OnePlus 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-real-photo-image-leaked-front-back-panel-dual-punch-hole-rear-camera-3-5mm-audio-jack/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-real-photo-image-leaked-front-back-panel-dual-punch-hole-rear-camera-3-5mm-audio-jack/#respond Mon, 11 Nov 2019 10:20:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5740 प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो.

The post OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus त्या ब्रँड्स पॅकी एक आहे, जो निवडक स्मार्टफोन्सच्या जीवावर मोबाईल मार्केटच्या मोठ्या हास्यवर राज्य करतो. OnePlus चे स्मार्टफोन हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात ज्यांची किंमत पण कमी असते. याच कारणांमुळे OnePlus ला फ्लॅगशिप कीलर म्हटले जाते. OnePlus 7 आणि OnePlus 7T च्या यशानंतर आता कंपनीची नजर OnePlus 8 वर आहे, जो ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असेल. तसे OnePlus 8 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत, पण या आठवड्यात OnePlus 8 चा खरा फोटो पण इंटरनेट वर वायरल झाला आहे.

OnePlus 8 ची खरी ईमेज समोर आली आहे. फोनचा फोटो टिपस्टर स्लॅशलीकने पोस्ट केला आहे ज्यात एक व्यक्ति हा स्मार्टफोन वापरत आहे. फोनच्या एका फोटो मध्ये OnePlus 8 यूजरच्या हातात आहे ज्यात फोनचा फ्रंट पॅनल दिसत आहे तसेच दुसऱ्या फोटो मध्ये तोच फोन टेबल वर उलटा ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनलची झलक मिळाली आहे ज्यावरून रियर कॅमेरा सेटअप डिजाईनचा खुलासा झाला आहे.

असा असेल OnePlus 8 चा लुक

फ्रंट पॅनल

1. OnePlus 8 च्या फ्रंट पॅनल वर डुअल पंच-होल देण्यात आला आहे.

2. हा पंच-होल डिजाईन स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला आहे.

3. खास बाब अशी कि हा डुअल पंच-होल पूर्णपणे उजव्या बाजूला नाही तर पंच होल आणि राईट एजच्या मध्ये जागा आहे.

4. OnePlus 8 च्या पंच-होल आणि राईट एज मध्ये नोटिफिकेशन्स आईकन फ्लॅश होत आहेत.

5. OnePlus 8 मध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलच्या दिशेला वाकलेला आहे.

6. OnePlus 8 मध्ये चिन पार्ट दिसत नाही. कदाचित हा फोन फुलव्यू डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो.

रियर पॅनल

7. OnePlus 8 च्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअपच्या मध्ये देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

8. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट आहे.

9. रियर पॅनल वर मधोमध OnePlus ची ब्रँडिंग आहे. इथे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही.

10. OnePlus 8 च्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला 5G पण लिहिण्यात आले आहे. म्हणजे हा फोन 5जी कनेक्टिविटी सह येईल.

साईड व लोवर पॅनल

11. OnePlus 8 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

12. फोनच्या लोवर पॅनल वर तीन कट आउट आहेत.

13. यात मधोमध यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे.

14. यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक आहे.

15. OnePlus 8 या फोटो मध्ये पर्पल कलर शेड मध्ये दिसत आहे.

OnePlus 8 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार OnePlus 8 मध्ये 12 जीबी रॅम मिळू शकतो. तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे क्वॉलकॉम आगामी काळात हा चिपसेट लॉन्च करेल. तसेच OnePlus 8 कंपनी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करू शकते. पण तरीही OnePlus 8 च्या अधिकृत माहितीसाठी वाट बघावी लागेल.

The post OnePlus 8 चा रियल फोटो आला समोर, बघा का असेल हा ब्रँडचा सर्वात वेगळा आणि एडवांस स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-8-real-photo-image-leaked-front-back-panel-dual-punch-hole-rear-camera-3-5mm-audio-jack/feed/ 0
OnePlus 7T भारतात झाला लॉन्च, फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये झाली दमदार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-launch-price-specifications-features-sale-offer-india/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-launch-price-specifications-features-sale-offer-india/#respond Fri, 27 Sep 2019 12:40:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5434 या फोनचा सेल अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाइट वर 28 सप्टेंबरला केला जाईल.

The post OnePlus 7T भारतात झाला लॉन्च, फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये झाली दमदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आजचा दिवस इंडियन टेक मार्केट साठी खूप खास होता. फ्लॅगशिप कीलर नावाने प्रसिद्ध टेक ब्रँड OnePlus ने आज भारतात एक साथ दोन बहुप्रतीक्षित डिवाईस लॉन्च केले आहेत. कंपनीने OnePlus 7T आणि OnePlus TV देशात आणले आहेत जे इंडियन मंचावरून पहिल्यांदा जगासमोर आले आहेत. OnePlus TV द्वारे वनप्लस कंपनीने स्मार्टफोनच्या दुनियेनंतर स्मार्ट टेलीविजन विश्वात पण आपली सुरवात केली आहे, तर OnePlus 7T स्मार्टफोन सह कंपनीने आपल्या OnePlus 7 सीरीजचा विस्तार केला आहे. चला एक नजर टाकू OnePlus 7T च्या लुक, स्पेसिफिकेशन्स आणि या दमदार फोनच्या किंमतीवर.

OnePlus 7T डिजाईन

वनप्लस ने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 7T मध्ये नवीन डिजाईन वापरली आहे. आतापर्यंत OnePlus स्मार्टफोन्स मध्ये वर्टिकल शेप रियर कॅमेरा दिला जात होता पण OnePlus 7T मध्ये कंपनीने राउंड शेपचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर मधोमध आहे जो बॉडीपासून थोडा वर आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आहेत जे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहेत. कॅमेरा सेंसरच्या खाली राउंड शेप मधेच फ्लॅश लाईट आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली OnePlus चा लोगो आहे आणि रियर पॅनल वर खाली OnePlus ची ब्रँडिंग देण्यात आली आहे.

OnePlus 7T फुलव्यू बेजल लेस डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यावर छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या चारही कडा बेजल लेस आहेत डिस्प्ले एज वर कर्व देण्यात आला आहे. फोनच्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर पावर बटण व शार्टकट ‘रिंगर’ की देण्यात आली आहे. OnePlus 7T च्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आहे तसेच लोवर पॅनल वरच डावीकडे सिम स्लॉट देण्यात आला आहे.

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. OnePlus 7T कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणला आहे ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी OnePlus 7T 3डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

OnePlus 7T एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट वर चालतो. OnePlus 7T 8 जीबी रॅम आहे जो भारतात 128 जीबी स्टोरेज आणि 256 जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे OnePlus 7T ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येणार नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.6 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. सोबत हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 12 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी साठी OnePlus 7T मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर देण्यात आला आहे.

OnePlus 7T डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी हा डिवाईस 30वॉट वॉर्प फास्ट चार्ज टेक्नॉलॉजी असलेली 3700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने OnePlus 7t च्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये आणि 8GB रॅम व 256GB वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. या फोनचा सेल अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाइट वर 28 सप्टेंबरला केला जाईल.

The post OnePlus 7T भारतात झाला लॉन्च, फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये झाली दमदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-launch-price-specifications-features-sale-offer-india/feed/ 0
OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/#respond Thu, 22 Aug 2019 14:10:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5098 कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल

The post OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चाइनीज कंपनी वनप्लस आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स साठी नेहमीच चर्चेत असते. आता कंपनीने स्मार्टफोन व्यतिरिक्त टीव्ही मार्केट मध्ये पाऊल टाकण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच आपली पहिली स्मार्ट टीव्ही रेंज सादर करणार आहे, जिचे नाव OnePlus TV असेल.

आता वनप्लस स्मार्ट टीव्ही सेगमेंट बद्दल कंपनीचे सीईओ पेटे लाऊ यांनी सांगितले आहे कि वनप्लस टीव्ही एक्सक्लूसिवली भारतात लॉन्च केला जाईल जी अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

अमेझॉन इंडिया वर सध्या टीव्ही साठी एक वेगळी माइक्रोसाइट बनवण्यात आली आहे, ज्यात ‘Notify Me’ चा ऑप्शन येत आहे. कंपनीने हे आधीच सांगितले आहे कि OnePlus TV सप्टेंबर मध्ये लॉन्च केली जाईल आणि हि इंडियन मार्केट साठी एक्सक्लूसिवली लॉन्च केली जाईल.

तसेच समोर येत असलेल्या माहिती नुसार टीव्ही सोबत कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल. बोलले जात आहे कि कंपनी आपला टीव्ही आणि फोन्स एकाच दिवशी सादर करू शकते.

कंपनीच्या सीईओनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि टीव्ही डेवलप करताना कंपनीचे लक्ष याच्या इमेज आणि साउंड क्वालिटी वर होते. पेटे लाऊ म्हणाले कि यूजर्स साठी इमेज क्वॉलिटी सर्वात महत्वाची आहे आणि यासाठी कंपनीने आपल्या टीव्हीची सर्वोत्तम टीव्ही सोबत तुलना केली आहे.

OnePlus स्मार्ट टीव्हीचे काही मॉडेल्स TPV Display वर बनलेले असतील तर कंपनी OLED पॅनल वर पण स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. आशा आहे कि OnePlus स्मार्टटीव्ही मध्ये 4K HDR स्क्रीन, एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम आणि AI टेक्नोलॉजी मिळेल.

The post OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/feed/ 0
4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल OnePlus 7, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-sale-starts-in-india-on-4-june-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-sale-starts-in-india-on-4-june-price-specifications/#respond Wed, 29 May 2019 13:05:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4446 OnePlus 7 चा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल OnePlus 7, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप ​कीलर नावाने ओळखली जाणाऱ्या टेक कंपनी OnePlus ने काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत स्मार्टफोन्सची रेंज वाढवत दोन नवीन व पावरफुल डिवाईस OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च केले होते. OnePlus 7 Pro पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह येतो तर OnePlus 7 वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोन लॉन्च सोबतच OnePlus 7 Pro देशात सेल साठी उपलब्ध झाला होता पण कंपनीने OnePlus 7 बाजारात आणला नव्हता. आज कंपनीने OnePlus 7 ची तारीख सांगितली आहे.

OnePlus ने अधिकृतपणे माहिती देत सांगितले आहे कि OnePlus 7 स्मार्टफोन येत्या 4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. OnePlus 7 Pro वर्जन प्रमाणे OnePlus 7 स्मार्टफोन पण कंपनीच्या आफिशियल वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विक्री साठी उपलब्ध होईल. किंमत पाहता OnePlus 7 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली तर OnePlus 7 चा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus 7
फोनचे स्पेसि​फिकेशन्स पाहता OnePlus 7 2,340 x 1,080 ​पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.41-इंचाच्या आप्टिक एमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोन अनलॉकिंग साठी फोनच्या स्क्रीन मधेच अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस वर सादर केला गेला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो.

OnePlus 7 फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा 0.8-माइक्रोन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा बद्दल बोलायचे तर OnePlus 7 च्या फ्रंट पॅनल वर नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण आहे. तसेच पावर बॅकअप साठी OnePlus 7 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली बॅटरी देण्यात आली आहे. येत्या 4 जून पासून हा फ्लॅगशिप कीलर भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

OnePlus 7 Pro
OnePlus 7 Pro मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले दिला आहे ज्याचे रेजोल्यूशन 3120×1440 पिक्सल आहे. तसेच फोनचा आस्पेक्ट रेशियो 18.5:9 आणि स्क्रीन-टु-बॉडी रेशियो 93 टक्के आहे. OnePlus 7 Pro 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने यात 48-मेगापिक्सलची Sony IMX5867पी लेंस आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबत दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे जो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो.

बॅटरी बद्दल बोलायचे तर OnePlus 7 Pro मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे कि फक्त 20 मिनिटांत हा 48 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच डिवाइस एंडरॉयड 9 पाई बेस्ड ऑक्सिजन ओएस वर चालतो.

The post 4 जून पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल OnePlus 7, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-sale-starts-in-india-on-4-june-price-specifications/feed/ 0
भारतात सुरु झाला OnePlus 7 Pro चा सेल, खरेदीवर मिळेल 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-goes-on-sale-in-india-heres-how-you-can-get-discount-on-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-goes-on-sale-in-india-heres-how-you-can-get-discount-on-amazon/#respond Fri, 17 May 2019 12:34:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4324 या फोनच्या खरेदीवर रिलायंस जियो 9300 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर करत आहे.

The post भारतात सुरु झाला OnePlus 7 Pro चा सेल, खरेदीवर मिळेल 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने अलीकडेच आपले दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चा समावेश होता. वनप्लस 7 चा सेल जून पासून सुरु होईल तर याचा प्रो वर्जन म्हणजे OnePlus 7 Pro चा सेल सुरु झाला आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुम्ही अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट वर विकत घेऊ शकता.

OnePlus 7 Pro ची किंमत 48,999 रुपायनपासून सुरु होत आहे. या फोनचे दोन वेरियंटच सेल साठी उपलब्ध आहेत, ज्यात OnePlus 7 Pro Mirror Grey (6 + 128 GB) आणि Mirror Grey, Almond, Nebula Blue (8 + 256 GB) चा समावेश आहे. दोन्ही वेरिएंटची किंमत क्रमश: 48,999 रुपये व 52,999 रुपये आहे. तर OnePlus 7 Pro Nebula Blue (12 + 256 GB) 28 मे ला सेल साठी येईल, ज्याची किंमत 57,999 रुपये आहे. 16 मे म्हणजे गुरुवारी वनप्लस 7 प्रो चा सेल अमेझॉन वर प्राइम ग्राहकांसाठी आला होता. तसेच वनप्लस ने पण वनप्लस अर्ली बर्ड सेलचे आयोजन केले होते.

ऑफर्स
OnePlus 7 Pro च्या खरेदीवर अनेक ऑफर्स पण मिळत आहेत. या फोन वर 8000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. तसेच अलावा स्मार्टफोन वर नो कॉस्ट ईएमआई चा विकल्प पण दिला जात आहे. जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुम्हाला 2000 रुपयांचा अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच 70 टक्क्यांची बाई बॅक वॅल्यू पण मिळत आहे. या फोनच्या खरेदीवर रिलायंस जियो 9300 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर करत आहे.

OnePlus 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 7 Pro मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले दिला आहे ज्याचे रेजोल्यूशन 3120×1440 पिक्सल आहे. तसेच फोनचा आस्पेक्ट रेशियो 18.5:9 आणि स्क्रीन-टु-बॉडी रेशियो 93 टक्के आहे. OnePlus 7 Pro 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने यात 48-मेगापिक्सलची Sony IMX5867पी लेंस आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबत दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे जो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो.

बॅटरी बद्दल बोलायचे तर OnePlus 7 Pro मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे कि फक्त 20 मिनिटांत हा 48 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच डिवाइस एंडरॉयड 9 पाई बेस्ड ऑक्सिजन ओएस वर चालतो.

The post भारतात सुरु झाला OnePlus 7 Pro चा सेल, खरेदीवर मिळेल 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-goes-on-sale-in-india-heres-how-you-can-get-discount-on-amazon/feed/ 0
OnePlus 7 Pro ची प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या कुठे करावा बुक आणि पद्धत काय आहे https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-pre-booking-starts-in-india-know-how-to-book-price-details/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-pre-booking-starts-in-india-know-how-to-book-price-details/#respond Fri, 03 May 2019 12:47:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4232 OnePlus 7 Pro प्री-बुक करणाऱ्या यूजर्सना 15,000 रुपयांचे फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट बेनिफिट पण दिले जात आहेत.

The post OnePlus 7 Pro ची प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या कुठे करावा बुक आणि पद्धत काय आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेव्हा पासून वनप्लस ने घोषणा केली आहे कि कंपनी आपला नवीन फ्लॅगशिप ​​कीलर आणणार आहे तेव्हापासूनच फक्त टेक विश्वात नव्हे तर स्मार्टफोन यूजर्स मध्ये पण उत्सुकता आहे. वनप्लसने सांगतले आहे कि कंपनी येत्या 14 मे ला एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंटच्या मंचावरून नवीन फ्लॅगशिप कीलर OnePlus 7 Pro स्मार्टफोन समोर येईल. चर्चा अशी आहे कि कंपनी यावेळी दोन फोन लॉन्च करेल आणि यात OnePlus 7 पण असेल. वनप्लस फॅन्स साठी खुशखबर अशी आहे कि आज पासून हे नवीन डिवाईस इंडिया मध्ये प्री-बुकिंग साठी पण उपलब्ध झाले आहेत.

अशी करा प्री-बुकिंग
वनप्लसचे आगामी डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन वर प्री-बुकिंग साठी सादर केले गेले आहेत. विशेष म्हणजे तिथे फक्त OnePlus 7 Pro प्री-बुकिंग केली जात आहे. फोनच्या प्री-बुकिंग साठी यूजरला 1,000 रुपये द्यावे लागतील. हि प्री-बुकिंग अमाउंट फोन विकत घेताना त्याच्या किंमतीतून कमी केली जाईल, सोबतच OnePlus 7 Pro प्री-बुक करणाऱ्या यूजर्सना 15,000 रुपयांचे फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट बेनिफिट पण दिले जात आहेत.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह लॉन्च होईल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला Vivo V15 Pro

ऑफलाइन प्लेटफॉर्म वर OnePlus 7 Pro बुक करणाऱ्या यूजर्स साठी फोनची प्री-बुकिंग 8 मे पासून सुरु केली जाईल. वनप्लस स्टोर सोबत क्रोमा आणि रिलायंस ​स्टोर्स वर जाऊन हा फोन प्री-बुक करता येईल. ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर प्री-बुकिंग साठी यूजर्सना 2,000 रुपये द्यावे लागतील जे फोनच्या किंमतीत एडजस्ट केले जातील.

लॉन्च डिटेल
OnePlus येत्या 14 मे ला बेंगलुरु मध्ये ईवेंटचे आयोजन करेल ज्यात कंपनीचे नवीन डिवाईस OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च केले जातील. हा ईवेंट 14 मे रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी सुरु होईल. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्याचवेळी वनप्लस इंडिया सोबत यूएस आणि यूरोप मध्ये लॉन्च ईवेंट आयोजित करेल. कंपनी एक साथ जगातील अनेक देशांमध्ये आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. भारतात फोनचा सेल कधी सुरु होईल, यासाठी लॉन्चची वाट बघावी लागेल.

हे देखील वाचा: Mi Home मुळेच जास्त त्रस्त शाओमी प्रीफर्ड पार्टनर, बोलेले-रोज होत आहे नुकसान

स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro दोन्ही फोन 5G कनेक्टिविटी सह येतील. रिपोर्टनुसार OnePlus 7 आणि 7 Pro नावाने लॉन्च होणारे दोन्ही स्मार्टफोन 2 स्टोरेज वेरियंट मध्ये लॉन्च केले जातील. फोनच्या बेस वेरियंट मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल, तसेच दुसऱ्या वेरियंट मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हे फोन क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च होतील.

लीक नुसार OnePlus 7 Pro च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल. तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल, यात 3X ऑप्टिकल झूम असेल. तसेच फोनच्या मागील तिसरा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. OnePlus 7 च्या कॅमेरा सेटअप मध्ये अपर्चर एफ/1.7 वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो. OnePlus 7 किंवा OnePlus 7 Pro पैकी एका मॉडेल मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी असू शकते जी 20 वाट चार्जिंग सपोर्ट सह येईल.

The post OnePlus 7 Pro ची प्री-बुकिंग सुरु, जाणून घ्या कुठे करावा बुक आणि पद्धत काय आहे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-pre-booking-starts-in-india-know-how-to-book-price-details/feed/ 0
OnePlus 7 Pro बद्दल समोर आली आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती, या फीचर्स सह होईल हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-alleged-live-images-reveal-key-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-alleged-live-images-reveal-key-specifications/#respond Wed, 10 Apr 2019 12:28:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4058 कंपनी OnePlus 7 सोबत फोनचा अजून एक वेरियंट लॉन्च करू शकते जो OnePlus 7 Pro असेल.

The post OnePlus 7 Pro बद्दल समोर आली आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती, या फीचर्स सह होईल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस द्वारा यावर्षी सादर केला जाणाऱ्या OnePlus 7 बद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहे. डिवाइस पुढल्या काही महिन्यात लॉन्च केला जाईल. पण यावेळी माहिती समोर आली आहे कि कंपनी OnePlus 7 सोबत फोनचा अजून एक वेरियंट लॉन्च करू शकते जो OnePlus 7 Pro असेल.

अलीकडेच OnePlus 7 को चीनी सोशल मीडिया वेबसाइट वीबो वर दिसला होता, ज्यात त्याच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात एक 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. OnePlus 7 Pro चा फोटो पहिल्यांदा लीक झाला आहे. हा फोन चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबो वर पहिल्यांदा दिसला आहे.

लीक मध्ये फोनचा फ्रंट आणि बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. लीक झालेले फोटो पाहता याच्या फ्रंट पॅनलवर बेजल नाहीत आणि यात नॉच पण नाही. याचा अर्थ असा कि फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे OnePlus चे मुख्य कार्यकारी अधिकारी पेटे लाउ यांनी 2018 च्या डिसेंबर मध्ये सांगितले होते कि OnePlus च्या आगामी फ्लॅगशिप मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट प्रोसेसर दिला जाईल. यावरून हे स्पष्ट झाले आहे कि हा फोन 5G ला सपोर्ट करेल.

OnePlus 7 Pro चे कॅमेरा फीचर्स पाहता जी माहिती इमेज मधून समोर आली आहे त्यानुसार फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा असेल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा 48-मेगापिक्सलचा असेल. तसेच इतर कॅमेरा सेंसर यात 16-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे असतील. त्याचबरोबर फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

सोबतच फोन लेटेस्ट एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर सादर केला जाईल. फोन मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. लाइव इमेज व्यतिरिक्त भारतातील फेमस लीक्सटर इशान अग्रवाल ने एक ट्विट करून वनप्लस 7 प्रो बद्दल माहिती दिली आहे. ट्विट नुसार OnePlus 7 प्रो फ्लॅगशिप वेरिएंट मधील सर्वात महाग हँडसेट असेल, जो मे मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post OnePlus 7 Pro बद्दल समोर आली आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती, या फीचर्स सह होईल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-pro-alleged-live-images-reveal-key-specifications/feed/ 0
वनप्लस 7 चा वीडियो आला समोर, हा फोन बनवेल यशाचे रेकॉर्ड, बघा पहिला लुक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-renders-image-360-degree-video-pop-up-selfie-triple-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-renders-image-360-degree-video-pop-up-selfie-triple-rear-camera-in-marathi/#respond Tue, 05 Mar 2019 10:38:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3769 या वीडियो मध्ये वनप्लस 7 चा फुल लुक दिसत आहे.

The post वनप्लस 7 चा वीडियो आला समोर, हा फोन बनवेल यशाचे रेकॉर्ड, बघा पहिला लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणाऱ्या टेक कंपनी वनप्लस ने आपले नेममकेच स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण वनप्लसचे हे निवडक स्मार्टफोनच हिट झाले आहेत. आपल्या स्मार्टफोन्सचे यश पुन्हा मिळवण्यासाठी कंपनी आता वनप्लस 7 वर काम करत आहे. या स्मार्टफोन बद्दल आतापर्यंत अनेकलीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती मिळाली आहे. त्यातच वनप्लस 7 वर शिक्कामोर्तब करत प्राइज बाबा ने वनप्लस 7 चा रेंडर वीडियो इंटरनेट वर शेयर केला आहे. हा वीडियो प्रसिद्ध टिपस्टर ऑनलीक्स सोबत भागेदारीत बनवण्यात आला आहे आहे ज्यात फोनचा फुल लुक आणि डिजाईन दिसत आहे.

वनप्लस 7 संबंधित आपल्या रिपोर्ट मध्ये प्राइज बाबा ने ऑनलीक्सशी हात मिळवणी करून हा वीडियो शेयर केला आहे. हा वीडियो 5के क्वालिटी वाला आहे जो 360 डिग्री रेंडर वीडियो म्हणून शेयर केला गेला आहे. या वीडियो मध्ये फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनल सोबत दोन्ही साईड पॅनल्स तसेच वरील आणि खालचा पॅनल पण दाखवण्यात आला आहे. या वीडियो वरून वनप्लस 7 चा डिस्प्ले, कॅमेरा सेग्मेंट सोबतच स्पीकर्स, यूएसबी स्लॉट्स तसेच फोन मधील इतर पोर्ट्सची माहिती पण मिळाली आहे. या वीडियो मध्ये वनप्लस 7 चा फुल लुक दिसत आहे.

वनप्लस 7 ची डिजाईन
वनप्लस 7 या वीडियो मध्ये फुलव्यू डिस्प्ले सह दिसत आहे. फोन मध्ये नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या खालच्या बाजूस बारीक बॉडी पार्ट आहे तसेच इतर तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत. नॉच नसल्यामुळे वनप्लस 7 पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा फोनच्या डावीकडे आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याच्या पुढे स्पीकर बार देण्यात आला आहे. या पॉप-अप कॅमेऱ्यात एकच सेंसर आहे. वनप्लस 7 च्या पॉप-अप कॅमेऱ्याची प्लेसमेंट फोनच्या रियर कॅमेऱ्या पासून वेगळी आहे.

32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन

वनप्लस 7 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर मधोमध देण्यात आला आहे. वनप्लस 7 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेऱ्यांच्या ऐवजी दोन इतर सेंसर पण दिसले आहेत ज्यांचे डिटेल अजूनतरी समोर आलेले नाहीत. या कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीचा लोगो आहे. वनप्लस 7 च्या उजव्या पॅनल वर दोन बटण देण्यात आले आहेत ज्यात एक पावर बटण आहे तर दुसरा फिंग​रप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे.

वनप्लस 7 च्या खालच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. समोर आलेल्या या रेंडर मध्ये वनप्लस 7 मध्ये 3.5एमएम जॅक दिसत नाही. वहीं साईड माउंटेड फिंगरप्रिंट बटण व्यतिरिक्त या फोन मध्ये अनलॉकिंग साठी इतर कोणताही ऑप्शन दिसत नाही. वनप्लस 7 चा बॅक पॅनल ग्लॉसी आणि शाईनी आहे. आशा आहे कि कंपनी आपला आगामी स्मार्टफोन ग्लास बॉडी वर लॉन्च करू शकते.

रेडमी नोट 7 ला मागे टाकण्यासाठी आला रियलमी 3 स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळतील शानदार फीचर्स

वनप्लस 7 चे स्पेसिफिकेशन्स
रेंडर वीडियोसोबत रिपोर्ट मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स पण आहेत. रिपोर्ट नुसार वनप्लस 7 मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉमच्या लेटेस्ट आणि पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी वनप्लस 7 मध्ये 4,150एमएएच ची फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी दिली जाऊ शकते. आशा आहे कि वनप्लस 7 दुसऱ्या सहामाहीत भारतात येईल.

सूत्र : प्राइज बाबा

The post वनप्लस 7 चा वीडियो आला समोर, हा फोन बनवेल यशाचे रेकॉर्ड, बघा पहिला लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-renders-image-360-degree-video-pop-up-selfie-triple-rear-camera-in-marathi/feed/ 0
वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-image-leaked-online-show-sliding-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-image-leaked-online-show-sliding-camera-in-marathi/#respond Mon, 14 Jan 2019 12:24:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3378 यावेळी वनप्लस 7 मध्ये स्लाइडर असू शकतो. अशी डिजाइन आपण ओपो फाइंड एक्स मध्ये बघितली आहे.

The post वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्याबद्दल गेल्यावर्षीपासून माहिती समोर येत आहे. बोलले जात आहे कि कंपनी यावर्षी मे किंवा जूनच्या आधी डिवाइस लॉन्च करेल जो वनप्लस 7 असेल. आता स्लॅशललीक ने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात वनप्लस 6टी सोबत वनप्लस 7 पण दिसत आहे. फोटो मध्ये दिसत आहे कि स्मार्टफोन मध्ये बारीक बेजल्स आहेत.

तसेच वनप्लस 6टी च्या तुलनेत वनप्लस 7चे स्पीकर थोडे रुंद वाटत आहेत. या फोटो मध्ये डिवाइसचा खालील भाग दाखवण्यात आलेला नाही. फोटो मध्ये वनप्लस 7 मध्ये कोणतीही नॉच नाही, त्यावरून वाटते कि यावेळी वनप्लस 7 मध्ये स्लाइडर असू शकतो. अशी डिजाइन आपण ओपो फाइंड एक्स मध्ये बघितली आहे.

नोव्हेंबर मध्ये वनप्लस ने आपल्या 6 सीरीजचा नवीन फोन 6टी बाजारात सादर केला होता. दामदार स्पेसिफिकेशन असलेला हा फोन अजूनही खूप चर्चेत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने याच्या नवीन वर्जन वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशनची घोषणा केली होती आणि आता हा फोन भारतात उपलब्ध झाला आहे.

नावावरूनच समजते की हा फोन कंपनी ने ऑटोमोबाइल कंपनी मॅक्लारेन सोबत मिळून आणला आहे. मॅक्लारेन खास करून आपल्या रेसिंग कारसाठी ओळखली जाते आणि कंपनी पण हा फोन स्पीड सोबत जोडून सादर करत आहे. वनप्लस 6टी मॅक्लारेन एडिशन मध्ये 10जीबी रॅम देण्यात आला आहे. भारतात 10जीबी रॅम सह लॉन्च होणार हा पहिला फोन आहे. सोबतच फोन मध्ये वार्प चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीनुसार हा जुन्या डॅश चार्जिंग पेक्षा जास्त फास्ट आहे.

भारतीय बाजारात वनप्लस 6टी ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे पण 6टी मॅक्लारेन एडिशन साठी तुम्हाला 50,999 रुपये द्यावे लागतील. हा वनप्लसचा आतापर्यंतचा सर्वात महाग डिवाइस आहे. वनप्लस 6टी मैक्लारेन एडिशन मध्ये मुख्य फरक रंगाचा आणि रॅमचा आहे. फोन गडद मेटॅलिक रंगात सादर करण्यात आला आहे.

The post वनप्लस 7 मध्ये नॉच ऐवजी असेल स्लाइडिंग कॅमेरा, यावर्षी होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-image-leaked-online-show-sliding-camera-in-marathi/feed/ 0
वनप्लस 7 मध्ये स्क्रीनच्या आत असेल सेल्फी कॅमेरा, फोटो व स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-in-display-selfie-camera-leak-5g-support-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-in-display-selfie-camera-leak-5g-support-specification-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 10:14:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2852 फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल, 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरा सेंसर असतील.

The post वनप्लस 7 मध्ये स्क्रीनच्या आत असेल सेल्फी कॅमेरा, फोटो व स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस या आठवड्याच्या सुरवातीपासून चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी वनप्लस बद्दल बातमी आली होती कि कंपनीने आपल्या 5जी फोन वर काम सुरु केले आहे आणि हा स्मार्टफोन नवीन ब्रॅण्डिंग सह बाजारात आणेल. हा बातमीत सांगण्यात आले होते कि वनप्लस आता पर्यंत फक्त वनप्लस 5, 5टी तसेच वनप्लस 6, 6टी टाइटल सह फोन लॉन्च करत होती तर कंपनीचा हा आगामी 5जी फोन वनप्लस 7 नव्हे तर इत्तर कोणत्या तरी टाइटल/ब्रॅण्ड सह लॉन्च होईल. पण आज समोर आलेल्या एका ताजा लीक मध्ये वनप्लस 7 चे फोटोज शेयर झाले आहेत आणि या फोन मध्ये वनप्लस 7 5जी नेटवर्क सपोर्ट असलेला दाखवण्यात आला आहे.

वनप्लस 7 च्या या क​थित फोटो मध्ये फोन पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या तीन साईड दिसत आहेत ज्या पूर्णपणे फोनच्या बॅक पॅनल पर्यंत कोणत्याही बॉडी पार्ट विना जोडले गेले आहेत. म्हणजे फोनच्या वरच्या तसेच उजव्या व डाव्या बाजूला फक्त फोनची स्क्रीन आहे व फोन बॉडी बिल्कुलही देण्यात आलेली नाही तसेच इथे कोणतीही नॉच व सेंसर नाही. फोनच्या फ्रंट पॅनल वरच स्क्रीनच्या मध्ये कॅमेरा होल आहे. ज्यावरून समजते कि वनप्लस 7 इन-​डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

वनप्लस 7 चा फ्रंट कॅमेरा फोनच्या बॉडी वर नसून डिस्प्ले मध्ये असेल ज्याच्या चारही बाजूला फोनची स्क्रीन असेल. समोर आलेल्या फोटो मध्ये वनप्लस 7 5जी कनेक्टिविटी सपोर्टेड दाखवण्यात आला आहे. तसेच फोनच्या नोटिफिकेशन बार मध्ये फोनच्या डुअल सिम सपोर्टची माहिती मिळते. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि वनप्लसचा सेल्फी कॅमेरा 24-मेगापिक्सलचा असेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल, 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरा सेंसर असतील.

वनप्लस 7 के बॅक पॅनल वरील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेपचा असेल जो फ्लॅश लाईटला सपोर्ट करेल. वनप्लस 7 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिसला नाही त्यामुळे हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार हा फोन पावर बॅकअप साठी 4,150एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल. आधी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि पुढल्या वर्षी बार्सिलोना मध्ये आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या मंचावरून वनप्लस आपला पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च करेल.

पण अजूनतरी वनप्लसचा पहिला 5जी फोन वनप्लस 7 असेल कि कंपनी एखदा नवीन ब्रॅण्ड सादर करेल हे निश्चित सांगता येत नाही. फ्लॅगशिप कीलर नावाने प्रसिद्ध वनप्लस जोपर्यंत आपल्या 5जी फोन व वनप्लस 7 बद्दल आॅफिशियल घोषणा करत नाही तोपर्यंत वनप्लस 7 च्या लीक वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post वनप्लस 7 मध्ये स्क्रीनच्या आत असेल सेल्फी कॅमेरा, फोटो व स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7-in-display-selfie-camera-leak-5g-support-specification-in-marathi/feed/ 0