शक्तिशाली OnePlus 10T 5G चे सर्व स्पेसिफिकेशन्स आले समोर; लाँचपूर्वी डिजाइन देखील लीक

OnePlus 10T 5G स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. प्राईसबाबा आणि पॉपुलर टिपस्टर इशान अग्रवालनं वनप्लसच्या आगामी स्मार्टफोन OnePlus 10T 5G च्या भारतीय व्हेरिएंटचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. त्याचबरोबर वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनचे झेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक कलर व्हेरिएंटचे अधिकृत प्रेस रेंडर देखील समोर आले आहेत. या रेंडर्समधून स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे, हा फोन OnePlus 10 Pro सारखा दिसतो. परंतु यात आयकॉनिक अलर्ट स्लायडर दिसत नाही तसेच Hassleblad सोबतची भागेदारी देखील रद्द करण्यात आली आहे. OnePlus 10T 5G स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात 3 ऑगस्टला लाँच होणार आहे. या दिवशी कंपनी चीनमध्ये OnePlus Ace Pro लाँच करेल, त्यामुळे Ace Pro आणि 10T चे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असण्याची शक्यता आहे.

OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचं रिजोल्यूशन Full HD+ (2,412 x 1080 पिक्सल) असेल. हा फोन 10-बिट कलर, sRGB कलर गमुट आणि HDR10+ ला सपोर्ट करेल. वनप्लसच्या या फोनमध्ये पंच होल कटआउट मिळेल, ज्यात 16MP चा सेल्फी कॅमेरा असेल. हा कॅमेरा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायजेशन (EIS) ला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

वनप्लसच्या आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. OnePlus 10T 5G स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन OIS ला सपोर्ट करेल. फोनमध्ये 8MP चा अल्ट्रावाईड अँगल कॅमेरा आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळेल.

हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालेल. रिपोर्ट्सनुसार वनप्लसचा हा फोन 16GB रॅमसह येईल. तसेच 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेजचे ऑप्शन देखील बाजारात येतील. हा फोन OxygenOS 13 वर चालेल जो Android 12 OS वर बेस्ड असेल.

OnePlus 10T 5G स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनचे रेंडर्सवरून असे दिसत आहे की कंपनी यात अलर्ट स्लायडर देणार नाही. तसेच फोनच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये Hasselblad ची ब्रँडिंग देखील दिसत नाही. बाकी डिजाईन OnePlus 10 Pro सारखी दिसत आहे. हे देखील वाचा: कसं असेल 5G SIM आणि कशाप्रकारे तुमचा मोबाईल नंबर होईल 5जी मध्ये पोर्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

OnePlus 10T 5G ची किंमत

OnePlus 10T 5G स्मार्टफोन भारतात 49,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. हा फोन बँक ऑफर्ससह भारतात 48,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. वनप्लसच्या या फोनची विक्री भारतात 6 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सुरु होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here