Nokia G22 स्मार्टफोन 4GB रॅमसह गिकबेंचवर लिस्ट; मिळू शकतो Unisoc T6061 प्रोसेसर

Highlights

  • Nokia G22 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनचा 4GB RAM व्हेरिएंट समोर आला आहे.
  • या नोकिया मोबाइलमध्ये Unisoc T6061 प्रोसेसर मिळू शकतो.

Nokia G21 स्मार्टफोन गेल्यावर्षी भारतात लाँच झाला होता जो 12,499 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. तर आता कंपनी या मोबाइल फोनचा अपग्रेडेड व्हर्जन Nokia G22 आणण्याची तयारी करत आहे. हा नवीन नोकिया फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंगमुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच आपल्या ‘जी’ सीरीजचा हा नवीन मोबाइल फोन बाजारात घेऊन येऊ शकते.

Nokia G22 चे लीक स्पेसिफिकेशन्स

नोकिया जी22 गीकबेंचवर नावासह लिस्ट झाला आहे जिथे फोनचा 4 जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे. परंतु एवढं मात्र निश्चित सांगता येईल की बाजारात या मोबाइलचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्स येऊ शकतो. या नोकिया फोनमध्ये यूनिएसओसी टी606 प्रोसेसर मिळू शकतो, असं लिस्टिंगमधून समोर आलं आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करू शकतो. हे देखील वाचा: 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा; परवडणाऱ्या दरात दणकट फोन

Nokia G22 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो जो स्टॉक अँड्रॉइड युआय असू शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये माली-जी57 जीपीयू असल्याचा खुलासा देखील गीकबेंचवर झाला आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता नोकिया जी22 ला सिंगल-कोर मध्ये 308 आणि मल्टी-कोर मध्ये 1094 स्कोर मिळाला आहे.

Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ 90Hz Display
  • Unisoc T606 processor
  • 6GB RAM + 128 GB Storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 18W 5,050mAh Battery

नोकिया जी21 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह आला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते आणि 400निट्स ब्राइटनेस व सनलाईट ब्राइटनेस बूस्ट सारखे फीचर्स देते. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: 5G Phone च्या यादीत होणार Vivo T2 5G चा समावेश; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 सह वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी नोकिया जी21 च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/1.8 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी नोकिया जी21 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,050एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here