Xiaomi चे काही नवीन स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट्स वर दिसले होते. यात Redmi Note 10 Pro आणि Mi 11 Lite चा समावेश आहे, ज्यांच्याबाबत चर्चा आहे कि शाओमी लवकरच हे फोन्स भारतीय बाजारात लाॅन्च करेल. आता 91मोबाईल्सला सूत्रांकडून या दोन्ही स्मार्टफोन सीरीजच्या भारतातील लाॅन्चची माहिती मिळाली आहे. रेडमी नोट 10 सीरीज आणि मी 11 सीरीजच्या इंडिया लाॅन्च प्लान बद्दल त्यांच्या वेरिएंट्स आणि प्राइस सेग्मेंटची बातमी पण समोर आली आहे.
91मोबाईल्सला टिप्स्टर इशान अग्रवालच्या हवल्यातून माहिती मिळाली आहे कि शाओमीची रेडमी नोट10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये भारतात लाॅन्च केली जाईल. या सीरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाॅन्च होतील जे कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये घेऊन येईल. सूत्रांच्या मते रेडमी नोट 9 सीरीज जास्त यशस्वी न झाल्यामुळे शाओमी इंडिया रेडमी नोट 10 सीरीजची किंमत खूप कमी ठेवणार आहे. सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन Gray, White आणि Green कलर मध्ये बाजारात येतील.
मी 11 सीरीज पाहता मिळालेल्या माहितीनुसार सीरीज अंतगर्त Mi 11 आणि Mi 11 Lite स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. यातील मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तसेच Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.
हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10 Pro इंडियन वेबसाइट वर लिस्ट, लाॅन्च आला जवळ
Redmi Note 10 सीरीज
रेडमी नोट 10 प्रो बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वाॅलकाॅमचा 750जी चिपसेट मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि रेडमी नोट 10 प्रो कंपनी 5G आणि 4G दोन्ही मॉडेल्स मध्ये लाॅन्च करेल आणि भारतात फोनचा 4जी मॉडेलच लाॅन्च केला जाईल. दुसरीकडे रेडमी नोट 10 मध्ये मीडियाटेकचा चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.
फोटोग्राफीसाठी या सीरीज क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असेल. रेडमी नोट 10 प्रो स्मार्टफोन मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे तर रेडमी नोट 10 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेंसर सह लाॅन्च केला जाऊ शकतो. हे दोन्ही फोन पावरफुल सेल्फी कॅमेऱ्याला पण सपोर्ट करतील जो पंच- होल डिजाईन मध्ये दिला जाऊ शकतो.
हे देखील वाचा : Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च
Mi 11 सीरीज
लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करेल. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनल वर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. सध्या मार्केट मधील POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह येतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीकनुसार Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये 8 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. लीकनुसार वियतनाम मध्ये या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल.