वनप्लस 6टी ची तयारी जोरात सुरू, कमीशन वेबसाइट वर झाला लिस्ट लवकरच होईल लॉन्च

वनप्लस त्या निवडक टेक कंपन्यांपैकी एक आहे जी वर्षभरात काहीच स्मार्टफोन बाजारात घेऊन येते. ​वनप्लस चे हे नेमकेच स्मार्टफोन मॉडेल्स संपूर्ण टेक बाजार हलवून टाकतात आणि त्यामुळेच वनप्लस च्या स्मार्टफोन्सना फ्लॅगशिप कीलर बोलले जाते. वनप्लस ने काही दिवसांपूर्वी आपल नवीन फ्लॅगशिप कीलर वनप्लस 6 लॉन्च केला होता जो एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स ची पहिली पसंती म्हणून समोर आला आहे. वनप्लस दरवर्षी आपल्या स्मार्टफोन्सचा ‘टी’ वर्जन घेऊन येत असते आणि यावेळी लोक वनप्लस 6टी ची आतुरतेने वाट बघत आहेत. पण असे वाटते आहे की ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. वनप्लस 6टी स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट वर करण्यात आला आहे.

वनप्लस 6टी रशिया च्या यूरोशियन इकोनॉमिक कमीशन (ईईसी) च्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला आहे. तसे पाहता वनप्लस 6टी बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत पण ही लिस्टिंग वनप्लस 6टी चा पहिला सॉलिड प्रूफ असल्याचे बोलेल जात आहे. ईईसी वर वनप्लस 6टी ए6013 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. लि​स्टिंग मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स किंवा याच्या फीचर्स चा उल्लेख करण्यात आला नाही पण या वेबसाइट वर वनप्लस 6टी दिसल्याने स्पष्ट झाले आहे की, वनप्लस कंपनी आपल्या नेक्स्ट फ्लॅगशिप कीलर ची तयारी करत आहे आणि लवकरच हा अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला जाईल.

वनप्लस 6टी बद्दल आता पर्यंत आलेल्य लीक्स नुसार हा फोन 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्याच्या वरच्या बाजूला नॉच असेल. कंपनी या फोन मध्ये 8जीबी रॅम देऊ शकते. तसेच लीक्स नुसार वनप्लस 6टी 2 स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 128जीबी मेमरी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते.

लीक्स नुसार वनप्लस 6टी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 किंवा स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर 3डी डेफ्थ सेंसर वाला डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप च्या बाबतीत पण वनप्लस 6टी आपल्या आधीच्या मॉडेल पेक्षा एडवांस होईल आणि यात डॅश चार्ज वाली 3,700एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here