Vivo T2 5G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट

Highlights

  • Vivo T2 5G स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोलवर मॉडेल नंबर V2222 सह लिस्ट झाला आहे.
  • या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC, 8GB RAM आणि Android 13 मिळू शकतो .
  • Vivo T2 लवकरच भारतात येऊ शकतो.

गेल्यावर्षी विवोनं आपल्या बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी नवीन ‘टी’ सीरिज सादर केली होती. यात कंपनीनं Vivo T1 Pro, Vivo T1 5G आणि Vivo T1 4G असे स्मार्टफोन सादर केले आहेत. आता या सीरिजमध्ये आणखी एका मॉडेलचा समावेश होऊ शकतो. Vivo T2 स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून स्मार्टफोन महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लाँचपूर्वीच मिळाली आहे. कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नसली तरी हा फोन लवकरच बाजारात येईल, ही शक्यता नाकारता येत नाही.

Google Play Console लिस्टिंगमधून समजलं आहे की Vivo T2 चा मॉडेल नंबर V2222 असू शकतो. या लिस्टिंगमध्ये रेंडर देखील आहे परंतु तो फोनचा आहे की फक्त प्लेस होल्डर आहे हे स्पष्ट झालं नाही. या रेंडरमध्ये वॉटर ड्रॉप नॉच आणि नॅरो बेझल दिसत आहेत. सीरिज मधील जुन्या फोन प्रमाणे Vivo T2 चे देखील अनेक व्हर्जन ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. हे देखील वाचा: भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; रेडमी-रियलमीची लागणार का वाट?

Vivo T2 5G चे स्पेसिफिकेशन

गुगल प्ले लिस्टिंगनुसार आगामी Vivo T2 5G स्मार्टफोनमधील प्रोसेसरचा मॉडेल नंबर Qualcomm SM6375 असा आहे. याचा अर्थ असा की या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे कंपनीनं गेल्यावर्षीच्या Vivo T1 5G मध्ये देखील याच प्रोसेसरचा वापर केला होता. या चिपसेटमध्ये 2.2GHz चा क्लॉक स्पीड दिला जाऊ शकतो, जोडीला एड्रिनो 619 जीपीयू मिळू शकतो. फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज कंपनी देऊ शकते. आगामी विवो फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 सह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा; परवडणाऱ्या दरात दणकट फोन

गुगल प्ले लिस्टिंगनुसार विवो टी2 5जीमध्ये FHD+ डिस्प्ले देण्यात येईल ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल असू शकतं. सध्यातरी अपकमिंग Vivo T2 5G ची एवढीच माहिती उपलब्ध झाली आहे. आगामी काळात अजून माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. तसेच गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट झाल्यामुळे कंपनी लवकरच हा फोन टीज करू शकते आणि बाजारात लाँच करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here