OnePlus 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-f1-beats-oneplus-6-to-become-no-1-smartphone-in-15000-and-above-budget-in-online-sales-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-f1-beats-oneplus-6-to-become-no-1-smartphone-in-15000-and-above-budget-in-online-sales-india/#respond Fri, 29 Mar 2019 11:42:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3963 या रेस मध्ये पोको एफ1 ने फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळख असलेल्या वनप्लस ब्रँडच्या वनप्लस 6 ला मागे टाकले आहे.

The post शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने गेल्यावर्षी भारतीय बाजारात आपला नवीन ब्रँड पोकोफोन सादर केला होता. पोको ब्रँड द्वारे कंपनीचा प्रयत्न हायर मीड बजेट मध्ये इतर कंपन्यांना टक्कर देणे तसेच या प्राइज रेंज मध्ये आपले वर्चस्व स्थापित करण्याचा होता. पोको ब्रँडची सुरवात पोको एफ1 स्मार्टफोनने झाली होती. पोको एफ1 त्यावेळच्या क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 845 वर लॉन्च झाला होता ज्याने बाजारात येताच यशाचे नवीन रेकॉर्ड केले होते. ताकदवान स्पेसिफिकेशन्स असलेल्या या स्मार्टफोनने पुन्हा एकदा स्वतःला नंबर वन सिद्ध केले आहे. आईडीसी द्वारा जारी एक ताजा रिपोर्ट मध्ये वनप्लस 6 ला मागे टाकत पोको एफ1 भारतातील नंबर वन स्मार्टफोन बनला आहे.

केला नवीन रेकॉर्ड
बाजारावर बारीक नजर ठेवणारी इंटरनेशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजे आईडीसी ने इंडियन स्मार्टफोन बाजारावरील आपला नवीन रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्ट साल 2018 च्या शेवटच्या तिमाहीचा आहे ज्यात इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये मोबाईलच्या ऑनलाइन बाजाराचा लेखाजोखा देण्यात आला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि इंडियन ऑनलाइन स्मार्टफोन मार्केट मध्ये 15,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त बजेट मध्ये पोको एफ1 ची विक्री सर्वात जास्त झाली आहे आणि हा फोन या सेग्मेंट मध्ये भारताचा नंबर वन स्मार्टफोन बनला आहे.

वनप्लस 6 ला टाकले मागे
आईडीसी ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि साल 2018 च्या शेवटच्या तीन महिन्यात भारतात ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर 15,000 रुपये आणि त्यावरील बजेट मध्ये विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्स मध्ये पोको एफ1 चा शेयर सर्वात जास्त आहे. सर्व स्मार्टफोन्स मध्ये पोको एफ1 च्या वाट्याला 22.5 टक्के शेयर आला आहे. या रेस मध्ये पोको एफ1 ने फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळख असलेल्या वनप्लस ब्रँडच्या वनप्लस 6 ला मागे टाकले आहे. वनप्लस 6 च्या वाट्याला 17.9 टक्के मार्केट शेयर्स आला आहे ज्यामुळे हा फोन दुसऱ्या नंबर वर राहिला.

हे देखील वाचा: 6जीबी रॅम आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च होईल सोनी एक्सपीरिया 2

पोको एफ1 स्पेसिफिकेशन्स
पोको एफ1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल. कपंनी ने पोको एफ1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पोको एफ1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी आली गूगल पिक्सल 3ए आणि 3ए एक्सएल ची किंमत, बघा किती स्टाइलिश आहे हा फोन

पोको एफ1 ची किंमत
भारतात पोको एफ1 तीन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. दोन वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात तर फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता पोको एफ1 चा 6जीबी/64जीबी स्टोरेज वेरीएंट 19,999 रुपये तसेच 8जीबी/128जीबी मेमोरी वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर 6जीबी/128जीबी स्टोरेज वेरिएंट सध्या 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-poco-f1-beats-oneplus-6-to-become-no-1-smartphone-in-15000-and-above-budget-in-online-sales-india/feed/ 0
शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ? https://www.91mobiles.com/marathi/oneplus-to-launch-new-brand-with-5g-phone-oneplus-7-mwc-2019-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-to-launch-new-brand-with-5g-phone-oneplus-7-mwc-2019-in-marathi/#respond Mon, 12 Nov 2018 13:48:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2831 वनप्लस ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार कोणताही स्मार्टफोन महाग किंमतीती लॉन्च करून कपंनी आपले ‘फ्लॅगशिप कीलर’ हे टाइटल संपुष्टात आणू इच्छित नाही.

The post शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
संपूर्ण जगासोबतच भारत पण 4जी इंटरनेट चा मोठा बाजार बनला आहे. 4जी कनेक्टिविटी ने भारतात आपले जाळे पसरवले आहे आणि सध्या प्रत्येक स्मार्टफोन ब्रँड आणि टेलीकॉम कंपन्या 4जी सपोर्ट तसेच 4जी नेटवर्क देत आहेत. 4जी च्या यशानंतर आता सर्वांची नजर सुपरफास्ट 5जी नेटवर्क कडे आहे. क्वालकॉम व स्नॅपड्रॅगॉन सारख्या दिग्गज चिपसेट व प्रोसेस​र बनवणर्या कंपन्यांनी घोषणा केली आहे कि त्या 5जी सपोर्ट असलेले चिपसेट बनवण्यात यशस्वी झाल्या आहेत. तसेच अनेक स्मार्टफोन ब्रँड्सनी पण पुढल्या वर्षी 5जी फोन आणण्याची घोषणा केली आहे . त्यात एक मोठी बातमी अशी आली आहे कि टेक कंपनी वनप्लस 5जी सपोर्ट असलेले फोन आणण्यासाठी एक नवीन ब्रँड बाजारात आणेल.

वनप्लस ने सीनेट ला सांगितले आहे कि कंपनी पुढल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 5जी सपोर्ट असलेला स्मार्टफोन नक्कीच घेऊन येत आहे पण हा फोन कंपनी एखाद्या नवीन ब्रँडिंग सह बाजारात येईल. आतापर्यंत कंपनी वनप्लस 5, 5टी तसेच वनप्लस 6, 6टी टाइटल सह फोन लॉन्च करत आहे तर आपल्या 5जी स्मार्टफोन सोबतच कंपनी आपला नवीन ब्रँड पण बाजारात घेऊन येईल. ज्याप्रमाणे शाओमी ने ‘पोकोफोन’ आणि ओपो ने ‘रियलमी’ लॉन्च केला आहे त्याचप्रमाणे वनप्ल्स पण आपला नवीन ब्रँड घेऊन येऊ शकते.

वनप्लस च्या या नवीन ब्रँड अंतर्गत कंपनीचे 5जी सपोर्ट असलेले स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पुढच्यावर्षी बार्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या मंचावरून वनप्लस आपला हा नवीन ब्रँड तसेच कंपनीचा पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च करेल याची दाट शक्यता आहे. वनप्लसचा हा 5जी फोन कोणत्या ब्रँड अंतर्गत लॉन्च होईल तसेच कंपनी आपल्या पहिल्या 5जी फोनला काय नाव देईल याबद्दल अजूनतरी काही सांगता येणार नाही.

काही मीडिया रिर्पोट्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि वनप्लसचा नेक्स्ट स्मार्टफोन वनप्लस 7 च 5जी सपोर्ट सह ईऊल हाच कंपनीचा पहिला 5जी फोन असेल. पण वनप्लस 7 5जी सपोर्ट सह येण्यासाची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे वनप्लस टाइटल सह लॉन्च होणारे कंपनीचे सर्व स्मार्टफोन्स ‘फ्लॅगशिप कीलर’ स्मार्टफोन म्हणून ओळखले जातात. आणि हे नाव त्यांना कमी किंमतीती दमदार स्पेसिफिकेशन्स असल्यामुळे देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे जर वनप्लस 7 5जी सपोर्ट सह लॉन्च करण्यात आला तर या फोनची किंमत वाढेल. त्यामुळे वनप्लस ब्रँड अंतर्गत लॉन्च होणार कोणताही स्मार्टफोन महाग किंमतीती लॉन्च करून कपंनी आपले ‘फ्लॅगशिप कीलर’ हे टाइटल संपुष्टात आणू इच्छित नाही. त्यामुळे 5जी फोन आणण्यासाठी ​वनप्लस आपला एक नवीन ब्रँड लॉन्च करेल याची शक्यता अजून वाढते.

The post शाओमीच्या आधी वनप्लस आणेल का आपला 5जी फोन ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-to-launch-new-brand-with-5g-phone-oneplus-7-mwc-2019-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-tp-launch-in-india-on-30-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-tp-launch-in-india-on-30-october-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 13:29:41 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2399 वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

The post वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणारी कंपनी वनप्लस गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कपंनी आपला नवीन फ्लॅगशिप फोन वनप्लस 6टी घेऊन येत आहे. वनप्लस 6टी बद्दल अनेक लीक समोर आले आहेत पण आता या लीक्स व अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. आपल्या फॅन्स व स्मार्टफोन यूजर्स ची प्रतीक्षा संपवत वनप्लस ने वनप्लस 6टी च्या लॉन्चची आॅफिशियल घोषणा केली आहे. वनप्लस इंडिया ने सांगितले आहे की वनप्लस 6टी येत्या 30 ऑक्टोबरला भारतात लॉन्च केला जाईल.

वनप्लस इंडिया ने आपल्या ट्वीटर हँडल वरून वनप्लस 6टी च्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. वनप्लस 6टी ऑक्टोबरच्या 30 तारखेला देशात लॉन्च होईल. वनप्लस 6टी च्या लॉन्च डेटची घोषणा करण्या सोबतच कंपनी ने वनप्लस च्या आॅफिशियल वेबसाइट वर वनप्लस 6टी च्या लॉन्च संबंधित माहिती पण दिली आहे. वनप्लस 30 ऑक्टोबरला दिल्ली मधील इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये वनप्लस 6टी च्या लॉन्च चे आयोजन करेल जे रात्री 8:30 ला सुरू होईल.

वनप्लस 6टी कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यात इन​-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

वनप्लस किती वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च होईल तसेच याची किंमत काय असेल यासाठी 30 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post वनप्लस 6टी 30 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च, हा असेल कंपनीचा सर्वात पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-tp-launch-in-india-on-30-october-in-marathi/feed/ 0
5,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 6, फक्त 5 दिवसांसाठी कंपनी देत आहे शानदार संधी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-rs-5000-discount-on-amazon-great-indian-sale-price-29999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-rs-5000-discount-on-amazon-great-indian-sale-price-29999-in-marathi/#respond Thu, 04 Oct 2018 08:35:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2362 अमेजॉन इंडिया ने सध्या वनप्लस 6 च्या 6जीबी रॅम वेरिएंट वरील आॅफरची माहिती दिली आहे. पण आशा आहे की फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण डिसकाउंट सह उपलब्ध होईल.

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 6, फक्त 5 दिवसांसाठी कंपनी देत आहे शानदार संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस ने जेवढे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत तेवढे सर्व टेक बाजारात यशस्वी झाले आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स आणि मीड बजेट मुळे वनप्लस च्या स्मार्टफोन्सना फ्लॅगशिप कीलर पण म्हटले जाते. कंपनी च्या लेटेस्ट स्मार्टफोन वनप्लस 6 ने पण त्याच यशाची पुनरावृत्ती केली आहे. स्मार्टफोन यूजर्स ने वनप्लस 6 हातोहात विकत घेतला. वनप्लस फॅन्सना भेट देत कंपनी ने या दमदार फोनची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी केली आहे आणि स्मार्टफोन यूजर्सना वनप्लस 6 विकत घेण्याची सुवर्णसंधी दिली आहे.

वनप्लस 6 34,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण आता हा फ्लॅगशिप कीलर 5,000 रुपयांनी कमी म्हणजे 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे वनप्लस 6 अमेजॉन एक्सक्लूसिव फोन आहे आणि फक्त याच वेबसाइट वरून विकत घेता येतो. जर तुम्ही पण वनप्लस 6 विकत घेऊ इच्छित असाल तर हीच चांगली संधी आहे. कारण ही खास संधी फक्त दिवस असणार आहे.

वनप्लस 6 येत्या 10 ऑक्टोबर पासून 5,000 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेता येईल. यूजर वनप्लस 6 10 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत पाच हजार कमी म्हणजे 34,999 रुपयांच्या ऐवजी 29,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. अमेजॉन इंडिया येत्या 10 ऑक्टोबरला अमेजॉन ग्रेट इंडियन सेल चे आयोजन करणार आहे आणि याच सेल मध्ये वनप्लस 6 वर कोणत्याही अटी विना 5,000 रूपयांची सूट मिळेल.

वनप्लस 6 चा एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी वर लॉन्च झाला आहे. 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे तर 8जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 39,999 रुपये आहे. अमेजॉन इंडिया ने सध्या वनप्लस 6 च्या 6जीबी रॅम वेरिएंट वरील आॅफरची माहिती दिली आहे. पण आशा आहे की फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण डिसकाउंट सह उपलब्ध होईल.

वनप्लस 6 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post 5,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस 6, फक्त 5 दिवसांसाठी कंपनी देत आहे शानदार संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-rs-5000-discount-on-amazon-great-indian-sale-price-29999-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 12:14:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2337 सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कधी विचार केला आहे का अचानक पणे स्मार्टफोन मधील रॅम बद्दल इतकी चर्चा का सुरू झाली आहे? लोक जास्त रॅम असलेला फोन का शोधत आहेत? त्यामागील एक कारण म्हणजे आता अॅप्स आणि गेम्स हेवी होत आहेत. हाय रेजल्यूशन असलेले हे अॅप्स चालवण्यासाठी जास्त रॅम ची गरज असते नाही तर फोन लॅग होईल किंवा स्लो होईल. फोन मध्ये अॅप्स आणि गेम्स इंटरनल मेमरी मध्ये स्टोर झाले तरी जेव्हा तुम्ही ते चालवता तेव्हा ते रॅम चा वापर करतात. याच कारणामुळे लोक जास्त रॅम असलेला फोन शोधतात. फोन मध्ये रॅम जास्त असल्यास तो लवकर हँग होणार नाही. फोन फास्ट चालेल आणि लॅग पण कमी होईल. सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी 2 प्रो

सध्या भारतीय बाजारात हा सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाला फोन आहे. रियलमी 2 प्रो नुकताच कंपनी ने लॉन्च केला आहे. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

2. शाओमी पोको एफ1

शाओमी ने भारतीय बाजारात पोको नावाने दुसरा ब्रँड सादर केला आहे. या अंतर्गत कंपनी ने पोको एफ1 नावाने पहिला मॉडेल लॉन्च केला आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. 8जीबी वाला वेरियंट 256जीबी मेमरी सह येतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

3. असूस झेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने पण 8जीबी रॅम सह आपला फोन सादर केला आहे. कंपनी झेनफोन 5झेड आणला आहे जो चांगल्या प्रोसेसर सोबत 8जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. याचा एक वेरियंट 6जीबी रॅम सह पण येतो. असूस झेनफोन 5झेड मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. 8जीबी रॅम मॉडेल सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर 6जीबी वाला वेरियंट 128जीबी मेमरी सह येतो. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. या फोन मध्ये एआई कॅपेबिलिटी आहे. कॅमेरा सोबत वाइड एंगल सपोर्ट आहे आणि यात एआई इंटीग्रेशन पण देण्यात आला आहे.

4. वनप्लस 6

भारतात 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात वनप्लस ने गेल्या वर्षीच केली होती. या वर्षी पण कंपनी ने 8जीबी रॅम सह वनप्लस 6 आणला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंच एमोलेड डिस्प्ले आहे जो नॉच स्टाइल सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. रॅम सोबत सर्वात ताकदवान प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो यात 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

5. वीवो नेक्स

ओपो व्यतिरिक्त वीवो ने पण इनविजिबल कॅमेरा वाला फोन सादर केला आहे आणि हा फोन पण खुप दमदार आहे. वीवो ने नेक्स भारतात आणला आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कमेरा देण्यात आला आहे. वीवो नेक्स मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फोन मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे.

6. ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनच्या बॉडी च्या आत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप उघडताच फोनच्या बॉडी च्या आतून कॅमेरा सेंसर बाहेर येतात आणि फोटो घेतात. कंपनी ने बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. पण इतर स्पेसिफिकेशन पण काही कमी दमदार नाहीत. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.1 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

7. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सह कंपनी ने 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात केली ज्यात 512जीबी इंटरनल स्टारेेज देण्यात आली. याचा एक मॉडल 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाला पण आहे. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो इतर कोणत्याही फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत तुम्हाला हा फोन आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दिली आहे. फोनचा कॅमेरा पण खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/feed/ 0
बॉलीवुड च्या शहंशाहाने केली वनप्लस 6टी ची घोषणा, लॉन्च होणार आहे हा फ्लॅगशिप कीलर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-teaser-out-listed-on-amazon-specification-in-display-fingerprint-sensor-feature-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-teaser-out-listed-on-amazon-specification-in-display-fingerprint-sensor-feature-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 06:22:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2180 बच्चन म्हणतात की स्मार्टफोन अनलॉक करण्याची अनोखी टेक्नोलॉजी वनप्लस 6टी मध्ये मिळेल, थोडक्यात काय तर फोन मधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर कडे त्यांनी इशारा केला आहे.

The post बॉलीवुड च्या शहंशाहाने केली वनप्लस 6टी ची घोषणा, लॉन्च होणार आहे हा फ्लॅगशिप कीलर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस 6 च्या यशानंतर आता स्मार्टफोन कंपनी वनप्लस पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या तयारीत आहे. खुप दिवसांपासून चर्चा सुरू आहे की कंपनी वनप्लस 6 चा अजून एक नवीन वर्जन वनप्लस 6टी घेऊन येणार आहे. या फोन संबंधीत अनेक लीक पण समोर आले आहेत. पण आता स्वतः कंपनी ने वनप्लस 6टी च्या इंडिया लॉन्च ची आॅफिशियल घोषणा केली आहे. विशेष म्हणजे वनप्लस 6टी ची घोषणा इतर कोणी नाही तर बॉलीवुड चे शंहशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

अमिताभ बच्चन वनप्लस इंडिया चे ब्रँड एम्बेसडर आहेत. वनप्लस 6 पण अमिताभ बच्चन द्वारा लॉन्च करण्यात आला होता. तसेच आता एका टीवी व्यावसायिक जाहिरातीच्या माध्यमातून बच्चन यांनी वनप्लस 6टी च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. या अॅड मध्ये अमिताभ यांनी वनप्लस 6टी हातात पकडला आहे. बच्चन म्हणतात की स्मार्टफोन अनलॉक करण्याची अनोखी टेक्नोलॉजी वनप्लस 6टी मध्ये मिळेल, थोडक्यात काय तर फोन मधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर कडे त्यांनी इशारा केला आहे.

वनप्लस 6टी साठी शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे ज्यावर ‘नोटिफाई मी’ बटन आहे. जरी कंपनी ने अजून फोनच्या लॉन्च डेट चा खुलासा केला नसला तरी बोलेले जात आहे की येत्या 17 ऑक्टोबरला कंपनी आपला नवीन फ्लॅगशिप कीलर स्मार्टफोन वनप्लस 6टी जगासमोर आणेल. लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की वनप्लस 6टी ‘वी’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल.

वनप्लस 6टी बद्दल आता पर्यंत आलेल्य लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो.

तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

The post बॉलीवुड च्या शहंशाहाने केली वनप्लस 6टी ची घोषणा, लॉन्च होणार आहे हा फ्लॅगशिप कीलर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-teaser-out-listed-on-amazon-specification-in-display-fingerprint-sensor-feature-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6टी मध्ये स्क्रीन खाली असेल फिंगरप्रिंट सेंसर, 17 ऑक्टोबरला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-in-display-fingerprint-sensor-might-launch-on-17-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-in-display-fingerprint-sensor-might-launch-on-17-october-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 14:03:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2019 नुकताच वनप्लस 6टी रशिया च्या यूरोशियन इकोनॉमिक कमीशन (ईईसी) च्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली होती.

The post वनप्लस 6टी मध्ये स्क्रीन खाली असेल फिंगरप्रिंट सेंसर, 17 ऑक्टोबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एकीकडे वनप्लस 6 यशाचे रेकॉर्ड बनवत आहे तर दुसरीकडे टेक बाजारात वनप्लस 6टी च्या चर्चेला उधाण आले आहे. नुकताच वनप्लस 6टी रशिया च्या यूरोशियन इकोनॉमिक कमीशन (ईईसी) च्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली होती. तसेच आज या फोन संबंधी महत्वाची माहिती समोर आली आहे. वनप्लस 6टी बद्दल समजले आहे की कंपनी हा इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात लॉन्च करेल तसेच हा फोन 17 ऑक्टोबरला टेक बाजारात येऊ शकतो.

वनप्लस 6टी बद्दल ही माहिती स्वतः वनप्लस कंपनी ने दिली आहे. वनप्लस ने एक आॅफिशियल ईमेज शेयर केली आहे ज्यातून फोन मध्ये इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याची बाब समोर आली आहे. या ईमेज मध्ये डिस्प्ले वर फिंगर​प्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. इमेज मध्ये 17 ऑक्टोबर या तारखे सोबत 11 वाजल्याची वेळ लिहिण्यात आली आहे. जरी वनप्लस ने फोन च्या लॉन्च डेट ची कोणतीही घोषणा केली नसली तरी ईमेज बघून बोलले जात आहे की वनप्लस 6टी 17 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता एखाद्या ईवेंट मधून लॉन्च होईल.

वनप्लस 6टी बद्दल आता पर्यंत आलेल्य लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.

लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

The post वनप्लस 6टी मध्ये स्क्रीन खाली असेल फिंगरप्रिंट सेंसर, 17 ऑक्टोबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-in-display-fingerprint-sensor-might-launch-on-17-october-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6टी ची तयारी जोरात सुरू, कमीशन वेबसाइट वर झाला लिस्ट लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-listed-on-eurasian-economic-commission-eec-website-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-listed-on-eurasian-economic-commission-eec-website-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 27 Aug 2018 09:23:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1823 वनप्लस दरवर्षी आपल्या स्मार्टफोन्सचा ‘टी’ वर्जन घेऊन येत असते आणि यावेळी लोक वनप्लस 6टी ची आतुरतेने वाट बघत आहेत.

The post वनप्लस 6टी ची तयारी जोरात सुरू, कमीशन वेबसाइट वर झाला लिस्ट लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस त्या निवडक टेक कंपन्यांपैकी एक आहे जी वर्षभरात काहीच स्मार्टफोन बाजारात घेऊन येते. ​वनप्लस चे हे नेमकेच स्मार्टफोन मॉडेल्स संपूर्ण टेक बाजार हलवून टाकतात आणि त्यामुळेच वनप्लस च्या स्मार्टफोन्सना फ्लॅगशिप कीलर बोलले जाते. वनप्लस ने काही दिवसांपूर्वी आपल नवीन फ्लॅगशिप कीलर वनप्लस 6 लॉन्च केला होता जो एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स ची पहिली पसंती म्हणून समोर आला आहे. वनप्लस दरवर्षी आपल्या स्मार्टफोन्सचा ‘टी’ वर्जन घेऊन येत असते आणि यावेळी लोक वनप्लस 6टी ची आतुरतेने वाट बघत आहेत. पण असे वाटते आहे की ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वनप्लस 6टी स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट वर करण्यात आला आहे.

वनप्लस 6टी रशिया च्या यूरोशियन इकोनॉमिक कमीशन (ईईसी) च्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला आहे. तसे पाहता वनप्लस 6टी बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत पण ही लिस्टिंग वनप्लस 6टी चा पहिला सॉलिड प्रूफ असल्याचे बोलेल जात आहे. ईईसी वर वनप्लस 6टी ए6013 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. लि​स्टिंग मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स किंवा याच्या फीचर्स चा उल्लेख करण्यात आला नाही पण या वेबसाइट वर वनप्लस 6टी दिसल्याने स्पष्ट झाले आहे की, वनप्लस कंपनी आपल्या नेक्स्ट फ्लॅगशिप कीलर ची तयारी करत आहे आणि लवकरच हा अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला जाईल.

वनप्लस 6टी बद्दल आता पर्यंत आलेल्य लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.

लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

The post वनप्लस 6टी ची तयारी जोरात सुरू, कमीशन वेबसाइट वर झाला लिस्ट लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6t-listed-on-eurasian-economic-commission-eec-website-feature-specifications-in-marathi/feed/ 0
वनप्लस ने सॅमसंग-अॅप्पल ला टाकले मागे, बनला भारतातील सर्वात मोठा प्रीमियम ब्रँड : रिपोर्ट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-surpasses-samsung-apple-lead-growing-indian-premium-segment-with-oneplus-6-in-q2-this-year-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-surpasses-samsung-apple-lead-growing-indian-premium-segment-with-oneplus-6-in-q2-this-year-in-marathi/#respond Tue, 31 Jul 2018 10:43:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1469 काउंटर प्वाइंट ने आपल्या रिपोर्ट मध्ये साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचे आकडे शेयर केले आहेत.

The post वनप्लस ने सॅमसंग-अॅप्पल ला टाकले मागे, बनला भारतातील सर्वात मोठा प्रीमियम ब्रँड : रिपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनप्लस ने मे महिन्यात भारतात आपला नवीन हाईएंड डिवाईस वनप्लस 6 लॉन्च केला होता. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन देशात भरपूर लोकांना आवडला आहे. तसेच आता इंडियन स्मार्टफोन बाजारातून एक अशी बातमी समोर आली आहे जी वनप्लस फॅन्स साठी खुप खास आहे. रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने एक नवीन रिपोर्ट शेयर केला ही ज्यात सांगितले आहे की स्मार्टफोन प्रीमियम सेग्मेंट मध्ये वनप्लस सॅमसंग व अॅप्पल ला मागे टाकत देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

काउंटर प्वाइंट ने आपल्या रिपोर्ट मध्ये साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचे आकडे शेयर केले आहेत. या आकडेवारीवरून समजले आहे की वनप्लस ने एप्रिल, मे आणि जून महिन्यात प्रीमियम सेग्मेंट मध्ये रेकॉर्ड सेल केला आहे आणि त्यामुळे कंपनी सॅमसंग आणि अॅप्पल ला मागे टाकत भारतातील सर्वात मोठा प्रीमियम सेग्मेंट वाला ब्रँड बनली आहे. स्पष्ट आहे की वनप्लस कंपनी ला हे यश कंपनी च्या नवीन स्मार्टफोन वनप्लस 6 मुळे मिळेल आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच वनप्लस ने प्रीमियम सेग्मेंट वर राज्य करणार्‍या सॅमसंग ला मागे टाकेल आहे.

भारतात 30,000 रुपयांपेक्षा जास्त बजेट ला प्रीमियम सेग्मेंट मध्ये ठेवण्यात येते. या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीत याच सेग्मेंट मध्ये वनप्लस ने 40 टक्के मार्केट शेयर्स वर कब्जा करत देशात पाहिले स्थान मिळवले आहे. वनप्लस 6 हिट झाल्यामुळे वनप्लस इथवर आली आहे. या सेग्मेंट मध्ये वनप्लस च्या मागे असलेल्या सॅमसंग कडे 34 टक्के शेयर आहे. तर प्रीमियम सेग्मेंट मध्ये 14 टक्के मार्केट शेयर्स सह अॅप्पल तिसर्‍या नंबर वर आहे.

वनप्लस साठी भारतीय स्मार्टफोन बाजार खुप खास आहे. ​रिपोर्ट नुसार सध्या भारतातून वनप्लस ला एक तृतीयांश फायदा होत आहे. वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीच्या प्रीमियम सेग्मेंट च्या रिपोर्ट नुसार या 40 टक्के शेयर मध्ये वनप्लस च्या वनप्लस 6 च्या सेल चा समावेश आहे तर सॅमसंग कडून गॅलेक्सी एस9 सीरीज तसेच अॅप्पल चे आयफोन 8 व आयफोन 10 आहेत.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा सॅमसंग ने या वर्षी गॅलेक्सी एस9 ची शिपमेंट कमी केली होती. दुसरीकडे आयफोन ची जास्त किंमत अॅप्पल च्या या पिछाडी चे मुख्य कारण असू शकते. वनप्लस, सॅमसंग आणि अॅप्पल ने मिळून भारतातील प्रीमियम स्मार्टफोन मार्केट च्या 88 टक्के भागावर कब्जा केला आहे. पण वर्षाच्या सुरवातीला या तिन्ही कंपन्या देशातील 95 टक्के प्रीमियम बाजारावर राज्य करत होत्या.

हुआवई पी20, वीवो एक्स21, नोकिया 8 सिरोको आणि एलजी वी30 प्लस सारख्या स्मार्टफोन्स मुळे सॅमसंग, वनप्लस व अॅप्पल ला प्रीमियम सेग्मेंट मध्ये 6 टक्क्यांचे नुकसान झाले आहे.

The post वनप्लस ने सॅमसंग-अॅप्पल ला टाकले मागे, बनला भारतातील सर्वात मोठा प्रीमियम ब्रँड : रिपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-surpasses-samsung-apple-lead-growing-indian-premium-segment-with-oneplus-6-in-q2-this-year-in-marathi/feed/ 0
वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिएंट लॉन्च, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी वाला आहे हा कंपनीचा सर्वात ताकदवान फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-midnight-black-variant-launched-in-india-with-8gb-ram-256gb-storage-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-midnight-black-variant-launched-in-india-with-8gb-ram-256gb-storage-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 08:16:26 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1071 विशेष म्हणजे कंपनी ने वनप्लस 6 च्या मीडनाईट ब्लॅक वेरिएंट आधी या फोन चे 2 वेरिएंट लॉन्च केले आहेत.

The post वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिएंट लॉन्च, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी वाला आहे हा कंपनीचा सर्वात ताकदवान फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस 6 ची नशा अजूनही टेक विश्वाच्या डोक्यावर आहे. स्मार्टफोन लवर्स एंडरॉयड फोन म्हणून वनप्लस 6 लाच बेस्ट फोन चा दर्जा देत आहेत. ​वनप्लस ने मागच्या महिन्यात आपला नवीन हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 6 भारतीय बाजारात आणला होता. देशात वनप्लस च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की ग्लोबल लॉन्च च्या दुसर्‍याच दिवशी हा फोन भारतात पण लॉन्च झाला होता. तसेच आज वनप्लस ने वनप्लस 6 चा 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट पण देशात लॉन्च केला आहे.

वनप्लस ने वनप्लस 6 चा मीडनाईट ब्लॅक वेरिएंट भारतीय बाजारात सादर केला आहे. हा वेरिएंट वनप्लस द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या सर्व स्मार्टफोंस मध्ये सर्वात ताकदवान आहे. या फोन मध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. वनप्लस ने हा वेरिएंट 43,999 रुपयांमध्ये देशात लॉन्च केला आहे.

वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिएंट आज पासूनच शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला आहे. येणार्‍या 10 जुलै पासून या दमदार फोन चा सेल सुरू होईल आणि हा शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरूनच एक्सक्लूसिव विकत घेता येईल. तसेच जुलै 14 तारखे पासून कंपनी हा वेरिएंट वनप्लस च्या आॅफिशियल वेबसाइट त्याचबरोबर वनप्लस एक्सक्लूसिव आॅफलाईन चॅनल्स वर सेल साठी सादर करेल.

या नवीन वेरिएंट च्या खरेदीवर अमेजॉन इंडिया अनेक आॅफर्स पण देत आहे. तुम्ही सिटी बँक च्या कार्ड ने फोन विकत घेतल्यास 2,000 रूपयांची सूट मिळेल. तसेच आ​यडिया यूजर्सना वनप्लस 6 च्या खरेदीवर आॅफर अंतर्गत 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिंएट अमेजॉन वरून विकत घेतल्यास क्लियर ट्रिप वर 25,000 रुपयांचे बेनिफिट, 250 रुपयांचा अमेजॉन पे बॅलेंस व किंडल वर आॅनलाईन बुक्स वाचण्यासाठी 500 रुपयांचे क्रेडिट मिळतील. त्याचबरोबर फोन वर 12 महिन्यांचे मोफत डॅमेज प्रोटेक्शन मिळेल जे कोटेक द्वारा दिले जाईल.

विशेष म्हणजे कंपनी ने वनप्लस 6 च्या मीडनाईट ब्लॅक वेरिएंट आधी या फोन चे 2 वेरिएंट लॉन्च केले आहेत. एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी सह सादर करण्यात आला आहे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 34,999 रुपये तसेच 39,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. या दोन्ही वेरिएंट्स सोबत कंपनी ने वनप्लस 6 चा मारवल स्पेशल एवेंजर्स इनफिनिटी वॉर एडिशन पण सादर केला होता जो मीडनाईट ब्लॅक वेरिएंट प्रमाणे 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी ला सपोर्ट करतो. हा एक लिमिटेड एडिशन होता जो देशात 44,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता.

The post वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिएंट लॉन्च, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी वाला आहे हा कंपनीचा सर्वात ताकदवान फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-6-midnight-black-variant-launched-in-india-with-8gb-ram-256gb-storage-in-marathi/feed/ 0