Nokia C31 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 08:56:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 9,999 रुपयांमध्ये 4GB रॅमसह Nokia C31 आला भारतात https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-phone-nokia-c31-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-phone-nokia-c31-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Thu, 15 Dec 2022 08:57:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16022 भारतीय बाजारात खूप कमी नॉन चायनीज स्मार्टफोन ब्रँड उरले आहेत. यातील नोकियावर भारतीयांचा खूप आधीपासून विश्वास आहे. आता या ब्रँडच्या मालक HMD Global कंपनीनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia C31 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन आयपी52 रेटिंग, 6.75” Display, 4GB RAM, 13MP Camera आणि 5,050mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह […]

The post 9,999 रुपयांमध्ये 4GB रॅमसह Nokia C31 आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात खूप कमी नॉन चायनीज स्मार्टफोन ब्रँड उरले आहेत. यातील नोकियावर भारतीयांचा खूप आधीपासून विश्वास आहे. आता या ब्रँडच्या मालक HMD Global कंपनीनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia C31 लाँच केला आहे. हा मोबाइल फोन आयपी52 रेटिंग, 6.75” Display, 4GB RAM, 13MP Camera आणि 5,050mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला असून, हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. पुढे नवीन नोकिया सी31 स्मार्टफोनची संपूर्ण माहिती शेयर करण्यात आली आहे.

Nokia C31 Price

नोकिया सी31 स्मार्टफोन भारतीय बाजारात 2 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3GB RAM + 32GB Storage देण्यात आली आहे ज्याची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. तसेच मोठा नोकिया सी31 4GB RAM + 64GB Storage सह लाँच झाला आहे ज्याची किंमत 10,999 रुपये आहे. नोकिया सी31 Charcoal, Cyan आणि Mint कलरमध्ये विकत घेता येईल, विशेष म्हणजे कंपनी हा फोन 1 वर्षांच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह विकत आहे. हे देखील वाचा: जबरदस्त! 240KM च्या दमदार रेंजसह आली इलेक्ट्रिक स्कूटर; डिजाइन आणि फीचर्स देखील एक नंबर

Nokia C31 Specifications

नोकिया सी31 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला असून एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन यु शेप नॉचसह बाजारात आला आहे. या फोनचे डायमेंशन 169.2 x 78 x 8.6एमएम आणि वजन 200ग्राम आहे. हा नोकिया मोबाइल आयपी52 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टंट बनतो.

Nokia C31 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो स्टॉक व्हर्जन आहे आणि यात अ‍ॅड फ्री अनुभव मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc 9863A1 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नोकिया मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात मिळत आहेत Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही; सुरु झाला Xiaomi चा Sale Out सेल

Nokia C31 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,050एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. ही बॅटरी तीन दिवसांचा बॅकअप देते असा दावा कंपनीनं केला आहे.

The post 9,999 रुपयांमध्ये 4GB रॅमसह Nokia C31 आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-phone-nokia-c31-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
स्वस्त आणि दमदार! नवीन Nokia C31 देऊ शकतो Realme आणि Redmi ला तगडे आव्हान https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-nokia-c31-launched-with-nokia-x30-5g-and-nokia-g60-5g-check-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-nokia-c31-launched-with-nokia-x30-5g-and-nokia-g60-5g-check-price-specification/#respond Fri, 02 Sep 2022 10:29:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12757 Nokia Launch IFA 2022: नोकिया अँड्रॉइड स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नव्यानं सक्रिय झाली आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये किंमतीला साजेसे स्पेसिफिकेशन्स नसतात अशी तक्रार काही ग्राहक करतात. परंतु दुसरीकडे स्मार्टफोन्सची बिल्ड क्वॉलिटी, वेळेवर मिळणारे अपडेट आणि क्लीन युआयचं कौतुक करणारे लोक देखील आहेत. आता नोकियाचे तीन नवीन स्मार्टफोन Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G तसेच एक […]

The post स्वस्त आणि दमदार! नवीन Nokia C31 देऊ शकतो Realme आणि Redmi ला तगडे आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia Launch IFA 2022: नोकिया अँड्रॉइड स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नव्यानं सक्रिय झाली आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये किंमतीला साजेसे स्पेसिफिकेशन्स नसतात अशी तक्रार काही ग्राहक करतात. परंतु दुसरीकडे स्मार्टफोन्सची बिल्ड क्वॉलिटी, वेळेवर मिळणारे अपडेट आणि क्लीन युआयचं कौतुक करणारे लोक देखील आहेत. आता नोकियाचे तीन नवीन स्मार्टफोन Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G तसेच एक टॅबलेट Nokia T21 IFA 2022 च्या मंचावरून लाँच झाले आहेत. हे सर्व डिवायस सध्या ग्लोबल मंचावरच सादर करण्यात आले आहेत परंतु लवकरच हे भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील. पुढे आम्ही 6.75” Display, 4GB RAM, 13P Camera आणि 5,050mAh Battery असलेल्या नोकिया सी31 स्मार्टफोनची माहिती दिली आहे.

Nokia C31 Specifications

नोकिया सी31 स्मार्टफोन 6.75 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला असून एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 169.2 x 78 x 8.6एमएम आणि वजन 200ग्राम आहे. हा नोकिया मोबाइल आयपी52 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर

Nokia C31 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे ज्यात 2 वर्षाचे सिक्योरिटी पॅच देणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc 9863A1 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 4GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नोकिया मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia C31 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,050एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा

Nokia C31 Price

जागतिक बाजारात नोकिया सी31 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट्स ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. यात 3GB RAM + 32GB Storage, 4GB RAM + 64GB Storage आणि 4GB RAM + 128GB Storage चा समावेश आहे. भारतीय करंसीनुसार Nokia C31 ची Price जवळपास 19,000 रुपयांपासून सुरु होते. नोकिया सी31 Charcoal, Cyan आणि Mint कलरमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र कंपनीनं अजूनतरी दिली नाही.

The post स्वस्त आणि दमदार! नवीन Nokia C31 देऊ शकतो Realme आणि Redmi ला तगडे आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-nokia-c31-launched-with-nokia-x30-5g-and-nokia-g60-5g-check-price-specification/feed/ 0
रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/#respond Fri, 02 Sep 2022 06:40:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12742 Nokia नं काही दिवसांपूर्वी भारतात आपले क्लासिक फिचर फोन नव्या अवतारात सादर केले आहेत. यात Nokia 2660 Flip आणि Nokia 5710 XpressAudio चा देखील समावेश आहे. हे फोन्स आधी जागतिक बाजारात सादर करण्यात आले होते. तसेच आता नोकियानं आपले तीन नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. हे मोबाइल फोन IFA 2022 च्या मंचावरून सादर करण्यात […]

The post रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia नं काही दिवसांपूर्वी भारतात आपले क्लासिक फिचर फोन नव्या अवतारात सादर केले आहेत. यात Nokia 2660 Flip आणि Nokia 5710 XpressAudio चा देखील समावेश आहे. हे फोन्स आधी जागतिक बाजारात सादर करण्यात आले होते. तसेच आता नोकियानं आपले तीन नवीन स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. हे मोबाइल फोन IFA 2022 च्या मंचावरून सादर करण्यात आले आहेत, जे Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G नावानं लाँच झाले आहेत. या लेखात आम्ही नोकिया जी60 5जी फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसचीमाहिती दिली आहे.

Nokia G60 5G Specifications

नोकिया जी60 5जी फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे. या मोबाइलची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच 500निट्स ब्राइटनेससह बाजारात आली आहे. फोनच्या डिस्प्लेला कंपनीनं कोर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 165 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळतो Nokia 6310 Mobile; सिंगल चार्जवर 35 दिवस चालेल याची बॅटरी

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. Nokia G60 5G अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia G60 5G Phone ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तथा एक डेप्थ सेन्सरसह चालतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

50mp camera phone Nokia G60 5G launched with Nokia C31 Nokia X30 5G smartphone check price specifications details

Nokia G60 5G इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवण्यात आला आहे. कंपनीनं आपला मोबाइल आयपी52 रेटिंगसह सादर केली आहे ज्यामुळे हा फोन वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीसह सादर करण्यात आला आहे जी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हे देखील वाचा: महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

Nokia G60 5G Price

नोकिया जी60 5जी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश आहे. नोकिया जी60 5जी फोन प्राइस जवळपास 25,000 रुपयांपासून सुरु होते. या फोन सोबत कंपनीनं तीन वर्षांचे अपडेट, तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट आणि तीन वर्षांची वॉरंटी देत आहे.

The post रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-g60-5g-launched-with-nokia-c31-nokia-x30-5g-smartphone-check-price-specifications-details/feed/ 0