Nokia X6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 20 Jul 2018 10:10:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया 6.1 प्लस झाला लॉन्च, नॉच डिस्प्ले वाला हा फोन लवकरच होईल भारतात उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-launched-in-global-market-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-launched-in-global-market-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 20 Jul 2018 10:10:34 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1348 नोकिया 6.1 प्लस नोकिया चा पहिला स्मार्टफोन आहे जो ग्लोबल मंचावर नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे.

The post नोकिया 6.1 प्लस झाला लॉन्च, नॉच डिस्प्ले वाला हा फोन लवकरच होईल भारतात उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने गेल्या आठवड्यात चीनी बाजारात आपल्या एक्स सीरीज ला पुढे नेत नोकिया एक्स5 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया एक्स5 कंपनी ने लॉन्च केलेला पहिला नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन नोकिया एक्स6 चा दुसरा वर्जन आहे. नोकिया एक्स6 अजूनतरी चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध होता, पण अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या फॅन्सना भेट देत कंपनी ने नोकिया एक्स6 ग्लोबली लॉन्च केला आहे. कंपनी ने नोकिया एक्स6 नोकिया 6.1 प्लस नावाने ग्लोबल मार्केट मध्ये आणला आहे.

नोकिया 6.1 प्लस नोकिया चा पहिला स्मार्टफोन आहे जो ग्लोबल मंचावर नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. हा फोन आज हाँगकाँग मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तिथे हा 2,888 हाँगकाँग डॉलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. ही किंमत भारतीय कंरसी नुसार जवळपास 20,000 रुपये आहे. हाँगकाँग मध्ये नोकिया 6.1 प्लस 24 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल. फोन च्या ग्लोबल लॉन्च नंतर नोकिया 6.1 प्लस लवकरच भारतात येईल याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 6.1 प्लस ची प्रमुख यूएसपी याचा नॉच डिस्प्ले आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम/32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम /64जीबी स्टोरेज च्या 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता पण ग्लोबल मंचावर कंपनी ने फक्त 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर केला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ग्लोबल मंचावर नोकिया 6.1 प्लस आल्यामुळे आता भारतीय फॅन्स फोन च्या इंडिया लॉन्च ची वाट बघत आहेत. आशा आहे की कंपनी लवकरच भारतात नोकिया 6.1 प्लस संबंधित घोषणा करेल.

The post नोकिया 6.1 प्लस झाला लॉन्च, नॉच डिस्प्ले वाला हा फोन लवकरच होईल भारतात उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-launched-in-global-market-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
19 जुलै ला ग्लोबली लॉन्च होईल नोकिया एक्स6, भारतीय बाजारात पण लवकरच येईल https://www.91mobiles.com/marathi/19-july-nokia-x6-global-launch-leak-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/19-july-nokia-x6-global-launch-leak-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 10 Jul 2018 08:33:45 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1212 हा फोन सध्या फक्त चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे पण येत्या 19 जुलै ला हा फोन ग्लोबली लॉन्च केला जाईल.

The post 19 जुलै ला ग्लोबली लॉन्च होईल नोकिया एक्स6, भारतीय बाजारात पण लवकरच येईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नोकिया आपल्या एक्स सीरीज मध्ये अजून एक डिवाईस आणत आहे आणि हा फोन 11 जुलै ला अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात येईल. आता सूचना मिळत आहे की नोकिया चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 पण ग्लोबल मार्केट मध्ये येणार आहे. हा फोन सध्या फक्त चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध आहे पण येत्या 19 जुलै ला हा फोन ग्लोबली लॉन्च केला जाईल.

विदेशी वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की एचएमडी ग्लोबल येत्या 19 जुलै ला नोकिया एक्स6 ग्लोबल मंचावर लॉन्च करणार आहे. ग्लोबल लॉन्च नंतर हा फोन भारता सह अन्य बाजारांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सेल साठी उपलब्ध होईल. काही दिवसांपूर्वी नोकिया च्या इंडियन वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला होता ज्यावर नोकिया एक्स6 स्मार्टफोन दाखवण्यात आला होता. हा वेबपेज समोर आल्या नंतर ही अपेक्षा होती की नोकिया एक्स6 लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो.

नोकिया एक्स6 कंपनी चा पहिला असा एंडरॉयड स्मार्टफोन आहे जो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया एक्स6 मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया एक्स6 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया एक्स6 तीन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 1,299 युआन (जवळपास 13,800 रुपये), 1,499 युआन (जवळपास 16,000 रुपये) तसेच 1,699 युआन (जवळपास 18,000 रुपये)आहे. तिन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. चीन मध्ये नोकिया एक्स6 ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post 19 जुलै ला ग्लोबली लॉन्च होईल नोकिया एक्स6, भारतीय बाजारात पण लवकरच येईल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/19-july-nokia-x6-global-launch-leak-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 08:49:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1187 विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे.

The post नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भरपुर दिवसांपासुन नोकिया ब्रांड च्या नवीन स्मार्टफोन बद्दल लीक्स समोर येत होते की, एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या अजून एका नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच तो टेक विश्वा समोर सादर करेल. आता नोकिया ने स्वतः हा फोन समोर आणत लॉन्च ची घोषणा केली आहे. नोकिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत सांगितले आहे की कंपनी येत्या 11 जुलै ला एक नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करणार आहे.

नोकिया ने हे स्पष्ट केले नाही की 11 जुलै ला ब्रांड चा पुढील फोन कोणत्या नावाने बाजारात येईल पण एवढे मात्र सांगितले आहे की हा फोन ‘नोकिया एक्स’ सीरीज चा दुसरा फोन असेल. बोलले जात आहे की हा फोन नोकिया 5एक्स किंवा मग नोकिया 5.1 प्लस नावाने लॉन्च होईल.

विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे. असे पण असू शकते की या फोन मध्ये 6-इंचाची स्क्रीन, 6जीबी रॅम सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 किंवा मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट मिळू शकतो. पण नोकिया ने या आगामी फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे वाट बघावी लागेल.

काही दिवसांपूर्वी नोकिया च्या ग्लोबल वेबसाइट तसेच कंपनी च्या इंडियन वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला होता ज्यात नोकिया एक्स6 स्मार्टफोन दाखवण्यात आला होता. हा वेबपेज समोर आल्या नंतर असे बोलले जात आहे की कंपनी नोकिया चा हा पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 लवकरच भारतात लॉन्च करू शकते.

The post नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला नोकिया चा पहिला नॉच डिसप्ले असलेला स्मार्टफोन नोकिया एक्स6, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह आहे स्टॉक एंडरॉयड https://www.91mobiles.com/marathi/nokia-x6-launched-with-notch-display-6gb-ram-dual-camera-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x6-launched-with-notch-display-6gb-ram-dual-camera-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 19:45:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=486 चीन मध्ये या फोन ची सुरवाती किंमत 1,299 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 13,800 रुपये आहे.

The post लॉन्च झाला नोकिया चा पहिला नॉच डिसप्ले असलेला स्मार्टफोन नोकिया एक्स6, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह आहे स्टॉक एंडरॉयड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने खुप काळानंतर आपला नवीन डिवाईस अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. नोकिया फॅन्सना भेट कंपनी ने नोकिया एक्स6 लॉन्च केला आहे. नोकिया ने हा फोन सध्यातरी चीनी बाजारात आणला आहे तिथे हा 3 वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. चीन मध्ये या फोन ची सुरवाती किंमत 1,299 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 13,800 रुपये आहे.

नोकिया एक्स6 कंपनी चा पहिला असा एंडरॉयड स्मार्टफोन आहे जो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया एक्स6 मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया एक्स6 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया एक्स6 तीन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 4जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. तिन्ही वेरिएंट्स ची किंमत क्रमश: 1,299 युआन (जवळपास 13,800 रुपये), 1,499 युआन (जवळपास 16,000 रुपये) तसेच 1,699 युआन (जवळपास 18,000 रुपये)आहे. तिन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. चीन मध्ये नोकिया एक्स6 ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post लॉन्च झाला नोकिया चा पहिला नॉच डिसप्ले असलेला स्मार्टफोन नोकिया एक्स6, 6जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह आहे स्टॉक एंडरॉयड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x6-launched-with-notch-display-6gb-ram-dual-camera-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
लॉन्च च्या आधी समोर आला नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स6 चा आॅफिशियल फोटो, 16 मे ला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/official-render-nokia-x6-shows-the-notch-display-rear-camera-setup-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/official-render-nokia-x6-shows-the-notch-display-rear-camera-setup-design-in-marathi/#respond Tue, 08 May 2018 14:23:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=354 नोकिया एक्स6 चा हा आॅफिशियल फोटो एका कँपेन च्या माध्यमातून समोर आला आहे.

The post लॉन्च च्या आधी समोर आला नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स6 चा आॅफिशियल फोटो, 16 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया कडून बातमी आली होती की ब्रांड चे मालकी हक्क असणारी फिनलँड ची कंपनी एचएमडी ग्लोबल एक हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वर काम करत आहे जो नोकिया एक्स6 नावाने लॉन्च केला जाईल. नो​किया एक्स6 16 मे ला चीन मध्ये सादर करण्यात येईल त्यानंतर येणार्‍या आठवड्यांमध्ये हा भारता सह जगातील इतर बाजारांमध्ये लॉन्च होईल. पण आता नोकिया एक्स6 च्या लॉन्च च्या आधी या फोन चा आॅफिशियल फोटो समोर आला आहे. नोकिया एक्स6 चा फोटो समोर आल्याने हे समजले आहे की कंपनी हा फोन अॅप्पल आयफोन सारख्या बेजल लेस नॉच डिसप्ले वर सादर करेल.

नोकिया एक्स6 चा हा आॅफिशियल फोटो एका कँपेन च्या माध्यमातून समोर आला आहे. हा फोन 16 मे ला चीन मध्ये लॉन्च होणार आहे. नोकिया एक्स6 च्या लॉन्च च्या आधी कंपनी ने चीनी रिटेल पार्टनर सोबत मिळून एक कँपेन सुरू केली आहे, ज्यात फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना कंपनी कडून बक्षीसा सह नोकिया एक्स6 पण मोफत दिला जात आहे. एचएमडी ग्लोबल च्या या कँपेन मध्ये नोकिया च्या आगामी स्मार्टफोन चा फोटो वापरण्यात आला आहे आणि त्यातून आम्हाला या फोन च्या डिजाईन व लुक ची माहिती मिळाली आहे.

नोकिया एक्स6 ला कंपनी ने 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस नॉच डिसप्ले वर बनवले आहे. हा फोन 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.8-इंचाच्या फुल एचडी+ डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. कंपनी नोकिया एक्स6 चे दोन वेरिएंट सादर करू शकते. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट दिला जाईल तर दूसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालेल. नोकिया एक्स6 चे हे दोन्ही वेरिएंट एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असतील. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चा डुअल रियर कॅमेरा दाखविण्यात आला आहे जो 12 मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर सह येतो. कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 5 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा असण्याचा लीक समोर आला आहे. कंपनी कडून नोकिया एक्स6 ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर समोर आलेल्या फोटो मध्ये हा फोन ग्लास बॅक पॅनल वर बनलेला दिसत आहे.

नोकिया एक्स6 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमती साठी आता 16 मे ची वाट बघावी लागेल. तसेच हा फोन भारतात उपलब्ध होईल की नाही याबद्दल काही बोलणे आता घाईचे ठरेल. विशेष म्हणजे टेक जगामध्ये 16 मे ला नोकिया एक्स6 च्या लॉन्च व्यतिरिक्त भारतात 15 मे ला आॅनर 10 आणि 17 मे ला वनप्लस 6 स्मार्टफोन पण लॉन्च होत आहे. या स्मार्टफोन्स चे अपडेट तुम्हाला आमच्या वेबसाइट मिळत राहतील.

The post लॉन्च च्या आधी समोर आला नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स6 चा आॅफिशियल फोटो, 16 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/official-render-nokia-x6-shows-the-notch-display-rear-camera-setup-design-in-marathi/feed/ 0
नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स चा वीडियो झाला लीक, 16 मे ला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-x-hands-on-video-leak-display-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x-hands-on-video-leak-display-design-in-marathi/#respond Thu, 03 May 2018 09:57:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=248 वीडियो नुसार नोकिया एक्स च्या बॅक पॅनल वर कार्ल जेसिस चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

The post नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स चा वीडियो झाला लीक, 16 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया मोबाईल ने काही दिवसांपूर्वीच माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून सांगितले होते की कंपनी येणार्‍या 16 मे ला आपला आगामी नॉच डिसप्ले वाला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया एक्स सादर करणार आहे. हा फोन जागतिक बाजारात नोकिया एक्स किंवा मग नोकिया एक्स6 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनी ने फोन ची स्पेसिफिकेशन व किंमती बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु फोन च्या अधिकृत लॉन्च च्या आधी याचा एक वीडियो समोर आला आहे. या वीडियो मधून फोन च्या डिजाईन व डिसप्ले ची माहिती मिळाली आहे.

नोकिया एक्स चा हा वीडियो स्लॅशलीक ने आपल्या यूट्यब चॅनल वर शेयर केला आहे. हा वीडियो 13 सेकंदाचा आहे ज्यात फोन हातात घेऊन दाखविण्यात आला आहे. हा फोन आॅन आहे तसेच याचा फ्रंट, साईड व बॅक पॅनल वीडियो मध्ये कॅप्चर करण्यात आले आहेत. फोन च्या डिसप्ले वर 16 मे तारीख लिहिण्यात आली आहे ज्यादिवशी फोन पहिल्यांदा टेक जगासमोर सादर केला जाईल.

वीडियो नुसार नोकिया एक्स च्या बॅक पॅनल वर कार्ल जेसिस चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप सह एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे ज्याच्या खाली नीचे फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. नोकिया एक्स फुल बेजल लेस डिसप्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याचे किनारे कर्व्ड आहेत. फोन च्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बारीक बेजल आहे ज्यावर ‘नोकिया’ लिहले आहे. तसेच फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर की आहे.

नोकिया एक्स बद्दल आलेल्या लीक्स नुसार हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल. लीक नुसार हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च होईल. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम असेल आणि मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम असेल आणि क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल.

4जीबी रॅम वेरिएंट मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच 6जीबी रॅम वाल्या वेरिएंट मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये 12-मेगापिक्सल आणि 13-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो. पण नोकिया एक्स च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

The post नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स चा वीडियो झाला लीक, 16 मे ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x-hands-on-video-leak-display-design-in-marathi/feed/ 0
16 मे ला लॉन्च होत आहे नोकिया चा नॉच डिसप्ले वाला दमदार फोन नोकिया एक्स/एक्स6 https://www.91mobiles.com/marathi/nokia-x-aka-nokia-x6-might-launch-on-16-may-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x-aka-nokia-x6-might-launch-on-16-may-in-marathi/#respond Mon, 30 Apr 2018 11:47:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=167 नोकिया मोबाईल ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात नोकिया एक्स च्या लॉन्च ची माहिती देण्यात आली आहे.

The post 16 मे ला लॉन्च होत आहे नोकिया चा नॉच डिसप्ले वाला दमदार फोन नोकिया एक्स/एक्स6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
दोन आठवड्यांपूर्वी चीन मधील मल्टीप्लेक्स मध्ये लागलेल्या बिलबोर्ड वर नोकिया च्या नवीन स्मार्टफोनचे फोटो दिसले होते. फोटो वरून समजले की हा नोकिया कडून लॉन्च करण्यात येणारा नवीन स्मार्टफोन ‘नोकिया एक्स’ आहे ज्यात नॉच डिसप्ले आहे. काही काळातच हा फोटो इंटरनेट वर वायरल झाला होता. तसेच आज पुन्हा ‘नोकिया एक्स’ ची चर्चा टेक बाजारात सुरू झाली आहे. यावेळी स्वतः कंपनी ने या फोनची माहिती दिली आहे आणि नोकिया एक्स च्या लॉन्च डेट वरून पडदा हटवला आहे.

नोकिया मोबाईल ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट शेयर केली आहे ज्यात नोकिया एक्स च्या लॉन्च ची माहिती देण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की नोकिया आपला नॉच डिसप्ले वाला आगामी स्मार्टफोन 16 मे ला सादर करणार आहे. हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात नोकिया एक्स किंवा नोकिया एक्स6 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनी ने फोन च्या स्पेसिफिकेशन्स वरून पडदा हटवला नाही. परंतु हे नक्की की हा फोन अॅप्पल आयफोन 10 प्रमाणे नॉच डिसप्ले वर लॉन्च होईल.

नोकिया एक्स/एक्स6 बद्दल आता पर्यंत समोर आलेले लीक्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ नॉच डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन स्टॉक एंडरॉयड आधारित असू शकतो सोबतच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 किंवा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम व 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल.

नोकिया एक्स/एक्स6 मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. सांगण्यात येत आहे की फोन च्या बॅक पॅनल वर लेईका चा डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. पण एचएमडी ग्लोबल कडून आता पर्यंत या फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची कोणतीच माहिती देण्यात आली नाही, त्यामुळे कंपनी च्या 16 मे ला होणार्‍या अधिकृत घोषणे कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post 16 मे ला लॉन्च होत आहे नोकिया चा नॉच डिसप्ले वाला दमदार फोन नोकिया एक्स/एक्स6 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x-aka-nokia-x6-might-launch-on-16-may-in-marathi/feed/ 0
आता नोकिया घेऊन येत आहे कमी बजेट मध्ये नॉच स्क्रीन आणि डुअल कॅमेरा वाला फोन, 27 एप्रिल ला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-x6-to-launch-on-27th-april-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x6-to-launch-on-27th-april-price-specification-and-features-in-marathi/#respond Wed, 25 Apr 2018 11:52:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=93 नोकिया एक्स6 मध्ये 5.8-इंचाचा 19:9 आसपेक्ट रेशियो वाला फुल एचडी+ स्क्रीन मिळेल.

The post आता नोकिया घेऊन येत आहे कमी बजेट मध्ये नॉच स्क्रीन आणि डुअल कॅमेरा वाला फोन, 27 एप्रिल ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नोकिया फोन चे मालकी हक्क असलेली कंपनी एचएमडी ग्लोबल लवकरच नोकिया एक्स फोन लॉन्च करू शकते. आता नवीन बातमी समोर आली आहे. मिळालेल्या सूचनेनुसार नोकिया एक्स फोन 27 एप्रिलला चीन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष बाब ही आहे की आधी बोलेल जात होते की हा एक महाग फोन असेल पण आता समोर येत आहे की हा एक माध्यम बजेट फोन असेल. त्याचबरोबर याचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन पण समोर आले आहेत.

सर्वात आधी फोन अरीना ने एका चीनी वेबसाइट च्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. माहिती नुसार एचएमडी ग्लोबल कडून नोकिया एक्स6 नावाने हा फोन लॉन्च केला जाईल. यात तुम्हाला नॉच स्क्रीन वाला बेजल लेस डिसप्ले मिळेल. माहितीनुसार 27 एप्रिलला कंपनी चीन मध्ये हा फोन लॉन्च करणार आहे.

नोकिया एक्स6 मध्ये 5.8-इंचाचा 19:9 आसपेक्ट रेशियो वाला फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. तर मागच्या पॅनल मध्ये नोकिया 7 प्लस प्रमाणे डुअल कॅमेरा दिला जाऊ शकतो. अन्य स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 6जीबी रॅम असण्याची शक्यता आहे. बातमीनुसार हा हेलियो पी60 चिपसेट वर पण सादर केला जाऊ शकतो आणि त्या मॉडेल मध्ये 4जीबी रॅम असेल.

नोकिया एक्स6 मध्ये तुम्हाला 2 गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल आणि हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित असेल. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 13-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. चांगल्या फोटोग्राफी साठी कंपनी यात कार्लजीज लेंस देऊ शकते. तर सेकेंडरी कॅमेरा 13-मेगापिक्सल चा दिला जाण्याची शक्यता आहे.

दिलेल्या माहितीनुसार डुअल सिम आधारित या फोन मध्ये एक नॅनो सिम चा वापर केला जाऊ शकतो तर यातील एक स्लॉट हाईब्रीड असेल. जिथे तुम्ही सिम किंवा मेमरी कार्ड पैकी एक वापरू शकाल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. तर कनेक्टिविटी साठी यूएसबी टाइप मिळेल.

The post आता नोकिया घेऊन येत आहे कमी बजेट मध्ये नॉच स्क्रीन आणि डुअल कॅमेरा वाला फोन, 27 एप्रिल ला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x6-to-launch-on-27th-april-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0