तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच

Highlights

  • Nokia G22 डिस्प्ले, पोर्ट, बॅटरी तसेच पॅनल कोणीही रिपेयर करू शकतो.
  • हा मोबाइल फोन 100% recycled plastic बॅक कव्हरपासून बनवण्यात आला आहे.
  • या फोनसाठी कंपनीनं iFixit सह भागेदारी केली आहे.

Nokia G22 Launch: MWC 2023 च्या मंचावरून HMD Global नं नोकिया ब्रँडचा एक अनोखा स्मार्टफोन लाँच केला आहे जो मोबाइल युजर स्वतः रिपेयर करू शकतात. हा फोन नोकिया जी22 नावानं बाजारात आला आहे जो 100% recycled plastic बॅक कव्हरपासून बनवण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट, बॅटरी तसेच पॅनल घर बसल्या दुरुस्त करता येईल आणि यासाठी कंपनी iFixit किट देखील सोबत देत आहे.

स्वतः रिपेयर करा फोन

सामान्यतः फोनमध्ये एखादा बिघाड झाल्यास लोक सर्व्हिस सेंटरकडे वळतात किंवा नवीन फोन घेतात. परंतु Nokia G22 असा मोबाइल आहे जो बराच काळ तुमची साथ देईल. हा फोन अशाप्रकारे डिजाईन करण्यात आला आहे की युजर हा ओपन करून स्वतःहून रिपेयर करू शकतात. या फोनसाठी HMD Global नं iFixit सोबत भागेदारी केली आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आणि मोठा कॅमेरा सेन्सरही; Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री

कंपनीचा दावा आहे की मोबाइल युजर फक्त 5 मिनिटांत याचा बॅक पॅनल उघडून बॅटरी बदलू शकतात. तसेच 20 मिनिटांच्या आत फोनचा डिस्प्ले बदलता येईल. या फोनसह कंपनी मोबाइल फोन रिपेयर टूल्स देखली देत आहे तसेच रिपेयरिंगचा युजर मॅन्युअल देखील सोबत मिळत आहे.

Nokia G22 specifications

  • 6.52″ HD+ 90Hz Display
  • 4GB RAM + 128GB storage
  • 2GB virtual RAM
  • Unisoc T606 processor
  • 50MP Rear Camera
  • 20W 5,050mAh battery

नोकिया जी22 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 720 x 1200 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेला हा फोन स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो तसेच 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 नं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

Nokia G22 अँड्रॉइड 12 वर सादर करण्यात आला आहे 2 वर्षांच्या ओएस अपडेटसह येतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा नोकिया फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. नोकिया जी22 2जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे त्यामुळे 6जीबी रॅमची परफॉर्मन्स मिळते.

फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Nokia G22 4G फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,050एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. हा फोन आयपी52 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. नोकिया जी22 मध्ये 3.5एमएम जॅक, एफएम रेडियो आणि एनएफसी सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: चार्जींगविना 3 दिवस चालणार स्मार्टफोन! स्वस्त Nokia C32 आणि Nokia C22 ची बाजारात एंट्री

Nokia G22 Price

नोकिया जी22 दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 179 पासून सुरु होते जी भारतीय करंसीनुसार 15,500 रुपयांच्या आसपास आहे. हा नोकिया फोन Meteor Grey आणि Lagoon Blue कलरमध्ये मार्केटमध्ये आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here