Moto Edge 40 Pro चे प्रोमोशनल फोटोज व रेंडर ईमेज पाहा इथे; लुक आणि डिजाईनचा झाला खुलासा

Highlights

  • Moto Edge 40 Pro च्या फोटोज लाँचपूर्वीच समोर आली आहेत.
  • फोनच्या फ्रंट आणि रियर पॅनलच्या लुकचा खुलासा झाला आहे.
  • यात कर्व्ड एज डिस्प्ले आणि आयपी सर्टिफाइड बॉडी मिळू शकते.

Motorola बद्दल अनेक दिवस बातम्या येत आहेत कंपनी आपल्या ‘एज’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सवर काम करत आहे जो Moto Edge 40 आणि Moto Edge 40 Pro नावानं बाजारात येतील. कंपनीनं अजूनही या दोन्ही मोबाइल फोन्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु 91मोबाइल्सला लाँचपूर्वीच सीरीजच्या प्रो मॉडेलचे एक्सक्लूसिव्ह फोटोज मिळाले आहेत. प्रसिद्ध टिपस्टर सुधांशूनं शेयर केलेल्या या फोटोजमध्ये मोटो एज 40 प्रोच्या प्रोमोशनल फोटोज सोबतच रेंडर ईमेजचा देखील समावेश आहे ज्यात फोनच्या सर्व पॅनल्सच्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे.

मोटो एज 40 प्रोचा लुक व डिजाईन

सर्वप्रथम फोनचा फ्रंट लुक पाहता, Moto Edge 40 Pro मध्ये कर्व्ड एज डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पूर्णपणे बेजल लेस स्क्रीन आहे जी दोन्ही साइड्सच्या बॅक पॅनलकडे वळली आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे जो बॉडी एजपासून दूर आहे. डिस्प्लेच्या वरची आणि खालची बाजू पूर्णपणे बेजल लेस आहे. विशेष म्हणजे हा हा मोटो फोन आयपी रेटिंगसह येईल ज्यामुळे यात वॉटर व डस्ट प्रोटेक्शन मिळेल.

Moto Edge 40 Pro च्या बॅक पॅनलवर नजर पाहता इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उपरी डावीकडे चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअप पॅनलवर वर आला आहे ज्यात दोन मोठे सेन्सर आणि एक छोटी लेन्स आहे. रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश आहे ज्याच्या खाली फोनमधील 50MP च्या सेन्सरची माहिती लिहिण्यात आली आहे. बॅक पॅनलवर मध्यभागी मोटोची ब्रँडिंग आहे. हे देखील वाचा: मोफत बघा IPL! Jio नं Airtel, VI आणि BSNL युजर्सना दिली खास ऑफर

मोटो एज 40 प्रो च्या राईट पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे ज्याच्या एका बाजूला स्पिकर ग्रिल आहे तर दुसऱ्या बाजूला सिम स्लॉट देण्यात आला आहे. एक स्पिकर फोनच्या अपर पॅनलवर देखील आहे जोडीला डॉल्बी अ‍ॅटमॉसची ब्रँडिंग आहे. फोनच्या वर आणि खालच्या पॅनलवर अँटीना बँड देखील फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहेत. आम्हाला मिळालेल्या फोटोज मध्ये आणि कलरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

मोटो एज 40 प्रो चे स्पेसिफिकेशन्स

माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार Moto Edge 40 Pro 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पीओएलईडी डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 165हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करू शकते. लीकनुसार ही स्क्रीन एचडीआर10+, डॉल्बी व्हिजन आणि 1300निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्ससह येऊ शकते.

Moto Edge 40 Pro बद्दल सांगण्यात आले आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 12GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS 4.0 ROM मिळू शकतो. हा मोबाइल फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होईल जो माययूएक्स 5.0 सह येऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरसह 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असल्याचं समोर आलं आहे. तसेच लीकनुसार सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 60 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा

Moto Edge 40 Pro बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 125वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. तसेच फोनमध्ये 15वॉट वायरलेस चार्जिंग आणि 5 वॉट रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाऊ शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here