Motorola Edge 30 Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 03:12:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लो बजेटमध्ये Moto G13 आणि Moto G23 ची एंट्री; युरोपियन बाजारात झाले दाखल https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g13-and-moto-g23-smartphone-launched-in-low-budget-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g13-and-moto-g23-smartphone-launched-in-low-budget-know-price-and-specifications/#respond Wed, 25 Jan 2023 07:35:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17233 Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी सादर केलेल्या 5 फोन्सयामध्ये दोन लो बजेट स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीनं दोन स्वस्त स्मार्टफोन Moto G13 आणि Moto G23 एकत्र लाँच केले आहेत. ‘जी’ सीरीजचे ये मोबाइल फोन युरोपियन बाजारात आले आहेत. कंपनीनं 50MP Camera, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारखे स्पेसिफिकेशन्ससह हे हँडसेट सादर केले आहेत. […]

The post लो बजेटमध्ये Moto G13 आणि Moto G23 ची एंट्री; युरोपियन बाजारात झाले दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Moto G13 आणि G23 युरोपमध्ये लाँच झाले आहेत.
  • याची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास आहे.
  • दोन्हींमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हे पावरफुल फोन 5,000mAh batteryला सपोर्ट करता.

Motorola नं जागतिक बाजारात एकाच वेळी सादर केलेल्या 5 फोन्सयामध्ये दोन लो बजेट स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीनं दोन स्वस्त स्मार्टफोन Moto G13 आणि Moto G23 एकत्र लाँच केले आहेत. ‘जी’ सीरीजचे ये मोबाइल फोन युरोपियन बाजारात आले आहेत. कंपनीनं 50MP Camera, MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि 5,000mAh battery सारखे स्पेसिफिकेशन्ससह हे हँडसेट सादर केले आहेत. मोटो जी13 आणि जी23 संबंधित माहिती पुढे वाजता येईल.

Moto G13 ची किंमत

मोटो जी13 कंपनीनं सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. हा मोबाइल फोन 4जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 179 आहे जी भारतीय करंसीनुसार जवळपास 15,800 रुपये आहे. युरोपमध्ये हा फोन Matte Charcoal, Rose Gold आणि Blue Lavender कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. Moto G13 ची भारतातील किंमत युरोपियन मार्केट पेक्षा कमी असेल. हे देखील वाचा: हार्दिक पंड्या वापरत असलेल्या मोबाइलचे नाव माहित आहे का? जाणून घ्या रॅम आणि प्रोसेसरविषयी

Moto G23 ची किंमत

मोटो जी23 स्मार्टफोननं दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये एंट्री केली आहे. बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आहे, ज्याची किंमत 199 युरो(सुमारे 17,600 रुपये) आहे तर. 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी 230 यूरो (सुमारे 20,000 रुपये) मोजावे लागतील. मोटो फोन युरोपमध्ये Matte Charcoal, Pearl White आणि Steel Blue कलरमध्ये लाँच झाला आहे.

Moto G13 आणि G23 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ 90Hz Display
  • MediaTek Helio G85
  • 50MP Triple Rear Camera
  • 5,000mAh battery

मोटोरोला जी13 आणि जी23 स्मार्टफोन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. या फोन्सची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. दोन्ही स्मार्टफोन्सचे डिस्प्ले पंच-होल स्टाईलसह येतात आणि पांडा ग्लासची सुरक्षा मिळते. हे 400निट्स ब्राइटनेस आणि 576हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतात.

Moto G13 आणि Moto G23 दोन्ही मोबाइल फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर मीडियाटेक हीलियो जी85 वर लाँच झाले आहेत. ग्राफिक्ससाठी इन मोटोरोला स्मार्टफोन्समध्ये माली-जी52 एमसी2 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी दोन्ही फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतात. मोटो जी13 10वॉट चार्जिंगसह येतो तर मोटो जी23 मध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी दोन्ही मोबाइल फोन एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Moto G13 च्या बॅक पॅनलवर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर Moto G23 च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. हे देखील वाचा: 5G Phones च्या यादीत Moto च्या दोन हँडसेटचा समावेश; इतक्या किंमतीत मिळतोय 8GB RAM

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Moto G23 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. तर Moto G13 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. मोटोरोलाचे स्वस्त मोबाइल फोन अँड्रॉइड 13 ओएसवर काम करतात तसेच यात 3.5एमएम जॅक, एनएफसी व स्प्लॅश प्रूफिंग सारखे फीचर्स मिळतात.

The post लो बजेटमध्ये Moto G13 आणि Moto G23 ची एंट्री; युरोपियन बाजारात झाले दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g13-and-moto-g23-smartphone-launched-in-low-budget-know-price-and-specifications/feed/ 0
200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone https://www.91mobiles.com/marathi/world-first-200mp-camera-phone-moto-edge-30-ultra-launched-check-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/world-first-200mp-camera-phone-moto-edge-30-ultra-launched-check-price-specifications-sale-details/#respond Tue, 13 Sep 2022 09:04:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13058 Motorola Edge 30 Ultra 5G Mobile: Motorola नं भारतीय बाजारात आज आपले दोन नवीन 5G Phone लाँच केले आहेत. कंपनीद्वारे भारतात Moto Edge सीरीजमध्ये Moto Edge 30 Ultra आणि Moto Edge 30 Fusion सादर करण्यात आले आहेत. Motorola Edge Ultra 30 बद्दल बोलायचं झालं तर हा भारतातील सर्वात पहिला फोन आहे जो 200MP Camera (World’s […]

The post 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola Edge 30 Ultra 5G Mobile: Motorola नं भारतीय बाजारात आज आपले दोन नवीन 5G Phone लाँच केले आहेत. कंपनीद्वारे भारतात Moto Edge सीरीजमध्ये Moto Edge 30 Ultra आणि Moto Edge 30 Fusion सादर करण्यात आले आहेत. Motorola Edge Ultra 30 बद्दल बोलायचं झालं तर हा भारतातील सर्वात पहिला फोन आहे जो 200MP Camera (World’s first 200MP Camera Phone) सह बाजारात आला आहे. तसेच या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Moto Edge 30 Ultra Camera

सर्वप्रथम फोनच्या कॅमेरा सेग्मेंटबाबत जाणून घेऊया. मोटो एज 30 अल्ट्रा ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.95 अपर्चर असलेला 200 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL HP1 sensor देण्यात आला आहे. जोडीला बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देखील देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोटोरोला मोबाइल 60 मेगापिक्सलच्या OmniVision OV60A फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

world first 200MP camera phone Moto Edge 30 Ultra launched check price specifications sale details

Moto Edge 30 Ultra Specification

मोटो एज 30 अल्ट्रा 5जीचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो ओएलईडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे ज्यात 1250निट्स ब्राइटनेस आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: BGMI Unban In India: ‘जय पबजी!’ चा नारा पुन्हा घुमणार; BGMI फॅन्ससाठी आली खुशखबर

Moto Edge 30 Ultra अँड्रॉइड 12 आधारित माययूएक्स 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जे़न 1 चिपसेटला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,610एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 125वॉट टर्बोपावर चार्जिंगसह 50वॉट वायरलेस चार्जिंग व 10वॉट रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Moto Edge 30 Ultra ची किंमत आणि उपलब्धता

Moto Edge 30 Ultra चा एकमेव 8GB + 128GB व्हर्जन कंपनीनं 59,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. लाँच ऑफर अंतगर्त हा फोन 54,999 रुपयांमध्ये मर्यादित कालावधीसाठी विकला जाईल. हा फोन Interstellar Black आणि Starlight White कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात शक्तिशाली वनप्लस येतोय; शाओमी-सॅमसंगचं टेन्शन वाढवणार का OnePlus 11 Pro 5G?

फोन 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट ऑनलाइन आणि रिलायन्स डिजिटल आउटलेटसह प्रमुख ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून विकत घेता येईल. कंपनी 100 रुपयांचे 40 रिचार्ज व्हाउचर आणि 10,699 रुपयांपर्यंतच्या पार्टनर व्हाउचरच्या माध्यमातून 14,699 रुपयांपर्यंतचे Jio बेनिफिट्स देत आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल नजीक असल्यामुळे ग्राहकांना बँक डिस्काउंट देखील दिला जाईल.

The post 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/world-first-200mp-camera-phone-moto-edge-30-ultra-launched-check-price-specifications-sale-details/feed/ 0
सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह ‘हा’ फोन घेणार भारतात एंट्री; 200MP च्या सेन्सरसह ‘या’ दिवशी होणार लाँच https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-motorola-edge-30-ultra-india-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-motorola-edge-30-ultra-india-launch-date/#respond Wed, 24 Aug 2022 04:00:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12413 Motorola नं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आपला सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर असलेला स्मार्टफोन सादर केला होता. आता या 200MP चा कॅमेरा असलेल्या हँडसेटची भारतात नव्या नावानं एंट्री होणार आहे. मोटोरोला लवकरच आपल्या फ्लॅगशिप Edge 30 सीरीजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. मोटोरोलानं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की, कंपनी भारतात लवकरच Edge 30 Ultra लाँच करणार […]

The post सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह ‘हा’ फोन घेणार भारतात एंट्री; 200MP च्या सेन्सरसह ‘या’ दिवशी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola नं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आपला सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर असलेला स्मार्टफोन सादर केला होता. आता या 200MP चा कॅमेरा असलेल्या हँडसेटची भारतात नव्या नावानं एंट्री होणार आहे. मोटोरोला लवकरच आपल्या फ्लॅगशिप Edge 30 सीरीजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. मोटोरोलानं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की, कंपनी भारतात लवकरच Edge 30 Ultra लाँच करणार आहे. कंपनीनं आपल्या ट्विटर हँडलवरून आगामी स्मार्टफोन टीज करत सांगितलं आहे की लवकरच भारतात Edge लाइन-अपचा स्मार्टफोन लाँच केला जाईल.

मोटोरोलानं शेयर केलेल्या टीजर व्हिडीओवरून समजलं आहे की मोटोरोला लवकरच 200MP प्रायमरी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. जो Motorola Edge 30 Ultra नावानं भारतात येईल. हा स्मार्टफोन जागतिक बाजारात आलेल्या Moto X30 Pro चा रिब्रँड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. जो 200MP कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की, Moto Edge 30 Ultra स्मार्टफोन 8 सप्टेंबरला भारतीयांच्या भेटीला येईल.

Motorola Edge 30 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 30 Ultra मध्ये फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 200MP Samsung HP1 sensor प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. जोडीला 12MP ची टेलीफोटो लेन्स आणि 50MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. Motorola Edge 30 Ultra च्या फ्रंट पॅनलवर 60MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो ओएलईडी पॅनल आहे. हा डिस्प्ले 144हर्ट्ज रिफ्रेश रेट व 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येते आणि एचडीआर10+ आणि 1250निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सला सपोर्ट करते.

Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेटवर चालतो. हा मोबाइल फोन वीसी कूलिंग सिस्टमसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळते. मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरी आणि 125W rapid charging टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.

Motorola Edge 30 Ultra ची संभाव्य किंमत

मोटोरोला एक्स30 प्रो स्मार्टफोन चीनी बाजारात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 3,699 युआन (जवळपास 43,500 रुपये) आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेल 4,199 युआन म्हणजे जवळपास 49,500 रुपयांमध्ये आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 4,499 युआन जवळपास 53,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

The post सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह ‘हा’ फोन घेणार भारतात एंट्री; 200MP च्या सेन्सरसह ‘या’ दिवशी होणार लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200mp-camera-phone-motorola-edge-30-ultra-india-launch-date/feed/ 0