रेडमी नोट 7 ला मागे टाकण्यासाठी आला रियलमी 3 स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळतील शानदार फीचर्स

भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये शाओमी रेडमी नोट 7 सीरीज, सॅमसंग गॅलेक्सी एम 30 आणि गॅलेक्सी ए सीरीजच्या लॉन्च नंतर आता रियलमी ने आपला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रियलमी 3 च्या लॉन्चने यावर्षी फोन लॉन्च करण्याची सुरवात कंपनी ने केली आहे. याव्यतिरिक्त कंपनी ने लॉन्च इवेंट मध्ये रियलमी 3 प्रोच्या लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनी डिवाइसचा प्रो वर्जन एप्रिल मध्ये लॉन्च करेल.

कंपनी अनेक दिवसांपासून हा स्मार्टफोन टीज करत होती. अलीकडेच फ्लिपकार्ट ने हा फोन टीज केला आहे, ज्यामुळे आधीच समजले होते कि हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल.

किंमत आणि उपलब्धता
कंपनी ने रियलमी 3 सोबत एक आइकॉनिक केस पण लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 599 रुपये आहे. तर रियलमी 3 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. डिवाइस 12 मार्चला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट रियलमी डॉट कॉम वर सेल साठी येईल.

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. रिलयमी 3 हॅन्डसेट मध्ये 12एनएम मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 3जीबी/4जीबी रॅम आणि 32जीबी/ 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह आला आहे. फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि एक डायमंट कट केस आहे. तसेच रियलमी 3 मध्ये ब्लूटूथ वी4.2 सपोर्ट मिळेल. हा फोन कलर ओएस 6 एंडरॉयड 9 पाई आधारित आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये डुअल 4जी वीओएलटीई सिम आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमेरा मध्ये बोके मोड फीचर पण आहे आणि अजून काही क्रिएटिव मोड्स पण आहेत जसे कि मल्टी फ्रेम नॉइस रिडक्शन, हाइब्रिड एचडीआर आणि एआई सीन रिग्नाइजेशन आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here