108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल Xiaomi Mi 11 स्मार्टफोन, Samsung Galaxy S21 ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च

Xiaomi बाबत चर्चा आहे कि कंपनीने आपल्या ‘मी 11’ सीरीज वर काम सुरु केले आहे आणि पुढच्यावर्षी पहिल्या तिमाहीत हि सीरीज अधिकृतपणे वर टेक मंचावर सादर केली जाईल. बातमी अशी आहे कि या सीरीज अंतगर्त दोन फोन लॉन्च होतील जे Mi 11 आणि Mi 11 Pro नावाने मार्केट मध्ये येतील. जोपर्यंत हे फोन बाजारात येत नाहीत तोपर्यंत यांच्या बाबत कोणती ना कोणती माहिती लीकच्या माध्यमातून येत राहील आणि यात आज Xiaomi Mi 11 च्या डिस्प्ले आणि याच्या कॅमेरा सेग्मेंट संबंधित बातमी समोर आली आहे.

Mi 11 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित हि बातमी एक्सडीए डेवलेपर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेयर केली आहे जी बऱ्याच अंशी खरी असल्याचे बोलले जात आहे. एक ट्वीटच्या माध्यमातून शाओमी मी 11 चे स्पेसिफिकेशन्स लीक केले गेले आहेत. या लीक मध्ये दावा केला गेला आहे कि Xiaomi Mi 11 स्मार्टफोन कर्व्ड डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला जाईल आणि या फोनची स्क्रीन पंच-होल डिजाईन असलेली असेल. हा फुलएचडी+ रेज्ल्यूशन असलेला असेल कि क्वॉडएचडी+ रेज्ल्यूशन डिस्प्ले असले हे अजून स्पष्ट झाले नाही.

Xiaomi Mi 11 Pro बद्दल पण लीक मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करेल आणि कर्व्ड डिजाईन वर लॉन्च केला जाईल. लीकनुसार शाओमी मी 11 प्रो ची स्क्रीन क्वॉडएचडी+ रेज्ल्यूशन सह येईल आणि 120 रिफ्रेश रेट वर काम करेल. तसेच मी 11 पाहता ताज्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन क्वॉलकॉमच्या आगामी सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 875 वर लॉन्च केला जाईल. असे बोलले जात आहे कि हा चिपसेट Samsung Galaxy S21 आणि OnePlus 9 सीरीज मध्ये पण मिळेल.

हे देखील वाचा : Xiaomi चा दमदार फोन Mi 10T Lite येत आहे भारतात, साइट वर झाला लिस्ट

Xiaomi Mi 11 च्या रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल शेयर करण्यात आले आहेत कि यात प्राइमरी कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा दिला जाईल. या सेंसर व्यतिरिक्त फोनच्या बॅक पॅनल वर एक सेंसर अल्ट्रा वाइड अँगल लेंस असेल तर दुसरा सेंसर एक मॅक्रो लेंस असेल. लीकनुसार मी 11 चा रियर कॅमेरा सेटअप 30एक्स झूमला सपोर्ट करेल. चर्चा अशी आहे कि Xiaomi Mi 11 सीरीज पुढल्या वर्षी Samsung Galaxy S21 सीरीजला टक्कर देण्यासाठी लॉन्च होईल.

Xiaomi फोन होत आहेत क्रॅश

भारतात शाओमी फोन्स बद्दल अलीकडेच बातमी आली आहे कि युजर्सना बूटलूप समस्येचा सामना करावा लागत आहे. हि समस्या Mi आणि Redmi सोबतच Poco ब्रँडच्या स्मार्टफोन मध्ये पण दिसत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांचे स्मार्टफोन वारंवार रीस्टार्ट होत आहेत. तसेच काही युजर्स म्हणत आहेत ज्या Redmi फोन्स मध्ये Airtel सिम वापरला जात आहे ते फोन क्रॅश होत आहेत. हि बातमी समोर आल्यानंतर शाओमीने युजर्सना शब्द दिला आहे कि समस्येचे निवारण करून लवकरच नवीन अपडेट जारी केला जाईल. कंपनीने म्हटले आहे कि ऍप अपडेट दरम्यान कोडच्या काही लाईन्स मध्ये झालेल्या चुकांमुळे हि समस्या निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here