Mi 11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Feb 2021 12:21:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी? https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-globally-launch-with-108mp-camera-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-globally-launch-with-108mp-camera-know-price/#respond Tue, 09 Feb 2021 12:21:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9946 Mi 11 मध्ये क्वालकॉमचा Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉमच्या बेंचमार्क रिजल्ट मध्ये या चिपसेटसह सीपीयू, ग्राफिक्स आणि AI समवेत इतर विभागांमध्ये चांगली परफॉर्मन्स दिसली आहे.

The post Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काल आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत ग्लोबली नवीन आणि पावरफुल फोन Mi 11 लॉन्च केला आहे. यासाठी कंपनीने एक वर्चुअल इवेंटचे आयोजन केले होते. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या मी 10 स्मार्टफोन्सचा अपग्रेडेड वर्जन आहे आणि जुन्या फोन्सच्या तुलनेत अनेक अपग्रेडेड फीचर्ससह आला आहे. हा स्मार्टफोन ग्लोबल लॉन्चच्या आधी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च झाला आहे. फोनची खासियत पाहता हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरसह आला आहे. तसेच यात 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट व ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 108-मेगापिक्सल आहे.

डिजाइन

लुकबद्दल बोलायचे झाले तर Mi 11 च्या फ्रंटला पंच-होल कट आउट देण्यात आला आहे जो डावीकडे वरच्या बाजूला आहे. तसेच फोनच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. फोन मध्ये राइट आणि लेफ्टची स्क्रीन कर्व्ड आहे. इतकेच नव्हे तर या डिस्प्ले मध्ये चारही बाजुंनी कर्व्ड कडा आहेत. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर बटन मिळतील. तर मागे कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे जो चौरस मॉड्यूल मध्ये आहे, ज्यात तीन कॅमेरा लेंससह एक एलईडी पण आहे.

ताकदवान प्रोसेसर

Mi 11 मध्ये क्वालकॉमचा Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉमच्या बेंचमार्क रिजल्ट मध्ये या चिपसेटसह सीपीयू, ग्राफिक्स आणि AI समवेत इतर विभागांमध्ये चांगली परफॉर्मन्स दिसली आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के पर्यंत वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के पर्यंत जास्त वेगवान ग्राफिक्ससह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो.

हे देखील वाचा : Mi 11 Ultra लॉन्च करून Xiaomi करणार आहे धमाका, 120Hz डिस्प्लेसह यात असेल 67W वायरलेस चार्जिंग

पावरफुल कॅमेरा

Mi 11 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप चौरस मॉड्यूल मध्ये दिला आहे. यात अपर्चर f/1.85 सह 108MP प्राइमरी सेंसर, 13MP (f/2.4 aperture) अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 5MP (f/2.4 aperture) टेलिफोटो कॅमेरा लेंस आहे. त्याचबरोबर फोन मध्ये MEMC व्हिडीओ फ्रेम टेक्नोलॉजी, OIS, रियल-टाइम SDR टू HDR आणि व्हिडीओ सूपर-रिजोल्यूशनला सपोर्ट आहे. सेल्फी कॅमेरा पाहता फ्रंटला 20MP चा कॅमेरा मिळतो.

डिस्प्ले

Mi 11 मध्ये 1500 nits ब्राइटनेस, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.81-इंचाचा 2K WQHD (1,440×3,200 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिजाइन आहे. शाओमीने या डिस्प्ले मध्ये HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन दिले आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी

कनेक्टिविटी फीचर्स आणि बॅटरी

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर हा फोन 10W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. Mi 11 मध्ये बिल्ट-इन हार्ट रेट सेंसरसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये NFC आणि Wi-Fi 6E सपोर्ट पण आहे आणि हा फोन दोन ब्लूटूथ हेडसेट्सशी एकसाथ कनेक्ट केला जाऊ शकतो.

किंमत

Mi 11 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत यूरोप मध्ये EUR 749 (जवळपास 65,732 रुपये) पासून सुरु होईल. तर फोनच्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 799 (जवळपास 70,120 रुपये) असेल.

शाओमी मी 11 व्हिडीओ

The post Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-globally-launch-with-108mp-camera-know-price/feed/ 0
Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/#respond Wed, 20 Jan 2021 11:50:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9710 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.

The post Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi चे काही नवीन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट्स वर दिसले होते. यात Redmi Note 10 Pro आणि Mi 11 Lite चा समावेश आहे, ज्यांच्याबाबत चर्चा आहे कि शाओमी लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करेल. आता 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.

91मोबाईल्सला टिप्स्टर इशान अग्रवालच्या हवल्यातून माहिती मिळाली आहे कि शाओमीची रेडमी नोट10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये भारतात लाॅन्च केली जाईल. या सीरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाॅन्च होतील जे कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये घेऊन येईल. सूत्रांच्या मते रेडमी नोट 9 सीरीज जास्त यशस्वी न झाल्यामुळे शाओमी इंडिया रेडमी नोट 10 सीरीजची किंमत खूप कमी ठेवणार आहे. सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन Gray, White आणि Green कलर मध्ये बाजारात येतील.

Photo courtesy: firstpost.com

मी 11 सीरीज पाहता मिळालेल्या माहितीनुसार सीरीज अंतगर्त Mi 11 आणि Mi 11 Lite स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. यातील मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तसेच Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 Pro इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लाॅन्च आला जवळ

Redmi Note 10 सीरीज

रेडमी नोट 10 प्रो बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा 750जी चिपसेट मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 10 प्रो कंपनी 5G आणि 4G दोन्ही मॉडेल्स मध्ये लाॅन्च करेल आणि भारतात फोनचा 4जी मॉडेलच लाॅन्च केला जाईल. दुसरीकडे रेडमी नोट 10 मध्ये मीडियाटेकचा चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Redmi Note 10 Pro

फोटोग्राफीसाठी या सीरीज क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असेल. रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे तर रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेऱ्याला पण सपोर्ट करतील जो पंच- होल डिजाईन मध्ये दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च

Mi 11 सीरीज

लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करेल. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनल वर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. सध्या मार्केट मधील POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह येतो.

Xioami Mi 11 Lite

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये 8 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. लीकनुसार वियतनाम मध्ये या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-xiaomi-redmi-note-10-pro-launch-in-india-february-mi-11-lite-specs-price-ram-leaked/feed/ 0
108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल Xiaomi Mi 11 स्मार्टफोन, Samsung Galaxy S21 ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-pro-108-megapixel-rear-camera-leaked-details-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-pro-108-megapixel-rear-camera-leaked-details-specifications/#respond Thu, 19 Nov 2020 12:48:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8999 Xiaomi Mi 11 च्या रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल शेयर करण्यात आले आहेत कि यात प्राइमरी कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा दिला जाईल.

The post 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल Xiaomi Mi 11 स्मार्टफोन, Samsung Galaxy S21 ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बाबत चर्चा आहे कि कंपनीने आपल्या ‘मी 11’ सीरीज वर काम सुरु केले आहे आणि पुढच्यावर्षी पहिल्या तिमाहीत हि सीरीज अधिकृतपणे वर टेक मंचावर सादर केली जाईल. बातमी अशी आहे कि या सीरीज अंतगर्त दोन फोन लॉन्च होतील जे Mi 11 आणि Mi 11 Pro नावाने मार्केट मध्ये येतील. जोपर्यंत हे फोन बाजारात येत नाहीत तोपर्यंत यांच्या बाबत कोणती ना कोणती माहिती लीकच्या माध्यमातून येत राहील आणि यात आज Xiaomi Mi 11 च्या डिस्प्ले आणि याच्या कॅमेरा सेग्मेंट संबंधित बातमी समोर आली आहे.

Mi 11 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित हि बातमी एक्सडीए डेवलेपर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेयर केली आहे जी बऱ्याच अंशी खरी असल्याचे बोलले जात आहे. एक ट्वीटच्या माध्यमातून शाओमी मी 11 चे स्पेसिफिकेशन्स लीक केले गेले आहेत. या लीक मध्ये दावा केला गेला आहे कि Xiaomi Mi 11 स्मार्टफोन कर्व्ड डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला जाईल आणि या फोनची स्क्रीन पंच-होल डिजाईन असलेली असेल. हा फुलएचडी+ रेज्ल्यूशन असलेला असेल कि क्वॉडएचडी+ रेज्ल्यूशन डिस्प्ले असले हे अजून स्पष्ट झाले नाही.

Xiaomi Mi 11 Pro बद्दल पण लीक मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करेल आणि कर्व्ड डिजाईन वर लॉन्च केला जाईल. लीकनुसार शाओमी मी 11 प्रो ची स्क्रीन क्वॉडएचडी+ रेज्ल्यूशन सह येईल आणि 120 रिफ्रेश रेट वर काम करेल. तसेच मी 11 पाहता ताज्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या आगामी सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 875 वर लॉन्च केला जाईल. असे बोलले जात आहे कि हा चिपसेट Samsung Galaxy S21 आणि OnePlus 9 सीरीज मध्ये पण मिळेल.

हे देखील वाचा : Xiaomi चा दमदार फोन Mi 10T Lite येत आहे भारतात, साइट वर झाला लिस्ट

Xiaomi Mi 11 च्या रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल शेयर करण्यात आले आहेत कि यात प्राइमरी कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा दिला जाईल. या सेंसर व्यतिरिक्त फोनच्या बॅक पॅनल वर एक सेंसर अल्ट्रा वाइड अँगल लेंस असेल तर दुसरा सेंसर एक मॅक्रो लेंस असेल. लीकनुसार मी 11 चा रियर कॅमेरा सेटअप 30एक्स झूमला सपोर्ट करेल. चर्चा अशी आहे कि Xiaomi Mi 11 सीरीज पुढल्या वर्षी Samsung Galaxy S21 सीरीजला टक्कर देण्यासाठी लॉन्च होईल.

Xiaomi फोन होत आहेत क्रॅश

भारतात शाओमी फोन्स बद्दल अलीकडेच बातमी आली आहे कि युजर्सना बूटलूप समस्येचा सामना करावा लागत आहे. हि समस्या Mi आणि Redmi सोबतच Poco ब्रँडच्या स्मार्टफोन मध्ये पण दिसत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांचे स्मार्टफोन वारंवार रीस्टार्ट होत आहेत. तसेच काही युजर्स म्हणत आहेत ज्या Redmi फोन्स मध्ये Airtel सिम वापरला जात आहे ते फोन क्रॅश होत आहेत. हि बातमी समोर आल्यानंतर शाओमीने युजर्सना शब्द दिला आहे कि समस्येचे निवारण करून लवकरच नवीन अपडेट जारी केला जाईल. कंपनीने म्हटले आहे कि ऍप अपडेट दरम्यान कोडच्या काही लाईन्स मध्ये झालेल्या चुकांमुळे हि समस्या निर्माण झाली आहे.

The post 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल Xiaomi Mi 11 स्मार्टफोन, Samsung Galaxy S21 ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-pro-108-megapixel-rear-camera-leaked-details-specifications/feed/ 0