Nokia C32 आणि Nokia C22 ची युरोपियन बाजारात लाँच; दोन्हीमध्ये अँड्रॉइड गो एडिशन ओएस

Highlights

  • Nokia C32 आणि Nokia C22 ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आले आहेत.
  • दोन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे Android 13 (Go Edition) वर चालतात.
  • नोकिया सी22 आणि सी32 फोन सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप देऊ शकतात.

MWC 2023 च्या मंचावरून नोकिया ब्रँड अंतर्गत टेक कंपनी HMD Global नं तीन नवीन मोबाइल फोन सादर केले आहेत. हे Nokia C22, Nokia C32 आणि Nokia G22 नावाने लाँच झाले आहेत. तिन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत जे स्वस्तात सेलसाठी उपलब्ध होतील. या लेखात आपण ‘सी’ सीरीजमधील नोकिया सी22 आणि सी32 ची माहिती घेणार आहोत, जे अँड्रॉइड गो एडिशन ओएस आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत.

Nokia C22 आणि Nokia C32 ची किंमत

नोकिया सी22 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 109 पासून सुरु होते जी 9,500 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Midnight Black आणि Sand कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

नोकिया सी32 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत EUR 129 पासून सुरु होते जी 11,300 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Charcoal, Autumn Green आणि Beach Pink कलरमध्ये लाँच झाला आहे.

Nokia C22 आणि Nokia C32 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ display
  • Unisoc SC9863A SoC
  • 10W 5,000mAh battery
  • 8MP selfie sensor
  • 50MP rear camera (Nokia C32)
  • 13MP rear camera (Nokia C22)

नोकिया सी22 आणि सी32 को 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर करण्यात आले आहेत हे दोन्ही स्मार्टफोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्टेड 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. पाणी व धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या नोकिया मोबाइल फोन्समध्ये IP52 रेटिंग देण्यात आली आहे.

हे नोकिया फोन अँड्रॉइड 13 ‘गो’ एडिशनवर लाँच झाले आहेत. यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅम व स्टोरेजवर देखील स्मूद प्रोसेस करू शकते. हे अ‍ॅप्स बॅटरी आणि इंटरनेट डेटा दोन्ही कमी वापरतात. प्रोसेसिंगसाठी नोकिया सी22 आणि सी32 मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हे दोन्ही नोकिया फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. नोकिया सी22 मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे तरवहीं नोकिया सी32 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्सच्या बॅक पॅनलवर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया सी22 व सी32 दोन्ही मोबाइल 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

Nokia C22 आणि Nokia C32 दोन्ही डुअल सिम फोन आहेत तसेच 4जीला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट चार्जिंगसह काम करते. फिंगरप्रिंट सेन्सर नोकिया सी22 च्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे तर सी32 च्या साइड पॅनलवर आहे. या मोबाइल फोनमध्ये 3.5एमएम जॅक व एफएम रेडियो सारखे फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here