Mi 11 Ultra लॉन्च करून Xiaomi करणार आहे धमाका, 120Hz डिस्प्लेसह यात असेल 67W वायरलेस चार्जिंग

Mi 11

Xiaomi च्या मी सीरीजच्या अपकमिंग फोन Mi 11 Ultra बद्दल पहिल्यांदा माहिती समोर आली आहे. चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वर टिप्स्टर Digital Chat Station ने हँडसेटबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. टिप्सटरने म्हटले आहे कि कंपनी चुपचाप मी 11 च्या प्रो मॉडेलवर काम करत आहे. अजूनतरी फोनच्या खुलासा झाला नाही. नावाचा पण, बोलले जात आहे कि हा नवीन फोन Mi 11 Ultra नावाने सादर केला जाईल. चला जाणून घेऊया Mi 11 Ultra बद्दल आतापर्यंत काय समोर आले आहे.

लीकनुसार कथित Mi 11 अल्ट्रा मध्ये 2K डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक पंच-होल कटआउट आणि चारीही बाजूनी घुमावदार कडा असतील. तसेच फोन मध्ये 67W वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि मोठी बॅटरी असेल. याव्यतिरिक्त फोनबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही.

तुम्हाला सांगू इच्छितो कि Xiaomi Mi 11 ग्लोबल मार्केट मध्ये 8 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता CET (5:30 pm IST) सादर केला जाईल. त्याचबरोबर Xiaomi या इवेंट मध्ये Mi 11 प्रो आणि Mi 11 लाइट पण सादर करू शकते. पण हे निश्चितपणे सांगता येत नाही.

हे देखील वाचा : लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9

Xiaomi ने Mi 11 स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या शेवटी लॉन्च केला होता, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह सादर केला गेला होता. तर दुसरीकडे असे रिपोर्ट्स आले आहेत कि कंपनी मी सीरीजचे स्मार्टफोन Mi 11 Pro आणि Mi 11 Lite वर पण काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका लीकनुसार मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तर मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजवर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तथा Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.

हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल

दुसरीकडे Xiaomi Mi 11 Lite फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करेल. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनलवर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल त्याचबरोबर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. सध्या बाजारात POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेटसह येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here