भारतात सुरु झाला OnePlus 7 Pro चा सेल, खरेदीवर मिळेल 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने अलीकडेच आपले दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चा समावेश होता. वनप्लस 7 चा सेल जून पासून सुरु होईल तर याचा प्रो वर्जन म्हणजे OnePlus 7 Pro चा सेल सुरु झाला आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुम्ही अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या ऑफिशियल साइट वर विकत घेऊ शकता.

OnePlus 7 Pro ची किंमत 48,999 रुपायनपासून सुरु होत आहे. या फोनचे दोन वेरियंटच सेल साठी उपलब्ध आहेत, ज्यात OnePlus 7 Pro Mirror Grey (6 + 128 GB) आणि Mirror Grey, Almond, Nebula Blue (8 + 256 GB) चा समावेश आहे. दोन्ही वेरिएंटची किंमत क्रमश: 48,999 रुपये व 52,999 रुपये आहे. तर OnePlus 7 Pro Nebula Blue (12 + 256 GB) 28 मे ला सेल साठी येईल, ज्याची किंमत 57,999 रुपये आहे. 16 मे म्हणजे गुरुवारी वनप्लस 7 प्रो चा सेल अमेझॉन वर प्राइम ग्राहकांसाठी आला होता. तसेच वनप्लस ने पण वनप्लस अर्ली बर्ड सेलचे आयोजन केले होते.

ऑफर्स
OnePlus 7 Pro च्या खरेदीवर अनेक ऑफर्स पण मिळत आहेत. या फोन वर 8000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. तसेच अलावा स्मार्टफोन वर नो कॉस्ट ईएमआई चा विकल्प पण दिला जात आहे. जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुम्हाला 2000 रुपयांचा अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच 70 टक्क्यांची बाई बॅक वॅल्यू पण मिळत आहे. या फोनच्या खरेदीवर रिलायंस जियो 9300 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर करत आहे.

OnePlus 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 7 Pro मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले दिला आहे ज्याचे रेजोल्यूशन 3120×1440 पिक्सल आहे. तसेच फोनचा आस्पेक्ट रेशियो 18.5:9 आणि स्क्रीन-टु-बॉडी रेशियो 93 टक्के आहे. OnePlus 7 Pro 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे जो क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने यात 48-मेगापिक्सलची Sony IMX5867पी लेंस आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबत दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे जो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो.

बॅटरी बद्दल बोलायचे तर OnePlus 7 Pro मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे कि फक्त 20 मिनिटांत हा 48 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच डिवाइस एंडरॉयड 9 पाई बेस्ड ऑक्सिजन ओएस वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here