्त JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 4G फीचर फोन, असतील हे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात सर्वात कमी किंमतीत 4G फोन उपलब्ध करवून देणाऱ्या रिलायंस जियोच्या JioPhone आणि JioPhone 2 ला आव्हान देण्यासाठी एक नवीन 4G फीचर फोन येणार आहे. बातमी अशी समोर आली आहे कि HMD Global लवकरच नवीन नोकिया फीचर फोन लॉन्च करू शकते. लीक्सनुसार कंपनी नोकिया ब्रँडचा किफायतशीर 4G फीचर फोन लॉन्च करू शकते. दरम्यान आता नोकियाचा एक फीचर फोन सर्टिफिकेशन वेबसाइट TENAA वर दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक खास स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

टेना वर नोकियाचा फीचर फोन मॉडेल नंबर TA-1278 सह दिसला आहे. लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन मध्ये 2.4 इंचाची टीएफटी 240 x 320 पिक्सल रेजोल्यूशन असलेली स्क्रीन असेल. तसेच हँडसेट मध्ये 1 गीगाहर्ट्ज प्रोसेसर आणि 64MB रॅम दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर नोकियाच्या 4जी फीचर फोन मध्ये 128एमबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 32 जीबी पर्यंत वाढवता येईल.

पावर बॅकअपसाठी या 4जी फीचर फोन मध्ये 1150mAh ची बॅटरी असू शकते. लिस्टिंगनुसार डिवाइस ब्लॅक आणि टॉरकोईज कलर मध्ये लॉन्च होईल. तसेच यात यूएसबी पोर्ट, जीएसएम, 4जी एलटीई सपॉर्ट, ब्लूटूथ आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स मिळतील. टेना वर फोनचे फोटोज पण समोर आले आहेत ज्यावरून समजले आहे कि डिवाइस मध्ये कोणताही कॅमेरा नसेल.

Nokia 125 आणि Nokia 150

काही दिवसांपूर्वी भारतात कंपनीने दोन फीचर फोन नोकिया 125 आणि नोकिया 150 सादर केले होते. Nokia 125 आणि Nokia 150 दोन्ही फोन्स मध्ये जवळपास एक सारखे स्पेसिफिकेशन्स आहेत. या फोन्स मध्ये 2.4 इंचाची QVGA (240×320 पिक्सल्स) टीएफटी एलसीडी कलर स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हँडसेट पॉलीकार्बोनेट बॉडी सह येतात. फोन्स मध्ये फक्त 2G कनेक्टिविटीच देण्यात आली आहे आणि यात ड्यूल सिम – ड्यूल स्टॅण्डबायचा ऑप्शन यूजर्सना मिळतो. दोन्ही फीचर फोन स्टॅंडर्ड फीचर फोन परफॉर्मेंस यूजर्सना देतील.

या दोन्ही डिवाइसेज मध्ये MediaTek प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन्स ऑपरेटिंग सिस्टम system Series 30+ सह येतात. फोन्स मध्ये 4 एमबी रॅम आणि 4 एमबी रोम देण्यात आला आहे आणि 1,020mAh ची रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंग कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोन मध्ये माइक्रोयूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Nokia 125 मध्ये VGA कॅमेरा नाही, जो Nokia 150 मध्ये मिळतो. पण दोन्ही फोन्स मध्ये एलईडी फ्लॅश आणि वायरलेस FM रेडियो सपॉर्ट देण्यात आला आहे. कलर ऑप्शंस पाहता Nokia 125 वाइट आणि ब्लॅक कलर ऑप्शंस मध्ये विकत घेता येईल. तर Nokia 150 ब्लू, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

The post स्वस्त JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 4G फीचर फोन, असतील हे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-nokia-4g-feature-phone-design-specifications-revealed-in-tenaa/feed/ 0
JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण https://www.91mobiles.com/marathi/nokia-400-4g-feature-phone-to-launch-soon-india-jio-phone-competitor-ta-1208/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-400-4g-feature-phone-to-launch-soon-india-jio-phone-competitor-ta-1208/#respond Wed, 29 Jan 2020 12:16:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6418 हा फोन सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये पण Nokia इतर फीचर फोन्स प्रमाणे एफएम रेडियो, गूगल क्रोम व मीडिया प्लेयर देईल.

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी मोबाईलचा महामेळावा असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC 2020 मध्ये सहभागी होणार आहे. या मंचावर कंपनी आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट टेक विश्वासमोर सादर करेल. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि एमडब्ल्यूसी 2020 मध्ये कंपनी Nokia 8.2 4G, Nokia 5.2 आणि Nokia 1.3 स्मार्टफोन्स सादर करू शकते. तसेच Nokia च्या एका फीचर फोनची माहिती पण समोर आली आहे कि कंपनी लवकरच एक नवीन 4G फीचर फोन घेऊन येणार आहे जो Nokia 400 नावाने बाजारात येऊ शकतो.

Nokia 400 4G ब्रँडचा फीचर फोन असेल जो 4जी कनेक्टिविटी सह येईल. कंपनीने अजूनतरी या फोनची अधिकृत माहिती दिली नाही पण असे म्हटले जात आहे कि हा फोन लवकरच ग्लोबल मार्केट मध्ये येईल. भारतीय यूजर्ससाठी चांगली बातमी अशी आहे कि Nokia 400 4G इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल. नोकिया 400 4जी फीचर फोन असेल कमी किंमतीत बाजारात सेलसाठी उपलब्ध होईल.

Nokia 400 4G

नोकिया 400 4जी भारतात जियोच्या 4G फीचर फोन JioPhone ला टक्कर देईल. हा स्मार्टफोन अलीकडेच ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट आणि वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर TA-1208 सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये Nokia 400 4G मध्ये ब्लूटूथ 4.2 आणि एलटीई सपोर्ट असल्याचे समोर आले आहे. तसेच या फोन बद्दल बोलले जात आहे कि हा फोन Unisoc प्रोसेसर वर चालेल. विशेष म्हणजे नोकियाचा हा 4जी फीचर फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर पण लिस्ट केला गेला आहे.

Nokia 400 4G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाही पण लीक्स मध्ये समजले आहे कि हा स्मार्टफोन सामान्य न्यूमरिक की-पॅड वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच हा फोन सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये पण Nokia इतर फीचर फोन्स प्रमाणे एफएम रेडियो, गूगल क्रोम व मीडिया प्लेयर देईल. पण तरीही फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लॉन्च डिटेल्ससाठी Nokia च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

Nokia 5.2

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी Nokia 5.2 3+32 GB आणि 4+64 GB सह सादर केला जाईल. तसेच फोनची कॅमेरा मॉड्यूल डिजाइन 6.2 प्रमाणे असेल. फोनच्या मागे 16+8MP कॅमेरा असेल. तसेच सेल्फीसाठी डिवाइस मध्ये 8 MP चा कॅमेरा आणि पावर बॅकअपसाठी 3500 mAh ची बॅटरी असेल. फोन 6.2-LCD स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन 169 EUR (जवळपास 13,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Nokia 1.3

लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी नवीन Nokia 1.3 LCD स्क्रीन (जवळपास 6-इंच) यू शेप आणि टियर ड्रॉप नॉच सह सादर करेल. तसेच डिवाइस मध्ये 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 13MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4000 mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच Nokia 2.3 मध्ये 3D नॅनो-टेक्चर प्लास्टिक कवर असेल. रिपोर्टनुसार फोनची किंमत €79 (जवळपास 6,200 रुपये) असेल.

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-400-4g-feature-phone-to-launch-soon-india-jio-phone-competitor-ta-1208/feed/ 0
जियो यूजर्स साठी पुन्हा आली वाईट बातमी, कंपनीने बंद केला 49 रुपयांचा प्लान https://www.91mobiles.com/marathi/jiophone-introduce-new-recharge-packs-and-discontinued-rs-49-prepaid-plan/ https://www.91mobiles.com/marathi/jiophone-introduce-new-recharge-packs-and-discontinued-rs-49-prepaid-plan/#respond Thu, 12 Dec 2019 09:03:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6038 आता याच्या रिचार्जची सुरवात 75 रुपयांपासून होत आहे.

The post जियो यूजर्स साठी पुन्हा आली वाईट बातमी, कंपनीने बंद केला 49 रुपयांचा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. पण JioPhone Plans च्या किंमतीत कोणतीही वाढ केली नव्हती. परंतु आता रिलायंस जियोने जियोफोनच्या प्लान्सची किंमत वाढवण्याऐवजी आपला जुना किफायतशीर 49 रुपयांचा JioPhone रिचार्ज प्लान बंद केला आणि आता याच्या रिचार्जची सुरवात 75 रुपयांपासून होत आहे.

काही आठवड्यांपूर्वी जियोने JioPhone यूजर्स साठी ऑल-इन-वन (All-in-One) प्लान्स सादर केले होते आणि 75 रुपयांचा प्लान त्यातील एक आहे. जुन्या 49 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे दुसरे प्लान्स पण आहेत. पण JioPhone यूजर्सना नॉन-जियो नंबर वर कॉल करण्यासाठी वेगळा IUC टॉप-अप रिचार्ज करावा लागेल.

75 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात यूजर्सना अनलिमिटेड जियो-टू-जियो वॉइस कॉलिंग, 500 मिनिट्स नॉन-जियो कॉल्स, प्रति दिन 100 MB डेटा आणि कुल 50 SMS मिळतात. इतकेच नव्हे तर या प्लानची वैधता 28 दिवस आहे.

49 रुपयांचा प्लान घेणाऱ्या जियो फोन यूजर्सना नॉन-जियो मिनिट्स साठी अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते आणि आता हा प्लान बंद करण्यात आला आहे. तसेच 75 रुपयांच्या प्लान मध्ये दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी 500 मिनिट्स मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने JioPhone ऑल-इन-वन रिचार्ज सादर केले होते, ज्यात 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांच्या प्लान्सचा समावेश होता.

125 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे तर यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग (500 मिनिट्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी), 300 SMS आणि 500MB डेटा प्रतिदिन मिळतो. तर 155 रुपयांच्या प्लान मध्ये डेली 1GB डेटा, अनलिमिटेड जियो-टू-जियो (500 मिनिट्स ऑफ-नेट कॉल) आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. 185 रुपयांच्या प्लान मध्ये 2GB हाई-स्पीड डेटा प्रतिदिन, 500 मिनिट्स नॉन-जियो कॉलिंग, अनलिमिटेड जियो-टू-जियो आणि लँडलाईन कॉल आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. सर्व JioPhone All-in-One प्लानची वैधता 28 दिवस आहे.

The post जियो यूजर्स साठी पुन्हा आली वाईट बातमी, कंपनीने बंद केला 49 रुपयांचा प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiophone-introduce-new-recharge-packs-and-discontinued-rs-49-prepaid-plan/feed/ 0