Nokia G22 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:09:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच https://www.91mobiles.com/marathi/self-repairable-mobile-phone-nokia-g22-launch-know-details/ https://www.91mobiles.com/marathi/self-repairable-mobile-phone-nokia-g22-launch-know-details/#respond Mon, 27 Feb 2023 06:31:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18160 Nokia G22 Launch: MWC 2023 च्या मंचावरून HMD Global नं नोकिया ब्रँडचा एक अनोखा स्मार्टफोन लाँच केला आहे जो मोबाइल युजर स्वतः रिपेयर करू शकतात. हा फोन नोकिया जी22 नावानं बाजारात आला आहे जो 100% recycled plastic बॅक कव्हरपासून बनवण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट, बॅटरी तसेच पॅनल घर बसल्या दुरुस्त करता येईल […]

The post तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia G22 डिस्प्ले, पोर्ट, बॅटरी तसेच पॅनल कोणीही रिपेयर करू शकतो.
  • हा मोबाइल फोन 100% recycled plastic बॅक कव्हरपासून बनवण्यात आला आहे.
  • या फोनसाठी कंपनीनं iFixit सह भागेदारी केली आहे.

Nokia G22 Launch: MWC 2023 च्या मंचावरून HMD Global नं नोकिया ब्रँडचा एक अनोखा स्मार्टफोन लाँच केला आहे जो मोबाइल युजर स्वतः रिपेयर करू शकतात. हा फोन नोकिया जी22 नावानं बाजारात आला आहे जो 100% recycled plastic बॅक कव्हरपासून बनवण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट, बॅटरी तसेच पॅनल घर बसल्या दुरुस्त करता येईल आणि यासाठी कंपनी iFixit किट देखील सोबत देत आहे.

स्वतः रिपेयर करा फोन

सामान्यतः फोनमध्ये एखादा बिघाड झाल्यास लोक सर्व्हिस सेंटरकडे वळतात किंवा नवीन फोन घेतात. परंतु Nokia G22 असा मोबाइल आहे जो बराच काळ तुमची साथ देईल. हा फोन अशाप्रकारे डिजाईन करण्यात आला आहे की युजर हा ओपन करून स्वतःहून रिपेयर करू शकतात. या फोनसाठी HMD Global नं iFixit सोबत भागेदारी केली आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आणि मोठा कॅमेरा सेन्सरही; Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री

कंपनीचा दावा आहे की मोबाइल युजर फक्त 5 मिनिटांत याचा बॅक पॅनल उघडून बॅटरी बदलू शकतात. तसेच 20 मिनिटांच्या आत फोनचा डिस्प्ले बदलता येईल. या फोनसह कंपनी मोबाइल फोन रिपेयर टूल्स देखली देत आहे तसेच रिपेयरिंगचा युजर मॅन्युअल देखील सोबत मिळत आहे.

Nokia G22 specifications

  • 6.52″ HD+ 90Hz Display
  • 4GB RAM + 128GB storage
  • 2GB virtual RAM
  • Unisoc T606 processor
  • 50MP Rear Camera
  • 20W 5,050mAh battery

नोकिया जी22 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 720 x 1200 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेला हा फोन स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो तसेच 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

Nokia G22 अँड्रॉइड 12 वर सादर करण्यात आला आहे 2 वर्षांच्या ओएस अपडेटसह येतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा नोकिया फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. नोकिया जी22 2जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे त्यामुळे 6जीबी रॅमची परफॉर्मन्स मिळते.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Nokia G22 4G फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,050एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. नोकिया जी22 मध्ये 3.5एमएम जॅक, एफएम रेडियो आणि एनएफसी सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: चार्जींगविना 3 दिवस चालणार स्मार्टफोन! स्वस्त Nokia C32 आणि Nokia C22 ची बाजारात एंट्री

Nokia G22 Price

नोकिया जी22 दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 179 पासून सुरु होते जी भारतीय करंसीनुसार 15,500 रुपयांच्या आसपास आहे. हा नोकिया फोन Meteor Grey आणि Lagoon Blue कलरमध्ये मार्केटमध्ये आला आहे.

The post तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/self-repairable-mobile-phone-nokia-g22-launch-know-details/feed/ 0
Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-c32-launched-with-nokia-c22-check-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-c32-launched-with-nokia-c22-check-price-features-specifications/#respond Mon, 27 Feb 2023 05:20:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18153 MWC 2023 च्या मंचावरून नोकिया ब्रँड अंतर्गत टेक कंपनी HMD Global नं तीन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. हे Nokia C22, Nokia C32 आणि Nokia G22 नावाने लाँच झाले आहेत. तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे स्वस्तात सेलसाठी उपलब्ध होतील. या लेखात आपण ‘सी’ सीरीजमधील नोकिया सी22 आणि सी32 ची माहिती घेणार आहोत, जे […]

The post Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia C32 आणि Nokia C22 ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत.
  • दोन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे Android 13 (Go Edition) वर चालतात.
  • नोकिया सी22 आणि सी32 फोन सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप देऊ शकतात.

MWC 2023 च्या मंचावरून नोकिया ब्रँड अंतर्गत टेक कंपनी HMD Global नं तीन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. हे Nokia C22, Nokia C32 आणि Nokia G22 नावाने लाँच झाले आहेत. तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे स्वस्तात सेलसाठी उपलब्ध होतील. या लेखात आपण ‘सी’ सीरीजमधील नोकिया सी22 आणि सी32 ची माहिती घेणार आहोत, जे अँड्रॉइड गो एडिशन ओएस आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत.

Nokia C22 आणि Nokia C32 ची किंमत

नोकिया सी22 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 109 पासून सुरु होते जी 9,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Midnight Black आणि Sand कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

नोकिया सी32 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 129 पासून सुरु होते जी 11,300 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Charcoal, Autumn Green आणि Beach Pink कलरमध्ये लाँच झाला आहे.

Nokia C22 आणि Nokia C32 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • Unisoc SC9863A SoC
  • 10W 5,000mAh battery
  • 8MP selfie sensor
  • 50MP rear camera (Nokia C32)
  • 13MP rear camera (Nokia C22)

नोकिया सी22 आणि सी32 को 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आले आहेत हे दोन्ही स्मार्टफोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्टेड 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. पाणी व धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या नोकिया मोबाइल फोन्समध्ये IP52 रेटिंग देण्यात आली आहे.

हे नोकिया फोन अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशनवर लाँच झाले आहेत. यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅम व स्टोरेजवर देखील स्मूद प्रोसेस करू शकते. हे अ‍ॅप्स बॅटरी आणि इंटरनेट डेटा दोन्ही कमी वापरतात. प्रोसेसिंगसाठी नोकिया सी22 आणि सी32 मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हे दोन्ही नोकिया फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. नोकिया सी22 मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तरवहीं नोकिया सी32 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्सच्या बॅक पॅनलवर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी22 व सी32 दोन्ही मोबाइल 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Nokia C22 आणि Nokia C32 दोन्ही डुअल सिम फोन आहेत तसेच 4जीला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट चार्जिंगसह काम करते. फिंगरप्रिंट सेन्सर नोकिया सी22 च्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे तर सी32 च्या साइड पॅनलवर आहे. या मोबाइल फोनमध्ये 3.5एमएम जॅक व एफएम रेडियो सारखे फीचर्स देखील मिळतात.

The post Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-nokia-c32-launched-with-nokia-c22-check-price-features-specifications/feed/ 0
Nokia G22 स्मार्टफोन 4GB रॅमसह गिकबेंचवर लिस्ट; मिळू शकतो Unisoc T6061 प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/low-cost-smartphone-nokia-g22-latest-update-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/low-cost-smartphone-nokia-g22-latest-update-specifications-leaked/#respond Mon, 13 Feb 2023 07:25:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17743 Nokia G21 स्मार्टफोन गेल्यावर्षी भारतात लाँच झाला होता जो 12,499 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. तर आता कंपनी या मोबाइल फोनचा अपग्रेडेड व्हर्जन Nokia G22 आणण्याची तयारी करत आहे. हा नवीन नोकिया फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंगमुळे अंदाज लावला जात आहे की […]

The post Nokia G22 स्मार्टफोन 4GB रॅमसह गिकबेंचवर लिस्ट; मिळू शकतो Unisoc T6061 प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nokia G22 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनचा 4GB RAM व्हेरिएंट समोर आला आहे.
  • या नोकिया मोबाइलमध्ये Unisoc T6061 प्रोसेसर मिळू शकतो.

Nokia G21 स्मार्टफोन गेल्यावर्षी भारतात लाँच झाला होता जो 12,499 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. तर आता कंपनी या मोबाइल फोनचा अपग्रेडेड व्हर्जन Nokia G22 आणण्याची तयारी करत आहे. हा नवीन नोकिया फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंगमुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच आपल्या ‘जी’ सीरीजचा हा नवीन मोबाइल फोन बाजारात घेऊन येऊ शकते.

Nokia G22 चे लीक स्पेसिफिकेशन्स

नोकिया जी22 गीकबेंचवर नावासह लिस्ट झाला आहे जिथे फोनचा 4 जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे. परंतु एवढं मात्र निश्चित सांगता येईल की बाजारात या मोबाइलचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्स येऊ शकतो. या नोकिया फोनमध्ये यूनिएसओसी टी606 प्रोसेसर मिळू शकतो, असं लिस्टिंगमधून समोर आलं आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करू शकतो. हे देखील वाचा: 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा; परवडणाऱ्या दरात दणकट फोन

Nokia G22 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो जो स्टॉक अँड्रॉइड युआय असू शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये माली-जी57 जीपीयू असल्याचा खुलासा देखील गीकबेंचवर झाला आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता नोकिया जी22 ला सिंगल-कोर मध्ये 308 आणि मल्टी-कोर मध्ये 1094 स्कोर मिळाला आहे.

Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ 90Hz Display
  • Unisoc T606 processor
  • 6GB RAM + 128 GB Storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 18W 5,050mAh Battery

नोकिया जी21 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते आणि 400निट्स ब्राइटनेस व सनलाईट ब्राइटनेस बूस्ट सारखे फीचर्स देते. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: 5G Phone च्या यादीत होणार Vivo T2 5G चा समावेश; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 सह वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी नोकिया जी21 च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/1.8 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी नोकिया जी21 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,050एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia G22 स्मार्टफोन 4GB रॅमसह गिकबेंचवर लिस्ट; मिळू शकतो Unisoc T6061 प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-cost-smartphone-nokia-g22-latest-update-specifications-leaked/feed/ 0