नोकिया 6.1 प्लस झाला लॉन्च, नॉच डिस्प्ले वाला हा फोन लवकरच होईल भारतात उपलब्ध

नोकिया ने गेल्या आठवड्यात चीनी बाजारात आपल्या एक्स सीरीज ला पुढे नेत नोकिया एक्स5 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया एक्स5 कंपनी ने लॉन्च केलेला पहिला नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन नोकिया एक्स6 चा दुसरा वर्जन आहे. नोकिया एक्स6 अजूनतरी चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध होता, पण अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या फॅन्सना भेट देत कंपनी ने नोकिया एक्स6 ग्लोबली लॉन्च केला आहे. कंपनी ने नोकिया एक्स6 नोकिया 6.1 प्लस नावाने ग्लोबल मार्केट मध्ये आणला आहे.

नोकिया 6.1 प्लस नोकिया चा पहिला स्मार्टफोन आहे जो ग्लोबल मंचावर नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. हा फोन आज हाँगकाँग मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तिथे हा 2,888 हाँगकाँग डॉलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. ही किंमत भारतीय कंरसी नुसार जवळपास 20,000 रुपये आहे. हाँगकाँग मध्ये नोकिया 6.1 प्लस 24 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल. फोन च्या ग्लोबल लॉन्च नंतर नोकिया 6.1 प्लस लवकरच भारतात येईल याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 6.1 प्लस ची प्रमुख यूएसपी याचा नॉच डिस्प्ले आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. चीन मध्ये हा फोन 4जीबी रॅम/32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम/64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम /64जीबी स्टोरेज च्या 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता पण ग्लोबल मंचावर कंपनी ने फक्त 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर केला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ग्लोबल मंचावर नोकिया 6.1 प्लस आल्यामुळे आता भारतीय फॅन्स फोन च्या इंडिया लॉन्च ची वाट बघत आहेत. आशा आहे की कंपनी लवकरच भारतात नोकिया 6.1 प्लस संबंधित घोषणा करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here