Nokia 6.1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 13:30:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-price-cut-in-india-3gb-4gb-ram-variants-price-6999-9999/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-price-cut-in-india-3gb-4gb-ram-variants-price-6999-9999/#respond Mon, 08 Jul 2019 11:41:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4745 Nokia 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट फ्लिपकार्ट वर पण नवीन किंमत सह उपलब्द आहे पण फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट अजून अपडेट झाला नाही.

The post Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या महिन्यातच Nokia 8.1, Nokia 4.1 आणि Nokia 3.1 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या होत्या त्या नंतर या तिन्ही स्मार्टफोन्सचे वेगवेगळे वेरिएंट्स स्वस्तात सेल साठी उपलब्ध झाले आहेत. आता पुन्हा एकदा आपल्या फॅन्सना भेट देत Nokia ने आपल्या मीड बजेट स्मार्टफोन Nokia 6.1 ची किंमत पण कमी केली आहे. कंपनी ने Nokia 6.1 च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत त्या मुळे हा फोन 10,000 रुपयांपेक्षा पण कमी बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे.

किंमत झाली कमी

Nokia 6.1 च्या 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम वाल्या वेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आधीपण कंपनीने या फोनची किंमत कमी केली होती. Nokia 6.1 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो नवीन प्राइस कट नंतर फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 18,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Nokia 6.1 चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट आता 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हा स्मार्टफोन नोकियाच्या अधिकृत वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट व अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध आहे. बातमी देण्यापुर्वीपर्यंत कंपनीच्या वेबसाइट वर Nokia 6.1 चा फक्त 4जीबी रॅम वेरिएंटच नवीन प्राइस कट सह 9,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट झाला होता. Nokia 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट फ्लिपकार्ट वर पण नवीन किंमत सह उपलब्द आहे पण फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट अजून अपडेट झाला नाही.

नोकिया 6.1

Nokia 6.1 पाहता हा फोन बेजल लेस डिजाईन वर सादर केला गेला होता ज्यात कोणतीही नॉच नाही. हा फोन 16:6 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.5-इंचाच्या फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनीने Nokia 6.1 स्टॉक एंडरॉयड वर सादर केला होता जो सध्या एंडरॉयडच्य लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

प्रोसेसिंग साठी Nokia 6.1 मध्ये 2.2 गीगा हर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 630 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 6.1 च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी Nokia 6.1 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Nokia 6.1 ची किंमत पुन्हा झाली कमी, 16,999 रुपयांचा फोन आता विकत घेता येईल फक्त 6,999 रुपयांमध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-price-cut-in-india-3gb-4gb-ram-variants-price-6999-9999/feed/ 0
लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-leak-hints-at-q2-2019-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-leak-hints-at-q2-2019-launch/#respond Tue, 12 Mar 2019 08:48:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3825 नोकिया 6.2 येत्या महिन्यात रिलीज होईल आणि या फोनची किंमत नोकिया 6.1 च्या आसपास असेल.

The post लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचे मोबाईल बनवणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबलने फेब्रुवारी मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये आपले 5 नवीन फोन लॉन्च केले होते. या 5 फोन्स मध्ये नोकिया 9 प्योरव्यू, नोकिया 3.2, नोकिया 4.2, नोकिया 1 प्लस आणि नोकिया 210 यांचा समावेश होता. अशा होती कि कंपनी नोकिया 6.2 लॉन्च करेल. पण असे नाही झाले. आत माहिती समोर आली आहे कि हा फोन येत्या महिन्यात सादर केला जाईल.

दावा करण्यात आला आहे कि नोकिया 6.2 वसंतात येईल. युरोपात वसंत ऋतू मार्चच्या शेवटी सुरु होऊन जून पर्यंत असतो. या आधवरावर म्हणूं शकतो कि नोकिया 6.2 येत्या तिमाहीत लॉन्च केला जाईल. पण डिवाइसच्या लॉन्च बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी नोकिया 6.2 च्या किंमती बद्दल माहिती आली होती. विशेष म्हणजे ‘नोकिया एन्यू’ नावाच्या एका ट्विटर यूजर ने दावा केला आहे कि नोकिया 6.2 येत्या महिन्यात रिलीज होईल आणि या फोनची किंमत नोकिया 6.1 च्या आसपास असेल.

एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजला टक्कर देण्यासाठी वीवो घेऊन येत आहे ट्रिपल कॅमेरा असलेला वीवो वाय5 आणि वाय3 मॉडेल

नोकिया 6.1 प्लस चे स्पेसिफिकेशन
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी वर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर करण्यात आला आहे.

आमचा 5जी फोन रेडी आहे, आम्ही कधीही लॉन्च करू शकतो: आदित्य बब्बर

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे

The post लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-2-leak-hints-at-q2-2019-launch/feed/ 0
नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात https://www.91mobiles.com/marathi/nokia-smartphones-android-oreo-and-android-9-pie-upgrade-in-april-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smartphones-android-oreo-and-android-9-pie-upgrade-in-april-in-marathi/#respond Thu, 10 Jan 2019 09:13:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3348 एचएमडी ग्लोबल ने ऑफिशियली त्या सर्व स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे ज्यांना कंपनी कडून एंडरॉयड ओरिया आणि एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केले जाईल

The post नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचे माळी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल ने आधी नोकिया एंडरॉयड स्मार्टफोन 8 जानेवारी 2017 ला सादर केला होता. नोकिया एंडरॉयड स्मार्टफोन्स लॉन्च च्या वेळीच कंपनी ने स्पष्ट केले होते कि ते आपल्या ग्राहकांना वेळोवेळी एंडरॉयड आणि सिक्योरिटी पॅचचा अपडेट देईल. आता कंपनी ने नवीन वर्षात नोकियाच्या 10 स्मार्टफोन्सची लिस्ट जाहीर केली आहे, ज्यांना एंडरॉयड ओरियो आणि लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम पाईचा अपडेट यावर्षी एप्रिल पर्यंत मिळेल.

एचएमडी ग्लोबल ने ऑफिशियली त्या सर्व स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे ज्यांना कंपनी कडून एंडरॉयड ओरिया आणि एंडरॉयड 9 पाई वर अपडेट केले जाईल. नोकियाचे हे स्मार्टफोन यावर्षी एप्रिल मध्ये नवीन ओएस वर अपडेट होतील. नोकिया स्मार्टफोनची हि लिस्ट अशाप्रकारे आहे.

या स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई आणि एंडरॉयड ओरियोचा अपडेट
एचएमडी ग्लोबल ने दिलेल्या लिस्ट नुसार नोकिया 8, नोकिया 8 सिराको, नोकिया 7 प्लस, नोकिया 7.1, नोकिया 6.1, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस स्मार्टफोनला एंडरयॉयड पाई चा अपडेट मिळेल. तसेच नोकिया 6, आणि नोकिया 5 स्मार्टफोन साठी एंडरॉयड 8.1 ओरियो व नोकिया 3 साठी एंडरॉयड 8.0 ओरियोचा अपडेट येईल.

एंड्रॉयड 9.0 अपडेट नंतर स्मार्टफोन्स मध्ये ऍप ऍक्शन फीचर येईल, ज्यामुळे यूजर यूज्ड ऍप्स मध्ये सह नेविगेट करू शकतील. तसेच ऍडप्टिव ब्राइटनेस फीचर पण स्मार्टफोन्स मध्ये येईल. या फीचरने डिवाइसची ब्राइटनेस आपोआप सेट होईल. बॅटरी ऑप्टिमाइजेशनचे फीचर पण या अपडेट मधून नोकिया 8, नोकिया 8 सिराको, नोकिया 7 प्लस, नोकिया 7.1, नोकिया 6.1, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस स्मार्टफोन्स मध्ये येईल. या फीचर मुळे बॅटरी लाइफ अधिकपेक्षा चांगली होईल.

तसेच नोकिया यावर्षी सादर करणाऱ्या स्मार्टफोन्सचे लीक व माहिती समोर येत आहे. नोकियाचे आगामी स्मार्टफोन नोकिया 9 प्योरव्यू ची बातमी काही दिवसांपूर्वी चीनीच्या माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर नोकियाच्या एका स्मार्टफोनचा फोटो शेयर करण्यात आला आहे, ज्यात ट्रिपल कॅमेरा आणि बेजल लेस फोन दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोन मध्ये कोणतीही नॉच व सेल्फी कॅमेरा दिसत नाही.

The post नोकिया च्या 7 स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड 9 पाई चा अपडेट, तुमचा फोन आहे का यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smartphones-android-oreo-and-android-9-pie-upgrade-in-april-in-marathi/feed/ 0
नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-and-5-1-and-6-1-nokia-8-sirocco-price-cut-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-and-5-1-and-6-1-nokia-8-sirocco-price-cut-in-india-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 07:13:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2573 नोकिया ने लोकांना आश्चर्यकारक धक्का देत आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 13,000 रुपयांपर्यंतची कपात केली आहे.

The post नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया एंडरॉयड मार्केट मध्ये जरी उशिरा आली असली तरी या ब्रांड प्रति मोबाईल यूजर्सच्या विश्वासामुळे नोकिया स्मार्टफोन थोड्याच कालावधीत हिट झाला आहे. नोकिया ने पण आपल्या यूजर्सची काळजी घेत चांगल्या बजेट मध्ये शानदार फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता दिवाळीच्या निमित्ताने नोकिया फॅन्सना भेट देत कंपनी ने आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर कमी केल्या आहेत. नोकिया ने लोकांना आश्चर्यकारक धक्का देत आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतींमध्ये 13,000 रुपयांपर्यंतची कपात केली आहे.

नोकिया ने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या बजेट स्मार्टफोन्स पासून फ्लॅगशिप स्मार्टफोन्स पर्यंतच्या किंमती कमी केल्या आहेत. या प्राइस कट मध्ये स्वस्त तसेच महाग फोन्सचा पण समावेश आहे. सर्वात आधी नोकियाच्या हाईएंड डिवाईस नोकिया 8 सिरोको बद्दल बोलूया तर हा फोन 49,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च झाला होता. पण दिवाळीच्या निम्मिताने झालेल्या प्राइस कट नंतर कंपनी या फोन वर थेट 13,000 रुपयांची सूट देत आहे. या मोठ्या प्राइस ड्रॉप नंतर नोकियाचा हा शानदार स्मार्टफोन 36,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

नोकियाच्या मीड रेंज स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर कंपनी ने नोकिया 6.1 ची किंमत पण कमी केली आहे. इंडियन मार्केट मध्ये नोकिया 6.1 4 जीबी रॅम व 3जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 3जीबी वेरिएंट 2,000 रुपयांच्या प्राइस सह विकत घेता येईल. हा फोन आधी 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध हप्ता आता हा 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 17,499 रुपयांचा नोकिया 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट 1,000 रुपयांनी कमी म्हणजे 16,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

नोकिया 5.1 कंपनी द्वारा 14,499 रुपयांमध्ये देशात लॉन्च करण्यात आला होता. किंमत कमी करताना कंपनी ने या फोन वर 1,500 रुपयांची सूट दिली आहे ज्यामुळे हा फोन 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 पण 1,000 रुपयांच्या कपाती नंतर फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post नोकिया ने ​आपल्या या स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 2,000 रुपयांपासून 13,000 रुपयांपर्यंत किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-1-and-5-1-and-6-1-nokia-8-sirocco-price-cut-in-india-in-marathi/feed/ 0
नोकिया ​6.1 प्लस असेल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-may-be-a-flipkart-exclusive-video-teaser-shankar-ehsaan-loy-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-may-be-a-flipkart-exclusive-video-teaser-shankar-ehsaan-loy-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 09:03:34 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1750 नोकिया इंडिया ने एक कँपेनची सुरवात केली आहे, ज्यात नोकिया फॅन्सना त्यांचे आवडीच्या नोकिया स्मार्टफोनचा कोणताही एक खास अनुभव शेयर करायला सांगण्यात आले आहे. नोकिया च्या या कॅपेंन मधील या स्पर्धेच्या विजेत्याला कंपनीच्या लॉन्च ईवेंट मध्ये जाण्याचे निमंत्रण मिळेल.

The post नोकिया ​6.1 प्लस असेल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया उद्या म्हणजे 21 ऑगस्टला भारतात एका मोठ्या ईवेंट चे आयोजन करणार आहे. नोकिया ने अजूनतरी या ईवेंट मध्ये सादर होणाऱ्या फोनचे नाव सांगितले नाही, पण बोलले जात आहे की उद्या कंपनी भारतात आपला पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन नोकिया 6.1 प्लस नावाने लॉन्च करेल. काही ठिकाणी नोकिया 9 ची पण चर्चा आहे पण नोकिया 6.1 प्लस लॉन्च होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच फोन लॉन्च आधीच फ्लिपकार्ट ने एक वीडियो टीजर शेयर केला आहे ज्यावरून समजते कि नोकियाचा हा येणारा स्मार्टफोन फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल.

भारतातील प्रसिद्ध संगीतकार शंकर, एहसान आणि लॉय या वीडियो मध्ये आहेत. या वीडियो मध्ये ते नोकिया ची जग प्रसिद्ध ट्यून वाजवत आणि गुणगुणत आहेत आणि त्यात शंकर महादेवन यांनी सांगितले आहे की फ्लिपकार्ट उद्या एक मोठे सादरीकरण करणार आहे. या वीडियो टीजर वरून स्पष्ट झाले आहे की नोकिया उद्या देशात जो फोन लॉन्च करणार आहे तो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकला जाईल. नोकिया चा हा ईवेंट लाईव बघण्यासाठी (इथे क्लिक करा)

नोकिया इंडिया ने एक कँपेनची सुरवात केली आहे, ज्यात नोकिया फॅन्सना त्यांचे आवडीच्या नोकिया स्मार्टफोनचा कोणताही एक खास अनुभव शेयर करायला सांगण्यात आले आहे. नोकिया च्या या कॅपेंन मधील या स्पर्धेच्या विजेत्याला कंपनीच्या लॉन्च ईवेंट मध्ये जाण्याचे निमंत्रण मिळेल. नोकिया चे मालकी हक्क असणारी एचएमडी ग्लोबल उद्या नोकिया 6.1 प्लस भारतीय बाजारात सादर करू शकते.

नोकिया 6.1 प्लस अंर्तराष्ट्रीय बाजारात जवळपास 20,000 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल.

चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम/32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम /64जीबी स्टोरेज च्या 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता पण ग्लोबल मंचावर कंपनी ने फक्त 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर केला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात नोकिया 6.1 प्लस किती रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच याची किंमत किती असेल आणि हा कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी उद्याच्या लॉन्च ईवेंट ची वाट बघावी लागेल.

The post नोकिया ​6.1 प्लस असेल फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव, इथे बघा लॉन्च ईवेंट लाईव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-may-be-a-flipkart-exclusive-video-teaser-shankar-ehsaan-loy-in-marathi/feed/ 0
फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-nokia-7-plus-nokia-6-1-available-on-down-payment-rs-3799-with-airtel-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-nokia-7-plus-nokia-6-1-available-on-down-payment-rs-3799-with-airtel-in-marathi/#respond Fri, 25 May 2018 16:46:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=644 नोकिया ने देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल सोबत भागीदारी केली आहे

The post फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 एचएमडी ग्लोबल द्वारा भारतात लॉन्च केलेले लेटेस्ट स्मार्टफोन आहेत. हे तिन्ही फोन वेगवेगळ्या किंमतीत देशात सेल साठी उपलब्ध आहेत. नोकिया चे असे फॅन्स जे जास्त किंमती मुळे आपला आवडीचा नोकिया स्मार्टफोन विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी नोकिया एक शानदार संधी घेऊन आली आहे. जास्त पैसे न देता हे स्मार्टफोन यूजर्सना उपलब्ध करण्यासाठी नोकिया ने एयरटेल सोबत हातमिळवणी केली आहे.

नोकिया ने देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल सोबत भागीदारी केली आहे, ज्या अंतर्गत एयरटेल आपल्या प्लॅटफार्म वरून नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 विकत आहे. एयरटेल कडून हे तिन्ही हिट स्मार्टफोन ईएमआई वर उपलब्ध करावण्यात येतील. एयरटेल कडून मामूली किंमत घेऊन हे फोन यूजर्सना दिले जातील, त्यानंतर ग्राहकांना ठराविक वेळे साठी एका फिक्स रक्केमेने रिचार्ज करत रहावे लागेल. या रिचार्ज ने नोकिया फोन चा र्इएमआई पूर्ण होईल आणि सोबतच वापरण्यासाठी भरपूर डाटा आणि अमर्याद टेलीकॉम बेनिफिट पण मिळतील.

नोकिया 6.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट विकत घेताना यूजर्सना 3,799 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर 12 महिन्यांपर्यंत 1,499 रुपये प्रतिमाह दराने पैसे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर नोकिया 6.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट विकत घेणार असला तर ग्राहकांना 5,799 रुपये द्यावे लागतील तसेच 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 1,499 रुपये द्यावे लागतील. या दोन्ही प्लान्स मध्ये एयरटेल यूजर्सना 12 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 30जीबी 4जी डाटा मिळेल आणि अनलिमिटेड वॉयस कॉल मिळतील.

नोकिया 7 प्लस जर तुम्ही घेऊ इच्छित असाल तर 5,599 रुपये देऊन हा फोन मिळवू शकतो. फोन विकत घेतल्यावर 12 महिन्यांपर्यंत यूजर्सना प्रत्येक महिन्याला 2,099 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क दिल्यावर प्रत्येक महिन्याला 30जीबी 4जी डाटा सह मोफत वॉयस कॉल पण मिळतील.

त्याचप्रमाणे नोकिया 8 सिरोको साठी 8,599 रुपयांचे डाउन पेमेंट करून हा फोन विकत घेऊ शकता. त्यानंतर 18 महिन्यांसाठी ग्राहकांना 2,799 प्रति माह च्या हिशोबाने शुल्क द्यावे लागेल. या प्लान मध्ये यूजर्सना 18 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 50जीबी 4जी डाटा अनलिमिटेड कॉलिंग चा लाभ मिळेल.

नोकिया 8 सिरोको, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 6.1 एयरटेल नेटवर्क वरून विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post फक्त 3,799 रुपयांमध्ये मिळेल नोकिया 6.1, नोकिया 7 प्लस आणि नोकिया 8 सिरोको, जाणून घ्या कसा मिळवाल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-8-nokia-7-plus-nokia-6-1-available-on-down-payment-rs-3799-with-airtel-in-marathi/feed/ 0