Moto Edge 40 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 Mar 2023 05:40:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/moto-edge-40-pro-render-image-leak/ https://www.91mobiles.com/marathi/moto-edge-40-pro-render-image-leak/#respond Tue, 28 Mar 2023 05:40:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19807 Motorola बद्दल अनेक दिवस बातम्या येत आहेत कंपनी आपल्या ‘एज’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सवर काम करत आहे जो Moto Edge 40 आणि Moto Edge 40 Pro नावानं बाजारात येतील. कंपनीनं अजूनही या दोन्ही मोबाइल फोन्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु 91मोबाइल्सला लाँचपूर्वीच सीरीजच्या प्रो मॉडेलचे एक्सक्लूसिव्ह फोटोज मिळाले आहेत. प्रसिद्ध टिपस्टर सुधांशूनं शेयर केलेल्या या […]

The post Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto Edge 40 Pro च्या फोटोज लाँचपूर्वीच समोर आली आहेत.
  • फोनच्या फ्रंट आणि रियर पॅनलच्या लुकचा खुलासा झाला आहे.
  • यात कर्व्ड एज डिस्प्ले आणि आयपी सर्टिफाइड बॉडी मिळू शकते.

Motorola बद्दल अनेक दिवस बातम्या येत आहेत कंपनी आपल्या ‘एज’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सवर काम करत आहे जो Moto Edge 40 आणि Moto Edge 40 Pro नावानं बाजारात येतील. कंपनीनं अजूनही या दोन्ही मोबाइल फोन्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु 91मोबाइल्सला लाँचपूर्वीच सीरीजच्या प्रो मॉडेलचे एक्सक्लूसिव्ह फोटोज मिळाले आहेत. प्रसिद्ध टिपस्टर सुधांशूनं शेयर केलेल्या या फोटोजमध्ये मोटो एज 40 प्रोच्या प्रोमोशनल फोटोज सोबतच रेंडर ईमेजचा देखील समावेश आहे ज्यात फोनच्या सर्व पॅनल्सच्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे.

मोटो एज 40 प्रोचा लुक व डिजाईन

सर्वप्रथम फोनचा फ्रंट लुक पाहता, Moto Edge 40 Pro मध्ये कर्व्ड एज डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पूर्णपणे बेजल लेस स्क्रीन आहे जी दोन्ही साइड्सच्या बॅक पॅनलकडे वळली आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे जो बॉडी एजपासून दूर आहे. डिस्प्लेच्या वरची आणि खालची बाजू पूर्णपणे बेजल लेस आहे. विशेष म्हणजे हा हा मोटो फोन आयपी रेटिंगसह येईल ज्यामुळे यात वॉटर व डस्ट प्रोटेक्शन मिळेल.

Moto Edge 40 Pro च्या बॅक पॅनलवर नजर पाहता इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उपरी डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप पॅनलवर वर आला आहे ज्यात दोन मोठे सेन्सर आणि एक छोटी लेन्स आहे. रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश आहे ज्याच्या खाली फोनमधील 50MP च्या सेन्सरची माहिती लिहिण्यात आली आहे. बॅक पॅनलवर मध्यभागी मोटोची ब्रँडिंग आहे. हे देखील वाचा: मोफत बघा IPL! Jio नं Airtel, VI आणि BSNL युजर्सना दिली खास ऑफर

मोटो एज 40 प्रो च्या राईट पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे ज्याच्या एका बाजूला स्पिकर ग्रिल आहे तर दुसऱ्या बाजूला सिम स्लॉट देण्यात आला आहे. एक स्पिकर फोनच्या अपर पॅनलवर देखील आहे जोडीला डॉल्बी अ‍ॅटमॉसची ब्रँडिंग आहे. फोनच्या वर आणि खालच्या पॅनलवर अँटीना बँड देखील फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत. आम्हाला मिळालेल्या फोटोज मध्ये आणि कलरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

मोटो एज 40 प्रो चे स्पेसिफिकेशन्स

माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार Moto Edge 40 Pro 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पीओएलईडी डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 165हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करू शकते. लीकनुसार ही स्क्रीन एचडीआर10+, डॉल्बी व्हिजन आणि 1300निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्ससह येऊ शकते.

Moto Edge 40 Pro बद्दल सांगण्यात आले आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 12GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS 4.0 ROM मिळू शकतो. हा मोबाइल फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होईल जो माययूएक्स 5.0 सह येऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरसह 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असल्याचं समोर आलं आहे. तसेच लीकनुसार सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 60 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा

Moto Edge 40 Pro बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 125वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. तसेच फोनमध्ये 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि 5 वॉट रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाऊ शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-edge-40-pro-render-image-leak/feed/ 0
Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-pro-global-price-storage-and-colour-options-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-pro-global-price-storage-and-colour-options-leaked-before-launch/#respond Tue, 17 Jan 2023 06:33:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16944 गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 लाँच केल्यानंतर मोटोरोला आता हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यासाठी तयार आहे. हा फोन भारतासह आंतरराष्ट्रीय ग्राहकांना Motorola Edge 40 Pro नावानं उपलब्ध होऊ शकतो. या डिवाइसमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स आहेत आणि हा गेल्यावर्षी मार्चमध्ये आलेल्या Motorola Edge 30 Pro ची जागा घेऊ शकतो. आता नव्या रिपोर्ट्समधून Motorola Edge 40 Pro च्या […]

The post Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Motorola Edge 40 Pro च्या जागतिक मॉडेलची किंमत लीक
  • Motorola Edge 40 Pro जागतिक बाजारात ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये येणार
  • Motorola Edge 40 Pro गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 नावानं लाँच झाला होता

गेल्यावर्षी चीनमध्ये Moto X40 लाँच केल्यानंतर मोटोरोला आता हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यासाठी तयार आहे. हा फोन भारतासह आंतरराष्ट्रीय ग्राहकांना Motorola Edge 40 Pro नावानं उपलब्ध होऊ शकतो. या डिवाइसमध्ये दर्जेदार स्पेसिफिकेशन्स आहेत आणि हा गेल्यावर्षी मार्चमध्ये आलेल्या Motorola Edge 30 Pro ची जागा घेऊ शकतो. आता नव्या रिपोर्ट्समधून Motorola Edge 40 Pro च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात स्टोरेज, कलर ऑप्शन आणि युरोपियन बाजारातील किंमतीचा समावेश आहे.

Motorola Edge 40 Pro ची लीक किंमत आणि कलर ऑप्शन

रिपोर्ट्सनुसार Motorola Edge 40 Pro स्मार्टफोन युरोपात एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या एकमेव मॉडेलमध्ये 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. त्याउलट चीनमध्ये लाँच झालेल्या Moto X40 स्मार्टफोनमध्ये 256GB व्हेरिएंटसह 8GB RAM सह 128GB स्टोरेज आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज देण्यात आली होती. हे देखील वाचा: बजेटमध्ये BGMI-PUBG साठी फोन हवा? 16 फेब्रुवारीला भारतात येतोय शानदार गेमिंग फोन iQOO Neo 7 5G

समोर आलेल्या लिक्समधून Motorola Edge 40 Pro च्या कलर व्हेरिएंटची देखील माहिती मिळाली आहे, त्यानुसार हा फोन Moto X40 प्रमाणे ब्लॅक आणि ब्लु कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. या स्मार्टफोनची युरोपिन बाजारातील किंमत 850 युरो (सुमारे 74,700 रुपये) असण्याची शक्यता आहे. परंतु Motorola Edge 40 Pro भारतात मात्र 60,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतो, असा आमचा अंदाज आहे.

Motorola Edge 40 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे आणि हा HDR10+ला सपोर्ट करू शकतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 13आधारित MyUI 5.0 वर चालू शकतो. Motorola Edge 40 Proस्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC दिली जाऊ शकते.

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये ड्युअल SIM 5G स्मार्टफोन Wi-Fi 6E आणि Bluetooth v5.3 सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. यात एनर्जी कंजम्शनसाठी MAXE टेक्नॉलॉजी तर तापमान कमी ठेवण्यासाठी 11-लेयर कूलिंग सिस्टम मिळू शकते. Motorola Edge 40 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 60MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

मोटोरोलाच्या या फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी आणि 125W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. Motorola चा दावा आहे की हा फोन फक्त 7 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो. Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 15W रिवर्स चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! Nothing Phone (1) वर सर्वात मोठा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

The post Moto X40 जागतिक बाजारात Moto Edge 40 Pro नावानं करू शकतो एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-40-pro-global-price-storage-and-colour-options-leaked-before-launch/feed/ 0
लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-x40-to-launch-in-december-with-snapdragon-8-gen-2-soc/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-x40-to-launch-in-december-with-snapdragon-8-gen-2-soc/#respond Wed, 30 Nov 2022 05:26:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15502 Motorola कंपनी आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा मोटोरोला मोबाइल कंपनीच्या ‘एक्स’ सीरीजमध्ये जोडला जाईल तसेच Moto X40 नावानं लाँच होऊ शकतो. Lenovo executive Chen Jin नं मोटोरोला मोटो एक्स40 स्मार्टफोन ऑफिशियली टीज केला आहे आणि हिंट दिली आहे की हा मोबाइल फोन डिसेंबर 2022 मध्ये बाजारात येऊ शकतो. Moto X40 सर्वप्रथम चीनमध्ये […]

The post लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola कंपनी आपल्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा मोटोरोला मोबाइल कंपनीच्या ‘एक्स’ सीरीजमध्ये जोडला जाईल तसेच Moto X40 नावानं लाँच होऊ शकतो. Lenovo executive Chen Jin नं मोटोरोला मोटो एक्स40 स्मार्टफोन ऑफिशियली टीज केला आहे आणि हिंट दिली आहे की हा मोबाइल फोन डिसेंबर 2022 मध्ये बाजारात येऊ शकतो. Moto X40 सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होऊ शकतो नंतर दुसऱ्या देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Moto X40 लाँच

मोटो एक्स40 बद्दल बातमी समोर आली आहे की हा मोबाइल फोन पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. लेनेवो एग्जीक्यूटिव्ह जिन यांनी मायक्रोब्लागिंग साइट वेईबोवर टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात फोनच्या नावाचा आणि लाँचचा खुलासा करण्यात आला आहे. या फोटोमध्ये फोनची झलक देखील दिसते तसेच मोटो एक्स40 ला मोबाइल फोन्सचा SUV असल्याचं सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की Moto X40 IP68 रेटिंगसह येईल त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनेल. हे देखील वाचा: अरे वाह! रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone झाला आणखी स्वस्त; डिस्काउंटसह 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा

Moto X40 चे लीक स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला एक्स40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स व मीडिया रिपोर्ट्सनुसार हा मोबाइल फोन 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. लीकनुसार या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 161.3×73.9×8.5एमएम आणि वजन 196 ग्राम असू शकते.

Moto X40 मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असू शकतो. तसेच सर्टिफिकेशन साइट्स व रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की मोटोरोला मोटो एक्स40 18जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो. हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल असू शकतो, ज्यात 12जीबी रॅम व 8जीबी रॅम देखील दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 512जीबी स्टोरेज, 256जीबी स्टोरेज तसेच 128जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

फोटोग्राफीसाठी Motorola Moto X40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर दिला जाऊ शकतो जो 4एक्स ऑप्टिकल झूमला सपोर्ट करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी मोटो एक्स40 मध्ये 4,950एमएएच किंवा 4,450एमएएचची बॅटरी मिळू शकते. चीनमध्ये लाँच झाल्यावर Moto X40 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये Moto Edge 40 Pro नावानं येण्याची शक्यता आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लेनोवोच्या अधिकाऱ्यांनी टीज केला Moto X40; सर्वप्रथम होऊ शकते चीनमध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-x40-to-launch-in-december-with-snapdragon-8-gen-2-soc/feed/ 0