16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा

Highlights

  • iQOO Neo 7 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • फोन 8GB RAM आणि 12GB RAM व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
  • या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत लीकमधून समोर आली आहे.

iQOO ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी भारतात iQOO 11 हा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला होता. जगातील सर्वात वेगवान फोन्स पैकी एक असलेल्या आयकू 11 ची किंमत देखील जास्त होती. आता या आठवड्यात 16 फेब्रुवारीला कंपनी मिडरेंज सेगमेंटमध्ये iQOO Neo 7 5G फोन लाँच करणार आहे. ज्याच्या रॅम व्हेरिएंट्सची आणि किंमतीची माहिती आता समोर आली आहे.

iQOO Neo 7 5G Price in India

टिपस्टर अभिषेक यादवनं आयकू नियो 7 5जी फोनची माहिती लीक केली आहे. त्यानुसार या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच हा मॉडेल 26,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. ही प्राइस लाँच ऑफर्सनंतर मिळेल, म्हणजे मूळ किंमत यापेक्षा जास्त असू शकते. हे देखील वाचा: What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

iQOO Neo 7 5G 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा खुलासा अलीकडेच टिपस्टर पारस गुगलानीनं केला होता आणि सांगितलं होतं की याची किंमत 34,999 रुपये असू शकते. या व्हेरिएंटची ऑफर प्राइस 30,999 रुपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा आयकू फोन Interstellar Black आणि Frost Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. फोनची विक्री 19 किंवा 20 फेब्रुवारीपासून सुरु होऊ शकते.

iQOO Neo 7 5G Specifications

  • 6.78” 120Hz AMOLED display
  • 12GB RAM, 256GB Storage
  • MediaTek Dimensity 8200 SoC
  • 64MP Triple Rear Camera

आयकू नियो 7 5जी फोन चायनामध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसईचा रीब्रँडेड व्हर्जन असेल. त्यामुळे या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असतिल. चीनमधील नियो 7एसई 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

आयकू नियो 7एसई मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटसह लाँच झाला आहे तसेच हा प्रोसेसर iQOO Neo 7 5G फोनमध्ये देखील मिळू शकतो. आयकू नियो 7एसई 16जीबी रॅमवर लाँच झाला होता परंतु नवीन लीकमध्ये नियो 7 5जी 12जीबी रॅमसह समोर आला आहे. तसेच हा फोन 8जीबी रॅमसह लाँच होणार आहे. हे देखील वाचा: भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; रेडमी-रियलमीची लागणार का वाट?

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 5जी फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here