वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिएंट लॉन्च, 8जीबी रॅम आणि 256जीबी मेमरी वाला आहे हा कंपनीचा सर्वात ताकदवान फोन

वनप्लस 6 ची नशा अजूनही टेक विश्वाच्या डोक्यावर आहे. स्मार्टफोन लवर्स एंडरॉयड फोन म्हणून वनप्लस 6 लाच बेस्ट फोन चा दर्जा देत आहेत. ​वनप्लस ने मागच्या महिन्यात आपला नवीन हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 6 भारतीय बाजारात आणला होता. देशात वनप्लस च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की ग्लोबल लॉन्च च्या दुसर्‍याच दिवशी हा फोन भारतात पण लॉन्च झाला होता. तसेच आज वनप्लस ने वनप्लस 6 चा 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट पण देशात लॉन्च केला आहे.

वनप्लस ने वनप्लस 6 चा मीडनाईट ब्लॅक वेरिएंट भारतीय बाजारात सादर केला आहे. हा वेरिएंट वनप्लस द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या सर्व स्मार्टफोंस मध्ये सर्वात ताकदवान आहे. या फोन मध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. वनप्लस ने हा वेरिएंट 43,999 रुपयांमध्ये देशात लॉन्च केला आहे.

वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिएंट आज पासूनच शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर रजिस्ट्रेशन साठी लिस्ट झाला आहे. येणार्‍या 10 जुलै पासून या दमदार फोन चा सेल सुरू होईल आणि हा शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वरूनच एक्सक्लूसिव विकत घेता येईल. तसेच जुलै 14 तारखे पासून कंपनी हा वेरिएंट वनप्लस च्या आॅफिशियल वेबसाइट त्याचबरोबर वनप्लस एक्सक्लूसिव आॅफलाईन चॅनल्स वर सेल साठी सादर करेल.

या नवीन वेरिएंट च्या खरेदीवर अमेजॉन इंडिया अनेक आॅफर्स पण देत आहे. तुम्ही सिटी बँक च्या कार्ड ने फोन विकत घेतल्यास 2,000 रूपयांची सूट मिळेल. तसेच आ​यडिया यूजर्सना वनप्लस 6 च्या खरेदीवर आॅफर अंतर्गत 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे वनप्लस 6 मीडनाईट ब्लॅक वेरिंएट अमेजॉन वरून विकत घेतल्यास क्लियर ट्रिप वर 25,000 रुपयांचे बेनिफिट, 250 रुपयांचा अमेजॉन पे बॅलेंस व किंडल वर आॅनलाईन बुक्स वाचण्यासाठी 500 रुपयांचे क्रेडिट मिळतील. त्याचबरोबर फोन वर 12 महिन्यांचे मोफत डॅमेज प्रोटेक्शन मिळेल जे कोटेक द्वारा दिले जाईल.

विशेष म्हणजे कंपनी ने वनप्लस 6 च्या मीडनाईट ब्लॅक वेरिएंट आधी या फोन चे 2 वेरिएंट लॉन्च केले आहेत. एक वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तर दुसरा वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी सह सादर करण्यात आला आहे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 34,999 रुपये तसेच 39,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. या दोन्ही वेरिएंट्स सोबत कंपनी ने वनप्लस 6 चा मारवल स्पेशल एवेंजर्स इनफिनिटी वॉर एडिशन पण सादर केला होता जो मीडनाईट ब्लॅक वेरिएंट प्रमाणे 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी ला सपोर्ट करतो. हा एक लिमिटेड एडिशन होता जो देशात 44,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here