Reliance ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी भारतात रिटेल क्षेत्रात आपली सेवा देण्यासाठी Jio Mart ची सुरवात करेल, ज्या अंतर्गत स्थानिक दुकानदार ऑनलाईन आपले सामान विकू शकतील. जियोमार्ट देशातील काही भागांमध्ये सुरु पण करण्यात आला आहे जिथे किराणा दुकान आणि दुकानदारांकडून डिजीटल सामान विकत घेता येते आणि पेमेंट करता येते. पण आता बातमी समोर येत आहे कि जियोच्या या सेवेचा काही लोक दुरुपयोग करत आहेत तसेच Jio Mart च्या नावावर लोकांना फसवले जात आहे.
Jio Mart च्या नावावर सुरु असलेल्या या फसवणुकीची माहिती कंपनीला मिळाली आहे आणि त्या विरोधात कडक पाऊले उचलत रिलायंसने सांगितले आहे कि जे लोक रिलायंस जियो किंवा जियो मार्टच्या नावावर लोकांची फसवणूक करत आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल तसेच अश्या लोकांना तुरुंगाचा रास्ता दाखवण्यात येतील. सामान्य माणसे आणि जियो यूजर्सना पण रिलायंसने आवाहन केले आहे कि अश्या फ्रॉड लोकांपासून सावध रहा. नोटिस प्रसिद्ध करून कंपनीने खोट्या जियो मार्टच्या वेबसाइट्सची लिस्ट पण दिली आहे.
1. jmartfranchise.in
2. jiodealership.com 7
3. jiomartfranchises.com
4. jiomartshop.info
5. jiomartreliance.com
6. jiomartfranchiseonline.com
7. jiomartsfranchises.online
8. jiomart-franchise.com
9. jiomartindia.in.net
10. Jiomartfranchise.co
वरील वेबसाइट्सची नावे स्वतः Reliance ने शेयर केली आहेत आणि सांगितले आहे कि यातील कोणतीही वेबसाइट कंपनीची नाही. या सर्व खोट्या आणि फ्रॉड वेबसाइट्स आहेत तसेच कंपनीने जनतेला यांचा वापर ना करण्याचा सल्ला दिला आहे. वेबसाइट्स व्यतिरिक्त रिलायंसने चेतावणी दिली आहे कि कंपनी सध्या जियो मार्टसाठी कोणतेही नवीन डीलर्स शोधत नाही किंवा कोणतीही फ्रॅन्चायजी देत नाही. त्यामुळे जे लोक जियोच्या नावावर लोकांना Jio Mart शी जोडण्याचा दावा करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तसेच रिलायंसने जियोमार्टशी जोडले जाण्यासाठी कोणतीही रक्कम न देण्यावर जोर दिला आहे.
अशी आहे पुढची योजना
काही दिवसांपूर्वी दिग्गज कंपनी Facebook ने Reliance Jio मध्ये गुंतवणूक करत कंपनीचे 9.9 टक्के शेयर्स विकत घेतले होते यासाठी फेसबुकने 43,574 कोटी रुपये दिले होते. या मोठ्या डील नंतर चर्चा सुरु झाली होती कि येत्या काळात जियो मार्ट फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp वर पण लाईव केला जाऊ शकतो जेणेकरून व्हाट्सऍप द्वारे ग्राहक आणि दुकानदार देवाणघेवाण करू शकतील. कारण येत्या काळात व्हाट्सऍप द्वारे पेमेंट करण्याचे फीचर पण भारतात लाईव होऊ शकते.