JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण

Nokia ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी मोबाईलचा महामेळावा असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC 2020 मध्ये सहभागी होणार आहे. या मंचावर कंपनी आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट टेक विश्वासमोर सादर करेल. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि एमडब्ल्यूसी 2020 मध्ये कंपनी Nokia 8.2 4G, Nokia 5.2 आणि Nokia 1.3 स्मार्टफोन्स सादर करू शकते. तसेच Nokia च्या एका फीचर फोनची माहिती पण समोर आली आहे कि कंपनी लवकरच एक नवीन 4G फीचर फोन घेऊन येणार आहे जो Nokia 400 नावाने बाजारात येऊ शकतो.

Nokia 400 4G ब्रँडचा फीचर फोन असेल जो 4जी कनेक्टिविटी सह येईल. कंपनीने अजूनतरी या फोनची अधिकृत माहिती दिली नाही पण असे म्हटले जात आहे कि हा फोन लवकरच ग्लोबल मार्केट मध्ये येईल. भारतीय यूजर्ससाठी चांगली बातमी अशी आहे कि Nokia 400 4G इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल. नोकिया 400 4जी फीचर फोन असेल कमी किंमतीत बाजारात सेलसाठी उपलब्ध होईल.

Nokia 400 4G

नोकिया 400 4जी भारतात जियोच्या 4G फीचर फोन JioPhone ला टक्कर देईल. हा स्मार्टफोन अलीकडेच ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट आणि वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर TA-1208 सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये Nokia 400 4G मध्ये ब्लूटूथ 4.2 आणि एलटीई सपोर्ट असल्याचे समोर आले आहे. तसेच या फोन बद्दल बोलले जात आहे कि हा फोन Unisoc प्रोसेसर वर चालेल. विशेष म्हणजे नोकियाचा हा 4जी फीचर फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर पण लिस्ट केला गेला आहे.

Nokia 400 4G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाही पण लीक्स मध्ये समजले आहे कि हा स्मार्टफोन सामान्य न्यूमरिक की-पॅड वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच हा फोन सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये पण Nokia इतर फीचर फोन्स प्रमाणे एफएम रेडियो, गूगल क्रोम व मीडिया प्लेयर देईल. पण तरीही फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लॉन्च डिटेल्ससाठी Nokia च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

Nokia 5.2

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी Nokia 5.2 3+32 GB आणि 4+64 GB सह सादर केला जाईल. तसेच फोनची कॅमेरा मॉड्यूल डिजाइन 6.2 प्रमाणे असेल. फोनच्या मागे 16+8MP कॅमेरा असेल. तसेच सेल्फीसाठी डिवाइस मध्ये 8 MP चा कॅमेरा आणि पावर बॅकअपसाठी 3500 mAh ची बॅटरी असेल. फोन 6.2-LCD स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन 169 EUR (जवळपास 13,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Nokia 1.3

लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी नवीन Nokia 1.3 LCD स्क्रीन (जवळपास 6-इंच) यू शेप आणि टियर ड्रॉप नॉच सह सादर करेल. तसेच डिवाइस मध्ये 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 13MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4000 mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच Nokia 2.3 मध्ये 3D नॅनो-टेक्चर प्लास्टिक कवर असेल. रिपोर्टनुसार फोनची किंमत €79 (जवळपास 6,200 रुपये) असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here