OnePlus 10T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:02:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 10T 5G वर 5,000 रुपयांचा बँक डिस्काउंट; पाहा ऑफर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-smartphone-discount-of-more-than-rs-15000-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-smartphone-discount-of-more-than-rs-15000-check-details/#respond Fri, 16 Dec 2022 04:07:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16045 OnePlus सध्या चीनमध्ये आपला नववा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने कंपनीची आगामी फ्लॅगशिप OnePlus 11 series लवकरच सादर केली जाऊ शकते. तिकडे नव्या सीरिजची तयारी सुरु असताना भारतात वनप्लसच्या जुन्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या OnePlus 10T 5G वर दमदार डील मिळत आहे. अ‍ॅमेझॉनवर सध्या वनप्लस कम्यूनिटी सेल सुरु आहे. […]

The post OnePlus 10T 5G वर 5,000 रुपयांचा बँक डिस्काउंट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus सध्या चीनमध्ये आपला नववा वर्धापनदिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने कंपनीची आगामी फ्लॅगशिप OnePlus 11 series लवकरच सादर केली जाऊ शकते. तिकडे नव्या सीरिजची तयारी सुरु असताना भारतात वनप्लसच्या जुन्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या OnePlus 10T 5G वर दमदार डील मिळत आहे. अ‍ॅमेझॉनवर सध्या वनप्लस कम्यूनिटी सेल सुरु आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट मिळून एकूण 15000 हजारांची सूट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला या ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे.

OnePlus 10T 5G वरील ऑफर

OnePlus 10T 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 49,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 5000 रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 10,000 रुपयांपर्यंतची आणखी बचत करू शकता. म्हणजे या फोनवर एकूण 15,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटसह जुन्या फोनची व्हॅल्यू इतका अतिरिक्त डिस्काउंट देखील दिला जात आहे. जो तुमच्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबुन असेल. अशाप्रकारे या फोनवर 15,000 रुपयांपेक्षा जास्तीचा डिस्काउंट मिळेल आणि वनप्लसचा हा फोन 34,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा होईल. हे देखील वाचा: How To Youtube Shorts Videos: पाहा युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ डाउनलोड करण्याच्या सर्वात सोप्या ट्रिक्स

OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-इंच Full-HD+ AMOLED पॅनल, 120Hz रिफ्रेश रेट
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर
  • 16GB पर्यंत RAM, 256GB स्टोरेज
  • Android 12 आधारित Oxygen OS 12.1
  • 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 16MP फ्रंट कॅमेरा
  • 4,800mAh बॅटरी, 150W चार्जिंग

OnePlus 10T मध्ये कंपनीनं 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 950 nits पीक ब्राईटनेस, 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20.1:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. HDR10+ सर्टिफाईड डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

OnePlus 10T मध्ये लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. जो Snapdragon 8 Gen 1 चिपसेट पेक्षा जास्त वेगवान आणि कार्यक्षम आहे. सोबतीला या फ्लॅगशिप वनप्लसमध्ये 16GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 two-lane storage2 देण्यात आली आहे. हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो OnePlus 10T ला कंपनी तीन प्रमुख OS अपडेट आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देणार आहे.

OnePlus 10T च्या बॅक पॅनलवर ड्युअल एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करतो. तर f/2.2 अपर्चर असलेला 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात f/2.2 अपर्चरसह 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: BSNL दमदार प्लॅन! 211 टीव्ही चॅनेल आणि 300GB पेक्षा जास्त डेटा अगदी मोफत

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 आणि 5जी सेल्युलर नेटवर्क मिळतं. 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी मिळते. फोनच्या बॉक्समध्ये एक 160W चा चार्जर मिळेल, जो OnePlus नुसार OnePlus 10T स्मार्टफोनला 19 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल.

The post OnePlus 10T 5G वर 5,000 रुपयांचा बँक डिस्काउंट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-smartphone-discount-of-more-than-rs-15000-check-details/feed/ 0
OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-vs-iqoo-9t-india-launch-price-specifications-feature-sale-offer-compared-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-vs-iqoo-9t-india-launch-price-specifications-feature-sale-offer-compared-in-marathi/#respond Fri, 05 Aug 2022 06:56:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12014 हा आठवत भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी शानदार आहे. तीन दिवसांत दोन तगडे फोन भारतात लाँच झाले आहेत. आधी iQOO 9T नं बाजारात पाऊल टाकले आणि त्यानंतर OnePlus 10T देखील बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 आणि हायएंड स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील एखादा शक्तिशाली स्मार्टफोन […]

The post OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हा आठवत भारतीय स्मार्टफोन बाजारासाठी शानदार आहे. तीन दिवसांत दोन तगडे फोन भारतात लाँच झाले आहेत. आधी iQOO 9T नं बाजारात पाऊल टाकले आणि त्यानंतर OnePlus 10T देखील बाजारात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 आणि हायएंड स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील एखादा शक्तिशाली स्मार्टफोन विकत घेण्याचं नियोजन करत असाल तर आयकू 9टी तसेच वनप्लस 10टी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. आयकू 9टी आणि वनप्लस 10टी दोन्ही 49,999 रुपयांमध्ये लाँच झाले आहेत. त्यामुळे यापैकी कोणता फोन 50 हजार रुपयांच्या किंमतीला न्याय देतो ते जाणून घेऊया. पुढे आम्ही दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनवर आधारीत एक छोटीशी तुलना केली आहे ज्यामुळे तुम्हाला या फोन्सची चांगली माहिती मिळेल.

OnePlus 10T vs iQOO 9T: Display

वनप्लस 10टी स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 950निट्स ब्राईटनेस आणि 1000हर्ट्ज टच रिस्पांस रेटला सपोर्ट करते. आयकू 9टी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा फोन डिस्प्ले एचडीआर10+ सारख्या फीचर्ससह येतो तसेच कोर्निंग गोरिल्ला ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Processor

वनप्लस 10टी आणि आयकू 9टी दोन्ही मोबाईल फोन अँड्रॉइड ओएस 12 वर लाँच झाले आहेत ज्यात प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो तर आयकू मोबाईलमध्ये ओरिजन ओशियन ओएस देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 ला सपोर्ट करतात.

OnePlus 10T vs iQOO 9T: Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10टी च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स766 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. आयकू 9टी देखील ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल सॅमसंग जीएन5 प्रायमरी सेन्सरसह 13एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12एमपी पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Battery

शक्तिशाली स्पेसिफिकेशन्ससह या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी देखील आहे. आयकू 9टी स्मार्टफोन 4,700एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तर दुसरीकडे वनप्लस 10टी स्मार्टफोन 4,800एमएएच बॅटरीवला सपोर्ट करतो जी 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आली आहे.

OnePlus 10T vs iQOO 9T: Price

OnePlus 10T

8GB RAM + 128GB Storage = 49,999

12GB RAM + 256GB Storage = 54,999

16GB RAM + 256GB Storage = 59,999

iQOO 9T

8GB RAM + 128GB Storage = 49,999

12GB RAM + 256GB Storage = 54,999

The post OnePlus 10T vs iQOO 9T: 50 हजारांच्या बजेटमध्ये कोणता आहे बेस्ट ऑप्शन? पाहा स्पेसिफिकेशन्सची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-vs-iqoo-9t-india-launch-price-specifications-feature-sale-offer-compared-in-marathi/feed/ 0
16GB RAM सह बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला दणकट OnePlus 10T 5G, सर्वांची होणार सुट्टी! https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-16gb-ram-oneplus-10t-5g-phone-launch-india-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-16gb-ram-oneplus-10t-5g-phone-launch-india-price-sale/#respond Thu, 04 Aug 2022 05:57:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11963 OnePlus 10T शानदार डिजाइन आणि फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. किंमती आणि स्पेसिफिकेशन अलीकडेच आलेल्या iQOO 9T ला थेट टक्कर देतात.

The post 16GB RAM सह बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला दणकट OnePlus 10T 5G, सर्वांची होणार सुट्टी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर OnePlus चा नवीन स्मार्टफोन OnePlus 10T भारतीय बाजारासह जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. न्यूयॉर्क मध्ये आयोजित एका लाँच इव्हेंटच्या माध्यमातून T-सीरीजमध्ये हा नवीन आणि दमदार फोन लाँच करण्यात आला आहे. OnePlus 10T मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट, 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट, नाईटस्केप 2.0, 120Hz Fluid अ‍ॅमोलेड डिस्प्ले, HyperBoot Gaming Engine 3.0, आणि 3.D कूलिंग सिस्टम असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

OnePlus 10T ची डिजाइन आणि बॉक्स कंटेंट

OnePlus 10T मध्ये कंपनीनं 360-degree antenna design चा वापर केला आहे. फोनच्या फ्रटला पंच-होल कटआउट आहे. तसेच तिन्ही कडा बेजल लेस आहेत, तर बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. मागच्या बाजूस Hasselblad ब्रँडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॉटमला टाईप सी पोर्ट व स्पिकर ग्रिल आहे. सुरक्षेसाठी OnePlus 10T मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं.

OnePlus 10T च्या बॉक्समध्ये या फोनसह 160W SUPERVOOC Power Adapter आणि Type-C Cable मिळेल. तसेच एक क्विक स्टार्ट गाईड, वेलकम लेटर, सेफ्टी इनफोर्मेशन व वॉरंटी कार्ड, स्क्रीन प्रोटेक्टर (pre-applied), प्रोटेक्टिव्ह केस आणि सिम ट्रे इजेक्टर देखील मिळतो.

OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स व फीचर्स

डिस्प्ले: OnePlus 10T मध्ये कंपनीनं 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 950 nits पीक ब्राईटनेस, 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20.1:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. HDR10+ सर्टिफाईड डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

प्रोसेसिंग पावर: OnePlus 10T मध्ये लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. जो Snapdragon 8 Gen 1 चिपसेट पेक्षा जास्त वेगवान आणि कार्यक्षम आहे. सोबतीला या फ्लॅगशिप वनप्लसमध्ये 16GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 two-lane storage2 देण्यात आली आहे.

कॅमेरा: OnePlus 10T च्या बॅक पॅनलवर ड्युअल एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करतो. तर f/2.2 अपर्चर असलेला 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात f/2.2 अपर्चरसह 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो.

बॅटरी: 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी मिळते. फोनच्या बॉक्समध्ये एक 160W चा चार्जर मिळेल, जो OnePlus नुसार OnePlus 10T स्मार्टफोनला 19 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल.

ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिव्हिटी फीचर: कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 आणि 5जी सेल्युलर नेटवर्क मिळतं. ड्युअल-स्टीरियोसह येणारा हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो OnePlus 10T ला कंपनी तीन प्रमुख OS अपडेट आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देणार आहे.

OnePlus 10T ची किंमत आणि लाँच ऑफर्स

भारतात OnePlus 10T ची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन 6 ऑगस्टपासून Amazon आणि OnePlus च्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेता येईल. फोनचे मूनस्टोन ब्लॅक आणि झेड ग्रीन कलर व्हेरिएंट आले आहेत. डिवाइसच्या 8GB/128GB व्हेरिएटची किंमत 49,999 रुपये, 12GB/256GB ची किंमत 54,999 रुपये आणि 16GB/256GB ची किंमत 59,999 रुपये आहे. OnePlus 10T को ICICI आणि SBI च्या कार्डनं विकत घेतल्यास युजर्सना 5,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

The post 16GB RAM सह बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी आला दणकट OnePlus 10T 5G, सर्वांची होणार सुट्टी! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-16gb-ram-oneplus-10t-5g-phone-launch-india-price-sale/feed/ 0
शक्तिशाली OnePlus 10T 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स आले समोर; लाँचपूर्वी डिजाइन देखील लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-specifications-and-design-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-specifications-and-design-leaked/#respond Wed, 27 Jul 2022 05:58:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11735 OnePlus 10T 5G स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होईल.

The post शक्तिशाली OnePlus 10T 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स आले समोर; लाँचपूर्वी डिजाइन देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 10T 5G स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. प्राईसबाबा आणि पॉपुलर टिपस्टर इशान अग्रवालनं वनप्लसच्या आगामी स्मार्टफोन OnePlus 10T 5G च्या भारतीय व्हेरिएंटचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. त्याचबरोबर वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनचे झेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक कलर व्हेरिएंटचे अधिकृत प्रेस रेंडर देखील समोर आले आहेत. या रेंडर्समधून स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे, हा फोन OnePlus 10 Pro सारखा दिसतो. परंतु यात आयकॉनिक अलर्ट स्लायडर दिसत नाही तसेच Hassleblad सोबतची भागेदारी देखील रद्द करण्यात आली आहे. OnePlus 10T 5G स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे. या दिवशी कंपनी चीनमध्ये OnePlus Ace Pro लाँच करेल, त्यामुळे Ace Pro आणि 10T चे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असण्याची शक्यता आहे.

OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचं रिजोल्यूशन Full HD+ (2,412 x 1080 पिक्सल) असेल. हा फोन 10-बिट कलर, sRGB कलर गमुट आणि HDR10+ ला सपोर्ट करेल. वनप्लसच्या या फोनमध्ये पंच होल कटआउट मिळेल, ज्यात 16MP चा सेल्फी कॅमेरा असेल. हा कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायजेशन (EIS) ला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. OnePlus 10T 5G स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन OIS ला सपोर्ट करेल. फोनमध्ये 8MP चा अल्ट्रावाईड अँगल कॅमेरा आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळेल.

हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालेल. रिपोर्ट्सनुसार वनप्लसचा हा फोन 16GB रॅमसह येईल. तसेच 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेजचे ऑप्शन देखील बाजारात येतील. हा फोन OxygenOS 13 वर चालेल जो Android 12 OS वर बेस्ड असेल.

OnePlus 10T 5G स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनचे रेंडर्सवरून असे दिसत आहे की कंपनी यात अलर्ट स्लायडर देणार नाही. तसेच फोनच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये Hasselblad ची ब्रँडिंग देखील दिसत नाही. बाकी डिजाईन OnePlus 10 Pro सारखी दिसत आहे. हे देखील वाचा: कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

OnePlus 10T 5G ची किंमत

OnePlus 10T 5G स्मार्टफोन भारतात 49,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. हा फोन बँक ऑफर्ससह भारतात 48,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. वनप्लसच्या या फोनची विक्री भारतात 6 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुरु होईल.

The post शक्तिशाली OnePlus 10T 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स आले समोर; लाँचपूर्वी डिजाइन देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-5g-specifications-and-design-leaked/feed/ 0
येतोय OnePlus चा सर्वात पावरफुल 5G फोन; ‘या’ दिवशी सुरु होणार प्री-ऑर्डर, भारतीय किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-pre-orders-will-start-in-india-from-august-3/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-pre-orders-will-start-in-india-from-august-3/#respond Fri, 22 Jul 2022 06:01:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11607 OnePlus 10T 5G क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येणारा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन आहे.

The post येतोय OnePlus चा सर्वात पावरफुल 5G फोन; ‘या’ दिवशी सुरु होणार प्री-ऑर्डर, भारतीय किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus नं कंफर्म केलं आहे की कंपनी आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T 5G जागतिक बाजारासह भारतात देखील लाँच करार आहे. आता बातमी आली आहे की हा फोन 3 ऑगस्टला लाँच होणार आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon.in आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. वनप्लसच्या 3 ऑगस्टच्या लाँच इव्हेंटची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होईल, जो कंपनीच्या YouTube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

OnePlus 10T स्मार्टफोन लाँचपूर्वीच अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. लिस्टिंगनुसार भारतात या फोनची प्री बुकिंग लाँचच्या दिवशीच सुरु होईल. म्हणजे OnePlus 10T स्मार्टफोन भारतात 3 ऑगस्टपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. लाँच इव्हेंट आटोपताच या फोनचे प्री ऑर्डर घेण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. लीक रिपोर्ट्सनुसार वनप्लसचा हा फोन लाँचनंतर एक आठवड्यांनी विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus 10T चे कलर आणि स्टोरेज व्हेरिएंट

टिपस्टर मुकुल शर्मानं सांगितलं आहे की आगामी OnePlus 10T 5G स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह मूनस्टोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. लीक रिपोर्ट्सनुसार, हा फोन 8/12GB RAM ऑप्शन आणि 512GB पर्यंत इंटरनलस्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. तसेच वनप्लसचा हा फोन मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

OnePlus 10T ची संभाव्य किंमत

OnePlus 10T स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 799 यूरो (सुमारे 65,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय किंमत 50 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. वनप्लसच्या या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, यूएसबी केबल, फोन केस आणि सिम इजेक्टर टूल दिला जाईल.

OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 10टी 5जी फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.7-inch Fluid AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईल फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असण्याची बातमी आली आहे. जो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉमचा चिपसेट असेल. हे देखील वाचा: वनप्लस-शाओमीला छोट्याश्या ब्रँड कडून आव्हान; दणकट प्रोसेसरसह सर्वात पहिल्या फोनची भारतात एंट्री

फोटोग्राफीसाठी OnePlus 10T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50MP IMX766 प्रायमरी सेन्सरसह 8MP ultrawide आणि 2MP macro लेन्सचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाईल फोन 16MP Selfie कॅमेऱ्यासह येईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 150W fast charging सपोर्ट असलेली 4,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post येतोय OnePlus चा सर्वात पावरफुल 5G फोन; ‘या’ दिवशी सुरु होणार प्री-ऑर्डर, भारतीय किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-10t-pre-orders-will-start-in-india-from-august-3/feed/ 0
आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली OnePlus ची लाँच डेट समजली; जाणून घ्या OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/3-august-could-be-the-india-launch-date-of-oneplus-10t-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/3-august-could-be-the-india-launch-date-of-oneplus-10t-5g-phone/#respond Tue, 19 Jul 2022 13:38:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11551 OnePlus बद्दल गेले कित्येक दिवस चर्चेत राहिली आहे, कंपनी आपल्या नंबर सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो OnePlus 10T 5G नावानं लाँच होईल. OnePlus 10 series मध्ये येणाऱ्या मोबाईल फोनबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या लुक, डिजाईन व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आता ताज्या लीकनुसार, OnePlus 10T […]

The post आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली OnePlus ची लाँच डेट समजली; जाणून घ्या OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus बद्दल गेले कित्येक दिवस चर्चेत राहिली आहे, कंपनी आपल्या नंबर सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो OnePlus 10T 5G नावानं लाँच होईल. OnePlus 10 series मध्ये येणाऱ्या मोबाईल फोनबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या लुक, डिजाईन व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आता ताज्या लीकनुसार, OnePlus 10T 5G स्मार्टफोनच्या इंडिया लाँच डेटचा देखील खुलासा झाला आहे. बातमीनुसार वनप्लस 10टी 5जी फोन 3 ऑगस्टला भारतात लाँच होईल.

OnePlus 10T 5G चा भारतीय लाँच

वनप्लस 10टी 5जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती देखील सध्या लीकच्या माध्यमातूनच समोर आली आहे. मोबाईलस्टॉक नावाच्या वेबसाईटनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की वनप्लस कंपनी येत्या 3 ऑगस्टला भारतात एक मोठ्या इव्हेंटचं आयोजन करेल आणि या इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 10T 5G फोन भारतीय बाजारात येईल. कंपनीनं आतापर्यंत वनप्लस 10टी 5जी फोनबद्दल अधिकृत घोषणा केली नाही परंतु आशा आहे की कंपनी लवकरच ऑफिशियल लाँच डेटची घोषणा करेल.

OnePlus 10T 5G बद्दल बोलले जात आहे की भारतीय बाजारात हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये एंट्री घेईल. यातील सर्वात छोट्या मॉडेलमध्ये 8GB RAM व 128GB Storage देण्यात येईल. तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 12GB RAM व 256GB Storage तसेच सर्वात मोठ्या वनप्लस 10टी 5जी मॉडेलमध्ये 16GB RAM + 512GB Storage देण्यात येईल. असं सांगण्यात आलं आहे की वनप्लस 10टी 5जी फोन Moonstone Black आणि Jade Green कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 10टी 5जी फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.7-inch Fluid AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईल फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असण्याची बातमी आली आहे. जो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉमचा चिपसेट असेल.

फोटोग्राफीसाठी OnePlus 10T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50MP IMX766 प्रायमरी सेन्सरसह 8MP ultrawide आणि 2MP macro लेन्सचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाईल फोन 16MP Selfie कॅमेऱ्यासह येईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 150W fast charging सपोर्ट असलेली 4,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

OnePlus 10T ची संभाव्य किंमत

OnePlus 10T स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 799 यूरो (सुमारे 65,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच कंपनी हा डिवाइस मूनस्टोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करू शकते. वनप्लसच्या या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, यूएसबी केबल, फोन केस आणि सिम इजेक्टर टूल दिला जाईल. OnePlus 10T स्मार्टफोन पुढील महिन्यात अर्थात ऑगस्टमध्ये भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.

The post आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली OnePlus ची लाँच डेट समजली; जाणून घ्या OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/3-august-could-be-the-india-launch-date-of-oneplus-10t-5g-phone/feed/ 0
शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-may-launch-a-powerful-smartphone-with-16gb-ram-and-snapdragon-8-plus-gen-1/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-may-launch-a-powerful-smartphone-with-16gb-ram-and-snapdragon-8-plus-gen-1/#respond Tue, 12 Jul 2022 06:35:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11307 OnePlus 10T स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात सादर केला जाऊ शकतो.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus यंदा भारतात 6 स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीनं भारतात आपल्या नॉर्ड सीरिजमध्ये काही हँडसेट सादर केले आहेत, तसेच फ्लॅगशिप वनप्लस 10 सीरिजचा देखील विस्तार केला आहे. आणि आता लवकरच आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. OnePlus 8T नंतर कंपनीनं T सीरीजमध्ये कोणताही स्मार्टफोन लाँच केलेला नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार OnePlus 10T लाँच करण्याची तयारी सुरु आहे. आगामी वनप्लस भारतात ऑगस्टमध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

प्रसिद्ध टिपस्टर DigitalChatStation नं आगामी OnePlus 10T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. त्यानुसार, स्मार्टफोनमध्ये 16GB LPDDR5 RAM चा ऑप्शन दिला जाईल, जो वनप्लसचा सर्वात जास्त रॅम असलेला स्मार्टफोन असेल. वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनचा हा व्हेरिएंट AnTuTu बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर स्पॉट करण्यात आला आहे, ज्याने 1131151 बेंचमार्क पॉइन्ट्स मिळवून शानदार कामगिरी केली आहे. हा फोन 8GB आणि 12GB रॅमच्या मॉडेलसह देखील सादर केला जाईल.

OnePlus 10T ची संभाव्य किंमत

OnePlus 10T स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 799 यूरो (सुमारे 65,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच कंपनी हा डिवाइस मूनस्टोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करू शकते. वनप्लसच्या या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, यूएसबी केबल, फोन केस आणि सिम इजेक्टर टूल दिला जाईल. OnePlus 10T स्मार्टफोन पुढील महिन्यात अर्थात ऑगस्टमध्ये भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.

OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर
  • 12GB पर्यंत RAM, 256GB स्टोरेज
  • Android 12 OS
  • 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा 16MP सेल्फी कॅमेरा
  • 4800mAh बॅटरी, 150W फास्ट चार्जिंग

OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120H रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. तसेच यात HDR10+, RGB आणि डिस्प्ले P3 कलर गमुटचा सपोर्ट देखील मिळेल. या डिस्प्लेला कोर्निंग ग्लास लेयरची सुरक्षा देण्यात येईल. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 प्रोसेसर मिळेल, जो क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि शक्तिशाली चिपसेट आहे. पहिल्यांदाच वनप्लस स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम दिला जाऊ शकतो, सोबतीला 256GB स्टोरेज मिळेल. वनप्लसचा हा फोन Android 12 आधारित OxygenOS वर चालेल.

OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा असू शकतो. ग्लोबल व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असू शकतात. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 16MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

OnePlus 10T मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, एक्स एक्सिम लीनियर मोटर आणि 4800mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2×2 MIMO, WiFi 802.11 a/b/g/n/ac/ax, Bluetooth 5.3, NFC, SBC & aptX HD & LDAC, NFC, आणि USB Type-C पोर्ट दिला जाऊ शकतो.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-may-launch-a-powerful-smartphone-with-16gb-ram-and-snapdragon-8-plus-gen-1/feed/ 0